Monday 19 October 2020

१६ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१६ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब●मुंबई
पुणे लोकमान्य डिजिटल फेस्टिव्हल २०२० च्या ई-बुक चे प्रकाशन मा .श्री .राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजसाहेब ●मुंबई
गुहागर तालुकाध्यक्ष श्री विनोद जानवळकर ह्यांनी मनसेप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली व कामाचा आढावा दिला.

मनसे प्रवेश | नवी मुंबई 
मनपा नेरुळ, वंडर्स पार्क येथील कामगारांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत, श्री गजानन काळे व युनियनचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, अभिजित देसाई, अमाेल आयवळे यांच्या उपस्थितीत मनसे मनपा कामगार सेनेत प्रवेश केला. 

मनसे प्रवेश●मुंबई
मायक्रो-फायनान्स कंपन्या राज्यातील महिला बचत गटांचे आर्थिक शोषण करत असल्याचा मुद्दा मनसेने हाती घेतला आणि या संकटग्रस्त महिलांना आशेचा एक किरण दिसू लागला. लवकरच या सर्व महिला #मनसे प्रवेश घेणार आहेत. 

मनसे प्रवेश●मानखुर्द(मुंबई)
मनसे वाहतूक सेनेचे श्री जगदीश खांडेकर आणि श्री श्रीमंत टेंगळे यांच्या  पुढाकाराने मानखुर्द शिवाजीनगर विभागातील रिक्षा चालक मालक ह्यांनी मनसे वाहतुन सेनेचे सभासत्व स्वीकारले.

मनसे यश●KDMC
मनसेचे श्री उल्हास भोईर आणि श्री कौस्तुभ देसाई ह्यांच्या पुढाकाराने KDMC मनपातील कामगारांचे वेतन २४ तासात कामगारांच्या खात्यावर जमा,कामगारांनी मनसेचे आभार मानले.

मनसे यश●पुणे
पुणे विश्रांतवाडी येथील बंद शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्यात यावी यासाठी  मनसेचे श्री गणेश पाटील ह्यांनी मागणी केली होती.अखेर त्याबाबत अन्नपुरवठा विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मनसे कार्य●खालापूर(रायगड)
काही दिवसांपूर्वी श्री. संदेश करतडे & श्री. अनिरुद्ध पवार ह्या दोन होतकरू कामगारांना खालापूर येथील कोपरन लि. ह्या कंपनीनं कामावरून काढून टाकले होते,मनसे कामगार सरचिटणीस श्री राणे ह्यांच्या पुढाकाराने ते पुन्हा कामावर रुजू झाले.

मनसे कार्य●घाटकोपर(मुंबई)
घाटकोपर पूर्व विभागातील टिळकरोड वरील लायन्स क्लब गार्डनमध्ये अनेक दिवसांपासून विजेचे खांब बंद अवस्थेत होते,मनसे प्रभाग क्र १३२ च्या वतीने त्याचा पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला व विजेचे पोल चालू करून घेतले.

मनसे कार्य●मुंबई
मुंबई येथील नामांकित सेक्युरिटी कंपनीमधील महिला सेक्युरिटी गार्ड यांचा २०१८ मधील थकीत बोनस बाबत श्री गजानन राणे(सरचिटणीस, मनसे कामगार सेना) ह्यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून महिला सेक्युरिटी गार्डना बोनस देण्यात आला.महिलांनी मानले आभार..!

मनसे कार्य●पंढरपूर
अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीघाटाच्या बांधकामाची २० फुटी भिंत कोसळून अभंगराव कुटुंबातील 4 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. सरचिटणीस श्री. दिलीप धोत्रे ह्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं आणि त्यांना विमा योजना व उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत केली. 

मनसे कार्य●भांडुप
भांडुप टँक रोड, काशीनगर,खडीमशीन प्रसाद सोसायटी,देवीचा मंडप तसेच आजुबाजुचा परिसर येथे मनसे राजगड ११२ शाखा अध्यक्ष श्री सुनिल नारकर यांच्या माध्यमातून धुरफवारणी करण्यात आली.

मनसे कार्य●शीव(मुंबई)
इमारत क्रमांक टि ६६ व ६७ प्रतिक्षा नगर सायन 
येथे मनसेचे शाखाअध्यक्ष श्री  शंकर कविलकर, श्री.इंगळे(बी.जी.शिर्के कंपनी) व श्री.शरद नवले यांच्या प्रयत्नाने रस्ता दुरुस्ती करण्यात आला.

मनसे निवेदन●संगमनेर
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्या विरोधात मनसेने दंड थोपटले, रस्त्याची अवस्था बिकट असल्याने रोज अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने मनसेच्या वतीने टोलनाका व्यवस्थापन ला निवेदन देण्यात आले,रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन.

मनसे निवेदन●नाशिक
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट/ महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बॉटनीकल गार्डनची दुरावस्था होत असल्याने तात्काळ सुरक्षा रक्षक नेमणे बाबत नाशिक मनसेने मा. आयुक्तांना निवेदन दिले आहे.

मनसे निवेदन●नालासोपारा
रस्त्यावर पडलेले खड्डे, उघड़ी पडलेली गटारे आणि नागरिकांना होणाऱ्या इतर अनेक अडचणी ह्याबाबत मनविसे मोरेगाव विभागाच्या वतीने व.वि.श.म.न.पा बांधकाम मुख्य अभियंता आर. के. पाटिल ह्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन●सावंतवाडी(सिंधुदुर्ग)
बचत गटांचे कर्ज माफ करण्यासाठी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन●मालवण(सिंधुदुर्ग)
मनसे मालवणचे बँकेसह मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे बचत गट अडचणीत असल्याने त्यांचे कर्जमाफी साठी निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन●देवगड(सिंधुदुर्ग)
मनसे देवगड च्या वतीने भातशेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करावा या मागणीसाठी  तहसील कार्यालय , देवगड , या ठिकाणी निवेदन देण्यात आले.त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री , उप तालुका अध्यक्ष अक्षय धुरी व इतर सहकारी उपस्थित होते.

मनसे निवेदन●पुणे
मनसे रोजगार स्वयंरोजगार चे श्री महेंद्र बैसणे यांचे आदेशाने पुणे हडसर विभागात ८०% स्थानिक तरुणांना संधी मिळाली पाहिजे ह्या मागणीसाठी मनसेच्या वतीने श्री श्रेयस देशमुख(पुणे शहर सचिव) यांनी विभागातील सर्व आस्थापना,मॉल &  कंपन्यांना निवेदन दिले.

मनसे निवेदन●मुंबई
कोर्ट आदेश असूनही हिरानंदानी बिल्डरने अत्यल्प घटकांसाठी घरे बांधण्याचे आश्वासन पुर्ण केले नाही.सदर बिल्डर्स  विकत असलेल्या सदनिकांचे रजिस्ट्रेशनला स्थगती द्यावी अशी मागणी नोंदणी उपमहानिरीक्षक श्री.पाटील ह्यांच्याकडे मनसे शिष्टमंडळाने केली.

मनसे निवेदन●पुणे
पुणे मनपा सर्वे क्रमांक १६ ,गोकुळ नगर भागातील नागरिकांना कमी दाबाचे पाणी,अनियमित वेळ ह्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने,मनसेच्या वतीने श्री समीर शिंदे(वार्ड अध्यक्ष ४९) ह्यांनी पाणी विभागाला निवेदन दिले.

मनसे मागणी●मुंबई
रेल्वे कामगारांना वर्ष २०२० साठी मिळणारा बोनस तातडीने जाहीर करण्यात यावा.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष मा श्री जितेंद्र पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली.

मनसे मागणी●मुंबई
मुख्यमंत्रीजी घरातून बाहेर पडा,शेतकऱ्यांना मदत करा “…नाहीतर लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल”; मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांची मागणी.

मनसे मागणी●मुंबई
सरकारने शेतकरी बांधवांसाठी कायमस्वरूपी 24 तास उपलब्ध असणारी "बळिराजा" हेल्पलाईन चालू करावी. आहि मागणी मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी सरकारकडे केली आहे.

मनसे मागणी●उल्हासनगर
उल्हासनगरातील बाजारपेठा नियमित सुरू करा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख ह्यांनी केली आहे. 

मनसे उपोषण●रत्नागिरी
टाळेबंद काळातील विज बिल माफी अन्यथा विजखांब कामाचे भाडे मिळण्यासाठी महावितरण अधीक्षक कार्यालयासमोर तब्बल तीन दिवस आमरण उपोषण करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांना महावितरणने पंधरा दिवसात आश्वासनाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. 

मनसे आंदोलन●लातूर
बचत गट चालवणाऱ्या महिलांना मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ व्हाव्हे यासाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता,त्या मोर्चात सहभागी झालेल्या मनसेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले.

मनसे आंदोलन●मानवत(परभणी)
मानवत तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० हजार रुपये मदत जाहीर करा या प्रमुख मागण्यांसाठी आज मानवत येथे मनसेकडून "रास्ता रोकून" आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन●हिंगोली
शहरात दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, शहरात स्वच्छता ठेवावी या मागणीसाठी मनसेतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून १६ आॅक्‍टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान आंदोलन केले.

मनसे आंदोलन●नागपूर
स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेला शहरांचा विकास नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने मनसे नागपूरच्या वतीने अर्धवट कामांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे दणका●शीव(मुंबई)
स्थानिक कोळी बांधवांच्या तक्रारीनंतर मनसे आक्रमक,परप्रांतीय कोळी बांधवाना मनसेने दिला दणका.

मनसे इशारा●पिंपरी चिंचवड
बायो मेडिकल वेस्टचे कंत्राट पास्को कंपनीला चुकिच्या पद्धतीनेच देण्यात आले? चुकीचे कंत्राट रद्द न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन असा इशारा मनसे नगरसेवक श्री सचिन चिखले ह्यांनी दिला आहे.

मनसे इशारा●मुंबई
बॉलिवूडला बाहेर नेण्याचा विचारही करु नका  असा इशारा मनसेचे सरचिटणीस/मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री अमेय खोपकर ह्यांनी दिला आहे.

मनसे इशारा●ठाणे
कोरोनाकाळात ठाणे शहरात खाजगी हॉस्पिटलकडून 1कोटी 64 लाख 68 हजारांची लूट झालीय असा आरोप मनविसेचे संदीप पाचंगे ह्यांनी केला आहे.आयुक्तांच्या आदेशाला खिसेकापू रुग्णालयांकडून केराची टोपली दाखवण्यात आले आहे आणि मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मनसे मुलाखत●ठाणे
कोरोनाच्या नावाखाली ठाण्यात खाजगी रुग्णालयाकडून लुटमार ?मनसेच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महापालिकेने नेमलेले लेखा परीक्षक यांनी निदर्शनास आणून दिलेली अवाजवी बिले रुग्णांना परत मिळत आहेत का?ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मनविसे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे ह्यांनी #ThaneLive  दिली आहे.

मनसे भेट●दहिसर
दहिसर चेक नाका येथील कोविड सेंटर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या(कामावरून कमी करणे,वेतन न देणे,आरोग्य विषयक सुविधा न मिळणे) मनसेकडे आल्या असता मनसेचे सरचिटणीस श्री नयन कदम ह्यांनी जातीने लक्ष घालत कामगारांना न्याय मिळवून दिला.

मनसे भेट●नागपूर
नागपूर शिक्षण विभागात सुरू असलेला प्रचंड भ्रष्टाचार, रात्रशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न अश्या अनेक समस्यांसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने श्री महेश जोशी,श्री शरद भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री श्री बच्चू कडू यांची भेट घेतली. 

मनसे सहभाग●पुणे
आंतराष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त, राज्यभरातील तरुणांच्या बेरोजगरीवर काम करणाऱ्या काही प्रतिनिधींसोबत मनविसेचे शहर अध्यक्ष श्री कल्पेश यादव यांनी चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी सहभाग घेतला.

मनसे संवाद●धाराशिव
नळदुर्ग (धाराशिव)- मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेल्या बचत गटांच्या कर्ज माफी साठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी शहरातील विविध भागात मनसे शहरध्यक्ष अलिम शेख, मनसे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वात बैठका घेऊन बचत गटातील महिलांशी संवाद साधला.

मनसे आनंदोत्सव●धुळे
महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील मनसे विध्यार्थी सेनेने सार्वजनिक वाचनालये व अभ्यासिका सुरू अभ्यासिका सुरू करण्यासाठी आंदोलन केलेलं.आज पासून ग्रंथालय ,अभ्यासिका सुरू झालेत राजसाहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मनवीसे टीमने आनंदोस्तव साजरा केला.

मनसे भेट●मिरारोड भाईंदर(ठाणे)
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अविनाश जाधव यांनी आज मीरा भाईंदर उद्योगिक वसाहतीतील पांचाळ आणि जय अंबे इंडस्ट्रीज मधील कामगारांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मनसे भेट●खेड(रत्नागिरी)
शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी खेड नगर परिषदेला सदिच्छा भेट दिली .त्यांचे स्वागत मनसेचे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर आणि इतर मनसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मनसे नियुक्ती●पालघर
पालघर उपशहराध्यक्ष पदी श्री कृणाल कुंटे यांची ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांनी नियुक्ती केली.

No comments:

Post a Comment