Thursday 1 October 2020

१ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१ ऑक्टोबर २०२० •  मनसे बातमीपत्र


1) मा. राजसाहेब ठाकरे 🛑 मुंबई
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील घडलेल्या बलात्कार घटनेबाबत मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला सोबत उत्तरप्रदेश येथी भाजप सरकारचे, प्रशासन आणि मिडियाचे कान टोचले आहेत.

2) मनसे नेते 🛑 मुंबई
कोरोनामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या नागरिकांकडून लुटमार करण्याची एकही संधी राज्य सरकार सोडत नाहीय. टोल वाढीविरोधात मनसे नेते श्री नितिन सरदेसाई यांनी सरकारचे टोचले कान.

3) मनसे यश ⭐ मिरारोड भाईंदर (ठाणे)
काहीच दिवसांपूर्वी मनसे टीमने वाढीव फी विरोधात आंदोलन केले होते आज मीरारोड भाईंदर शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांना नोटीस काढली आहे. हे मनसेच्या आंदोलनाचे फलित आहे.

4) मनसे यश ⭐ मुंबई
प्रभाग क्रं ३६ मधील नागरी समस्या (घनकचरा व्यवस्थापन) बाबत श्री प्रशांत महाडिक (शाखा अध्यक्ष) यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून समस्या सोडवून घेतली.

5) मनसे यश ⭐ विरार (पालघर)
विरार पुर्व येथील कारगिल नगर मधील रस्त्याच्या लगत बंद अवस्थेत असलेले पथदिवे दुरुस्ती करणे बाबत प्रभाग क्र. २५ चे शाखाध्यक्ष श्री. विश्वनाथ कुळे यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून आणि सतत पाठपुरावा करून पथदिवे चालू करून घेतले.

6) मनसे कार्य ⭐ भायखळा (मुंबई)
प्रभाग क्र २०८ प्रभागातील श्री केशवराव बोरकर मार्गावर नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत पाठपुरावा करून रस्त्याची डागडुजी पुन्हा करून घेतली.

7) मनसे उपक्रम ⭐ बदलापूर (ठाणे)
वाढीव वीजबिल वरून जनतेचा रोष वाढत आहे,त्यातच मनसे बदलापूर शहर आणि महावितरण यांच्या वतीने ग्राहक तक्रार निवारण केंद्र आजपासून तीन दिवस चालू होतं आहे. जनतेने वाढीव बिल सोडवून घ्याव्यात.

8) मनसे उपक्रम ⭐ मुंबई
BEST वीज बिल भरणा केंद्र बंद असल्याने मनसे प्रभाग क्रमांक २०८ वतीने नागरिकांना ऑनलाइन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

9) मनसे निवेदन ✍️ अंधेरी (मुंबई)
अंधेरी येथील नेचर बास्केट कंपनीतील अस्वच्छता बाबत मनसेचे श्री प्रशांत राणे यांनी व्यवस्थापनला निवेदन देऊन स्वच्छता राखण्याची मागणी केली आहे.

10) मनसे निवेदन ✍️ संगमेश्वर (रत्नागिरी)
बॅंक ऑफ इंडिया साखरपा शाखेत कायमस्वरूपी गर्दी असल्याने जेष्ठ नागरिकांना ताटकळत गर्दीत उभे रहावे लागते. मनसेने आलेल्या तक्रारीच्या आधारे दिनेश मांडवकर (संगमेश्वर तालुका संपर्क अध्यक्ष) यांच्या सहकाऱ्यांनी जेष्ठ नागरिकांना वेगळ्या खिडकीची मागणी निवेदन देऊन केली आहे. 

11) मनसे मागणी ✍️ उस्मानाबाद
अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांचे खरीपातील सोयाबीन व इतर पिकांचे झालेल्या नुकसानीस शासनाने तात्काळ हेक्टरी ५० हजार रूपयेंची आर्थिक मदत करावी. अशी मागणी अमरराजे कदम (जिल्हा संघटक मनसे उस्मानाबाद) यांनी केली आहे.

12) मनसे मागणी ✍️ JNPT रायगड
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जे एन पी टी येथील उभारत असलेल्या करंजा टर्मिनल लोजिस्टीक पोर्ट व त्या कंपनीच्या अस्थापनाला भेट देऊन स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार देण्याची मागणी कार्याध्यक्ष श्री निशांत (बाळा) गायकवाड आणि मनसे नाविक सेनेकडून करण्यात आली आहे.

13) मनसे आंदोलन 🚩 मुंबई
मनसे सरचिटणीस श्री मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळी, ऐरोली मनसे तर्फे आज टोल वाढ विरोधात आंदोलन केले. आंदोलन कर्त्यांना पोलिस अटक व नंतर सुटका झाली.

14) मनसे आंदोलन 🚩 डोंबिवली (ठाणे)
कल्याण डोंबिवली मनपाच्या ३७ व्या वर्धापन दिनी मनसेकडून खड्यांच्या विरोधात आंदोलन करताना कल्याण डोंबिवली नव्हे, ही तर खड्ड्याण डोंबिवली मनपा असे नामकरण करण्यात आले व खड्ड्यात केक कापला.

15) मनसे दणका 🔥 मुंबई
मनसे नेते नितीन सरदेसाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनसे दणक्यानंतर विमानतळ  प्रशासन ताळ्यावर, कर्मचाऱ्यांचे पगार झाले त्यांच्या  खात्यात जमा. मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार.

16) मनसे ईशारा ⚠️ घणसोली (ठाणे)
व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसह घणसोली मधील विविध नागरी समस्येयांवर घणसोली मनसे आक्रमक, घणसोली विभाग अधिकाऱ्यांन सोबतच प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांना मनसेने धरले धारेवर. सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी न लागल्यास मनसेचा खळखट्याकचा इशारा

17) मनसे नियुक्ती ✅ अमरावती
अमरावती शहराच्या मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या करण्यात आल्या.

18) मनसे आभार 💐 मुंबई
मुंबई मधील डबेवाल्यांनी रेल्वेने प्रवास करता यावा म्हणून मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती,मनसेच्या दबावामुळे सरकारने डबेवाल्यांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे,त्याबद्दल डबेवाल्यांनी मनसेचे आभार मानले आहेत. 

समाप्त

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

@mnsreport9

#mnsrepost

No comments:

Post a Comment