Sunday 25 October 2020

२३-२४ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२३ + २४ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश >> ठाणे
ठाणे प्रभाग क्रमांक १९ येथे मनसे विभाग अध्यक्ष श्री गजानन कर्पे यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या हस्ते झाले.

मनसे प्रवेश >> रत्नागिरी >> खेड
खेड तालुक्यातील इंडियन आक्झ‌ॅलेट लिमिटेड लोटे परशुराम एम आय डी सी (SR Group) कार्यकर्त्यांनी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला. 

मनसे यश >> विरार >> पालघर
मनवेल पाडा (विरार,पालघर) येथे प्र क्रं ३० चे शाखा अध्यक्ष श्री प्रथमेश साळवी मागील दोन वर्षांपासून सेंट पीटर शाळेजवळ रस्त्याच्या मध्यात असलेले विजेचे खांब काढण्यासाठी पाठपुरावा करत होते, अखेर दोन वर्षाने त्यांच्या लढ्याला यश आलेय.

मनविसे यश >> मुंबई
मनविसेचे उपाध्यक्ष श्री अखिल चित्रे ह्यांच्या निवेदन नंतर अमेझॉन मागोमाग फ्लिपकार्ट सुद्धा मराठी सेवा देणार.

मनकासे यश >> रायगड >> पनवेल
रायगड (पनवेल) मधील जे डब्लू सी (JWC) कंपनी मधील कामगारांना लॉक डाउनचे कारण देऊन कोणतेही नोटीस न देता कामावरून कमी केले होते. मनकासे नेते श्री सचिन गोळे ह्यांनी बेकायदेशीरपणे कामावरून कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घ्यायला भाग पाडले.

मनसे कार्य >> यवतमाळ
यवतमाळ - पांढरकवडा मार्गावरील मोहदा नजीक रस्त्यात मोठमोठे खड्डे पडून यात बरेच लहान सहान अपघात होत होते, मनसे तालुकाध्यक्ष तृषार गब्राणी व सहकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती करण्यास भाग पाडले.

मनसे कार्य >> ठाणे
सम्राट अशोक नगर माजिवडा नाक्यावरील रहिवाशांचे घरांच व थकित भाड्याचं प्रश्न आज श्री. अविनाश जाधव, श्री रवींद्र मोरे व श्री. सचिन कुरेल यांच्या मार्गदर्शनाखाली विकासका (बिल्डर) सोबत चर्चा करून सोडविण्यात आला.

मनसे कार्य >> मुंबई >> भायखळा
भायखळा प्रभाग क्र २०८ च्या वतीने बाटलीबॉय मैदानाच्या भिंतीवर तारांचे जाळे निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनसेच्या वतीने पाठपुरावा करून तारेंचे जाळे काढून टाकण्यात आले.

मनसे निवेदन >> पालघर >> नालासोपारा
राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन ह्यांच्या ढिसाळ नियोजन मुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे श्री राज नागरे (नालासोपारा शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले.

मनसे निवेदन >> नागपूर
मनसेच्या महिला शहर अध्यक्षा सौ मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त ह्यांना शहरांतर्गत बस सेवा चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन >> सोलापूर >> बार्शी
सत्ताधारी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकारी सौ रुपाली चाकणकर दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आल्या असता मनसेचे विभाग अध्यक्ष बाबा शेख ह्यांनी निवेदन देऊन हेक्टरी ₹ ५०,००० मदत जाहीर करण्याची मागणी केलीय.

मनविसे निवेदन >> मुंबई >> वांद्रे
सिद्धार्थ कॉलनी ते टिचर्स कॉलनी येथे होत असलेले रोडचे  निकृष्ट दर्जाचे काम मनसेच्या श्री संजय धोत्रे (मनविसे राज्य उपाध्यक्ष) ह्यांनी निवेदन देऊन बंद केले.

मनसे निवेदन >> यवतमाळ >> महागाव
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी मनसेच्या वतीने महागाव येथे तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले,आणि हेक्टरी ₹५०,००० मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मनसे निवेदन >> यवतमाळ >> आर्णी
आर्णी-सावळी (सदोबा) रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अश्या आशयाचे निवेदन मनसेच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन यलगंधेवार (आर्णी, यवतमाळ) यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग यांना देण्यात आले.

मनकासे भेट >> मुंबई
कामगार प्रश्नांसाठी झटणाऱ्या मनसेच्या वाघांनी (डॉ. मनोज चव्हाण, श्री संतोष धुरी, श्री गजानन राणे, श्री सचिन गोळे) मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली.

मनसे भेट >> रत्नागिरी >> खेड
खेड तालुक्यातील चिंचघर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांनी केली आणि शेकऱ्यांशी त्यावर सविस्तर चर्चा केली.

मनसे भेट >> मुंबई >> अंधेरी
हिंदूंच्या सणांबाबत अपमानजनक सोशल मीडिया पोस्टप्रकरणी 'ईरॉस नाऊ' व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी शालिनी ठाकरे कार्यालयात वैयक्तिक भेट घेतली आणि दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अशी कोणतीही चूक होणार नाही, असं निःसंदिग्ध आश्वासन त्यांनी या भेटीत दिलं.

मनसे भेट >> ठाणे >> खेड
श्री गजानन काळे (नवी मुंबई शहराध्यक्ष) श्री निलेश बाणखेळे (मनसे उपशहर अध्यक्ष) ह्यांनी मनपा उपायुक्त श्री कानडे (मालमत्ता विभाग) ह्यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांवर जाब विचारला.

मनसे आंदोलन >> सिंधुदुर्ग >> मालवण
मंदिरे उघडण्यासाठी मनसेच्या वतीने मालवण तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद, टाळ वाजवा आंदोलन करण्यात आले. उपजिल्हा अध्यक्ष दया साहेब मेस्त्री, कणकवली तालुका अध्यक्ष  दत्ताराम बिडवडकर ह्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

मनसे आंदोलन >> सिंधुदुर्ग >> कणकवली
मंदिरे उघडण्यासाठी मनसेच्या वतीने कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद, टाळ वाजवा आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अधिकाऱ्यांना निवेदनही दिले.

मनसे मोर्चा >> धाराशिव >> नळदुर्ग
मायक्रो फायनान्स कडून होत असलेल्या पिळवणूक बाबत मनसेच्या वतीने मोर्च्याचे नियोजन करण्यात येत आहे. तत्पूर्वी मनसेचे शहर अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या आणि मोर्च्यांच्या बाबत माहिती दिली.

मनसे पर्दाफाश >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
अवजड वाहनांना ठराविक वेळेत बंदी असताना स्थानिक पोलीस चिरीमिरी पैसे घेऊन अवजड वाहनांना सोडत आहेत. मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री राजेश कदम ह्यांनी पर्दाफाश केला आहे तर मनसे आमदार राजू पाटील ह्यांनी कडक कारवाईची मागणी केलीय.

मनसे उपक्रम >> पालघर >> ठाणे
मनसे नालासोपारा शहराच्या वतीने  नागरिकांसाठी "वृत्तपत्र वाचनालय" तर जेष्ठ नागरिकांसाठी "जेष्ठ नागरिक कट्टा" चे दिनांक २५/१०/२०२० सायंकाळी ६.०० वाजता लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.

मनसे उपक्रम >> मुंबई >> मानखुर्द
विधवा, गरीब, गरजू,कचरा वेचणारे अश्या ५० कुटुंबाना प्रांजल राणे (उपविभाग अध्यक्षा) नमिता पवार (महिला शाखा अध्यक्षा) यांच्या संकल्पनेतुन अणुशक्ती विधानसभा प्र क्र १४३  येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मनसे उपक्रम >> रत्नागिरी >> खेड
मनसे शासित खेड नगरपरिषद (रत्नागिरी) येथे नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर (सरचिटणीस) ह्यांच्या पुढाकाराने नगरपरिषद मार्फत अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी ५℅ अपंग निधि म्हणून  ₹ ११,००० धनादेश देण्यात आला.

मनसे दणका >> मुंबई >> मुलुंड
आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डर श्रद्धा अगरवाल यांना त्यांच्या राहत्या घरासमोरील गावगुंडांनी मारहाण केली. हे मनसेच्या लक्षात येताच मनसे नेत्या रिटा गुप्ता, सांतन फर्नांडिस, ऋषी शेरेकर (मनसे शारीरिक सेना अध्यक्ष) ह्यांनी त्या नराधमांच्या विरोधात ३५४ IPC Sec खाली गुन्हा दाखल केला. 

मनवासे उपक्रम >> ठाणे
मनसे वाहतूक सेना लक्ष्मी चिराग नगर ठाणे यांच्या वतीने चिराग नगर येथे "पंतप्रधान आत्मनिर्भर कर्ज योजना" शिबिराचे नियोजन करण्यात आले.

मनसे दणका >> नाशिक
परप्रांतातून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या महिलेने मराठी भाषा बोलणार नाही आणी शिकणारही नाही असा उर्मट पवित्रा घेतल्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने "nyasa enterprise" मनसे दणका दिला आणि मराठी भाषिकांची माफी मागायला लावली.

मनकासे उद्घाटन >> ठाणे
किलबर्न इंजीनियरिंग लिमिटेड - सरवली MIDC, R & B इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड (घनकचरा विभाग KDMC)  येथे मनसे कामगार सेनेच्या नामफलकाचा अनावरण सोहळा मनकासे अध्यक्ष श्री मनोज चव्हाण यांच्या उपस्थितीत  पार पडला.

मनसे धन्यवाद >> डोंबिवली >> ठाणे
महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मा. मुख्यमंत्र्यांना मनसे आमदार श्री राजु पाटील ह्यांनी पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या, त्याची दखल घेऊन सांस्कृतिक कार्य विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले.  सदर कार्यवाही साठी मनसे आमदार राजू पाटील ह्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. 

समाप्त !

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

No comments:

Post a Comment