Friday 16 October 2020

१५ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१५ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश●शहापूर
शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधवांच्या उपस्थितीत असंख्य शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश.

मनसे प्रवेश●वर्धा
बँड,वाजंत्री,वादक मातंग समाजाचा बांधवांनी मा.राजसाहेब ठाकरे यांचा विचारांनी प्रेरित होऊन व मनसे जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वंदिले यांच्या नेतृत्वात मनसेमध्ये प्रवेश केला.

मनसे प्रवेश●धुळे
मनसे अध्यक्ष राज साहेब ह्यांच्या विचाराने प्रेरित होऊन धुळे मनविसे जिल्हा अध्यक्ष यांच्या कामगिरी वर विश्वास ठेवत कुसुंबा ता.साक्री येथील विद्यार्थीनीं केला मनविसेत प्रवेश केला.

मनसेप्रवेश●खेड(रत्नागिरी)
खेड तालुक्यातील खोपी ,शिरगांव, गुणदे,कुभांड,मिर्ले,कुळवंडी, मधील  शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला.


मनसे कार्य●मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात साप दिसून आल्याची माहिती काही नागरिकांनी मनसेला दिली. पावसाळ्यात मैदानात वाढलेल्या गवतामुळे सापांना राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याची शक्यता आहे.कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी म्हणून आज मैदानातील वाढलेले गवत श्री नितिन सरदेसाई ह्यांच्या नेतृत्वाखाली कापण्यात आले.

मनसे कार्य●अमरावती
ग्लोबल फार्मासिस्ट कंपनीने प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे तरुणांकडून पैसे उकळले होते,ही तक्रार मनसेकडे येताच श्री संतोष बद्रे ह्यांनी मनसे दणका देत ४० ते ५० तरुणांना न्याय मिळवून दिला.

मनसे कार्य●मुंबई
दादर माटुंगा परिसरातील भ्रष्ट ठेकेदारांच्या बदलीसाठी मनसेकडून श्री मनीष मारू ह्यांनी पालिकेला निवेदन दिले होते,आज पालिकेने कारवाई करत त्या भ्रष्ट मुकादमची बदली केली.

मनसे कार्य●पुणे
कात्रज तलावातील पाणी ज्या ज्या कारणांमुळे लोकवस्तीत शिरते त्या त्या सर्व अडचणी मनसे नगरसेवक श्री वसंत मोरे ह्यांनी बुलडोझर च्या सहाय्याने मोकळा करून घेतला.

मनसे कार्ये●पुणे
पुण्याचे मनसेचे नगरसेवक श्री वसंत मोरे ह्यांनी विधानसभा निवडणुकीत सचाई माता मंदिर जवळील अचल फार्म भागाला पाणी देतो असे आश्वासन दिले होते,निकाल श्री वसंत मोरे ह्यांच्या बाजूने लागला नसला तरी त्यांनी दिलेला शब्द पाळला.अचल फार्म भागातील नागरिकांना पाणी पुरवठा केला.

मनसे कार्ये●पुणे
पुणे कोंढवा येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणांहून ड्रेनेज व राडारोडा वाहुन आला होता,मनसेचे नगरसेवक श्री साईनाथ बाबर ह्यांनी स्वतः प्रभागात उतरून प्रशासकीय आणि कार्येकर्त्यांच्या जोडीने परिसरात साफसफाई करून घेतली.

मनसे कार्ये●विरार(पालघर)
विरार पुर्व येथील कारगिल नगर मधील रस्त्याच्या लगत  असलेली मुख्य पाईप
लाईन कित्येक दिवस गळत/नादुरूस्त होती प्रभाग क्र. २५ चे शाखाध्यक्ष श्री. विश्वनाथ कुळे यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून आणि सतत पाठपुरावा करून  दुरूस्ती करून घेतली. 



मनसे निवेदन●कर्जत
कर्जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याबाबत. तालुका अध्यक्ष रवींद्रदादा सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.


मनसे निवेदन●मुंबई
महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करावं, बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री श्री अजित पवार ह्यांची भेट घेतली. 

मनसे निवेदन●मुंबई
अमेझॉन व फ्लिकार्ट ह्या बॅंगलुरु स्थित मुजोर कंपन्यांची दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलले आहे.तरी,आज फ्लिपकार्ट, अमेझॉन ह्या मुजोर कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन श्री अखिल चित्रे ह्यांनी निवेदन दिले. 

मनसे निवेदन●मुंबई 
भांडुप ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या मार्गावर ट्रेन बंद मुळे बस वर मोठा ताण येत आहे,बस फेऱ्या वाढवण्यासाठी मनसेच्या वतीने श्री संतोष पार्टे आणि सहकाऱ्यांनी विक्रोळी डेपोत निवेदन दिले.


मनसे निवेदन●लांजा(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील  भांबेड गावात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे,मनसेच्या वतीने लांजा तालुका मनविसे सहसंपर्क अध्यक्ष श्री किरण रेवाळे आणि सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतला पाणीपुरवठा पूर्वरत करण्यासाठी निवेदन दिले.

मनसे आंदोलन●भिवंडी
मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मेट्रोमुळे रस्त्यात पाणी साठल्याने मनसेच्या वतीने "मासे पकडा" आंदोलन करण्यात आले.

मनसे इशारा●आळंदी(पुणे)
आळंदी शहरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.पाणीपुरवठा नियमित न झाल्यास मनसेकडून आंदोलन पुकारले जाईल असा इशारा मनसे जिल्हा अध्यक्ष श्री समिरभाऊ थिगळे ह्यांनी दिला आहे.

मनसे मोर्चा●कर्जत
महिला बचत गटातील महिलांचं कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने महिलांचा तहसील कार्यालयावर उद्या कर्जत रॉयल गार्डन येथून सकाळी १० वाजता मोर्चा निघणार आहे.


मनसे दणका●बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील एक विधवा महिलेस मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने शिवी घातली,ही बाब मनसेच्या लक्षात येताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फायनान्स कंपनीला मनसे दणका दिला.

मनसे दणका●नगर
मनसेचे श्री राजू दादा जावळीकर,मंगेश साळवे यांनी पालकांची लुटमार करणाऱ्या जैन इंटरनॅशनल शाळेला  मनसे दणका दिला.

मनसे उद्घाटन●मालाड(मुंबई)
मनसे कामगार सेना सरचिटणीस श्री.गजानन नारायण राणे यांच्या नेतृत्वात आज दि १५/१०/२० रोजी मेडीट्रीन इन्स्टूमेट कंपनी (Meditrin Instrument Pvt Ltd ) मलाड पश्चिम येथे व्दारसभा तसेच नामफलकाचे अनावरण श्री निशांत गायकवाड आणि श्री गजानन राणे ह्यांच्या उपस्थितीत झाले.

मनसे अभिनंदन●नाशिक
मनसेच्या कार्यसम्राट नगरसेविका सौ वैशालीताई भोसले यांची नाशिक महानगरपालिका पश्चिम विभाग प्रभाग "सभापती पदी" बिनविरोध निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.

मनसे मागणी●जालना
जालना मनसे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश बापू सोळंके ह्यांनी पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे.


मनसे मागणी●दादर 
दादर येथील भाजव विक्रेत्यांकडून हप्ता वसुली करण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,मनसेचे सरचिटणीस श्री संदीप देशपांडे ह्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

मनसे मागणी●सिंधुदुर्ग
नुकसान झालेल्या भातशेतीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.


मनसे मागणी●पुणे
पुण्यातील आंबील ओढ्याची साफसफाई पुणे मनपा कडून होत नसल्याने नागरिकांना थोड्या थोड्या पावसाने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मनसे पर्वती विभागाचे वृषभ संघवी यांनी साफसफाई ओढा करण्याची मागणी केली


पदाधिकारी बैठक●राजगड(दादर)
'महिला बचतगटांना कर्जमाफी मिळावी' ह्यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेने'ची राज्यव्यापी मोहीम. सहकार सेनेचे अध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे ह्यांनी पक्षाच्या मुख्यालयात सरचिटणीस सौ. रिटा गुप्ता ह्यांच्या उपस्थितीत मध्य व दक्षिण मुंबईतील पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

पदाधिकारी बैठक●गोरेगाव
मुंबईत गोरेगाव येथे पक्षाच्या सरचिटणीस सौ शालिनी ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सहकार सेनेचे अध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर-पश्चिम मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

No comments:

Post a Comment