Thursday 8 October 2020

२ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२ ऑक्टोबर २०२० • मनसे बातमीपत्र


🛑 मा. राजसाहेब ठाकरे • मुंबई
१) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि माजी पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतीस मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी अभिवादन केले.

👥 मनसे प्रवेश • चिंचवड (पुणे)
२) पिंपरी चिंचवड चे नगरसेवक श्री सचिन चिखले यांच्या उपस्थितीत शहरातील तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

👥 मनसे प्रवेश • पुणे
३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक कला विभागाचे सरचिटणीस श्री स्वानंद देव यांनी कार्येकत्यांसह श्री रमेश परदेशी (अभिनेते) आणि विधी विभागाचे अध्यक्ष श्री किशोर शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

👥 मनसे प्रवेश • मावळ (पुणे)
४) श्री संदीप शिंदे (तालुका संघटक मावळ) श्री रुपेश म्हाळसकर (तालुकाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत आज तरुणांनी पक्षप्रवेश केला. तसेच आज तालुक्यातील अनेकांच्या नियुक्त्या सुद्धा झाल्या.

👥 मनसे प्रवेश • नवी मुंबई (ठाणे)
५) ऐरोली दिघा येथील तरुणांनी शहर अध्यक्ष श्री गजानन काळे यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

⭐ मनसे यश • नागपूर
६) काहीच दिवसांपूर्वी सौ कल्पना चौहान नागपूर उपशहर अध्यक्षा यांनी महिलांच्या अंतर्वस्त्रे च्या प्रदर्शनावर आक्षेप नोंदवला होता आज पोलीस निरीक्षक भोसले यांनी सर्व व्यापाऱ्यांना बोलावून यासंदर्भात चांगलाच दम वजा समज दिली.

⭐ मनसे यश • मुंबई 
७) भायखळा प्रभाग क्रमांक २०८ च्या वतीने प्रभागातील नागरी समस्या (श्री टी बी कदम मार्गावरील घनकचरा) बाबत पालिका प्रशासन शी पाठपुरावा करून समस्या निकालात काढली.

⭐ मनसे यश • पुणे
८) कोविड काळात अहोरात्र काम करणाऱ्या ६२ महिला नर्स गेले दोन महिने वेतन पासून वंचित होत्या त्यांनी मनसेच्या श्री वसंत मोरे, साईनाथ बाबर, रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे आपली समस्या मांडली आणि यांनी त्यांना थकीत वेतन मिळवून दिले.

⭐ मनसे यश • मुंबई
९) प्रभाग क्र १२१ चे शाखा अध्यक्ष श्री नागनाथ चौगुले प्रभागातील पादचारी पुलाचे काम चालू करण्यासाठी पाठपुरावा केला होता आज त्यांना ऑक्टोबर महिण्यापासून कामकाज चालू होईल असे पत्र मिळाले.

⭐ मनसे यश • पुणे
१०) मनविसेचे पुणे शहर अध्यक्ष श्री कल्पेश यादव यांनी पुढाकाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले आले आहे.

⭐ मनसे यश • महाबळेश्वर (सातारा)
११) महाबळेश्वर शहरातील आधार केंद्र चालू करण्यासाठी मनसेकडून पाठपुरावा चालू होता आज त्याला यश आले आहे.

✍️ मनसे निवेदन • पलूस (सांगली)
१२) भिलवडी पलूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (कोविड सेंटर) मालकीचे उपहारगृह बचत गटांना चालवण्यासाठी द्यावे अश्या मागणीचे निवेदन पलूस मनसेने तहसीलदारांना दिले.

✍️ मनसे निवेदन • महाड (रायगड)
१३) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था बाबत महाड- मनसे उपजिल्हाअध्यक्ष चेतनदादा उतेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली L&T या कंपनी मध्ये रस्ते नियोजन विषयी निवेदन देवून नॅशनल हायवेच कामं लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी केली.

✍️ मनसे निवेदन • संभाजीनगर
१४) संभाजी नगर शासकीय रुग्णालयात घाटी येथील ४ वर्गातील २४० कंत्राटी कामगारांच्या समस्यांचे निवेदन श्री सुमित खांबेकर (राज्य उपाध्यक्ष) श्री राजीव जावळीकर यांनी विधान परिषद चे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांना दिले.

✍️ मनसे निवेदन • मिरा भाईंदर (ठाणे)
१५) मिरा भाईंदर शहराला लागून एम. इ. पी चा  दहिसर टोल नाका असून हा मुंबई मध्ये ये जा करण्यासाठी शहरातील नागरिकांना प्रवास करावा लागतो कोरोना अन्यायकारक टोल दर वाढ करून नागरिकांची लूटमार व्यवस्थापनाकडून केली जात आहे यांचा विरोध म्हणून मनसे टीमने आज निवेदन दिले.

✍️ मनसे निवेदन • नाशिक
१६) निफाड तालुक्यात ओला दुष्काळ मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत घ्यावी यासाठी मनसेने तहसीलदार यांना निवेदन दिले.

🚩 मनसे आंदोलन • नाशिक
१७) नाशिक पोलीस स्टेशन कडून विभागीय आयुक्त यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मनसेच्या वतीने रस्त्यावर माती टाकून त्यावर बसून सर्जरचा आणि प्रशासनाचा निषेध करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

🚩 मनसे आंदोलन • वांद्रे (मुंबई)
१८) ग्रंथालय, अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेनं मुख्यमंत्री यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळीन नंदादीप उद्यानात पुस्तके वाचन करून श्री अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

🚩 मनसे आंदोलन • वरळी (मुंबई)
१९) वरळीमध्ये मनसेचे परिसर स्वच्छ करत आंदोलन, मानसिकता कधी स्वच्छ करणार ? असा प्रश्न मनसे आंदोलक यांनी उपस्थित केला.

⭐ मनसे उपक्रम • शिवडी (मुंबई)
२०) मनसे नेते श्री बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करी रोड येथील श्रमिक जिमखाना मैदान, ना.म.जोशी मार्ग येथे मैदानात येणारे खेळाडू आणि नागरिक यांना करोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून मनसेकडून मास्क वाटप करण्यात आले.

⭐ मनसे उपक्रम • ठाणे
२१) ठाणे मनपा, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मनसे तर्फे ठाण्यात "मोबाईल डिस्पेनसरी व्हॅन" शिबिर चे नियोजन केले आहे.

⭐ मनसे उपक्रम • मुंबई
२२) प्रभाग क्रं १३२ चे शाखा अध्यक्ष श्री अभिजित शेजवळ आणि टीम यांच्या पुढाकाराने प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्शल आर्ट प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी सुरू झाली आहे.

⭐ मनसे उपक्रम • मुंबई 
२३) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनसे शिवडी विधानसभा तर्फे आरोग्य शिबिर चे नियोजन करण्यात आले होते.

🤝 मनसे भेट • अंधेरी (मुंबई)
२४) अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे नागरिकांनी त्यांच्या हक्काच्या घराच्या संदर्भात त्यांनी मनसे विभाग अध्यक्ष श्री संदेश देसाई यांची भेट भेटली. सर्वोतोपरी मनसेकडून सहकार्य होईल असे त्यांनी नागरिकांना आश्वासित केले.

🤝 मनसे भेट • कणकवली (सिंधुदुर्ग)
२५) तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल मनसेतर्फे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली.

🤝 मनसे भेट • ठाणे
२६) ठाण्यातील  वाडा येथीलक मोना टोना कंपनीतील कामगारांच्या समस्यांसाठी मनसेच्या श्री संदीप राणे (मनसे कामगार सेना उपाध्यक्ष) व श्री विकास जाधव (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष) यांच्यासह मनसेची टीम पुढे सरसावली आहे. कंपनीतील कामगारांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.

🤝 मनसे भेट • मुंबई
२७) मनसे शारीरिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन कामकाजाचा अहवाल सादर केला.

💐 मनसे शुभेच्छा • उस्मानाबाद
२८) उस्मानाबाद जिल्हा तालुका कळंब,मोहा  येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेंकर ऍग्रो या कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ व मोळी पुजन आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकार मंत्री तथा मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष श्री  दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. मनसे शुभेच्छा!

💐 मनसे अभिनंदन • महाबळेश्वर (सातारा)
२९) महाबळेश्वर शहराला ब दर्जाचे पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.स्वप्नाली ताई शिंदे यांच्या मनसेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

⚠️ मनसे इशारा • नालासोपारा (पालघर)
३०) कोविडमुळे सर्वसामान्य माणसाचे आर्थिक परिस्थितीने कंबरडे मोडले यात भर म्हणून की काय विजबिलात झालेली वाढ, ह्या वीजबिल वाढीविरोधात मनसे नालासोपारा पूर्व विभाग अध्यक्ष श्री महेश पालांडे न्यायालयात जाणार आहेत, श्री. पालांडे वाढीव विजबिल च्या विरोधात आर्थिक दिलासा मिळण्यासाठी नियामक मंडळ, महावितरण ह्यांना नोटीस धाडली आहे. 

समाप्त !

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र

@mnsreport9
#mnsrepost

No comments:

Post a Comment