Thursday 8 October 2020

६ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

६ ऑक्टोबर २०२० • मनसे बातमीपत्र

१) मनसे पक्षप्रवेश 🔸 इचलकरंजी (कोल्हापूर)
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन जिल्हा उपाध्यक्ष श्री रवि गोंदकर व शहर अध्यक्ष श्री प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत तरुणांनी पक्षप्रवेश केला.

२) मनसे पक्षप्रवेश 🔸 नांदेड
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज माहूर येथील तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

३) मनसे पक्षप्रवेश 🔸 नवी मुंबई
सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई तुर्भे येथील तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश. यावेळी शहर सचिव विलास घोणे, सहसचिव दिनेश पाटील व विभाग अध्यक्ष प्रवीण वाघमारे उपस्थित होते.

४) मनसे दणका 🔹 मुंबई
'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना मनसे दणका दिला.

५) मनसे दणका 🔹 सोलापूर
शासनाचा आदेश येऊन सुद्धा कुर्डुवाडी शहर महिलांना दमबाजी व सक्तीची वसुली करत असणाऱ्या मायक्रो फायनान्स वाल्यांना आकाश लांडे (कुर्डुवाडी शहर संघटक) सोलापूर यांनी मनसे स्टाईल दणका दिला.

६) मनसे दणका 🔹 मुंबई
IIT पवई येथील सुरक्षा रक्षकांचे वेतन तीन महिन्यातून अधिक काळ थकवण्यात आले होते, मनसेच्या दणक्यांनातर IIT व्यवस्थापनने लेखी हमी देत वेतन बँक खात्यावर जमा करू असे आश्वासन दिले. श्री नंदकिशोर तळावडेकर यांचे आभार.

७) मनसे दणका 🔹 मीरारोड भाईंदर(ठाणे)
भाईंदर (प) येथील पोरवाल डायग्नॉस्टिक सेंटरकडून चुकीच्या पद्धतीने लॅब रिपोर्ट दिल्या प्रकरणी खडसावून जाब विचारण्यात आला. व रुग्णांचे देखील पैसे परत देण्यात आले व तसेच न कळत चूक झाली ती देखील डायग्नॉस्टिक सेंटरकडून मान्य करण्यात आली.

८) मनसे कार्य 🔸 मुंबई
पश्चिम रेल्वे लोअर परेल वर्कशॉप मधील कंत्राटदारानी जवळजवळ जुने शंभर ते दीडशे कंत्राट कामगारांना काढून टाकले आणि हि माहिती नेते श्री. बाळा नांदगांवकर साहेब यांना कळताच त्यांनी कंत्राटदाराला समज देऊन खळ्खट्याकचा इशारा दिला आणि पुन्हा त्या जुन्या कामगारांना कामावर रुजू करण्यात आले. 

९) मनसे कार्य 🔸 वैजापूर (संभाजी नगर)
समृद्धी महामार्ग मुळे तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली होती, मनसेने दोन वेळा रस्ता रोको, धरणे आंदोलन, शेवटी कार्यालयात तोडफोड केल्यानंतर अखेर रस्त्याचे कामकाज चालू झाले.

१०) मनसे कार्य 🔸 ठाणे
ठाण्यातील सरस्वती इंग्रजी शाळेत फीससाठी  मुजोरी चालू होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पालक संघटनांकडून शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत शाळेला समस दिला. शिक्षणापासून कुठलीही शाळा विद्यार्थ्यांना वंचित ठेवू शकत नाही. 

११) मनसे कार्य 🔸 बोरिवली
बोरिवली रेल्वे स्थानकातील देशाचा तिरंगा ध्वज जीर्ण अवस्थेत होता मनसेचे सरचिटणीस श्री नयन कदम यांनी रेल्वेशी पाठपुरावा केल्यानंतर तिरंगा पुन्हा फडकायला लागला.

१२) मनसे उपोषण 🔹 वणी (यवतमाळ)
चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर व वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी मनसेचे आरोग्य केंद्रासाठी चालू असलेल्या उपोषण ठिकाणी भेट दिली.

१३) मनसे उपोषण 🔹 वणी (यवतमाळ)
मनसे राज्य उपाध्यक्ष श्री राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य केंद्रासाठी चालू असलेल्या उपोषणाची यशस्वीतेकडे वाटचाल...!आरोग्य विभागाने दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य विभागाचे अधिकारी चर्चेसाठी दाखल.

१४) मनसे उपोषण 🔹कर्जत (नगर)
मनसे कर्जतच्या वतीने तालुकाध्यक्ष रविंद्र सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपतालुकाध्याक्ष श्री.सुर्यकांत कोरे यांनी कोरेगाव सटाईवाडी रस्त्यावरील पुलासाठी जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देवुनही दखल घेतली जात नसल्याने आज पाण्यात बसुन आंदोलन करण्यात आले. आमरण उपोषण सुद्धा चालू झाले आहे.

१५) मनसे आंदोलन 🔸 धुळे
कालपासून मदयालये सुरु झाले पण, सरकार ग्रंथालये कधी सुरू करणार.? असा प्रश्न विचारत धुळे मनविसे तर्फे वाचनालयाबाहेर पुस्तक वाचा आंदोलन. यावेळी मनविसे चे प्रसाद देशमुख, गौरव गिते, हर्षल परदेशी व आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

१६) मनसे आंदोलन 🔸 भिवंडी (ठाणे)
भिवंडी येथे मनसेच्या वतीने वाढीव वीजबिल विरोधात आंदोलन करण्यात आले.

१७) मनसे मागणी 🔹 सोलापूर (रेल्वे कामगार)
सोलापूर विभागातील रेल्वेच्या ट्रॅकमेन कामगारांना वरीष्ठ रेल्वे अधिकारी ह्यांच्याकडून प्रचंड त्रास दिला जातोय, ह्यांबाबत रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील ह्यांनी सेंट्रल रेल्वे GM कडे केली आहे 

१८) मनसे मागणी 🔹 मुंबई
गोरेगाव आरे कॉलनी येथील ६ वर्षीयमुलीवर बलात्कार करण्यात आला होता,आरोपीला पोलिसांनी फक्त अर्ध्या तासासाठी मनसेच्या रणरागिणींच्या ताब्यात द्यावे. 'मनसे स्टाईलने त्या आरोपीची चौकशी' करून आम्ही त्याला पुन्हा पोलिसांकडे देऊ. बघूया,त्यानंतर एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी मागणी मनसे सरचिटणीस सौ शालिनी ठाकरे यांनी केली आहे.

१९) मनसे मागणी 🔹 चांदीवली (मुंबई)
अपुऱ्या नागरी सुविधांमुळे एक महिलेचा प्राण जातो,दुर्घटनेला जवाबदार एल वॉर्ड महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करताना सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवला जावा ही अशी मागणी विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी केली आहे.

२०) मनसे मागणी 🔹 शेतकरी
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी.

२१) मनसे नियुक्ती 🔹 नाशिक
मनसे पक्षप्रवेश नाशिक शहर, ग्रामीण, जिल्ह्यातील वाहतूक सेनेच्या नियुक्त्या आज पार पडल्या, सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा!

२२) मनसे निवेदन 🔸 सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान ह्याबाबत मनसेने विद्यापीठ कुलगुरू यांना निवेदन दिले.

२३) मनसे निवेदन 🔸 संभाजीनगर
शासनाच्या श्रावण बाळ योजना व इतर योजनांचा निधी लाभार्थी महिलांना मिळाला नाही त्याबद्दल मनसेचे श्री दिलीप बनकर पाटील यांनी तहसीलदार अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

२४) मनसे निवेदन 🔸 पनवेल
...अन्यथा कायदा हातात घेऊ - पनवेल मनसे 
पनवेल विद्युत महामंडळाचे अधिकारी श्री. राठोड साहेब यांना भेटून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल निवेदन दिले आहे. वीजबिल दुरुस्तीसाठी वेगळे असे केंद्र चालू करण्याची मागणी केली जिथे वीजबील दुरुस्तीसाठी ठराविक कालावधी असावा जेणेकरून लोकांचे हाल होणार नाहीत. 

२५) मनसे निवेदन 🔸 मुंबई
बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या २०१६-२०२१ या पंचवार्षिक कालावधी करिता प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या आणि सोयीसवलतींच्या कराराबाबत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त श्री. इकबाल चहल यांची मनसेच्या शिष्टंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.

२६) मनसे भेट 🔹 पेण (रायगड)
महाराष्ट्र राज्य गणपती महामंडळाचे पदाधिकारी उद्या सकाळी ०७-१०-२०२० बुधवार रोजी ११ वाजता, आपल्या विविध मागण्या, अडचणी घेऊन हिंदुजननायक मनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे, यांची भेट घेणार आहेत. मनविसे रायगड जिल्हा सचिव श्री रुपेश पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट होणार आहे.

२७) मनसे भेट 🔹 खेड (रत्नागिरी)
खेड नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर यांनी विद्यमान खासदार श्री सुनील तटकरे यांची भेट घेऊन खेड नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामांवर चर्चा केली.

२८) मनसे यश 🔸 भायखळा (मुंबई)
मुंबई प्रभाग क्रमांक २०८ मधील श्री रामभाऊ भोगले रोडवरील नागरी समस्या (गटारांवरील झाकण) बाबत मनसे २०८ च्या वतीने पाठपुरावा करून दुरुस्ती करून घेतले.

२९) मनसे यश 🔸 नवी मुंबई
काल पासून पोदार इंटरनेशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा चालू झाल्या आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फी भरली नाही त्यांना परीक्षा देण्या पासून रोखण्यात येत होते. मनसेच्या दणक्या नंतर  नेरूळ  येथील पोद्दार शाळेने  ब्लॉक केलेली ऑनलाईन परीक्षेची लिंक सुरु.

३०) मनसे यश 🔸 नळदुर्ग (धाराशिव)
मनसेच्या मागणीनंतर गोलाई-अक्कलकोट रोड पर्यंत होत असलेल्या महामार्गावर लवकरच हायमास्ट लॅम्प व दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच रंबलर स्ट्रीप, गतिरोधक, साईन बोर्ड बसविण्यात येणार आहेत.

३१) मनसे इशारा 🔹 मुंबई
महिला कामगारांचे वेतन थकविणाऱ्या ट्रिगॉन ट्रांसिट प्रा. ली.  कंपनीला म न का से चिटणीस निलेश पाटील यांच्या नेतृत्वात इशारा देण्यात आला. कामगारांचे थकीत वेतन न मिळाल्यास येणाऱ्या काळात कामगार सेनेतर्फे अंदोलन करण्यात येईल. असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे.

३२) मनसे इशारा 🔹 बीड
केज तालुक्यातील नागरिकांना दिलेले वाढीव वीज बिल रद्द करून रिडींग प्रमाणे बिल आकारणी करा अन्यथा वीज बिल कंपनीचे कार्यालय फोडून टाकु.असा इशारा मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस व केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांचा ईशारा.

३३) मनसे उपक्रम 🔸 मुंबई
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष श्री अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली दादर स्मशानभूमीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना फेस मास्क, फेसशील्डचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment