Thursday 15 October 2020

१२ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१२ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र


१ ⤵️ मनसे प्रवेश • वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील अनेक तरुण कार्येकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

२ ⤵️ मनसे प्रवेश • कळमनुरी
कळमनुरी येथे विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

३ ⤵️ मनसे प्रवेश • उल्हासनगर
उल्हासनगर मध्ये रिक्षा चालकांचा मनसेत उल्हासनगर मनसेचे शहर संघटक मैनुद्दीनभाई शेख यांच्या नेतृत्वात तसेच उप-जिल्हा सचिव श्री संजय घुगे, शहर सह-सचिव प्रवीण माळवे, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विभाग अध्यक्ष बादशहा शेख, अक्षय धोत्रे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला.

४ ⤵️ मनसे प्रवेश • नागपूर
मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन दक्षिण विभाग क्षेत्र वार्ड नं .32 येथे नागपूर उपशहर अध्यक्षा कल्पना चौहान यांच्या नेतृत्वात महिलांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी नागपूर शहर अध्यक्षा संगिता सोनटक्के आणि अचला ताई मेसन उपस्थित होत्या.

५ ⤵️ मनसे यश • मानखुर्द
मनसे रस्ते आस्थापना विभागाचे प्रभाग संघटक श्री श्रीमंत टेंगळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मनसेच्या मागणीनंतर प्रभागातील रस्ते दुरुस्तीचे काम चालू.

६ ⤵️ मनसे यश • नवीमुंबई
मनसे शहर अध्यक्ष श्री गजानन काळे आणि टीमच्या पाठपुराव्याला यश १ कोटींची रक्कम काेविड रुग्णांना परत,नवी मुंबई मनपाची खाजगी रुग्णालयांवर कारवाई.

७ ⤵️ मनसे कार्य • मुंबई
प्रभाग क्रमांक १३० चे श्री विकास गायकवाड (एन विभाग प्रभाग संघटक) यांच्या पाठपुराव्यामुळे नित्यानंद नगर येथील वामन मास्तर वाडी, शशी सहकार बालवाडी परिसरातील बंद पथदिवे चालू करून घेतले.

८ ⤵️ मनसे भेट • बोरिवली
मनसे सरचिटणीस श्री नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळ दि.१३ ऑक्टोबर रोजी "महानगर गॅस" व्यवस्थापनाला वाढीव बिल संदर्भात भेट देणार आहेत.

९ ⤵️ मनसे निवेदन • मीरारोड भाईंदर
भाईंदर येथील शासकीय रुग्णालयात कोव्हीडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मोबाईल चोरीला जातो शासकीय रुग्णालयात इतकी सुरक्षा असूनही वस्तू गहाळ होते तरी संबंधित विषयाची जबाबदारी इथल्या व्यवस्थापनाने स्वीकारून चौकशीचे आदेश द्यावे अन दोषींवर कारवाही झालीच पाहिजे यासाठी भाईंदर मनसेच निवेदन. 

१० ⤵️ मनसे निवेदन • बुलढाणा
बुलढाणा येथे सर्क्युलर रोडच्या काँक्रेटिकरण कामाकरिता मा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग याना मनसे शहर अध्यक्ष मनोजभाऊ पवार यांनी सहकाऱ्यांसह निवेदन दिले.

११ ⤵️ मनसे निवेदन • गुहागर
पाटपन्हाळे कोंडवाडी ते पिंपळवट आरे एस टी सुरू करण्यासाठी मनसे गुहागर तालुक्याच्या वतीने श्री विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली गुहागर डेपोला निवेदन देण्यात आले.

१२ ⤵️ मनसे निवेदन • राजापूर (रत्नागिरी)
ओणी आणि ओझर विभागातील जीर्ण झालेल्या खांबांबद्दल उप कार्यकारी अभियंता ह्यांना मनसेच्या वतीने श्री संजय जडियार (मनसे उप तालुकाध्यक्ष ) यांनी निवेदन दिले आणि अपघात टाळण्यासाठी लक्ष घालण्यास सूचना केल्या.

१३ ⤵️ मनसे निवेदन • सालेकसा
सालेकसा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

१४ ⤵️ मनसे इशारा • नवीमुंबई
कित्येक दिवस निवेदन देऊन झाली पण सरकारला जाग येत नाहीय. मनसे महिला शहर अध्यक्ष डॉ. सौ आरती पाटील-धुमाळ यांनी वीज बिलात दिलासा न दिल्यास मनसेकडून उपोषण केले जाईल असा इशारा दिला आहे.

१५ ⤵️ मनसे आंदोलन • नागपूर
नागपूर शहरातील कपड्यांच्या दुकानाबाहेर अंतर्वस्त्रे प्रदर्शन मांडलेले असते त्याविरोधात मनसे नागपूर महिला सेनेच्या वतीने पोलिसांत तक्रार केली होती पोलिसांनी व्यापाऱ्यांना समजावून सांगितले तरीही काही मुजोर व्यापारी पोलिसांचा आदेश जुमानायला जलतायर नाहीत मनसेच्या महिला आघाडीने स्वतः मार्केट मध्ये उतरून व्यापाऱ्यांना सज्जड दम भरला.

१६ ⤵️ मनकासे आंदोलन • मुंबई
सरचिटणीस श्री. गजानन राणे ह्यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून कार्यरत असलेले आयटी असिस्टंट मागील ०५ महिन्यापासुन वेतन न मिळाल्यामुळे ते सर्व आजपासून 'No Pay, No Work' ह्या तत्वावर कामबंद आंदोलन करत आहेत. 

१७ ⤵️ मनविसे आंदोलन • पेण
कारमेल हायस्कूल शाळेत होणारी मराठी भाषेची गळचेपी वाढीव फी, वाढीव पुस्तकांची किंमत अशा अनेक प्रकारे शाळा मनमानी अथवा लुटमार करतेय शिवाय अनेक निवेदने देऊन सुद्धा शाळा उत्तर देत नाही म्हणून शाळे विरोधात १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मनविसेने आंदोलन पुकारले आहे. (रुपेश पाटील)

१८ ⤵️ मनसे उपक्रम • जळगाव
मराठी प्रतिष्ठान आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात ५ पिंक रिक्षा सेवेसाठी उपलब्ध. याच संदर्भात त्या महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून श्री जलील देशपांडे यांनी पोलिसांकडून सहकार्यची भावना व्यक्त केली.

१९ ⤵️ मनविसे उपक्रम • ठाणे
ठाणे किसन नगर येथील महिलांना कोरोना काळात रोजगार मिळावा ह्या हेतूने मनविसेने तेथील स्थानिक महिलांकडून मास्क बनवून घेतले आणि त्यांच्याच हस्ते तिथल्या रिक्षा चालकांना वाटप केले.

२० ⤵️ मनसे मोर्चा • लातूर
मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीविरुद्ध आणि कोरोना टाळेबंदीमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिला बचतगटांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सोलापूरनंतर लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे अध्यक्ष श्री. संतोष नागरगोजे ह्यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा.

२१ ⤵️ मनकासे दौरा • बुलढाणा
मनसे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, कार्यध्यक्ष संतोष धुरी, उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, चिटणीस केतन नाईक, निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा बुलढाणा दौरा दि. १४+१५ ऑक्टो. रोजी सुरू.

२२ ⤵️ मनसे सन्मान • कोल्हापूर
कोल्हापूर मनसेच्या वतीने कोरोना काळात आपले महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या "कोविड योध्यांचा" मनसेचे वतीने सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री रवी गोंदकर आणि टीमने केले होते.

२३ ⤵️ मनसे कार्य • खेड (रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्यातील "क" श्रेणीतील पहिली खेड नगर परिषद (मनसे सत्ताधारी) अंतर्गत अत्याधुनिक CCC (कोविड केअर सेंटर) व कार्डियाक रुग्णवाहिका याच्या लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर, विद्यमान खासदार श्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

२४ ⤵️ मनसे उद्घाटन • नालासोपारा (पालघर)
प्रवाशांच्या सेवेसाठी मनसे वाहतूक सेनेच्या वतीने नालासोपारा पूर्वेकडील श्रीरामनगर येथील नाक्यावर रिक्षा स्टँडचे उदघाटन करण्यात आले. स्टँड अध्यक्ष म्हणून सुलतान अली शेख यांची नियुक्ती करण्यात आली.

No comments:

Post a Comment