Thursday 8 October 2020

५ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

५ ऑक्टोबर २०२० ● मनसे बातमीपत्र

.मनसे भेट●मुंबई
मुंबईत डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. त्यांच्या मुजोरीमुळे कोळी बांधवांचा व्यवसाय मंदावला.'राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा' अशी मागणी करत कोळी भगिनी कृष्णकुंजवर. राजसाहेबांनी प्रश्न मार्गी लावण्याबद्दल केलं आश्वस्त. 

मनसे भेट●मुंबई
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्री संजय नाईक यांनी मासळी विक्रेत्यांचा प्रश्न हाताळत डोंगरी पोलीस स्थानकात धाव घेतली.स्थानिक पोलिसांच्या हा मुद्दा लक्षात घालून दिला.

मनसे भेट●विरार(पालघर)
वसई विरार मधील जिम चालू करावी ह्यात मनसेने अधिक प्रखरतेने लक्ष घालावे अश्या मागणीसाठी वसई विरार मधील जिम चालकांनी श्री अविनाश जाधव(ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष) यांची भेट घेतली.

मनसे भेट●मुंबई
श्री संदीप देशपांडे यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन विभागातील जेष्ठ नागरिकांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

मनसे प्रवेश●ब्राह्मपुरी (चंद्रपूर)
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन,मनसेच्या कार्यशैलीवर प्रभावित होत,चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त तालुका ब्रम्हपुरी येथील तालुकाध्यक्ष श्री सूरज शेंडे यांच्या नेतृत्वात काल ज्येष्ठ  व युवकांनी मनसेत प्रवेश केला.

मनसे प्रवेश●नागपूर
पारडी प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपच्या कार्येकर्त्यांनी श्री धीरज चीचघरे(पूर्व नागपूर उपाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे प्रवेश●पारनेर(अहमदनगर)
मनसे पारनेर  तालुकाध्यक्ष मा. बाळासाहेब माळी(नाना) यांच्या उपस्थितीत तरुणांनी मनसेत प्रवेश केला.त्यावेळी अहमदनगर मनसे जिल्हाउपाध्यक्ष मारुतीशेठ रोहकले तसेच  मनसे पारनेरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

मनसे प्रवेश●जुन्नर(पुणे)
जुन्नर येथील तरुणांनी आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश●अंधेरी(मुंबई)

#मनसे_प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,अंधेरी पूर्व विधानसभा येथे मा.श्री.राज साहेब ठाकरे ह्यांच्या विचारांना प्रेरीत होऊन,,विभाग अध्यक्ष रोहन विजय सावंत ह्यांच्या मार्गदशनाने धर्मेश विसारिया ह्यांच्या सह वॉर्ड क्र ८१ व ७६ येथील अनेक तरुणांनी केला पक्ष प्रवेश. 

मनसे यश●संभाजीनगर
चिखलठाना येथील कोविड रुग्णांसाठी वापरल्या गेलेल्या वस्तू त्याच परिसरात जाळण्यात येतात त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या जीवीतव्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.मनसेने संबंधित अधिकाऱ्यांना वेठीस धरून कचऱ्याची विल्हेवाट लावून घेतली.

मनसे यश●ठाणे
ठाणे पाचपाखाडी येथील ओपन हाऊस परिसरातील धोकादायक दुभाजक मनसेच्या श्री केदार जोशी(शाखा अध्यक्ष) यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर हटवण्यात आला.

मनसे यश●जळगाव
जळगाव स्थानक परिसरात शिवाजी नगर मधील राहिवाश्यांना रेल्वे पूल ओलांडून जाता यावा यासाठी मनसेने पाठपुरावा केला होता,अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश आले अशी माहिती श्री जमील देशपांडे यांनी दिली.

मनसे यश●वैजापूर(संभाजीनगर)
समृद्धी महामार्ग मुळे तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली होती, मनसेने दोन वेळा रस्ता रोको,धरणे आंदोलन, शेवटी कार्यालयात तोडफोड केल्यानंतर अखेर रस्त्याचे कामकाज चालू झाले.

मनसे यश●भिलवडी
भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असताना शव विच्छेदन खोलीमध्ये रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची एक वेगळीच घटना भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडली,उपहारगृह ऑक्सिजन रूम साठी देण्याचे आदेश आले होते तरीही उपहारगृह चालूच होते मनसेच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग येऊन उपहारगृह खाली करण्यात आले आहे.

मनसे विरोध●कर्जत(रायगड)
कर्जत येथे गजबजलेल्या लोक वस्तीत खाजगी सुखम हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर बनवण्याच्या हालचाली होत होत्या मनसे कर्जत शहराच्या वतीने आणि स्थानिक नागरिकांनी ह्याला जोरदार विरोध दर्शविला आहे.

मनसे निवेदन●पुणे
मनसे प्रभाग क्रमांक २ च्या वतीने दिनांक ५/१०/२०२० रोजी दुपारी १२ वाजता संगमवाडी क्षेत्रीय कार्यालय, येरवडा, विद्युत  विभाग अधिकारी यांना प्रभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

मनसे निवेदन●गुहागर(रत्नागिरी)
एल & टी कंपनीमध्ये कामगार भरतीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने निवेदन

मनसे आंदोलन●मुंबई
बलात्काराच्या आरोपींना फाशीच द्या,उत्तर प्रदेश येथील हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीच व्हायला हवी या मागणीकरीता आज मनसेतर्फे मनसे नेते श्री नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क परिसरात पुतळ्यांना फासावर लटकवून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन●अहमदनगर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार मागणी करूनही नगरमधील काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती होत नसल्यामुळे, या खराब रस्त्याला खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव मनसेने आंदोलन केले.
.
मनसे विनंती●बोरिवली(मुंबई)
बोरिवली स्थानकातील आपला राष्ट्रीय ध्वज जीर्ण परिस्थितीत आहे,मनसेचे सरचिटणीस श्री नयन कदम यांनी रेल्वे प्रशासनाला लक्ष घालण्यास विनंती केली आहे.

मनसे प्रश्न●ठाणे
९ महिने होऊनही कोणतेही पूर्व नियोजन न करता भूमिपूजन करून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ? किती दिवस खड्ड्यातून ये जा करावी लागणार आहे...! रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची पर्यायी व्यवस्था काय ? सर्व अनुत्तरित.! ठाणे पाचपाखाडी विभागातील नागरी प्रश्नावरून पालिका प्रशासनाला श्री दिनेश मांडवकर यांनी प्रश्न केला आहे.

मनसे सहभाग●मुंबई
लक्षवेधी ह्या "जय महाराष्ट्र"च्या विशेष कार्यक्रमात "टाळेबंदीचा घोळ मिटवायचा की वाढवायचा.?"ह्या विषयावर मनविसे उपाध्यक्ष श्री अखिल चित्रे ह्यांनी पक्षाच्या वतीने भूमिका मांडली.

मनसे धन्यवाद●मुंबई
TV9 मराठी ह्या चॅनेलने "कृष्णकुंज"वर प्रति सरकार.?"हा स्पेशल रिपोर्ट बनवला आहे प्रत्येकाने जरूर पहा.TV9 मराठी चे खूप खूप धन्यवाद.

मनसे उपोषण/पाठिंबा●वणी(यवतमाळ)
शासनाकडे मंजूर असलेले वणी उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित करावे म्हणून मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व सहकारी आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. वणीतील बार असोसिएशन, व्यापारी असोसिएशन अशा विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मनसे उपक्रम●पुणे
टाळेबंद हळू हळू उघडत आहे,पण मनसेचे काम मात्र थांबत नाहीय,मनसे पुण्याचे नगरसेवक यांच्या पुढाकाराने गोर गरीब लोकांना मोफत अन्नधान्य चे वाटप सुरूच.

मनसे निषेध●मुंबई
वडाळा विधानसभा क्षेत्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तरप्रदेश मधील पीडित महिलेस श्रद्धांजली वाहिली.तसेच विद्यमान भाजप सरकारचा निषेध केला.

मनसे निषेध●पालघर
पालघर मनसेच्या वतीने उत्तरप्रदेश मधील मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध मनसेकडून करण्यात आला.

मनसे सत्कार●गुहागर(रत्नागिरी)
शृंगारतळी कोविड केअर सेंटर च्या सर्व सन्मा. डॉ. यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका तर्फे श्री श्री विनोद जानवळकर आणि टीमने  सत्कार केला.

मनसे नियुक्ती●मुंबई
मनसे रोजगार सेलचे श्री महेंद्र बैसाणे यांनी आज रोजगार विभागातील अनेक पदांवर नियुक्त्या केल्या,सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

मनसे नियुक्ती●सोलापूर
प्रदेश सरचिटणीस मा.दिलीप (बापु) धोत्रे  यांनी सोलापुर जिल्हाध्यक्ष मा.प्रशांतजी गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली मा.विनायक सातव यांची कुर्डुवाडी शहर सचिवपदी नियुक्ती केली.

मनसे इशारा●नाशिक
नाशिक साखर कारखान्याला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे,वाहनचालक त्रस्त आहेत मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मनसे इशारा●नागपूर
नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक २८ मधील रस्त्यांवरील खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत,शहर अध्यक्ष श्री विशाल बडगे आणि श्री लोकेश कामडी(दक्षिण नागपूर उपाध्यक्ष) आणि खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मनसे इशारा●देवगड(सिंधुदुर्ग)
देवगड तालुक्यातील  दाभोळे गावातील खड्डेमय रस्ते याबद्दल निवेदन देण्यात आले, लवकरात लवकर खड्डे बुजवून दाभोळे गावातील ग्रामस्थांना रस्ता व्यवस्थीत करुन दयावा, नाही तर ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा मनसेच्या वतीने इशारा देण्यात आला.

मनसे आरोप●ठाणे
ठाणे मनपा अधिकाऱ्यांना हाताशी धरून धनदांडग्या विकासकांसाठी जनतेचा ३०८ कोटींचा शुल्क बुडवण्याचा डाव आखत आहे असा आरोप मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री संदीप पाचंगे यांनी केला आहे.

मनसे अभिनंदन●बदलापूर(ठाणे)
मनसे बदलापूर महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवनकर यांना "MD24 मुंबई हेडलाईन"या युट्युब चॅनेल ने कोरोना योद्धा म्हणून गौरविले.

मनसे उद्घाटन●आंबेजोगाई(बीड)
देवळा तालुका अंबाजोगाई येथे मनसे पक्ष कार्यालयाचे(शाखेचे)उदघाटन मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मनसे उद्घाटन●ठाणे
ठाणे प्रभाग क्रमांक ११ कोलबाड येथील मनसेच्या शाखेचे उद्घाटन मनसे पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment