Wednesday 28 October 2020

२६ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक २६ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब >> मुंबई >> कृष्णकुंज
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी श्री. यशवंत किल्लेदार ह्यांच्या नेतृत्वात  'महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेची' नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

राजसाहेब >> मुंबई >> कृष्णकुंज
मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांना चाहत्यांकडून (श्री आनंद प्रभू) राज ठाकरेंच्या चंदेरी प्रतिमेसह आकर्षक रेल्वे इंजिन भेट.

मनसे प्रवेश >> रत्नागिरी >> खेड
श्री संदीप फडकले (खेड तालुका उपाध्यक्ष) यांच्या प्रयत्नांनी खेड तालुक्यातील शिव बुद्रुक, भोई वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला.

मनसे यश >> पालघर >> नालासोपारा
नालासोपारा येथे प्रवाशांचा झालेला उद्रेक ह्यावर मनसेचे श्री राज नागरे ह्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले, रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत तिकीट खिडक्या जास्तीच्या उघडल्या व EVM तिकीट मशीन चालू केल्या.

मनसे निवेदन >> मुंबई >> गोराई
बोरिवली (प), आर – मध्य, गोराई (२) आर एस सी ५२ येथे १८४१.२९ चौ मी.  असा आरक्षित असलेल्या भूखंडात अधिकृत मनपा मार्केट उभारावे ह्यासाठी मनसे शाखा अध्यक्ष श्री महेश नर ह्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड ह्यांना पत्र लिहिले.

मनविसे निवेदन >> नाशिक
मनविसे शाखा अध्यक्ष हर्षद गायधनी यांचा पुढाकाराने व मनसे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी यांच्या नेतृत्वाखाली पळसे फुलेनगर देवी रस्ता पथदीप बंद असल्यामुळे  पळसे गावचे ग्रामसेवक यांना मनसेकडून निवेदन दिले.

मनसे निवेदन >> अहमदनगर >> कर्जत
माननीय पोलीस निरीक्षक (कर्जत,अहमदनगर) यांना मनसेचे श्री प्रसाद मैड यांनी राशीन येथे दर मंगळवारी आठवडे बाजार दिवशी पाच ते सहा वाहतूक पोलीस मिळणेबाबत निवेदन दिले.

मनसे उपक्रम >> मुंबई >> माहीम दादर
कुणीही उपाशी पोटी झोपू नये... पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई ह्यांनी "माणुसकीचा फ्रीज"हा उपक्रम चालू केलाय.

मनसे उपक्रम >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांतील अपंगांसाठी मनसेचे श्री योगेश पाटील ह्यांच्या पुढाकाराने श्री राजू पाटील ह्यांच्या उपस्थितीत शासन पुरस्कृत "स्वावलंबन योजनेस" सुरवात.

मनसे उपक्रम >> ठाणे >> नवी मुंबई
नवी मुंबई मधील  विविध ग्रंथालये वाचक रसिकांसाठी खुली करण्यात आली. त्याचवेळी काेराेनाच्या या रोगराईमध्ये  खबरदारी आणि सुरक्षितता जपण्यासाठी मनसे नवी मुंबईतर्फे वाशी येथील साहित्य कला मंदिर संस्थेला सॅनिटायझर स्टॅन्ड, फेस शिल्ड, सॅनिटायझर, मास्क इत्यादी आवश्यक वस्तू देण्यात आल्या. 

मनवासे इशारा >> मुंबई
फायनान्स कंपन्या आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या हस्तकांना आधी 'हात जोडून' कायद्याच्या भाषेत आणि गरज पडली तर 'हात सोडून' खळ्ळफटॅक करत कशी 'समज' द्यायची, हे मनसे आणि मनवासे यांना चांगलं माहित आहे.असा धमकीवजा इशारा मनसे सरचिटणीस श्री किर्तीकुमार शिंदे ह्यांनी फायनान्स कंपन्यांना दिला आहे.

मनसे इशारा >> मुंबई
कोरोना काळात वाहतूक बंद असताना सुद्धा आर्थिक अडचणीत सापडलेल्या  वाहतूकदारांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून धमकावून जबरदस्ती वाहन ताब्यात घेणाऱ्या सर्व खाजगी बँकांना मनसे इशारा.

मनसे इशारा >> रायगड >> महाड
महाड MIDC येथे खड्यांच्या बाबत मनसेने MIDC अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, पाच दिवस होऊन गेले अद्याप काम चालू नाही म्हणून.. मनसेचे श्री चेतन उतेकर (जिल्हा उपाध्यक्ष) यांनी आज पुन्हा भेट दिली, येत्या पाच दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर मनसेचा दणका बसेल असा इशारा दिला. 

मनसे आवाहन >> संभाजीनगर
कोरोना मुळे रूतलेलं अर्थ चक्र बघता खाजगी शाळांनी विद्यार्थी व पालकांना शालेय शुल्काबाबत सहकार्य करणं अपेक्षित आहे. ज्या पालकांना व विद्यार्थ्यांना शाळा प्रशासन शुल्क भरण्यासाठी दबाव टाकत असेल त्यांनी त्वरित मनसेशी संपर्क साधावा. (राजीव जावळीकर-9588673280, मंगेश साळवी-7058587774)

मनसे मोर्चा >> बीड >> केज
मनसे केज तालुक्याच्या वतीने बचत गटातील महिलांना कर्जमाफी मिळावी यासाठी गुरुवारी केज येथे मनसेच्या पुढाकाराने मोर्चा निघणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज मनसे जिल्हाध्यक्ष श्री सुमंत धस ह्यांनी बचत गटातील महिलांशी चर्चा केली.

मनसे आंदोलन >> सिंधुदुर्ग >> वेंगुर्ला
तालुक्यातील मंदिरे चालू करण्यासाठी तालुका अध्यक्ष वेंगुर्ला सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला मनसेतर्फे तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला येथे घंटा व टाळ वाजवुन आंदोलन करण्यात आले.

मनसे भेट >> नेरुळ
सीवूड्स मधील सिडको घरांच्या दुरुस्तीसाठी मनसेचे शिष्टमंडळ मुख्य अभियंता के एम गोडबोले यांना भेटले. मनसेच्या या शिष्टमंडळात शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष अमोल आयवले, उप विभागअध्यक्ष अप्पासाहेब जाधव, मंगेश काळेबाग , दत्ता खिलारी हे उपस्थित होते.

मनसे सत्कार >> सिंधुदुर्ग >> मालवण
व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका मालवणवासीयांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्यावद्दल तरुण युवक अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर यांचा मालवण मनसेच्यावतीने तालुकाध्यक्ष विनोद सांडव आणि सहकाऱ्यांनी सत्कार केला.

मनसे प्रश्न >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
कल्याण डोंबिवली येथे 'एमआरआय मशीनच आली नाही तर लोकार्पणाचा कार्यक्रम कसा?', मनसे शहराध्यक्ष/ राज्य उपाध्यक्ष श्री राजेश कदम ह्यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न केला आहे.

समाप्त!

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment