Thursday 15 October 2020

१४ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१४ ऑक्टोबर २०२० ● मनसे बातमीपत्र

१| राजसाहेब ~ महाराष्ट्र
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आग्रही मागणीनंतर महाराष्ट्रात सर्वत्र ग्रंथालयं सुरु होणार; विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी दिलासादायक बाब.

२| मनसे प्रवेश ~ बुलढाणा
मनसेचे श्री मनोज चव्हाण, श्री राजेश उज्जेनकर, श्री किर्तीकुमार शिंदे, श्री संतोष धुरी, श्री केतन नाईक, निलेश पाटील आणि सहकारी/ टीम बुलढाणा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थित बुलढाणा येथे भव्य "मनसेप्रवेश" झाला. त्यावेळी स्थानिक कार्येकर्ते उपस्थित होते.

३| मनसे प्रवेश ~ नवी मुंबई (ठाणे)
नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा विभागातील सफाई कामगारांनी  सन्मा. राजसाहेब ठाकरे व आ.अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युनियनचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे व उपाध्यक्ष रुपेश कदम यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.


४| मनसे प्रवेश ~ मिरारोड भाईंदर
मनसे महिला सेनेच्या उपाध्यक्षा सौ रेश्मा तपासे उपस्थित भाईंदर पूर्व येथील विद्यार्थ्यांनी आणि कराटे आणि रोप स्कीटिंग च्या विद्यार्थ्यांनी आज मनसेत पक्षप्रवेश केला.

५| मनसे प्रवेश ~ रत्नागिरी
१६ ऑक्टोबर सकाळी ११:०० वा. कृष्णकुंज  येथे कोकणातील कार्यकर्त्यांचा भव्य पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर यांनी दिली.

६| मनसे यश ~ लातूर
मनसे जिल्हा अध्यक्ष डॉ श्री नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली मागच्या आठवड्यात रस्त्यांच्या खड्यांच्या दुरुस्ती साठी आंदोलन करण्यात आले होते. मनसेच्या आंदोलनानंतर प्रशासनला जाग आली आणि रस्ता दुरुस्तीचे काम चालू झाले.

७| मनसे यश ~ कोल्हापूर
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फायनान्स कंपन्या व कामात कसूर करणाऱ्या डाॅक्टर्स आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांना दिले होते व त्यावर अंमलबजावणी म्हणून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

८| मनसे भेट ~ डोंबिवली
KDMC तील साफसफाई कामगारांना गेल्या दोन महिन्या पासून ठेकेदार वेतन देत नाही. मनपाने सुद्धा दुर्लक्ष केले. कामगारांनी कल्याण शहर जिल्हा अध्यक्ष श्री.उल्हास दादा भोईर ह्यांच्याकडे समस्या मांडल्या त्यावेळी मनसेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

९| मनसे भेट ~ सिंधुदुर्ग
ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर ह्या पदावर कार्यरत असलेले २० कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने वेतन नाही. मनविसे जिल्हा उपाध्यक्ष श्री @AmtIbhrampurkar यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे भेट घेऊन मुद्दा समजावून सांगितला. मनसेच्या मागणीनंतर आठ दिवसांत वेतन खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले.

१०| मनसे भेट ~ मुंबई
Amazon कंपनीच्या अधिकाऱ्यांची मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री यशवंत गोळे यांनी भेट घेऊन चुकीबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागण्यास भाग पाडले आणि आवश्यक बदल लवकरच केले जातील असे आश्वासन दिले.

११| मनसे निवेदन ~ मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे सरचिटणीस श्री अनिल चितळे यांनी गृहनिर्माण मंत्री श्री डॉ जितेंद्र आव्हाड यांची मंत्रालय येथे मुंबईतील ५६ म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांना २०१८ पासून केलेल्या वाढीव भाडे व त्या वरील १८% व्याज माफ करण्या संदर्भात चर्चा करून निवेदन दिले.

१२| मनसे निवेदन ~ मीरारोड भाईंदर
मिरारोड भाईंदर शहरातील वाढती गुन्हेगारी संदर्भात ममसेची शिष्टमंडळाने सौ रेश्मा तपासे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यासंदर्भात निवेदन दिले.

१३| मनसे निवेदन ~ नागपूर
नागपूर शहर अध्यक्ष श्री विशाल बडगे आणि सहकाऱ्यांनी नागरी सुविधा पाणी प्रश्नावर आज OCW कार्यालयात निवेदन दिले.

१४| मनसे निवेदन ~ सिंधुदुर्ग
भात शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी मनसे सावंतवाडी शहराच्या वतीने करण्यात आली.

१५| मनसे निवेदन ~ वाशी
वाशी खाडी मध्ये पाण्याच्या प्रदूषणामुळे अनेक मासे मृत झाले आहे. दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे पत्र मनसेकडून प्रशासनाला देण्यात आले.

१६| मनसे उपक्रम ~ कल्याण
‘आयुष्यमान भारत’ & "महात्मा ज्योतिबा फ़ुले जन आरोग्य योजना" ह्या सरकारी योजनांचे मनसे तर्फे घारीवलीचे माजी सरपंच श्री योगेश पाटील ह्यांनी तीन दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते.सरकारी योजनेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ह्या उपक्रमाचे नियोजन केले होते.

१७| मनसे उपक्रम ~ शिवडी (मुंबई)
प्रभाग क्रमांक १९९/१९८ मनसेच्या वतीने नागरिकांसाठी करी रोड नाका येथे मोफत मास्क वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता.

१८| मनसे उपोषण ~ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना विजबिलात दिलासा द्यावा अन्यथा शेकऱ्यांच्या जमिनीत विजेचे खांब वगैरे उभे आहेत त्याबदल्यात शेतकऱ्यांना भाडे द्यावे ह्या मागणीसाठी मनसे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण उपोषणला बसले आहेत.आजच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन कर्त्यांनी भजन गाऊन सरकार आणि वीज कंपनीचा निषेध केला.

१९| मनसे नियुक्ती ~ विदर्भ
श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आशिर्वादाने तसेच मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे अध्यक्ष श्री. आदित्य शिरोडकर ह्यांनी श्री. मितेश खाडे ह्यांची मनविसेच्या उपाध्यक्ष पदी नेमणूक केली आहे.

२०| मनसे मागणी ~ मुंबई 
सर्वच समाजाची प्रार्थना स्थळे खुली करावीत अशी मागणी मनसेचे श्री अल्ताफ खान (मुंबई उपनगर सचिव) ह्यांनी केली आहे.

२१| मनसे भूमिका ~ अंधेरी
जुहू मोरगाव येथे परप्रांतीय मासे विक्रीसाठी मोकळे आणि मराठी कोळी बांधवाना अटकाव करणाऱ्या प्रशासनाविरोधात मनसे कोळी बांधवांच्या बाजूने मैदानात उतरून पाठिंबा दिला आहे.

२२| मनसे मेळावा ~ चिपळूण
मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर,चिपळूण तालुका अध्यक्ष श्री संतोष नलावडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचा कार्येकर्ता मेळावा पार पडला.

२३| मनसे इशारा ~ नवी मुंबई
मनसेच्या निवेदनांनंतर रस्ते दुरुस्तीचे काम चालू झालेय खरे, पण भ्रष्ट कंत्राटदार ह्यावर आपले खिसे भरत आहेत, भ्रष्ट अधिकारी अन कॉन्ट्रॅक्टरला घरी बसवल्या शिवाय कोपरखैरणे-घणसोली मनसे शांत बसणार नाही असा इशारा मनसे नवी मुबई, उपाध्यक्ष श्री प्रसाद घोरपडे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment