Sunday 25 October 2020

२२ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२२ ऑक्टोबर २०२० ● मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश >> ठाणे >> नवी मुंबई
मा. राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शारीरिक सेना अध्यक्ष ऋषी शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील तरुणांनी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे व शारीरिक सेना नवी मुंबई अध्यक्ष सागर नाइकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> मुंबई >> शीव
शीव येथील।मनसे विभाग अध्यक्ष श्री अनंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विभागातील तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> अहमदनगर >> पारनेर
पारनेर तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> पालघर >> मोखाडा
मोखाडा तालुक्यातील तरुणांनी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> पालघर >> जव्हार
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील तरुणांनी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> पालघर >> विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील तरुणांनी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> रत्नागिरी >> संगमेश्वर
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संगमेश्वर तालुक्यातील नावडी जि प गटातील संगमेश्वर बाजारपेठ येथील युवकांनी  मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

मनसे कार्य >> मुंबई >> भायखळा >> 
कोरोना काळात बंद असलेले बेस्ट वीज बिल भरणा केंद्र मनसेच्या मागणीनंतर अखेर चालू. मनसेचे शाखा अध्यक्ष श्री किरण टाकळे ह्यांनी "बेस्ट वीज बिल भरणा केंद्र" चालू करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.

मनसे कार्य >> मुंबई >> भायखळा
श्री ए जी पवार मार्गावरील खड्यांच्या बाबत मनसे प्रभाग क्रमांक २०८ च्या वतीने मनपा कडे पाठपुरावा करून खड्डे भरून घेतले.

मनसे कार्य >> सिंधुदुर्ग >> देवगड
दाभोळे(देवगड) गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मनसेचे सहसंपर्क अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांना १००० मास्कचे वाटप करण्यात आले.

मनसे इशारा >> वर्धा
 “सोयाबीनला हेक्टरी 40 हजारांची मदत द्या, अन्यथा राज्यातील मंत्र्यांना विदर्भात फिरु देणार नाही,” असा इशारा विदर्भातील मनसेचे नेते अतुल वांदीले यांनी दिला आहे. 

मनसे दणका >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
अवजड वाहनांना बंदी असताना देखील सोडली जात होती अवजड वाहने,मनसे आमदार राजू पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी घेतले वाहतूक पोलिसांना फैलावर.

मनसे दणका >> मुंबई >> जुहू
मनसे विभाग अध्यक्ष श्री मनीष धुरी यांनी कोळी बांधवांची घरे उध्वस्त करणाऱ्या विकासक नरेश जैन याच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मनसे दणका >> मुंबई 
'ईरॉस नाऊ' या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ट्विटर हँडलवर नवरात्रीच्या शुभेच्छा देताना हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार घडला. याबाबत मनसेने इशारा देताच 'ईरॉस नाऊ' व्यवस्थापनाने शरणागती पत्करत आक्षेपार्ह ट्विट डिलिट केले आणि मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे लेखी माफी मागितली. 

मनसे आंदोलन >> चंद्रपूर >> अरोरा
मनसे अरोरा तालुका अध्यक्ष श्री वैभव दहाने यांनी मनसेच्या वतीने अवैध वाळू तस्करी विरोधात मोबाईल टॉवरवर चढून महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

मनसे निवेदन >> रायगड >> JNPT
JNPT परिसरामध्ये Karanja Infra Pvt Ltd कडून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डा सोबत २००९ साली केलेल्या करारानुसार काम पूर्ण न केल्यामुळे सरकारच्या आर्थिक नुकसान केल्याबद्दल कारवाई करावी या बाबतच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना मनसे कडून निवेदन सादर करण्यात आले. 

मनसे निवेदन >> नागपूर
टाळेबंद दिवसागणिक उघडला जात असला तरी छोटे मोठे व्यावसायिकांना अजून परवानगी दिली गेली नाहीय. त्यांना आता व्यवसाय करू द्या अशी मागणी मनसेचे नेते श्री हेमंत गडकरी ह्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

मनसे निवेदन >> मुंबई >> गोरेगाव
मराठी मध्ये माहिती देण्यास नकार देणाऱ्या उर्मट "जस्ट डाईल"
कंपनीच्या कार्यालयात मनसेचे गोरेगाव विभाग अध्यक्ष श्री विरेंद्र जाधव ह्यांनी भेट दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना झालेल्या प्रकार बाबत माफी मागायला लावली, पुन्हा असे प्रकार घडल्यास मनसे दणका बसेल असे समजावले. 

मनसे निवेदन >> यवतमाळ >> मोहदा
यवतमाळ पांढरकवडा राज्य क्र.६ वर मोठे खड्डे पडून रोज अपघात होत आहेत. मनसे तालुकाध्यक्ष पांढरकवडा तृषाल ग्रबाणी यांनी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाला निवेदन दिले.

मनसे निवेदन >> पालघर >> नालासोपारा
कोरोना काळात आर्थिक संकट सर्वांवर आले आहेत, वीज ग्राहकांना महावितरण विभागाने दिलासा द्यावा, मीटर कापू नयेत अश्या मागणीसाठी नालासोपारा शहर उपाध्यक्ष श्री कैलास पवार ह्यांनी महावितरणला निवेदन दिले.

मनसे निवेदन >> जालना
नाटकी पंचनामे बंद करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागमी मनसेच्या वतीने विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही आक्रमकपणे मांडा ह्यासाठी मनसेचे जालना जिल्हा अध्यक्ष श्री  गजानन गीते ह्यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवेदन दिले.

मनविसे निवेदन >> मुंबई >> भायखळा
जिओ सारख्या कंपन्या मनपाचा कर कशाप्रकारे बुडवते आणि त्यांच्यामूळे स्थानिक केबल व्यवसायिकांना कशाप्रकारे अर्थिक नुकसान होत आहे ह्याबाबत मनसेचे केबल सेना उपाध्यक्ष श्री सुनिल शिर्के, मनविसे उपाध्यक्ष मनीष पाथरे ह्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन >> अहमदनगर
कोरोना उपचारासाठी रुग्ण आणि नातेवाईक यांच्याकडून झालेली लूट सरकारी ऑडिट करून परत करण्यात यावी यासाठी मनसेचे सचिन दफळ, नितीन भुतारे ह्यांनी नगर मनपा आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली.

मनसे मागणी >> धाराशिव
शेतकऱ्यांचे अश्रू फुसायला येतात आणि फोटो काढून निघून जातात, प्रत्यक्षात मदत मिळणे हे दूरच. म्हणून मनसेने धाराशिव जिल्हा "VIP सेल्फी पॉइंट" म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

मनसे उपक्रम >> अमरावती
अमरावती शहर प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने मनसेचे शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर यांच्या तर्फे नवरात्रोत्सव मंडळात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

मनसे उपक्रम >> ठाणे >> आंबिवली (कल्याण)
मनसे आंबिवली टीम कडून पॅन कार्ड शिबिर सह "जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना" ह्याबाबत जनजागृती व योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी शिबीर नियोजन केले आहे.

मनसे उपक्रम >> मुंबई
मनसे वाहतूक सेना आपल्या सेवेत घेऊन येत आहोत "मोफत रक्तदान, प्लाझ्मा दान", ह्या रक्त साखळीसाठी सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य लाभत आहे असेच सहकार्य राहुद्या. (संपर्क: अजय-९८९२३६२९०७, विशाल-९११२३३४२५५, गाैरव-८१०८०१०२२२, अनुष -९९२०९०६०१०)
 
मनसे उपक्रम >> ठाणे >> डोंबिवली
घारीवली गावचे माजी सरपंच श्री योगेश रोहिदास पाटील ह्यांच्या पुढाकाराने अपंगांसाठी "मोफत स्वावलंबन कार्ड" हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मनसे उपक्रम >> ठाणे >> पाचपाखाडी
मनसे पाचपाखाडीचे श्री दिनेश मांडवकर यांनी नवरात्र उत्सवचे औचित्य साधून विभागातील डॉक्टर, परिचारिका, पत्रकार, बस चालक, वाहक ह्यांचा सत्कार केला.

मनसे आवाहन >> सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांचे व्यवहार सर्रास होत आहेत. मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर ह्यांनी तरुणांना अमली पदार्थांपासून वेळीच सावध होण्याचे आवाहन केले आहे.

मनसे आवाहन >> पुणे
मनसे महिला पुणे शहर अध्यक्षा रुपालीताई पाटील यांनी कामचुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात जम्बो कोविड सेंटर मधील डॉक्टर आणि इतर स्टाफच्या मागण्यांसाठी आपल्यालाच आंदोलन करावे लागेल असे आवाहन केले आहे.

मनसे भेट >> मुंबई >> अंधेरी
अंधेरी, जोगेश्वरी येथील असंघटित रिक्षा चालक ह्यांनी अंधेरी पूर्व येथील मनसे कार्यालयात आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. श्री सुरेंद्र पाल ह्यांनी श्री संजय नाईक आणि श्री आरिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या समस्यांचे निवारण लवकरच केले जाईल असे आश्वासित केले.

मनसे भेट >> मुंबई >> अंधेरी
मुंबई मनपा मध्ये कोरोना योद्धे म्हणून काम करणारे ४० कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन दिले जात न्हवते. कामगारांनी मनसे विभाग अध्यक्ष श्री संदेश देसाई यांची भेट घेतली. श्री देसाई ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सात दिवसात वेतन तुमच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासित केले.

मनसे भेट >> मुंबई
बॉम्बे मरकंटाईल बँक मधील कर्मचाऱ्यांनी मनसे नेते श्री नितिन सरदेसाई यांची भेट घेतली. बँक व्यवस्थापनाकडून वर्षानुवर्षे होणारे गैरप्रकार व कर्मचारी वर्गाला होणारा त्रास याबद्दल त्यांनी माहिती दिली. 

मनसे सूचना >> मुंबई >> Tweet
मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी राज्यातील सर्व सिग्नल वर टायमर यावेत अशी सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांना केलीय जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि इंधनाची बचत होईल.

No comments:

Post a Comment