Thursday 1 October 2020

३० सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

३० सप्टेंबर २०२० ● मनसे बातमीपत्र

१.मनसे पक्षप्रवेश  👥 कळमनुरी (हिंगोली)
कळमनुरी येथील तरुणांनी राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे पक्षात प्रवेश केला. 

२.मनसे पक्षप्रवेश  👥 मोताळा (बुलढाणा)
सारोळा, पीर वडगाव, पोफळी या गावातील तरुणांनी राजसाहेबांच्या विचारांवर प्रेरीत होऊन श्री विठ्ठल लोखंडकर, मदन राजे गायकवाड (जिल्हाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत आज तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

३.मनसे पक्षप्रवेश 👥 खेड (रत्नागिरी)
खेड तालुक्यातील शिवसैनिकांचा मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. (३०/०९/२०२०)

४.मनसे पक्षप्रवेश 👥 खेड(रत्नागिरी)
खेड तालुक्यातील असगणी व दाभिळ  गावातील तरुणांनी श्री संदीप फडकले (खेड तालुका उपाध्यक्ष) यांच्या माध्यमातून श्री वैभव खेडेकर (सरचिटणीस) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

५.मनसे पक्षप्रवेश 👥 चिपळूण (रत्नागिरी)
चिपळूण येथील सौ श्रावणी सतीश चिपळूणकर, सौ सलमा सलिम परकार या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

६.मनसे निवड ✅ माढा (सोलापूर)
श्री .दिलीप जोशी (माढा तालुका उपाध्यक्ष) यांची लऊळ गावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. अभिनंदन!💐

७.मनसे निषेध 🏴 मुंबई
उत्तर प्रदेश घटनेकडे जातीय विचाराने बरबटलेले मेंदू जातीने पाहात असले तरीही मनसे ह्या संतापजनक घटनेचा निषेध व्यक्त करते. सौ. रिटा गुप्ता (मनसे नेत्या) यांनी निषेध नोंदवत कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे.

८.मनसे दणका 💪 बदलापूर (ठाणे) 
ब्लॉसम स्कुल तर्फे फिसाठी अनेकदा पालकांच्या मागे तगादा लावला जायचा, मनसेचे श्री अमित कदम (मनविसे) आणि शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांच्या नेतृत्वाखाली सदर शैक्षणिक संस्थेला दणका दिला. ज्या विध्यार्थ्यांना कमी केले होते त्यांना मनसेच्या दणक्यांनातर पुन्हा घेतले जाईल.

९.मनसे यश ⭐  मुंबई
मनसेच्या दबावानंतर मुंबईची ओळख असलेल्या डबेवाल्यांना अखेर मुंबई लोकलचे दरवाजे उघडे.

१०.मनसे यश ⭐ महाबळेश्वर
महाबळेश्वर येथे मनसेच्या पाठपुराव्यानंतर आधार कार्ड केंद्र सुरू. ह्या लढ्यात ज्या ज्या पदाधिकारी वर्गाने स्वतःला झोकून दिले त्यांचे आभार.

११.मनसे यश ⭐ जालना
जालना जिल्हाध्यक्ष श्री बळीराम खटके आणि टीमने अंबड शहराला जोडला जाणारा रस्ता ३५ फूट ऐवजी ५० फुटाचा करण्याची मागणी केली होती.मनसेच्या मागणी नंतर प्रशासनाने घेतला ५० फूट रस्त्याचा निर्णय.

१२.मनसे कार्य 🌟 हिंगणघाट (वर्धा)
मनसे आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबीर हिंगणघाट येथे पार पडला.

१३.मनसे कार्य 🌟 मुंबई
भायखळा विधानसभा क्षेत्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील नागरी समस्या (घनकचरा) सोडवण्यात मनसे शाखा क्रं २०८ च्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.

१४.मनसे कार्य 🌟 चाकण (पुणे)
चाकण शहारामध्ये श्री.अभय वाडेकर (पुणे जिल्हा संघटक) यांच्या नेतृत्वाखाली आज वीजबिल तक्रार निवारण व वीजबिल दुरुस्ती कॅम्प च आयोजन करण्यात आले.

१५.मनसे कार्य 🌟 मुंबई
भाजप आमदार सुनील राणे यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे मराठी माणसाला फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करणे अवघड झाले होते, सत्ताधारी शिवसेना त्रास देत होती. जप्त केलेली गाडी मनसेच्या दबावामुळे पुन्हा मराठी व्यावसायिकाला मिळाली.

१६.मनसे कार्य 🌟 भिवंडी (ठाणे)
मनविसे भिवंडीचे श्री संतोष साळवी यांच्या प्रयत्नांनी डॉ ओमप्रकाश अगरवाल शाळेतील विद्यार्थ्यांची माहे जुलै, ऑगस्ट महिन्याची प्रत्येकी ₹ १००० म्हणजेच विद्यार्थी संख्या पाहता साधारण ₹ ४००००० रुपये शाळा व्यवस्थापन कडून माफ करण्यात यश आले आहे.

१७.मनसे कार्य 🌟 ठाणे 
मनपा ठाणे येथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना मनसेचे श्री संजय म्हसे यांच्या प्रयत्नांनी एक लक्ष रुपयांचे विमा कवच.

१८.मनसे कार्य 🌟 संभाजीनगर
संभाजीनगर शासकीय कर्करोग इस्पितळात काम करणाऱ्या ४० कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन दिले जात न्हवते. मनसेचे श्री राजीव जावळीकर यांच्या दणक्याने डीन ने सहा दिवसात वेतन वर्ग केले जाईल असा शब्द दिला.

१९.मनसे कार्य 🌟 कल्याण (ठाणे)
मनसे, मनविसे कल्याण शहर यांच्या वतीने मनसे आमदार श्री राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करणयात आले होते. १२०० हुन अधिक नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांनी सहभाग घेतला. ९५० जणांना संधी उपलब्ध झाली आहे, ते ९५० चाकरमानी २ ते ३ दिवसात नोकरीवर रुजू होतील.

२०.मनसे दणका 🔥 पेण (रायगड)
जोहे गावातील तलाठी सतत गैरहजर असल्याने नागरिकांच्या कामाचा खेळ खंडोबा झाला होता. मनविसेचे सचिव श्री रुपेश पाटील यांच्या दणक्यांनातर तलाठी पूर्वरत.

२१.मनसे निवेदन ✍️ पुणे
भारती विद्यापीठ मधील गैरप्रकार बाबत मनविसेचे पुणे शहर सचिव श्री कल्पेश यादव यांनी निवेदन दिले.

२२.मनसे निवेदन ✍️ नागपूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मध्ये अनेक वर्षे पारडी भंडारा रोड, संघर्ष नगर येथील रस्ता, उड्डाणपूल याचे काम रखडलेले आहे, या विरोधात मनसे तर्फे श्री. विशाल बडगे (शहर अध्यक्ष) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

२३.मनसे निवेदन ✍️ नवी मुंबई (ठाणे)
सिडको, बृहन्मुंबई परिवहन सेवा (BMTC) चे १५८७ कामगार १९९० पासून संघर्ष करीत आहेत. त्यांनी मनसेवर विश्वास ठेवत त्यांच्या संघर्षाला अंतिम स्वरूप देऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली. कामगारांच्या समस्यांचे निवेदन श्री गजानन काळे यांनी आमदार राजू पाटील यांना दिले.

२४.मनसे निवेदन ✍️ मुंबई 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून श्री प्रशांत राणे यांनी "मुंबई मेट्रोमध्ये ८०% स्थानिक कामगारांना नोकरी मिळण्यासाठी" निवेदन दिले.

२५.मनसे निवेदन ✍️ मीरारोड भाईंदर (ठाणे)
प्रभाग क्रमांक ८ शाखा अध्यक्ष श्री सुशांत तटकरे यांनी प्रभागातील नागरी समस्यांबाबत (सार्वजनिक शौचालय) संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन दिले.

२६.मनसे निवेदन ✍️ नाशिक
महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे प्रदेश अध्यक्ष मा. परेश तेलंग. ऐअरटेल व जिओ-रिलायन्स कंपन्यांचा केबल चालकांवरील अन्याय त्वरित दूर होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन.

२७.मनसे नियुक्ती 🛑 नवी मुंबई (ठाणे)
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची नवी मुंबई कार्यकारिणी जाहिर मनचिक सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नवी मुंबईतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची कार्यकारिणी जाहिर केली.

२८.मनसे मागणी 📢 फलटण (सातारा)
बोगस सैन्य भरती घोटाळ्यातील पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून तपास सी.बी.आय. कडे वर्ग करावा अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री युवराज शिंदे यांनी केली आहे.

२९.मनसे मागणी 📢 अंधेरी (मुंबई) 
जेवता मग फी भरायला काय झालं? असे उद्धट बोलणाऱ्या राजराणी मल्होत्रा विद्यालय च्या मुजोर व्यवस्थापक आणि शिक्षक वर्गावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे यांनी शिक्षक उपसंचालक यांच्याकडे केली आहे.

३०.मनसे मागणी 📢 पनवेल (रायगड)
मनसे रस्ते आस्थापना चे श्री योगेश चिले आणि पनवेल मनसे टीम रायगड येथील अमूल आस्थापना मधील रोजगार  ८०% भूमीपुत्रांचा मिळाला पाहिजे यासाठी आग्रही. अन्यथा उग्र आंदोलन..!

३१.मनसे मागणी 📢 वांद्रे (मुंबई)
परीक्षा अगदी तोंडावर आल्यात, मनसेच्या अखिल चित्रे यांनी  अभ्यासिका चालू करण्याची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने अद्याप निर्णय न घेतल्याने अखिल चित्रे राज्यपालांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली.

३२.मनसे मागणी 📢 औरंगाबाद
आठवडा बाजाराचे जागेवर कोरोना रुग्णांचा जैविक कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य प्रशासनाने धोक्यात घालू नये. अशी मागणी मनसेचे नंदकिशोर भावे यांनी केली आहे.

३३.मनसे मोर्चा 🚩 मुंबई 
सुरक्षा रक्षकांना जी वागणूक आणि गैरव्यवहार केला जातोय त्या विरोधात मनसे सुरक्षा रक्षक सेनेचा सोमवार ५ ऑक्टोबर २०२० ला मोर्चा IIT वर निघणार आहे.

३४.मनसे मोर्चा 🚩 मुंबई
मनसे सरचिटणीस/ मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टोल वाढीविरोधात १ ऑक्टोबर रोजी ऐरोली टोल नाक्यावर मनसेचा एल्गार मोर्चा निघणार आहे.

३५.मनसे इशारा ⚠️ संगमनेर (अहमदनगर)
संगमनेर शहरातील खड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनसेचे श्री बाबा शिंदे (जिल्हाध्यक्ष) यांनी खड्डे न बुजवल्यास प्रशासनाला मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.

३६.मनसे प्रश्न ❓ कल्याण (ठाणे) मनसे प्रश्न
कल्याण येथील किल्ले दुर्गाडीच्या दुरुस्ती साठी लागणारे पैसे सरकारने थकवल्याने कंत्राटदारने काम बंद केले, सरकारच्या भूमिकेवर मनसे आमदार श्री राजू पाटील यांनी ताशेरे ओढले आहेत. छञपतींसाठी सरकारकडे पैसे नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

३७.मनसे प्रश्न ❓ मुंबई 
प्रभाग क्र १२१ मधील पासपोली गावाला जोडणारा पादचारी पुलाचे काम लाखोत होणारे होते तिथे नागरिकांचे करोडो रुपये खर्च करायची काय गरज? असा प्रश्न श्री नागनाथ चौगुले (मनसे शाखा अध्यक्ष) यांनी उपस्थित केला आहे. हा करोडचा भ्रष्टाचार कोण करतेय? नगरसेवक आणि अधिकारी यांनी किती टक्क्यांवर काम घेतले आहे..?

३८.मनसे आंदोलन 🗣️ वाशीम
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटून गेला, शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, रब्बी पिकांसाठी मोफत बियाणे द्यावीत यासाठी मनसेच्या वतीने मनिष डांगे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

३९.मनसे सत्कार 💐 करवीर (कोल्हापूर) 
सावर्डे दुमला शाखेच्या वतीने तालुक्यातील कोरोना योध्याचा सत्कार करण्यात आला.

४०.मनसे विश्वास 💯 पुणे
जीव धोक्यात घालून पुणेकरांवर इलाज करणाऱ्या महिला ज्यूनियर नर्सला २ महीने झाले पगारच नाही. कामगारांनी आपल्या समस्या श्री वसंत मोरे (सरचिटणीस), रुपाली पाटील (महिला शहर अध्यक्षा), श्री साईनाथ बाबर (नगरसेवक) यांच्याकडे मांडल्या.

समाप्त!

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

@mnsreport9

No comments:

Post a Comment