Sunday 25 October 2020

२१ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२१ ऑक्टोबर २०२० • मनसे बातमीपत्र

राजसाहेब • मुंबई
आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नुतन कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले.

मनसे भूमिका • शेतकरी
मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी "ABP माझाने" आयोजीत केलेल्या चर्चासत्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची नाटक बंद करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्या अशी भूमिका मांडली.

मनसे प्रवेश • ठाणे
वसंत विहार,धर्मवीर नगर येथील तरुणांनी आज मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे कार्य • भायखळा
प्रभाग क्रमांक २०८ च्या वतीने प्रभागात (विग्नहर, हेरंब सोसायटी समोर) पडलेल्या खड्यांच्या बाबत पाठपुरावा करून खड्डे भरून घेतले.

मनसे कार्य • पुणे
पुणे येथील मनपा नगरसेवक/ मनसे सरचिटणीस श्री वसंत मोरे यांच्या पुढाकाराने कै कृष्णाजी बळवंत मोरे शाळेला रंगरंगोटी करण्यात आली.

मनसे कार्य • भांडुप
रस्ते आस्थापना विभागाचे संघटक श्री संतोष मयेकर ह्यांच्या पुढाकाराने रेल्वे पोलिसांना मास्क चे वाटप करण्यात आले.

मनसे कार्य • मुंबई
प्रभाग क्रमांक १०८ चे शाखा अध्यक्ष श्री संदीप वरे ह्यांनी गिडवाणी स्कूल ते हनुमान पाडा रस्ता "समाजसेवक बबन दगडू शिंदे (बी.डी.शिंदे मार्ग)" नामफलक साठी पाठपुरावा केला होता. आता तो फलक तब्बल 10 वर्षानंतर मनसेच्या पाठपुराव्याने पूर्ववत.

मनसे कार्य • चाकण (पुणे)
ठेकेदार कडून थकवलेले स्थानिक मराठी व्यवसायिकाचे बिल  ‘मनसे’च्या दणक्याने ठेकेदाराकडून मिळवून दिले, संतोष काळे (चाकण शहर उपाध्यक्ष) शुभम स्वामी (खेड तालुका उपाध्यक्ष) ह्यांनी ठेकेदाराला समज दिली.

मनसे कार्य • कांदिवली
प्रभाग क्रमांक २३ चे शाखा अध्यक्ष श्री किरण जाधव ह्यांनी मुंबई मनपाच्या "मास्क नाही,प्रवेश नाही" ह्या मोहिमेत सहभागी होत. समाजात जागरूकता व्हावी म्हणून प्रभागातील दुकानात सूचना फलक लावत दुकानदारांना सूचना केल्या.

मनसे कार्य • सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून झालेल्या मनसेनच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

मनसे कार्य • विरार
मोरेगाव येथील साई काळकाई अपार्टमेंट च्या बाजूची इलेक्ट्रॉनिक DP मृत अवस्थेत होती. मनसेच्या वतीने पाठपुरावा करून नवीन बसवून घेण्यात आली.

मनसे निवेदन • अमरावती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या होत असलेल्या परीक्षा संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हे लक्षात घेऊन मनविसेचे श्री भूषण फरतोडे आणि हर्षल ठाकरे ह्यांनी  विद्यापीठाच्या व्यवस्थापनास निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

मनसे निवेदन • लांजा
लांजा तालुक्यात,अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन मनसेच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष श्री सचिन साळवी ह्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केलीय.

मनसे निवेदन • भांडुप
भांडुप रेल्वे स्थानकातील ईश्वर नगर येथून स्थानकात येणारे प्रवेशद्वार प्रवाशांसाठी खुले करावे ह्या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने, श्री संतोष पार्टे आणि सहकाऱ्यांनी रेल्वेला निवेदन दिले.

मनसे निवेदन • पारनेर
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून सरकारने पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत करावी ह्या मागणीचे निवेदन मनसे शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले.

मनसे निवेदन • भांबेड (लांजा, रत्नागिरी)
भांबेड गावातील अपघात क्षेत्राच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी किरण रेवाळे ह्यांनी भांबेड ग्रामपंचायत येथे निवेदन दिले.

मनसे निवेदन • विरार (पालघर)
विरार स्थित DNA Infotel ही इंटरनेट सेवा देणारी कंपनी मराठी भाषेला जाणूनबुजून दुय्यम दर्जा देत असल्याचे आढळून आल्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने श्री महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठीला प्राधान्य देण्यासाठी सदर कंपनीला निवेदन दिले.

मनसे निवेदन • भायखळा
प्रभाग क्रमांक २०८ चे शाखा अध्यक्ष श्री किरण टाकळे ह्यांनी नागरिकांच्या मागणीनुसार कोरोना काळात बंद असलेली बस क्र १६८ चालू करण्याची मागणी बेस्ट प्रशासनाकडे निवेदन देऊन केली.

मनसे इशारा • कुडाळ (सिंधुदुर्ग)
कुडाळ बसस्थानक इमारत अडीच कोटी खर्च करून उभारण्यात आली पण अजूनही प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली नाही, मनसे परिवहन सेनेचे उपाध्यक्ष श्री बनी नाडकर्णी ह्यांनी बसस्थानक खुले करा अन्यथा क्रिकेटचे सामने भरवू असा इशारा दिला.

मनसे मोर्चा • उस्मानाबाद
उमरगा - उस्मानाबाद येथे महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित महिलांचा मोर्चा काढण्यात आला. 

मनसे उद्घाटन • भंडारा
लाला लचपतराय वार्ड येथील मनसेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री नितीनभाऊ वानखेडे यांच्या हस्ते झाले.

मनसे आंदोलन • खोपोली (रायगड)
पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सुधागड मनसेने एमएसआरडीसी व बेग कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकार्‍यांना मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे व पदाधिकार्‍यांनी चक्क खड्डे मोजायला लावले.

मनसे नियुक्ती • नागपूर
जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री महेश जोशी, जनहित कक्ष नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीइक्बाल रिजवी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर मधील जनहित कक्षाच्या नियुक्त्या झाल्या.

मनसे नियुक्ती • मीरा भाईंदर(ठाणे)
मनविसे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष पदी श्री शान पवार ह्यांची नियुक्ती करण्यात आली.

No comments:

Post a Comment