Thursday 15 October 2020

११ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

११ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

१) राजसाहेब ● महाराष्ट्र
मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने ग्रंथालय १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार.

२) राजसाहेब ● पुणे
राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील मैदानावर उभे राहणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरचे भूमिपूजन करण्यात झाले. 

३) अमित ठाकरे ● मुंबई
मनसे नेते श्री अमित ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींच्या लढाऊ वृत्तीला सलाम आणि कौतुक केले तर सरकारचे आभार मानले.

४) अमित ठाकरे ● मुंबई
मनसे नेते श्री अमित ठाकरे यांनी एका मराठी वाहिनी वरील श्री केदार शिंदे यांच्या "सुखी माणसाचा सदरा" सेटला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

५) मनसे पक्ष प्रवेश ● मिरारोड भाईंदर (ठाणे)
मिरा रोड येथील पेनकर पाडा विभागात नवीन तरूण युवकांचा श्री शान पवार (शहर सचिव मनविसे) यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश झाला.

६) मनसे पक्ष प्रवेश ● रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला. तसेच पद नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला.

७) मनसे पक्ष प्रवेश ● मुंबई
प्रभाग क्रमांक  १११ + ११७ मधील विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी मनसे विभाग अध्यक्ष श्री विनोद शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

८) मनसे पक्ष प्रवेश ● रामटेक
पवनी येथील पथराई शाखेचे उद्घाटन व प्रवेश घेण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मनसेचे रामटेक तालुका अध्यक्ष, शेखर भाऊ दूंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाला. शाखा अध्यक्ष म्हणून विकास ऊईके यांची शाखा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

९) मनसे पक्ष प्रवेश ● पुणे
पुणे शहरातील दत्तनगर येथील तरुणांनी आज मनसेचे पुणे शहरातील कार्यक्षम नगरसेवक वसंत मोरे यांच्या उपस्थितीत मनसेनेत प्रवेश केला सोबतच त्यांच्या हस्ते आज नवीन शाखेचे उदघाटन ही करण्यात आले.

१०) मनसे पक्ष प्रवेश ● नायगाव (पालघर)
नायगाव येथील विविध पक्षातील तरुणांनी आजी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. वसई विरार मधील पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.

११) मनसे पक्ष प्रवेश ● नालासोपारा(पालघर)
नालासोपारा शहर मनविसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नालासोपारा मोरेंगाव परिसरातील तरुण तरुणींनी मनसेत जाहीर प्रवेश केला. 

१२) मनसे पक्ष प्रवेश ● नाशिक
नाशिक शहरअध्यक्ष अंकुश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यासोबतच आज नाशिक शहरातील अनेक तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. 

१३) मनसे पक्ष प्रवेश ● मीरा भाईंदर (ठाणे)
मीरा-भाईंदर शहरात मनसे कामगार सेना उपाध्यक्ष श्री. संदिप राणे यांच्या पुढाकाराने  रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अविनाश जाधव यांच्या उपस्थित मोठ्या संख्येने कामगारांनी मनसेत प्रवेश केला.

१४) मनसे पक्ष प्रवेश ● सांगली
सांगली जिल्ह्यातील पलूस- कडेगाव  विधानसभाक्षेत्रातील युवकांनी, कामगारांनी कामगार सेना संयुक्त सरचिटणीस सचिन गोळे आणि जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत पक्ष प्रवेश केला. 

१५) मनसे पक्ष प्रवेश ● कोल्हापूर
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील वळीवडे चिंचवाड भागातील युवा कार्यकर्त्यानी शहरअध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनसेत प्रवेश केला. 

१६) मनसे यश ● ठाणे
लक्ष्मी चिराग नगर येथे पाण्याच्या समस्सेसाठी मनसेकडून पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. मनसेच्या मागणीनंतर पालिकेने पाईपलाईन स्वच्छ करून घेतली आणि परिसरात पाणी मिळाले.

१७) मनसे यश ● जामखेड (नगर)
आठ दिवसांपूर्वी कर्जत मनसेच्या वतीने कोरेगाव-सटवाईवाडी रस्त्यासाठी अनेक वेळा निवेदन देऊन व आमरण उपोषण करून विषयाला वाचा फोडली होती आज कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व दोन दिवसात काम चालू करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

१८) मनसे भेट ● ठाणे
ठाणे येथील टॉप्स सिक्युरिटी लिमिटेड कंपनीत २० वर्ष बाऊन्सर प्लस अधिकारी पदावर कार्यरत  असलेल्या कामगारांना वर्षभराचा पगार कंपनीने दिलेला नाही. या संदर्भात गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम त्यांना घेऊन अविनाश जाधव यांची भेट घेतली. लवकरच मनसेदणका देऊ असा शब्द अविनाश जाधव यांनी दिला.

१९) मनसे भेट ● रत्नागिरी
मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर यांनी रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा सौ. संगमित्रा फुले मॅडम भेट  घेतली. खेड शहरातील सरकारी दवाखान्यात उभारण्यात आलेल्या  रत्नागिरी जिल्हातील 'क' वर्गातील नगर परिषदेचे पहिले कोविड केअर सेंटरचे उद्या उदघाटन होणार आहे. या बाबत चर्चा केली .
   
२०) मनसे कार्य ● पुणे
रविवारी ऑक्सिजन पुण्यात उपलब्ध होत न्हवता. मनसे वाहतूक सेना पुणे शहर यांच्या प्रयत्नाने पुण्यात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला.

२१) मनसे उद्घाटन ● खारघर
मनसे खारघर शाखेचे उद्घाटन श्री राजु पाटील यांच्या हस्ते झाले. विभागातील अनेक कार्येकर्त्यांच्या नियुक्त्या झाल्या, मनसे आमदार राजू पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

२२) मनसे उद्घाटन ● मालवंडी (बार्शी)
मनसे वाहतूक सेनेच्या मालवंडी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

२३) मनसे निवेदन ● पेण (रायगड)
मुंबई-गोवा महामार्गापासून पेण जवळील हमरापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सततचे खड्डे, चिखल, यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास एकूण रस्त्याच्या दुरावस्थे बाबत मनविसेचे सचिव रुपेश पाटील यासकडून मा. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन वजा आंदोलनाचा इशारा.

२४) मनसे निवेदन ● खडकवासला पुणे
पुणे खडकवासला येथे मनसेच्या रोजगार, स्वयंरोजगार विभागातर्फे विधानसभा क्षेत्रातील सर्व मॉलला सरकारी GR प्रमाणे ८०% स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ह्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

२५) मनसे इशारा ● डोंबिवली (ठाणे)
डोंबिवली मधून पनवेल, वाशी आणि ठाणे केडीएमटी बस न सोडल्यास मनसे स्टाईलने समाचार घेऊ असा इशारा मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे.

२६) मनसे इशारा ● सिंधुदुर्ग
आ. वैभव नाईक यांची बोगस कामे आणि भ्रष्टाचार मनसे जनतेसमोर मांडणार असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

२७) मनसे भेट ● सिंधुदुर्ग
मनसेच्या ओरोस रुग्णालयासमोरील कोरोना मदत केंद्रास नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली आणि स्तुत्य उपक्रमला शुभेच्छा दिल्या.

२८) मनसे मेळावा ● सिंधुदुर्ग
मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. उद्या सावंतवाडी येथी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक/ मेळावा संपन्न होईल.

२९) मनसे मेळावा ● उस्मानाबाद
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, तीन तालुक्यातील पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा नळदुर्ग येथे घेण्यात आला. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

३०) मनसे मोर्चा ● लातूर
मनसेच्या वतीने १२ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता महिलांचा भव्य मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा बचत गटांचे कर्जमाफी सह अनेक मागण्यांसाठी आहे.

३१) मनसे उपक्रम ● ठाणे
ठाणे प्रभाग १२ चे श्री दिनेश मांडवकर यांच्या वतीने वीजबिल वाढी विरोधात "तक्रार निवारण उपक्रम " घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न.

३२) मनसे उपक्रम ● अमरावती
दि 11, 10, 2020 रोजी मनसेचे शहर उपाध्यक्ष सचिन भाऊ बावनेर यांच्या कडून प्रभाग क्र.१७ तील न्यू गणेश कॉलनी व ज्ञानेश्वर मंदिर सुनील प्रोविजन लाईन परिसर याठिकाणी घरो घरी जाऊन डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्यापासून थांबवण्यासाठी औषधी फवारणी करण्यात आली.

३३) मनसे उपक्रम ● रत्नागिरी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे रत्नागिरी तर्फे शहरातील रिक्षाचालकांना "पार्टिशियन" वाटप करण्यात आले. रत्नागिरी शहरातील रिक्षाचालकांनी  महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सदस्यत्व स्वीकारले.

३४) मनसे उपक्रम ● नालासोपारा (पालघर)
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नालासोपारा शहर तुळीज विभाग आयोजित डोळे तपासणी मोफत शिबीर संपन्न झाले. 

३५) मनसे मागणी ● डोंबिवली (ठाणे)
KDMC मधील जलवाहतूक मार्ग अवलंबल्याने मनसे आमदार श्री राजू पाटील यांनी लोकल चालू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

३६) मनसे दणका ● अंधेरी (मुंबई)
आयनॉक्स सिनेमाजच्या मनमानी कारभारा विषयी मनकासे सरचिटणीस गजानन राणे यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा एल्गार देताच आस्थापनेने सांमजस्य दाखवत लॉकडाउन काळात बडतर्फ कंत्राटी आणि पर्मनंट कामगारांच्या नोकरी बाबत संघटनेसोबत चर्चा करण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली.

३७) मनसे दणका ● नवी मुंबई (ठाणे)
ऐरोलीमध्ये परप्रांतीय मच्छीमारांना विभाग अध्यक्ष निलेश बाणखेले आणि कार्यकर्त्यांनी दिला मनसे दणका, परप्रांतीय अनधिकृत मच्छिमारांमुळे स्थानिक कोळी मासळी विक्रेत्या व्यावसायिकना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

३८) मनसे दणका ● गिरगाव (मुंबई)
गिरगाव मध्ये परप्रांतीय मच्छीमारांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला मनसे दणका, परप्रांतीय अनधिकृत मच्छिमारांमुळे स्थानिक कोळी मासळी विक्रेत्या व्यावसायिकना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

No comments:

Post a Comment