Thursday 15 October 2020

९ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

९ ऑक्टोंबर २०२० ● मनसे बातमीपत्र

१) राजसाहेब ● पुणे
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेस भेट दिली.

२) राजसाहेब ● मुंबई
डोंगरी येथील कोळी माता भगिनींना त्रास देणाऱ्या अनधिकृत मासेविक्रेत्यांना मनसे दणका दिला म्हणून कोळी भगिनींनी मनसे प्रमुख श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांचे आभार मानले.

३) मनसे यश ● संगमेश्वर (रत्नागिरी)
मनविसे संगमेश्वर तालुका संपर्क अध्यक्ष श्री दिनेश मांडवकर आणि टीम यांच्या कडून वेळोवेळी पाठपुरावा झाल्यानंतर साखरपा येथील बँक ऑफ इंडिया येथे मराठी अधिकारी लाभले.

४) मनसे यश ● मुंबई
मराठीत बोलायला सराफाचा नकार ! मनसेच्या खळ खट्याक नंतर मागितली आंदोलन कर्त्या लेखिका शोभा देशपांडे ह्यांची जाहीर माफी.

५) मनसे यश ● पुणे
लोणीकंद येथील एक कंपनीने कामगारांना कामावरून बडतर्फ केले होते मनसेचे श्री गणेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर  बडतर्फ केलेले कामगार पुन्हा कामावर रुजू.

६) मनसे यश ● पलूस (सांगली)
पलूस नगरपरिषद हद्दीतील जाहिरात फलक मोडकळीस आला होता, रहदारीचा भाग असल्याने जीवित हानी टाळण्यासाठी मनसेने पाठपुरावा केला. अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मोडकळीस आलेला जाहिरात फलक काढून टाकला.

७) मनसे प्रवेश ● अंधेरी(मुंबई)
मनसे अंधेरी पूर्व विधानसभेतील विभागअध्यक्ष रोहन सावंत ह्यांच्या मार्गदशनाने धर्मेश विसारिया ह्यांच्या सह वॉर्ड क्र ८१ व ७६ येथील अनेक तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

८) मनसे मदत ● ठाणे
१० वीत ९८%  गुण मिळवलेल्या विद्यार्थीनीच्या मदतीसाठी मनसेचा पुढाकार, अविनाश जाधव यांच्याकडून फी चाळीस हजार पर्यंत कमी करण्यात आली, रिटा गुप्ता यांच्याकडून ₹४०००० रुपयांची आर्थिक  मदत, वह्या पुस्तकांचा खर्च श्री गजानन राणे उचलणार.

९) मनसे कार्य ● नागपूर
यादव लिंगाला नामक व्यक्ती मागील १५ दिवसापासुन वंजारी दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत होते. आजवर ५ लाख खर्च झाला आता अजुन २ लाख भरायला सांगितले अशावेळी मनसे दक्षिण नागपुर उपाध्यक्ष लोकेश कामडी दवाखान्या मध्ये येऊन डॉक्टरांसोबत बोलुन २ लाख रुपयांचे बिल माफ करून दिले.

१०) मनसे कार्य ● नागपूर
पीडित विधवा महिला कमला यादव यांनी बचत गटातून कर्ज घेतले होते. टाळेबंद मुळे परतफेड करणे शक्य झाले नाही, घरचे कमावते हात सोडून गेले, फायनान्स वाले तगादा लावून बसले मनसेच्या सौ मनीषा पापडकर ह्यांनी पुढाकार घेऊन कर्ज माफ करायला लावले. 

११) मनसे कार्य ● कांदिवली (मुंबई)
कांदिवलीची तरुणी राधिका गुप्ता हिला अपघातात उजव्या पायाला गंभीर इजा झाली. मनीष जाधव, भगवान जाधव महाराष्ट्रसैनिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. शाखाध्यक्ष निवृत्ती पवार वेळीच धावुन येऊन डाँक्टरांशी चर्चा करुन उपचार करण्यासाठी विनंती करुन सहकार्याची भावना जोपासली.

१२) मनसे लढा ● पुणे
अजित नागरी पतसंस्था यांच्याकडून बचत गटांवर अन्यायकारक कारवाई होत आहे याविरोधात मनसे सरचिटणीस श्री वसंतराव मोरे यांनी आवाज उठवला आहे.

१३) मनसे लढा ● गोराई (बोरिवली, मुंबई)
अदानी इलेक्ट्रिसिटी, महानगर गॅस यांच्या पिळवणूक विरोधात मनसेचे प्रभाग क्रमांक ९ चे शाखा अध्यक्ष श्री महेश नर यांचा लढा सुरु.

१४) मनसे निवेदन ● सोलापूर
सोलापूर विद्यापीठच्या कुलगुरू यांचा स्वभाव विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडणारा आहे अश्या अनेक तक्रारी त्यांच्याबाबत आहेत त्या तक्रारींचे निवेदन शहर अध्यक्ष श्री राहुल पाटील ह्यांनी मंत्री उदय सामंत ह्यांना दिले.
 
१५) मनसे निवेदन ● मालेगाव (नाशिक)
कोलकाता पॉवर लिमिटेडचे तोकडे मनुष्यबळ अपुरी सेवा वाढती वीजचोरी तर ८०% स्टाफ स्थानिक अपेक्षित असून सुद्धा वरिष्ठ अधिकारी बंगाली भाषिक असल्याने विसंवाद आढळतोय कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता नाही अश्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मालेगाव मनसेने लेखी निवेदन दिले.

१६) मनसे निवेदन ● मुंबई
टपाल वाहन सेवेत होत असणाऱ्या रिक्त जागांच्या भरतीत स्थानिक मराठी भूमीपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे.यासाठी मनसे शिष्टमंडळाने श्री नंदकुमार चिले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले.

१७) मनसे निवेदन ● चंद्रपूर
चंद्रपूर मनसे शहराध्यक्ष मनदिप रोडे यांच्या तर्फे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, यासह स्थानिक खासदार यांना, गंगाकाशी नामक नवीन उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये ५०% बेड चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी राखीव ठेवण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.

१८) मनसे निवेदन ● मानखुर्द (मुंबई)
प्रभाग क्रमांक १४१ येथे नागरी सुविधांचा अभाव (शौचालय) असल्याने मनसेचे श्री श्रीमंत टेंगळे यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन अवगत केले.

१९) मनसे निवेदन ● नागपूर
सरकार ने अनलॉक ५ मध्ये छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक यांना मुभा दिली आहे. पण त्याच सर्व रोडवरील फेरीवल्याच्या कडे खुलेआम दारू विक्री चालू आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढतेय या संदर्भात कारवाई करण्यात यावी म्हणून मनसेकडून सौ मनीषा पापडकर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.

२०) मनसे दणका ● नागपूर
नागपूरच्या NXT कंपनीतील कंत्राटदार पळून गेल्यामुळे ६ कामगारांचा पगार गेल्या वर्षभरापासून मिळला नाही. मनसेच्या कामगार संघटनेचे किशोर बागडे यांच्या कानावर ही बाब येताच त्यांनी कंपनी व्यवस्थापकाला मनसे दणका देताच १० दिवसात विषय मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन लिहून घेतले.

२१) मनसे दणका ● पनवेल
पनवेलमध्ये लॉकडाउनमध्ये १२ कामगाराना नोटीस न देता कामावरून काढले. मनसे कामगार सेनेचे सचिन गोळेंनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून कामगारांना परत कामावर रुजू करा असा दम दिला कंपनी व्यवस्थापनाने २ दिवसात कामगारांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ असे ठोस आश्वासन दिले. 

२२) मनसे दणका ● नागपूर
काही दिवसांपूर्वी नागपूर मनसे महिला सेनेतर्फे शहरातील कापड व्यवसायिकांकडून होत असलेल्या महिलांच्या आक्षेपार्ह अंतर्वस्त्रे प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात आलेली त्यावर मनसेच्या निवेदनाची सक्करधरा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी दखल घेत हद्दीतल्या दुकानदारांना बोलावुन सक्त ताकीद दिली.

२३) मनसे आंदोलन ● चंद्रपूर
मनसे जिल्हाध्यक्ष श्री सचिन भोयर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावरील ९३० (मुल, चंद्रपुर) खड्ड्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता मनसेने राष्ट्रीय महामार्ग खोदून आंदोलन केले.

२४) मनसे आंदोलन ● पुणे
ब्रिक्स इंडिया प्राव्हेट लिमिटेड पुणे ह्या कंपनीने ४३० कामगारांचे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वेतन दिले नाही. मनसेकडून श्री गजानन राणे यांच्या नेतृत्वाखाली "No Pay, No Work" आंदोलन करण्यात येणार आहे.

२५) मनसे भेट ● कामगार समस्या
श्री गजानन राणे यांनी TATA स्टीलच्या कामगारांच्या समस्या विषयी टाटा स्टील व्यवस्थापण ला भेट दिली. कामगारांच्या समस्या समजावून सांगितल्या, कामगारांच्या हितार्थ सकारात्मक चर्चा झाली.

२६) मनसे भेट ● डोंबिवली
डोंबिवली मधील "Holy Angel" शाळेच्या पालकांनी काल फिवाढीसह अन्य तक्रारी संदर्भात मनसे गोग्रासवाडी कार्यालयात भेट देऊन अडचणी मांडल्या. त्यांच्या मागणीनुसार शाळा प्रशासन व पालकांची संयुक्त बैठक आयोजित करु असे श्री मनोज प्रकाश घरत यांनी आश्वासन दिले. 

२७) मनसे दौरा ● सांगली
मनसेचे कामगार संघटनेचे श्री सचिन गोळे ११ ऑक्टोबर रोजी सांगलीत येत आहेत. सांगलीतील कामगारांनी आपल्या काही समस्या असतील तर त्यांच्याकडे मांडू शकता.

No comments:

Post a Comment