Thursday 15 October 2020

१३ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१३ ऑक्टोबर २०२०◆ मनसे बातमीपत्र

१| मनसे पक्ष || कवठे महांकाळ (सांगली)
सांगली-कवठे महाकाळ येथील जॉली बोर्ड (JOLLY BOARD) कंपनी मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व श्री सचिन गोळे आणि जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत स्वीकारले.

२| मनसे प्रवेश || खेड रत्नागिरी
श्री संजय आखाडे यांच्या माध्यमातून आणि खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत खेड तालुक्यातील खोपी, शिरगांव, गुणदे, कुभांड, मिर्ले, कुळवंडी मधील शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांचा (शिवसैनिकांसह) मनसेत जाहीर प्रवेश केला.

३| मनसे प्रवेश || नालासोपारा
मनविसे नालासोपारा-मोरेगाव विभाग प्रभाग क्र. ४७, ३८, ३९, ५१ मध्ये महिला व तरुण युवा विद्यार्थ्यांचे मा. शहर अध्यक्ष श्री. अमितजी नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

४| मनसे यश || नागपूर
नागपूर शहरातील नेहरू नगर झोन मधील टेलिफोन नगर ते नरसाळा रोड वरील खड्डे बुजवण्यात यावे यासाठी मनसेने निवेदन दिले होते आज प्रशासनाने खड्डे बुजवले. 

५| मनसे यश || मिरारोड भाईंदर
१४५ मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष श्री संदीप राणे यांनी दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली असावीत यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती. प्रशासनाने मागणी पूर्ण केली आहे.

६| मनसे यश || मुंबई
प्रभाग १९९ मधील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या बाबत मनसेचे शाखा अध्यक्ष श्री मारुती दळवी यांनी निवेदन दिले होते. अखेर मनसेच्या निवेदनानंतर रस्ता दुरुस्तीचे कामकाज पूर्ण झाले.

७| मनसे यश || कल्याण
मानपाडा रोड ते डोंबिवली स्थानक रस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी मनसेकडून निवेदन देण्यात आले होते, स्थानिक पोलीस प्रशासनाने दखल घेत त्वरित बेकायदेशीर वाहनांवर कारवाई केली.

८| मनसे भेट || पुणे
महावितरणकडून आलेल्या वीज बिलसंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. अशावेळी मनसे कोथरुड विभागाच्यावतीने नागरिकांच्या  तक्रारी सोडविण्याच्या हेतूने लढा पुकारला होता त्याचे फलस्वरूप आज मनसे कार्यालयात महावितरणच्या शिष्टमंडळाने भेट दिली आणि तक्रारी निर्मूलन करण्याचे आश्वासन दिले. 

९| मनसे भेट || डोंबिवली
मनसे आमदार श्री राजू पाटील ह्यांनी KDMC आयुक्तांची भेट घेऊन KDMC  लगतच्या ९ गावातील सुधारीत मालमत्ता कर बाबत चर्चा केली.

१०| मनसे भेट || अमरावती
गिरणी कामगार संघच्या वतीने कामगारांना वेतन मिळवण्यासाठी साखळी उपोषण करण्यात आले होते. मनसेच्या वतीने श्री राज पाटील यांनी उपोषण ठिकाणी भेट दिली. कामगारांनी श्री राज पाटील ह्यांना निवेदन दिले लक्ष घालून प्रश्न सोडवण्यास सांगितले.

११| मनसे निवेदन || पुणे
खडकवासला वडगाव धायरी विभागातील महावितरण कार्यलयात वाढीव वीज बिला संदर्भात मनसे कडून श्री हर्षल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

१२| मनसे निवेदन || बीड
बीड जिल्ह्यात अविवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस, सोयाबीन, कापूस, तूर, पिवळी आदीसह अन्य नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी मनसेचे श्री सुमंत धस यांनी केली आहे.

१३| मनसे निवेदन || नागपूर
मनसे सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, शहराध्यक्ष श्री विशाल बडगे यांच्या नेतृत्वाखाली बँडबाजा वाजयंत्री,घोडा बग्गी, विद्युतीकरण असे अनेक छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या समस्या बाबत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

१४| मनसे निवेदन || उल्हासनगर
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारचा हाथरसप्रकरणी मनसे कडुन निदर्शने करून निषेध करण्यात आला.

१५| मनसे निवेदन || नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गव्हाणफाटा ते बेलापूर या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यामुळे रोज अपघात होऊन सुद्धा ठेकेदाराना जाग येत नाही म्हणून मनसे उलवे शहराच्यावतीने ठेकेदाराना निवेदन दिले. मनसेच्या निवेदन नंतर तात्काळ कामही सुरू झाले.

१६| मनसे निवेदन || चोपडा
चोपडा ते शिरपूरडे-धरणगाव-अमळनेर रस्त्यांवर खूप खड्डे पडले आहेत व खड्यांमुळे अनेक लोकांना प्राण गमवावा लागत आहे १५ दिवसांत हे रस्ते खड्डे विरहित करावे यासाठी मनसेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्यांना रेती-खडीचे प्रतिकात्मक डंपर देऊन निवेदन दिले.

१७| मनसे निवेदन || मुंबई - वडाळा
वडाळा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे श्री निकम यांचेबरोबर  बैठक घेऊन रिक्शा-टॅक्सी आणि इतर वाहन धारकांना परवाना नुतनीकरण, रोड टॅक्स, अनुज्ञाप्ती (लायसन्स) यावर विलंब शुल्क आकारू नये यासाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

१८| मनसे निवेदन || कल्याण
राज्यात ‘दिशा’ कायदा लागू करण्यासाठी कल्याण मनसे महिला सेनेकडून मुख्यमंत्री व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

१९| मनसे निवेदन || अमरावती
शिक्षण विभागाच्या वारंवार बदलणाऱ्या धोरणांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर व गुणांवर होणार विपरीत परिणाम याबाबत मनसेच्या वतीने विभागीय सचिव ह्यांना निवेदन देण्यात आले. 

२०| मनसे निवेदन || पुणे
लोणावळा येथील गॅस सिलेंडरचा अनाधिकृत साठा करत काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी मनसे लोणावळा शहराच्या वतीने करण्यात आली आहे.

२१| मनसे निवेदन || सिंधुदुर्ग
देवगड तालुक्यातील अवैधरित्या चालू असलेले मटका, गुटखा, गोवा बनावटी दारू यावर पोलिस प्रशासनाने ताबडतोब आळा घालावा यासाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

२२| मनसे मुलाखत || पंढरपूर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर चालू करण्यासाठी पक्षाच्या वतीने मनसे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे यांनी "News18India" ह्या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन भूमिका स्पष्ट केली.

२३| मनसे मुलाखत || ठाणे
वर्तक नगर प्रभाग समिती हद्दीत, नगरसेवक निधीतुन उभारण्यात आलेल्या अनेक "स्टुडंट बस शेल्टरची" दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. तसेच या ठिकाणी गर्दुल्ले व इतर मंडळी बसून असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे असा आरोप मनसेचे मयूर तळेकर यांनी "MH4 Media" ह्या वाहिनीला मुलाखत देताना म्हटले आहे.

२४| मनसे उपक्रम || मीरारोड भाईंदर
१४५ विधानसभा अध्यक्ष श्री संदीप राणे यांच्या पुढाकाराने मनसे आणि अष्टविनायक ट्रस्ट च्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना "मोफत मोबाईल फोन" वाटप २५ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

२५| मनसे आरोप || कल्याण डोंबिवली
कल्याण-डोंबिवली शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार असा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

२६| मनसे पोलखोल || पनवेल
रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे नवीन तंत्रज्ञानाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस (रस्ते आस्थापना) श्री योगेश चिले यांच्याकडून पनवेल मनपाची (CIDCO) पोलखोल करण्यात आली.

२७| मनसे इशारा || नगर
खासगी शाळांची वाढीव फी कोणीही भरु नये, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केल्यास संबंधित शाळांच्या चेअरमन व मुख्याध्यापकांच्या तोंडाला मनसे काळे फासणार असा इशारा मनसेचे श्री नितीन भुतारे यांनी दिला आहे.

२८| मनसे उपोषण || रत्नागिरी
मागील आठवड्यात मनसे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांनी वीज दरवाढ विरोधात उपोषण चालू केले तेंव्हा अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत तोडगा काढू असे आश्वासित केले होते,आठ दिवसांनंतर कोणत्याही हालचाली नसल्याने पुन्हा उपोषण चालू.

२९| मनसे आंदोलन || पेण
कारमेल हायस्कूल पेण च्या विरोधात मनसेने रायगड जिल्हा सचिव श्री रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाळेत होणारी मराठी भाषेची गळचेपी, वाढीव फी, वाढीव पुस्तकांची किंमत ह्या मुद्यांवर आंदोलन करण्यात आले.

३०| मनसे मोर्चा || बोरिवली
बोरीवलीतील महानगर गॅसच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक, मनसेचे सरचिटणीस श्री नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा "महानगर गॅस" च्या कार्यालयात गेला होता.

३१| मनसे उपक्रम || अंधेरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे वार्ड क्रमांक ५९ मध्ये मनसे सचिव श्री अल्ताफ खान व संदीप बानेकर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

३२| मनसे सोहळा || अंधेरी
११ ऑक्टोबर रोजी अंधेरी पुर्व विधानसभा वाँर्ड. ७६ येथे विविध ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाम फलकांचा अनावरण सोहळा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

३३| मनसे मेळावा || नळदुर्ग (तुळजापूर)
तुळजापूर येथील रामतीर्थ देवस्थान परिसरात मनसे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्येकर्ता मेळावा संपन्न झाला.

No comments:

Post a Comment