Thursday 8 October 2020

३ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

३ ऑक्टोबर २०२० • मनसे बातमीपत्र

१) राजसाहेब ठाकरे • मुंबई
कलेवर प्रेम करणारे मनसे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केदार शिंदे यांची भरत जाधव यांची कला असलेली कलर्स मराठी वर येणारी नवीन मालिका "सुखी माणसाचा सदरा" टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या.

२) मनसे प्रवेश • नाशिक
सामाजिक कार्येकर्ते, विविध पक्षातील कार्येकर्ते, नवतरुण कार्येकर्ते यांनी मनसे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप दातीर, अंकुश पवार (शहर अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

३) मनसे प्रवेश • पलूस (सांगली)
प्रसिद्ध उद्योजक श्री झुंजार पवार यांनी सांगली जिल्हाध्यक्ष श्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

४) मनसे प्रवेश • अंधेरी (मुंबई)
अंधेरी मोरगाव जुहु वर्सोवा येथील असंख्य युवासेनेच्या तरुण कार्येकर्त्यांनी व महीलांनी मनसेचे विभाग अध्यक्ष श्री संदेश देसाई यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

५) मनसे प्रवेश • अंबरनाथ (ठाणे)
अंबरनाथ MIDC येथील "स्पायसेन PVT LTD" कंपनीतील कामगारांनी मनसेच्या कामगार युनियनचे सभासत्व स्वीकारले. शैलेश शिर्के, परशुराम साळवे यांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण झाले.

६) मनसे निवेदन • गुहागर (रत्नागिरी)
मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री गणेश कदम यांनी आज वाढीव विजबिलात जनतेला दिलासा मिळाला म्हणून महावितरण विभागाला निवेदन दिले.

७) मनसे कार्य • घाटकोपर (मुंबई)
रॉयल स्पोर्ट क्लब, पर्णकुटी, दादासाहेब गायकवाड वसाहत येथे नागरी समस्यांकडे (नालेसफाई) प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. मनसेकडे तक्रारी आल्यानंतर मनसेच्या श्री प्रशांत कुलकर्णी (उपविभाग अध्यक्ष) श्री कुणाल केदारे यांनी पाठपुरावा करून नालेसफाई करून घेतली.

८) मनसे कार्य • भायखळा (मुंबई)
श्री दत्ताराम लाड मार्गावरील नागरी समस्या म्हणजेच मार्गावरील गटारांच्या झाकणांची दुरवस्था झाली होती मनसे प्रभाग क्रमांक २०८ च्या वतीने पाठपुरावा करून दुरुस्ती करून घेतल्या.

९) मनसे उपक्रम • नवी मुंबई (ठाणे)
नवी मुंबई मनपा सेक्टर क्र १४, प्रभाग क्रमांक ५२ चे उपशहर अध्यक्ष श्री प्रसाद घोरपडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतिदिन याचे औचित्य साधून मोकळ्या मैदानाच्या भोवती वृक्षारोपण करण्यात आले.

१०) मनसे उपक्रम • बोरिवली (मुंबई)
प्रभाग क्रमांक ९ मनसेच्या वतीने नागरी सेवा देण्यासाठी "परिवर्तन सेवा" उपक्रम राबविण्यात येत आहे. ८४२५८३२७८९ वर अधिक माहिती.

११) मनसे उपक्रम • शीव (मुंबई)
शीव कोळीवाडा प्रभाग क्रमांक १४३ व सह्यानी सोसियल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फ्री ट्रेनिंग कोर्सेचे (ITES- Information Technology Enable Services, Web Designing, Graphic Designing, Beauty & Wellness.) नियोजन करण्यात आले आहे.

१२) मनसे उपोषण • वणी (यवतमाळ )
वणी येथे आरोग्याचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेलाच आहे, मागणी करून सरकार काही लक्ष देत नाहीय. उपजिल्हा रुग्णालयच्या मागणीसाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री राजु उंबरकर यांचे ५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण.

१३) मनसे प्रश्न • मुंबई
अभ्यासिका, ग्रंथालय सुरु करण्याची तारिख सांगा ?
मनसे विद्यार्थी सेना उपाध्यक्ष श्री अखिल चित्रे यांचा सरकारला प्रश्न.

१४) मनसे आंदोलन • नळदुर्ग (धाराशिव)
२ ऑक्टोबर रोजी होणारे उपजिल्हा रुग्णालयात चे उद्घाटन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वेळ काढूपणामुळे लांबणीवर जात असल्याने मनसेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली "प्रतिकात्मक उद्घाटन" तात्काळ आरोग्य सुविधा चालू करावी अशी मागणी करण्यात आली.

१५) मनसे भेट • ठाणे
ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी ठाण्यातील नागरिकांची भेट घेऊन वाढीव वीजबिल बाबत समस्या जाणून घेतल्या. मनसे नागरिकांच्या पाठीशी आहे. लवकरच ह्यावर तोडगा निघेल असे नागरिकांना आश्वासन दिले.

१६) मनसे भेट • संभाजीनगर
मनविसेचे श्री राजीव जावळीकर ह्यांनी संभाजी नगर कर्करोग इस्पितळ मधील कामगारांच्या समस्यांसाठी अधिष्ठाता डॉ गायकवाड यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या समजावून सांगितल्या.

१७) मनसे भेट • गोरेगाव (मुंबई)
गोरेगाव पूर्व येथील रायन इंटरनॅशनल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज मनसे नेत्या सौ शालिनी ठाकरे यांची भेट घेऊन कोरोना संकटकाळाच्या संदर्भात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.

१८) मनसे आभार • वसई विरार (पालघर)
१,१९,७४३ रिक्षा मालकांना ठोस आर्थिक दिलासा मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री संजय नाईक साहेब यांचे विरार शहर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

१९) मनसे निदर्शने • नवी मुंबई (ठाणे)
ऐरोली ते पनवेल लोकल फेऱ्या वाढवणे, लोकलला ऐरोली स्थानकात थांबा मिळावा यासाठी मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष श्री निलेश बाणखेले यांनी रेल्वे विभागाला निवेदन दिले आणि खासदार राजन विचारे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निदर्शने केली.

२०) मनसे निदर्शने • भांडुप (मुंबई)
उत्तर प्रदेश मध्ये एकामागून एक असे दोन बलात्कार च्या घटना घडल्या असताना मनसेच्या वतीने भांडुप येथे सौ. रिटाताई गुप्ता, सौ. अनिषा माजगावकर, सौ वैष्णवी सरफरे नेतृत्वाखाली आज काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला. पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

समाप्त !

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

No comments:

Post a Comment