Thursday 15 October 2020

१० ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१० ऑक्टोबर २०२०★ मनसे बातमीपत्र

१) राजसाहेब ● मुंबई
जगातील हार्वर्ड बिझनेस स्कुल च्या डीन पदी मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची निवड झाल्याबद्दल मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी ठाकरे शैलीत पत्र लिहून शुभेच्छा दिल्या.

२) राजसाहेब ● पुणे
महाराष्ट्र मंडळ येथे "पुलप्रेमी" टीशर्ट चे अनावरण आज मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.

३) राजसाहेब ● पुणे
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी पुण्याचे खासदार श्री गिरीश बापट यांनी सदिच्छा भेट घेतली.

४) राजसाहेब ● पुणे
स्वारगेट (पुणे) पाणी पुरवठा तोडफोड प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी राजसाहेबांची भेट घेतली व साहेबांनी शुभशिर्वाद आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

५) मनसे प्रवेश ● मालवण (सिंधुदुर्ग) | परशुराम उपरकर
साळेल नांगरभाटचे माजी सरपंच श्री उदय गावडे यांनी कार्येकर्त्यांसह मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

६) मनसे प्रवेश ● नागपुर | हेमंत गडकरी
श्री राजसाहेब ठाकरे यांचया विचाराने प्रेरित होऊन उत्तर विधानसभा क्षेत्र, नागपूर येथील प्रभाग ६ व प्रभाग १ व ४ मधील अनेक युवकांनी मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

७) मनसे यश ● नवी मुंबई (ठाणे) | निलेश बाणखेले
मनसे उपशहर अध्यक्ष श्री निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली स्थानकात लोकल थांबवावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते, त्यांच्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र सैनिकांनी ट्रेनचे जोरदार स्वागत केले.

८) मनसे यश ● पुणे | कल्पेश यादव
मनविसे पुणे शहर अध्यक्ष श्री कल्पेश यादव यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. इयत्ता ५ आणि ८ च्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर.

९) मनसे कार्य ● पुणे | साईनाथ बाबर
कोंढवा मतदारसंघात मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर यांच्या माध्यमातून शिवशक्ती नगर येथे नवीन गतिरोधकचे काम चालू केले आहे.

१०) मनसे मोर्चा ● वसगत | काशिनाथ टोपे पाटील
ओला दुष्काळ, महिला बचतगट कर्ज माफी, वीजबिल माफी अश्या विविध मागण्यांसाठी मनसेचे श्री काशिनाथ टोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १३ ऑक्टोबर २०२० ला भव्य मोर्चा निघणार आहे.

११) मनसे उपक्रम ● मुंबई 
मुंबई प्रभाग क्रमांक २१९ च्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम श्री अभिषेक सकपाळ, लक्ष्मण कदम, दत्ता येलवंडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.

१२) मनसे उपक्रम ● मुंबई 
मनसे नेते श्री बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली साई श्रद्धा सेवा मंडळ, तसेच गुन्हे अन्वेषण विभाग क्रमांक-२ सातरस्ता येथे शाखाध्यक्ष श्री. मारुती दळवी, श्री. विनय हळदणकर यांच्या सहकार्याने मास्क आणि सॅनिटाइझर वाटप करण्यात आले.

१३) मनसे इशारा ● नवी मुंबई (ठाणे)
लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे सर्वच संतप्त झाले आहे. याविरोधात मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या 15 दिवसात वाढीव वीज बिल कमी केले नाही, तर मनसेच्या महिला पदाधिकारी मनसे स्टाईलने आमरण उपोषण करु असा इशारा दिला आहे.

१४) मनसे आंदोलन ● चांदीवली (मुंबई)
नाल्यात पडून महिलेचा मृत्यू झाला त्या विरोधात चांदीवली मनसे वतीने ताईंना श्रद्धांजली वाहताना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बहिऱ्या सत्ताधाऱ्यांना जाग करण्यासाठी शनिवार, १० ऑक्टोबर, ०६:०० वाजता 
३४० बस स्टॉप, असल्फा मेट्रो स्टेशन, घाटकोपर येथे थाळी नाद आंदोलन होणार आहे.  

१५) मनसे मागणी ● जळगाव
दिपनगर औष्णक वीजनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांना भरती करून घ्यावे. या मागणीसाठी मनसे भुसावळकडून शहराध्यक्ष मा. विनोद पाठक यांनी मुख्य अभियंता विवेक रोकडे व मुकेश मेश्राम यांच्या सोबत चर्चा केली असता पुढील दोन  दिवसांत भरती प्रक्रिया सुरू करण्याच आश्वासन मनसेनेला देण्यात आलं आहे.

१६) मनसे निवेदन ● महाबळेश्वर (सातारा)
महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटन स्थळावरील पाँईट व मंदिर, वेण्णा लेक, प्रतापगड किंल्ला, मिनी काश्मीर तापोळा पर्यटन पाँईट सुरू करणेबाबत. मनसे महाबळेश्वर तालुका यांसकडुन पर्यटन स्थळे चालु करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

१७) मनसे निवेदन ● हिंगोली
कळमनुरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मनसेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले आहे.

१८) मनसे निवेदन ● पंढरपूर | शशिकांत पाटील
पंढरपूर प्रांतआधिकारी  यांना मनसे पंढरपूर तालुकाध्यक्ष  शशिकांत आप्पा पाटील यांनी अजनसोंड येथे स्मशानभुमी तील अतिक्रमण हाटवण्याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.

१९) मनसे दणका ● नवी मुंबई (ठाणे) | गजानन काळे
ऐराेली, रबाळे प्रिजय हीट एक्सचेंजर कंपनीच्या कामगारांना व्यवस्थापनेकडून विविध प्रकारे त्रास देण्याचे काम चालू होते व लॉकडाउनमधील पगार ही कामगारांना दिला नव्हता. गजानन काळे यांनी मनसे इशारा देताच कंपनीने कामगारांच्या समस्या येत्या १५ दिवसात सोडवू असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले. 

२०) मनसे उद्घाटन ● उलवे (रायगड) | गजानन राणे
अंबुजा सिमेंट उलवे येथील कार्यालय येथे मनसेचे श्री गजानन राणे यांनी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्घाटन केले.

२१) मनसे नोंदणी ● महाराष्ट्र
महाराष्ट्रातील सर्व केबल चालकांची मनसे केबल सेनेचे सभासत्व नोंदणीसाठी नोंदणी राज्यभर सुरू.

२२) मनसे नियुक्ती ● सिंधुदुर्ग | परशुराम उपरकर
मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी रिक्त पदी जिल्ह्यातील अनेक नियुक्त्या केल्या.

No comments:

Post a Comment