Thursday 8 October 2020

७ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

७ ऑक्टोबर २०२० ♾️  #मनसेबातमीपत्र!

१) राजसाहेब 🔸 मुंबई 
पेण मधील गणपती मूर्ती बनवणाऱ्या व्यावसायिकांनी मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

२) राजसाहेब 🔸 मुंबई
राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, म्हणून ग्रंथालयांचे विश्वस्त व संचालक मंडळ मा. राजसाहेब ठाकरे यांची गुरुवार दिनांक ८ ऑक्टोर २०२० रोजी  सकाळी ११:०० वा. कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

३) राजसाहेब 🔸 मुंबई
मायक्रो फायनान्स कंपन्या सर्वसामान्य कर्जदाराचा मानसिक-सामाजिक छळ करत आहेत, त्यांना हा अधिकार कुणी दिला? ह्या दंडेलशाहीवर सरकार अंकुश ठेवणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल. राजसाहेबांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. 

४) राजसाहेब 🔸 मुंबई
कळंब येथे वीज केंद्रावर आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह मनसे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

५) मनसे प्रवेश 🔹 नवी मुंबई
दिघा ऐरोली राबाळे घणसोली येथील रिक्षा चालक आणि मालक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेमध्ये नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, विभाग अध्यक्ष विनोद पाखरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेमध्ये प्रवेश केला.

६) मनसे यश 🔸 वणी (यवतमाळ)
मनसे राज्य उपाध्यक्ष श्री राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य रुग्णालयाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते आणि ती मागणी सरकार दरबार मान्य झाली आहे. त्याबाबत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

७) मनसे यश 🔸 डोंबिवली
श्री राजेश कदम (मनसे राज्य उपाध्यक्ष/शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी मनसेने शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांच्या बाबत आंदोलन केले होते. आज प्रशासनाला जाग आली आणि खड्डे बुजवण्याचे कामकाज चालू झाले आहे.

८) मनसे यश 🔸 मानखुर्द (मुंबई)
प्रभाग क्रमांक १४० मधील देवनार पशु वध केंद्र येथील रस्त्यावरील दिवे अनेक दिवसांपासून बंद होते. मनसेचे श्री श्रीमंत टेंगळे यांनी पाठपुरावा करून रस्त्यांवरचे दिवे चालू करून घेतले.

९) मनसे यश 🔸 गुहागर (रत्नागिरी)
मौजे पालशेत येथील पोमेंडी फाटा व मारुती मंदिर येथील एस. टी. पीक अप शेडची दयनीय अवस्था झाली होती. मनसे गुहागर तालुका अध्यक्ष विनोदजी जाणवळकर यांनी ग्रामपंचायत ला पत्रव्यवहार करून व सततचा पाठपुरावा करून शेडचे काम पुर्ण करून घेतले.

१०) मनसे यश 🔸 पुणे
लोणीकंद,पुणे येथील बिक बास्केट कंपनीतील कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते,मनसेचे गणेश म्हस्के पाटील (पुणे जिल्हा उपाध्यक्ष)श्री सुमित गायकवाड (हवेली तालुका संघटक) यांच्या पुढाकाराने कंपनीने कमी केलेल्या कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेतले.

११) मनसे उद्घाटन 🔹 कोंढवा (पुणे)
मनसे पुणे नगरसेवक श्री साईनाथ बाबर यांच्या नगरसेवक निधीतून स्ट्रीट लाईटचे लोकार्पण पार पडले.

१२) मनसे निवेदन 🔸 निजामपूर (धुळे)
साक्री तालुक्यातील मंदिरे नवरात्रोत्सव साठी खुली करण्यात यावी यासाठी मनसेने तहसीलदार श्री प्रवीण चव्हाण यांना निवेदन दिले.

१३) मनसे निवेदन 🔸 बोरिवली (मुंबई)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोरिवली विधानसभेच्या वतीने मनसे सरचिटणीस मा श्री नयनभाई कदम यांच्या सूचनेनुसार आज मराठी भाषेला डावळण्यासंदर्भात  रिलायन्स मॉल व्यवस्थापनास निवेदन देण्यात आला येत्या दहा दिवसांमध्ये अपेक्षित बद्दल होईल असे आश्वासन देऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

१४) मनसे निवेदन 🔸 बुलढाणा
हथसर मध्ये झालेल्या तरुणीच्या बलात्कार नराधमांना फाशी मिळावी तसेच महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय म्हणून मनसे शाखाच्या वतीने बुलढाणा ता. सिंदखेड दरेगाव शाखासंघटक राधेश्याम बंगाळे पाटील यांनी पंतप्रधानांना, मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिले.

१५) मनसे निवेदन 🔸 वरळी (मुंबई)
टपाल वाहन सेवेत रिक्त जागांच्या भरतीत स्थानिक मराठी भूमीपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने वरळी येथील टपाल वाहन विभाग वरिष्ठ व्यवस्थापक यांची भेट घेऊन भरतीत मराठी भूमीपुत्रांचाच प्रथम हक्क आहे. हि समजच मनसे शिष्टमंडळाने दिली आणि निवेदन दिले.

१६) मनसे निवेदन 🔸 अमरावती
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तर्फे शिक्षणाधिकारी अमरावती यांना पुराव्यासह शाळेचा मनमानी कारभार, शाळेचे शुल्क भरण्यासाठी पालकांना होत असलेला मनस्ताप याकरिता निवेदन देण्यात आले व मागील निवेदनचा पाठपुरावा करण्यात आला. 

१७) मनसे निवेदन 🔸 संभाजीनगर
जैन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फी अभावी ती माही परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला, मनसेच्या वतीने ह्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

१८) मनसे निवेदन 🔸 मुंबई
ऐरटेल, जिओ, च्या अतिरेकी पणामुळे स्थानिक केबल धारकांना अनेक समस्यांना  सामोरे जावे लागत असल्याने केबल सेनेचे सरचिटणीस श्री संतोष शिंदे यांनी जिओ आणि ऐरटेलच्या व्यवस्थापनला ह्याबाबत निवेदन दिले.

१९) मनसे निवेदन 🔸 मिरारोड भाईंदर (ठाणे)
बांगलादेशी मासळी विक्रेत्यांमुळे स्थानिक आगरी, कोळी बांधवांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे हे जाणून मनसेचे श्री हेमंत सावंत (शहर अध्यक्ष) यांनी वाहतूक पोलिसांना ह्याबाबत निवेदन दिले.

२०) मनसे भेट 🔹 कंत्राटी कामगार समस्या
डॉ मनोज चव्हाण (मनसे सरचिटणीस), श्री संतोष धुरी (कार्याध्यक्ष, मनसे कामगार सेना) श्री शैलेश पाटणकर (उपाध्यक्ष) यांनी रेल्वेतील कंत्राटी कामगार समस्या बाबत रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्यांची जाण करून दिली.

२१) मनसे भेट 🔹 नाशिक
श्री रमेश नामदेव राणे (उपचिटणीस, मनसे कामगार सेना) यांनी नाशिक मधील मनसे कामगार युनिट च्या कामागरांशी भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.

२२) मनसे कार्य 🔸 विरार (पालघर)
कोरोना काळात आधार केंद्र बंद असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर सहसचिव श्री. महेश अंबाजी कदम यांच्या मागणी नंतर विरार पुर्व चंदनसार येथील आधार केंद्र सुरू करण्यात आले.

२३) मनसे कार्य 🔸 दापोली
सलोनी नामक विद्यार्थीला पुढील शिक्षण घ्यायचे होते पण आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण थांबणार होते. मनसे मुंबई प्रभाग ५९/६८ चे उप विभाग अध्यक्ष श्री सचिन तळेकर यांनी त्या विद्यार्थिनींला तात्काळ आर्थिक मदत खात्यात जमा केली.

२४) मनसे कार्य 🔸 मुंबई
श्री सचिन बलोसे या महाराष्ट्र सैनिकाने रस्त्यावर आजारी असलेल्या व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि प्रशासकीय यंत्रणेला ह्याबाबत माहिती दिली.

२५) मनसे आंदोलन 🔹 पुणे
मनसेचं मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन. बार सुरू झाले मंदिरं कधी उघडणार? मनसे शहर अध्यक्ष श्री अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

२६) मनसे आंदोलन 🔹 लातूर
जिल्ह्यातील खड्यांच्या विरोधात मनसेचे जिल्हा अध्यक्ष श्री नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली आज रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात आले. सरकारला जागे करण्यासाठी मनसेने हे आंदोलन केले होते.

२७) मनसे उपक्रम 🔸 मुलुंड (मुंबई)
"माझा प्रभाग, माझी जबाबदारी" अंतर्गत मनसेचे शाखा अध्यक्ष श्री संदीप वरे श्री पदमनाथ राणे (उपाध्यक्ष, मनचिसे) यांच्या तर्फे शनिवारी २००० मास्क चे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

२८) मनसे उपक्रम 🔸 पुणे
मनसे सरचिटणीस, नगरसेवक श्री वसंत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते २ पर्यंत सर्व रिक्षाचालकांना "CNG गॅस सेटिंग" मोफत.

२९) मनसे उपक्रम 🔸 नालासोपारा (पालघर)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नालासोपारा शहर तुळींज विभाग आयोजित डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत आहे तरी तुळींजकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे मनसेकडून आवाहन करण्यात येत आहे.

३०) मनसे उपक्रम 🔸 रोजगार विभाग
मनसे रोजगार विभाग तर्फे बेसिक देवनागरी, रोमन इंग्लिश कॅलिग्राफी चे वेबिनार ११ ऑक्टोबर रोजी आयोजित केले आहे. इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा.

३१) मनसे उपक्रम 🔸 वर्सोवा (मुंबई)
श्री अल्ताफ खान (मुंबई उपनगर मनसे सचिव) आणि प्रभाग क्रमांक ५९/६८ यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे.

३२) मनसे आवाहन 🔹 नाशिक
मनसे कामगार संघटनेचे सरचिटणीस श्री गजानन राणे उद्या एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक मधील कामगारांनी आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडाव्यात असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.

३३) मनसे आवाहन 🔹 डोंबिवली (ठाणे)
सरकारच्या विरोधात डंबेल्स घेऊन मोर्चा काढा. मनसे तुमच्या पाठीशी. मनसेचा पवित्रा. बार आणि रेस्टॉरंट खुली केली आहेत, मग मंदिर आणि जीमबद्दल सरकार असे धोरण का घेत आहे.? मनसे नेते, आमदार प्रमोद (राजू) पाटील आक्रमक.

३४) मनसे आवाहन 🔹 मुंबई
कोरोना काळात फायनान्स, बचत गट, बँक यांच्याकडून वसुली साठी तगादा लावल्यास मनसेचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी श्री हाजी अजगर शेख यांना ७६६६१८९९९९ ह्या क्रमांकावर संपर्क करू शकता.

३५) मनसे आवाहन 🔹 मुंबई
केंद्र सरकारच्या PM SVANidhi या योजने अंतर्गत  पथविक्रेत्यांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सैनिकांनी ही योजना प्रत्येक मराठी तरुणांपर्यंत पोचवावी असे आवाहन मनसे नेते श्री नितिन सरदेसाई यांनी महाराष्ट्र सैनिकांना केली आहे.

३६) मनसे दणका 🔸 मीरा रोड (ठाणे)
पं भीमसेन जोशी हॉस्पिटलमध्ये लक्ष्मी गुप्ता नामक व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मनसेचे श्री संदीप राणे आक्रमक पवित्रा घेत जबाबदार डॉक्टर, अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

३७) मनसे नियुक्ती 🔹 जनाधिकार सेना
मनसे जनाधिकार सेनेच्या पुणे शहराच्या नियुक्त्या श्री अनिल शिदोरे (मनसे नेते) श्री हेमंत संभुस (मनसे नेते) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

३८) मनसे इशारा 🔸 नवी मुंबई (ठाणे)
सानपाडा विभागातील परप्रांतीय व बांग्लादेशी देशी मासळी विक्रेत्यानवर मनसे दणका दिल्यानंतर  विभाग अधिकारी ठाणेकर ह्यांनी त्वरित कायवाई केली हया पूढे जर आढलले तर मनसे दणका देण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

३९) मनसे मागणी 🔹 कर्जत (अहमदनगर)
राशीन येथील महावितरण सेक्शन (विघुत विभाग) मध्ये काम करणाऱ्या कुंडलिक कानगुडे यांच्या मृत्यू स जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणे बाबत. मनसेने मागणी केली आहे.

समाप्त !
धन्यवाद ..
जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment