Thursday 8 October 2020

४ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

४ ऑक्टोबर २०२० ● मनसे बातमीपत्र

१.मनसे भेट●मुंबई
वाद्यवृंद कलाकार ५ ऑक्टोबर  सकाळी ११.०० वाजता मनसे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतील.

२.मनसे प्रवेश ●अमरावती
शहर अध्यक्ष श्री हर्षल ठाकरे (मनविसे शहर अध्यक्ष)यांच्या प्रयत्नांनी तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

३.मनसे प्रवेश●वर्धा
मनसे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जिल्हा अध्यक्ष श्री अतुल बंदिले यांच्या उपस्थितीत हिंगणघाट येथील तरुणांनी पक्षप्रवेश केला.

४.मनसेप्रवेश●बुलढाणा
दि ०३/१०/२० रोजी भिवगाव,ता देऊळगांवराजा जिल्हा बुलढाणा येथे महिला,पुरुष व युवकांनी श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन,नेते श्री विठ्ठलभाऊ लोखंडकार याच्या मार्गदर्शनाखाली,श्री.मदनराजे गायकवाड(जिल्हाध्यक्ष) यांच्या नेतृत्वावात पक्ष प्रवेश केला.

५.मनसे प्रवेश●टिटवाळा(ठाणे)
श्री दिनेश भोय(उपशहर अध्यक्ष )यांच्या उपस्थितीत तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

६.मनसे प्रवेश●ठाणे
कोकणातील वकील श्री अजय पाटील यांच्यासह अनेक वकिलांनी ,तरुणांनी श्री दिनेश मांडवकर(संगमेश्वर तालुका मनविसे संपर्क अध्यक्ष) यांचया पुढाकाराने श्री अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

७.मनसे प्रवेश●नालासोपारा(पालघर)
नालासोपारा शहर-तुळींज विभागामध्ये विभाग अध्यक्ष नरेन्द्र जाधव ,अक्षय कोयते,दर्शन घरत याच्या माध्यमातून तरुण तरुणींचा पक्षप्रवेश शहर अध्यक्ष अमित नारकर आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

८.मनसे प्रवेश●ठाणे
लोकमान्य नगर (ओवळा माजीवाडा विधानसभा)येथील तरुणी,तरुणांनी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

९.मनसे प्रवेश●नवी मुंबई
मनसे वाहतूक सेनेमध्ये नवी मुंबईतील टूर्स आणि ट्रॅव्हल चे चालक,मालक यांनी मोठ्या संख्येने नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे,वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर,विलास घोणे,दिनेश पाटील,संजय आचरेकर यांच्या उपस्थितीत मध्ये प्रवेश केला.

१०.मनसे प्रवेश ●नवी मुंबई
नवी मुंबईतील विविध विभागातील शिवभक्तांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

११.मनसे प्रवेश●साक्री(धुळे)
साक्री तालुका अध्यक्ष योगेश सोनवणे, जिल्हाध्यक्ष श्री. दुष्यंत राजे देशमुख यांच्या उपस्थित असंख्य तरुणानी मनसेत प्रवेश देखील केला.


१२.मनसे यश●पुणे
क्रुट मेमोरियल शाळेला मनसेचा दणका..!अवाजावी फी- भरण्याची सक्ती करत पालकांनां दबावाखाली घेत मुलांनां आनलाईन शिक्षणांमधून वगळलेल्यां २५० मुलांनां महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दणक्यांपुढे नमते घेत परत समाविष्ट करून घेतले.

१३.मनसे यश●सोलापूर
बचतगटांतील महिलांचा कर्ज वसुलीसाठी होणारा जाच थांबणार,मनसेच्या मोर्चाची दखल घेत पुणे विभागीय आयुक्तांनी दिले सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश अशी माहिती श्री दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.


१४.मनसे कार्य●नालासोपारा(पालघर)
प्रभाग क्रमांक ३९ मधील नालासोपारा पूर्व येथे नागरी समस्या(गटारांवरील झाकणे) मनसेचे श्री सैनिक मागंले आणि टीमच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्ती करण्यात आली.


१५.मनसे सत्कार●बदलापूर(ठाणे)
मनसे नेत्या सौ.शालिनी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे बदलापूर टीम कडून कोरोना काळात ज्या ज्या महिलांनी शहरासाठी आपले योगदान दिले त्या सर्व महिला "कोरोना योध्या" चा सत्कार करण्यात आला.


१६.मनसे इशारा●उल्हासनगर(ठाणे)
उल्हासनगर येथे रेशन दुकानात नित्कृष्ट दर्जाचा गहू पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्रुटी सुधारणा झाली नाही तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.

१७.मनसे निवेदन●संभाजीनगर
विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची संभाजीनगर येथे भेट घेऊन शासकीय रुग्णालय(घाटी,कर्करोग )येथे कार्यरत 240 कंत्राटी वर्ग-4 कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतना निवेदन संदर्भात श्री सुमित खांबेकर (राज्य उपाध्यक्ष,मनसे) यांनी निवेदन दिले.

१८.मनसे उपक्रम●भायखळा(मुंबई )
प्रभाग क्रमांक २०८ च्या वतीने "सतर्क नागरिक"संकल्पना राबविण्यात येत आहे, नागरिकांनी आपल्या समस्या https://www.mns208.com/ या संकेतस्थळ वर नोंदवाव्यात.

१९.मनसे उपक्रम●सटाणा(बागलाण नाशिक)
मनसे सटाणा शहराच्या वतीने "वीजबिल तक्रार निवारण सप्ताह"चे आयोजन केले आहे,नागरिकांनी वाढीव वीजबिल बाबत तक्रारी मनसेकडे नोंदवाव्या.


२०.मनसे उपक्रम●गोरेगाव(मुंबई)
मनसे नेत्या सौ शालिनी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव विभाग अध्यक्ष श्री विरेंद्र जाधव,सौ. धनश्री नाईक(महिला विभाग अध्यक्षा) यांच्या नेतृत्वाखाली टोपीवाला प्रसूतीगृहात आरोग्यास उपयुक्त वस्तूंचे वाटप. 

२१.मनसे उपक्रम●वाकड(पुणे)
प्रभाग क्रमांक २६ चे श्री चेतन लिम्हण यांनी प्रभागात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

२२.मनसे प्रश्न●वांद्रे(मुंबई)
निवेदन झाले,आंदोलन झाले,चर्चा झाली आता तर आग्रहाची विनंती आहे आता तरी झोपेतून जागे व्हा ..परिक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मदिरालय नाही ग्रंथालय,अभ्यासिका हवं आहे,कधी लक्षात येईल तुमच्या मुख्यमंत्री महोदय..?असा प्रश्न मनविसे उपाध्यक्ष श्री अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

२३.पद नियुक्ती●मुरबाड(ठाणे)
मुरबाड शहरातील पद नियुक्ती श्री वैभव किणी(संपर्क अध्यक्ष ) यांच्या उपस्थितीत पार पडली.

२४.मनसे आश्वासन●मीरारोड भाईंदर(ठाणे)
मीरारोड भाईंदर(१४५) विधानसभा क्षेत्रातील नागरी समस्या(तुंबलेली गटारे, कार्यरत नसलेले विजेचे खांब)बाबत श्री संदीप राणे यांनी सहकाऱ्यांसह नागरिकांची भेट घेऊन लवकरच ह्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment