Wednesday 28 October 2020

२५ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२५ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र
 
मनसे प्रवेश >> माणगाव (रायगड)
माकटी (इंदापूर, माणगाव, रायगड) गावातील तरुणांनी राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे माणगाव तालुकाध्यक्ष श्री सुबोध जाधव ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे प्रवेश >> नायगाव (पालघर)
मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचाराने प्रेरित होऊन विविध पक्षातील तरुणांनी मनसे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे प्रवेश >> घणसोली (नवी मुंबई, ठाणे)
बदलत्या राजकारणाचे समीकरण पाहता मा. राजसाहेब यांचे विचार घेत मा. आमदार राजू दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत घणसोलीतील तरुणांनी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे व उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला.

मनविसे प्रवेश >> भिवंडी (ठाणे)
भिवंडी शहरातील अनेक तरुणांनी मनविसे उपशहर अध्यक्ष कु. महेश मिरजे, श्री गुरुनाथ शरीबाद यांच्या नेतृत्वाखाली श्री संतोष साळवी. (मनविसे ग्रामीण अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनविसे प्रवेश >> मिरारोड भाईंदर (ठाणे)
श्री शान पवार (मीरा भाईंदर मनविसे शहर अध्यक्ष) यांच्या प्रयत्नांनी शहरातील तरुण कार्येकर्त्यांनी मनसे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> पनवेल (रायगड)
पनवेल मनपा क्षेत्रात आज विविध पक्षातील महिला कार्येकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे उद्घाटन/ सन्मान >> नवी मुंबई (ठाणे)
मनसे महीला सेनेच्या अनुष्का अभिजित देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ येथे आराेग्य शिबिर, रीक्शा स्टॅंडचे उद्घाटन व काेराेना काळातही समाजाला आपली सेवा देणा-या विविध लाेकांना काेराेना याेद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

मनसे उद्घाटन >> पारनेर (अहमदनगर)
मनसे पारनेर तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष श्री सचिन डफळ, तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब माळी ह्यांच्या उपस्थितीत झाले. पारनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी ह्यावेळी उपस्थित होते.

मनसे उद्घाटन >> कर्जत (रायगड)
मनसे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली आशाने गाव येथे मनसेच्या शाखेचे उद्घाटन झाले तसेच नामफलकाचे अनावरण.

मनसे उद्घाटन >> चिपळूण (रत्नागिरी)
मनसे चिपळूण तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर (नगराध्यक्ष, खेड नगरपरिषद) ह्यांच्या हस्ते संपन्न झाले.

मनसे उद्घाटन >> गोरेगाव (मुंबई उपनगर)
आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मनसे शाखाध्यक्ष (शाखा क्रमांक ५६) श्री. भूषण फडतरे व महिला शाखाध्यक्षा सौ.निशा कदम यांच्या तिरंगा नाका, प्रेम नगर, गोरेगाव पश्चिम येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मनसे नेत्या शालिनी ठाकरे ह्यांनी केले. 

मनसे उपक्रम >> बीड
मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्री सुमंत धस यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बचत गटांसाठी (३००० महिला) आर्सेनिक अल्बम ३० रोगप्रतिकारक गोळ्या व फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.

मनसे उपक्रम >> शिवडी (मुंबई)
मनसे प्रभाग क्रमांक २०२ च्या वतीने भारतीय जैन संघटना ह्यांच्या सहकार्याने प्रभागात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेत शिबिराचा लाभ घेतला.

मनसे उपक्रम >> नालासोपारा (पालघर)
नवरात्रोत्सव निमित्ताने मनसे नालासोपारा शहराच्या वतीने "नारी सन्मान"(मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप) उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सौ सोनल सागर तुर्डे (महिला महाराष्ट्र सैनिक) ह्यांनी ह्या उपक्रमाचे नियोजन केले होते.

मनसे उपक्रम >> विक्रोळी (मुंबई उपनगर)
मनसेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना वाफेची मशीन स्टीमर वाटप विक्रोळी विधानसभेचे विभाग अध्यक्ष श्री. विनोद रामचंद्र शिंदे आणि श्री मनोज महाडिक (शाखाध्यक्ष ११७) ह्यांच्या हस्ते करण्यात आले. नियोजन समाजसेवक श्री उमेश मोरे व सौ मोरे आणि मनविसे विक्रोळी विधानसभा उपविभाग अध्यक्ष कु. प्रथमेश धुरी. ह्यांनी केले होते.

मनसे उपक्रम >> कल्याण डोंबिवली (ठाणे)
मनसे शहर सचिव श्री अरुण जांभळे आणि नाहर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ह्यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन  १ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आले आहे.

मनसे निवेदन >> विरार (पालघर)
मनसेचे विरार शहर सहसचिव श्री अक्षय पेंडलकर ह्यांनी विरार स्थानकात प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता तिकीट खिडकी वाढवण्यासाठी, सॅनिटायसर स्टॅन्ड, सुरक्षित अंतर राखले जावे ह्यासाठी रेल्वेला निवेदन दिले आहे.

मनसे निवेदन >> कल्याण डोंबिवली (ठाणे)
आर के नगर  टिटवाळा विभागात कल्याण डोंबिवली मनपाची कचरा उचलणारी गाडी फिरकत नसल्याने ऐन सणासुदीला परिसरात घाणीचे साम्राज्य झाले. मनसेतर्फे श्री भूषण जाधव (शाखा अध्यक्ष १० मांडा, टिटवाळा) ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे भेट >> मुंबई
ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामगारांना गेल्या पाच महिन्यापासून वेत मिळत न्हवते, गेले १३ दिवस "No payment, No Work" अंतर्गत कामगारांनी आंदोलन केले, मनसेचे कृष्णा मोहिते ह्यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर ह्यांची भेट घेतली. श्री बाळा नांदगावकर ह्यांनी संबंधित मंत्री श्री धनंजय मुंडे ह्यांच्याशी बोलून कामगारांचा प्रश्न मार्गी लावूया असे आश्वासन दिले.

२६ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक २६ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब >> मुंबई >> कृष्णकुंज
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी श्री. यशवंत किल्लेदार ह्यांच्या नेतृत्वात  'महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेची' नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

राजसाहेब >> मुंबई >> कृष्णकुंज
मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांना चाहत्यांकडून (श्री आनंद प्रभू) राज ठाकरेंच्या चंदेरी प्रतिमेसह आकर्षक रेल्वे इंजिन भेट.

मनसे प्रवेश >> रत्नागिरी >> खेड
श्री संदीप फडकले (खेड तालुका उपाध्यक्ष) यांच्या प्रयत्नांनी खेड तालुक्यातील शिव बुद्रुक, भोई वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला.

मनसे यश >> पालघर >> नालासोपारा
नालासोपारा येथे प्रवाशांचा झालेला उद्रेक ह्यावर मनसेचे श्री राज नागरे ह्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले, रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत तिकीट खिडक्या जास्तीच्या उघडल्या व EVM तिकीट मशीन चालू केल्या.

मनसे निवेदन >> मुंबई >> गोराई
बोरिवली (प), आर – मध्य, गोराई (२) आर एस सी ५२ येथे १८४१.२९ चौ मी.  असा आरक्षित असलेल्या भूखंडात अधिकृत मनपा मार्केट उभारावे ह्यासाठी मनसे शाखा अध्यक्ष श्री महेश नर ह्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड ह्यांना पत्र लिहिले.

मनविसे निवेदन >> नाशिक
मनविसे शाखा अध्यक्ष हर्षद गायधनी यांचा पुढाकाराने व मनसे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी यांच्या नेतृत्वाखाली पळसे फुलेनगर देवी रस्ता पथदीप बंद असल्यामुळे  पळसे गावचे ग्रामसेवक यांना मनसेकडून निवेदन दिले.

मनसे निवेदन >> अहमदनगर >> कर्जत
माननीय पोलीस निरीक्षक (कर्जत,अहमदनगर) यांना मनसेचे श्री प्रसाद मैड यांनी राशीन येथे दर मंगळवारी आठवडे बाजार दिवशी पाच ते सहा वाहतूक पोलीस मिळणेबाबत निवेदन दिले.

मनसे उपक्रम >> मुंबई >> माहीम दादर
कुणीही उपाशी पोटी झोपू नये... पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई ह्यांनी "माणुसकीचा फ्रीज"हा उपक्रम चालू केलाय.

मनसे उपक्रम >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांतील अपंगांसाठी मनसेचे श्री योगेश पाटील ह्यांच्या पुढाकाराने श्री राजू पाटील ह्यांच्या उपस्थितीत शासन पुरस्कृत "स्वावलंबन योजनेस" सुरवात.

मनसे उपक्रम >> ठाणे >> नवी मुंबई
नवी मुंबई मधील  विविध ग्रंथालये वाचक रसिकांसाठी खुली करण्यात आली. त्याचवेळी काेराेनाच्या या रोगराईमध्ये  खबरदारी आणि सुरक्षितता जपण्यासाठी मनसे नवी मुंबईतर्फे वाशी येथील साहित्य कला मंदिर संस्थेला सॅनिटायझर स्टॅन्ड, फेस शिल्ड, सॅनिटायझर, मास्क इत्यादी आवश्यक वस्तू देण्यात आल्या. 

मनवासे इशारा >> मुंबई
फायनान्स कंपन्या आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या हस्तकांना आधी 'हात जोडून' कायद्याच्या भाषेत आणि गरज पडली तर 'हात सोडून' खळ्ळफटॅक करत कशी 'समज' द्यायची, हे मनसे आणि मनवासे यांना चांगलं माहित आहे.असा धमकीवजा इशारा मनसे सरचिटणीस श्री किर्तीकुमार शिंदे ह्यांनी फायनान्स कंपन्यांना दिला आहे.

मनसे इशारा >> मुंबई
कोरोना काळात वाहतूक बंद असताना सुद्धा आर्थिक अडचणीत सापडलेल्या  वाहतूकदारांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून धमकावून जबरदस्ती वाहन ताब्यात घेणाऱ्या सर्व खाजगी बँकांना मनसे इशारा.

मनसे इशारा >> रायगड >> महाड
महाड MIDC येथे खड्यांच्या बाबत मनसेने MIDC अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, पाच दिवस होऊन गेले अद्याप काम चालू नाही म्हणून.. मनसेचे श्री चेतन उतेकर (जिल्हा उपाध्यक्ष) यांनी आज पुन्हा भेट दिली, येत्या पाच दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर मनसेचा दणका बसेल असा इशारा दिला. 

मनसे आवाहन >> संभाजीनगर
कोरोना मुळे रूतलेलं अर्थ चक्र बघता खाजगी शाळांनी विद्यार्थी व पालकांना शालेय शुल्काबाबत सहकार्य करणं अपेक्षित आहे. ज्या पालकांना व विद्यार्थ्यांना शाळा प्रशासन शुल्क भरण्यासाठी दबाव टाकत असेल त्यांनी त्वरित मनसेशी संपर्क साधावा. (राजीव जावळीकर-9588673280, मंगेश साळवी-7058587774)

मनसे मोर्चा >> बीड >> केज
मनसे केज तालुक्याच्या वतीने बचत गटातील महिलांना कर्जमाफी मिळावी यासाठी गुरुवारी केज येथे मनसेच्या पुढाकाराने मोर्चा निघणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज मनसे जिल्हाध्यक्ष श्री सुमंत धस ह्यांनी बचत गटातील महिलांशी चर्चा केली.

मनसे आंदोलन >> सिंधुदुर्ग >> वेंगुर्ला
तालुक्यातील मंदिरे चालू करण्यासाठी तालुका अध्यक्ष वेंगुर्ला सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला मनसेतर्फे तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला येथे घंटा व टाळ वाजवुन आंदोलन करण्यात आले.

मनसे भेट >> नेरुळ
सीवूड्स मधील सिडको घरांच्या दुरुस्तीसाठी मनसेचे शिष्टमंडळ मुख्य अभियंता के एम गोडबोले यांना भेटले. मनसेच्या या शिष्टमंडळात शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष अमोल आयवले, उप विभागअध्यक्ष अप्पासाहेब जाधव, मंगेश काळेबाग , दत्ता खिलारी हे उपस्थित होते.

मनसे सत्कार >> सिंधुदुर्ग >> मालवण
व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका मालवणवासीयांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्यावद्दल तरुण युवक अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर यांचा मालवण मनसेच्यावतीने तालुकाध्यक्ष विनोद सांडव आणि सहकाऱ्यांनी सत्कार केला.

मनसे प्रश्न >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
कल्याण डोंबिवली येथे 'एमआरआय मशीनच आली नाही तर लोकार्पणाचा कार्यक्रम कसा?', मनसे शहराध्यक्ष/ राज्य उपाध्यक्ष श्री राजेश कदम ह्यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न केला आहे.

समाप्त!

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र!

२७ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक २७ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब >> कृष्णकुंज
बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप बँक लिमिटेड येथील कामगारांनी आज मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

राजसाहेब >> कृष्णकुंज
नाशिक जिल्हा मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली आणि आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले.

मनसे नवी मुंबई >> पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेवा दलाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ भिमाजी दाते यांचा आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश.

मनसे शहापूर >> पक्ष प्रवेश
ठाणे: शहापूर तालुक्यात विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्याचबरोबर पक्षाच्या काही पदांच्या जबाबदारीचा कार्यभार देण्यात आला.

मनसे सिंधुदुर्ग >> पक्ष प्रवेश
इळये (देवगड, सिंधुदुर्ग) गावातील ग्रामस्थांनी श्री संतोष मयेकर (सहसंपर्क अध्यक्ष देवगड) ह्यांच्या पुढाकारानी श्री राजन दाभोळकर (जिल्हा अध्यक्ष) ह्यांच्या नेतृत्वाखाली श्री दया मेस्त्री (उप जिल्हा अध्यक्ष) ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे सांगली >> यश
आंधळी (पलूस, सांगली) येथे आंधळी ते जुने बांबवडे रस्ता खड्डा मुक्त करण्यासाठी मनसेने निवेदन दिले होते. मनसेच्या मागणीनंतर रस्ता दुरुस्तीचे कामकाज चालू.

मनसे अहमदनगर >> यश
मनसे नगर जिल्हा सचिव श्री नितीन भुतारे ह्यांच्या प्रयत्नांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये मध्ये होत असलेल्या लूटला चाप बसणार.! दहा खाजगी इस्पितळाना एकूण २६ लक्ष रुग्णांना परत करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश.

मनसे विद्यार्थी सेना दापोली >> पक्ष कार्य
रत्नागिरी: मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन गायकवाड ह्यांच्या नेतृत्वाखाली दापोली नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती साठी निवेदन दिले होते. मनपाने दुरुस्तीस टाळाटाळ केल्याने मनसेने स्वतः पुढाकार घेत शौचालय दुरुस्ती करून घेतला.

मनसे भिवंडी >> मागणी 
ठाणे: भिवंडी मनपा ने एप्रिल ते जून ची पाणीपट्टी, घर पट्टी माफीची घोषणा करूनही आता नागरिकांना एप्रिल ते जून ची बिले दिली जात आहेत, मनसेच्या वतीने श्री अनिकेत जाधव (मनसे भिवंडी शहर सचिव) ह्यांनी हा निर्णय मागे घ्या अन्यथा मनसेच्या रोषाला सामोरे जा असा इशारा दिला आहे.

मनसे विद्यार्थी सेना ठाणे >> इशार
खाजगी रुग्णालयात होणारी लूट आता थांबली पाहिजे पण ठाणे मनपा अधिकारी आणि आरोग्य प्रशासन कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहे. मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संदीप पाचंगे ह्यांनी मनपाने कारवाई केली नाही तर मनसेकडून आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला आहे.

मनसे महिला सेना गोवंडी >> मेळावा 
महिला विभाग अध्यक्षा सौ.रंजनाताई गायकवाड ह्यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २८ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता महिला बचत गटांचे मायक्रो फायनान्स कडून घेण्यात आलेले कर्जमाफी मिळावी ह्यासाठी बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मनसे बीड >> मोर्चा
बचत गटांचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी मनसेकडून जिल्हाध्यक्ष श्री सुमंत धस ह्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केज मध्ये महिला मोर्चा.

मनसे उस्मानाबाद >> मोर्चा 
नळदुर्ग येथे मनसेच्या वतीने महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कडून कर्जमाफी मिळावी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत नवगिरे ह्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

मनसे लातूर >> आंदोलन 
महावितरण कार्यालयात जनतेचे लॉक डाऊन मधील वीजबिल माफ का करत नाही? असा जाब विचारत जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले.

मनसे बुलढाणा >> आंदोलन
बुलढाणा येथे शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात न आल्याने मनसेचे श्री मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. तीन महिन्या पासून थकलेले वेतन मनसेच्या आंदोलन नंतर काही तासांत मिळून जाईल अशी ग्वाही देण्यात आली.

मनसे सावंतवाडी >> आंदोलन
सिंधुदुर्ग | बंद असलेली मंदिरे सुरू करण्याबाबत आज उपविभागीय अधिकारी महसूल तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर मनसे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे ठाणे >> उपक्रम
दसऱ्याच्या निमित्ताने मनसेच्या श्री रविंद्र सोनार (ठाणे शहर सचिव) यांच्या वतीने वाडा, मोखाडा, जव्हार येथून हारतुरे, आपट्याची पाने विकायला आलेल्या आदिवासी महिलांना/मुलींना मोफत नाश्ता पाण्याची सोय करण्यात आली होती.

मनसे कणकवली >> निवेदन
सिंधुदुर्ग: जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून आर्थिक तडजोड करून सोडण्यात आल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री दया मेस्त्री ह्यांनी ह्या धाडीमध्ये जे जे दोषी आढळलेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ह्यासाठी मनसेकडून निवेदन दिले.

मनसे विरार >> निवेदन
पालघर: वसई विरार मनपा क्षेत्रात अथवा रेल्वे स्टेशन लगतच्या परिसरात राज्यातील इतर पालिकांप्रमाणे भारत मातेच्या ध्वज स्तंभाची उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी मनसे विरार शहर सह सचिव श्री महेश कदम ह्यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे.

मनसे चित्रपट सेना पुणे >> निवेदन 
कोरोना काळात अनेक कलाकारांना उपासमारीची वेळ आलीय अशा कलाकारांना आपली उत्पादने विकता यावीत म्हणून मनपाच्या अधिपत्याखाली असलेले गाळे माफक दरात त्यांना उपलब्ध करून घ्यावेत ह्यासाठी मनसे-चित्रपट सेनेचे रमेश परदेशी ह्यांनी पुण्याचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ ह्यांना निवेदन दिले. 

मनसे मीरा भाईंदर >> निवेदन
ठाणे: चार महिने अनुभव असलेल्या मिरारोड भाईंदर येथील "ओम साई आरोग्य केअर "कंपनीवर मनपा खुश..! मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची दिली परवानगी, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मनसेने निवेदन देऊन  मागणी केलीय.

मनसे कामगार सेना मुंबई >> मीटिंग
ITC मराठा हॉटेल मधील फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टवर कार्यरत असलेले कर्मचारी & कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मागील काही महिन्यांपासून कामावरून अचानकपणे काढून टाकले होते. मनकासेचे श्री गजानन राणे यांनी सहकाऱ्यांसह भेट दिल्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. 

मनसे केबल सेना मुंबई >> दणका
कुलाबा विधानसभेतील काही केबल मालकांकडून टाटा ग्रुपचे  नेट चे काम त्याच्या त्याच्या विभागात काम सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाल्या होत्या. मनसे केबल सेनेचे उपाध्यक्ष श्री. विधाधर बने ह्यांनी सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी जाऊन टाटा नेटचे काम थांबवले.

मनसे वाहतूक सेना नालासोपारा >> उद्घाटन
पालघर: "मनसे - वाहतूक सेना पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन सोहळा" दि: २८/१०/२०२० दुपारी ठीक २ वाजता मनसे सरचिटणीस आणि वाहतूक सेना अध्यक्ष - संजयजी नाईक यांच्या हस्ते होणार आहे. ठिकाण - गाला नं ३६/३७/३८ सुष्टी हाईट, शनी मंदिर समोर, 4था रस्ता, नालासोपारा (पश्चिम).

मनसे खेड >> उद्घाटन
रत्नागिरी: खेड तालुक्यातील शेल्डी, भेलसाई, चिरणी, काडवली, आंबडस, केळणे, या गावांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री वैभव खेडेकर ह्यांच्या हस्ते संपन्न.

मनसे उल्हासनगर >> उद्घाटन
मनसे प्रभाग क्रं १९ उल्हासनगर येथे मनसे कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे माजी आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या हस्ते झाले.

मनसे विद्यार्थी सेना नाशिक >> नियुक्ती
मनसे अध्यक्ष मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनविसे अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली "मनविसे नाशिक जिल्हा कार्यकारणी" नियुक्ती जाहीर करण्यात आली.

मनसे ठाणे >> दौरा >> सांगली
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव दोन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर.


समाप्त ..

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

Sunday 25 October 2020

२३-२४ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२३ + २४ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश >> ठाणे
ठाणे प्रभाग क्रमांक १९ येथे मनसे विभाग अध्यक्ष श्री गजानन कर्पे यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या हस्ते झाले.

मनसे प्रवेश >> रत्नागिरी >> खेड
खेड तालुक्यातील इंडियन आक्झ‌ॅलेट लिमिटेड लोटे परशुराम एम आय डी सी (SR Group) कार्यकर्त्यांनी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला. 

मनसे यश >> विरार >> पालघर
मनवेल पाडा (विरार,पालघर) येथे प्र क्रं ३० चे शाखा अध्यक्ष श्री प्रथमेश साळवी मागील दोन वर्षांपासून सेंट पीटर शाळेजवळ रस्त्याच्या मध्यात असलेले विजेचे खांब काढण्यासाठी पाठपुरावा करत होते, अखेर दोन वर्षाने त्यांच्या लढ्याला यश आलेय.

मनविसे यश >> मुंबई
मनविसेचे उपाध्यक्ष श्री अखिल चित्रे ह्यांच्या निवेदन नंतर अमेझॉन मागोमाग फ्लिपकार्ट सुद्धा मराठी सेवा देणार.

मनकासे यश >> रायगड >> पनवेल
रायगड (पनवेल) मधील जे डब्लू सी (JWC) कंपनी मधील कामगारांना लॉक डाउनचे कारण देऊन कोणतेही नोटीस न देता कामावरून कमी केले होते. मनकासे नेते श्री सचिन गोळे ह्यांनी बेकायदेशीरपणे कामावरून कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घ्यायला भाग पाडले.

मनसे कार्य >> यवतमाळ
यवतमाळ - पांढरकवडा मार्गावरील मोहदा नजीक रस्त्यात मोठमोठे खड्डे पडून यात बरेच लहान सहान अपघात होत होते, मनसे तालुकाध्यक्ष तृषार गब्राणी व सहकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती करण्यास भाग पाडले.

मनसे कार्य >> ठाणे
सम्राट अशोक नगर माजिवडा नाक्यावरील रहिवाशांचे घरांच व थकित भाड्याचं प्रश्न आज श्री. अविनाश जाधव, श्री रवींद्र मोरे व श्री. सचिन कुरेल यांच्या मार्गदर्शनाखाली विकासका (बिल्डर) सोबत चर्चा करून सोडविण्यात आला.

मनसे कार्य >> मुंबई >> भायखळा
भायखळा प्रभाग क्र २०८ च्या वतीने बाटलीबॉय मैदानाच्या भिंतीवर तारांचे जाळे निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनसेच्या वतीने पाठपुरावा करून तारेंचे जाळे काढून टाकण्यात आले.

मनसे निवेदन >> पालघर >> नालासोपारा
राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन ह्यांच्या ढिसाळ नियोजन मुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे श्री राज नागरे (नालासोपारा शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले.

मनसे निवेदन >> नागपूर
मनसेच्या महिला शहर अध्यक्षा सौ मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त ह्यांना शहरांतर्गत बस सेवा चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन >> सोलापूर >> बार्शी
सत्ताधारी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकारी सौ रुपाली चाकणकर दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आल्या असता मनसेचे विभाग अध्यक्ष बाबा शेख ह्यांनी निवेदन देऊन हेक्टरी ₹ ५०,००० मदत जाहीर करण्याची मागणी केलीय.

मनविसे निवेदन >> मुंबई >> वांद्रे
सिद्धार्थ कॉलनी ते टिचर्स कॉलनी येथे होत असलेले रोडचे  निकृष्ट दर्जाचे काम मनसेच्या श्री संजय धोत्रे (मनविसे राज्य उपाध्यक्ष) ह्यांनी निवेदन देऊन बंद केले.

मनसे निवेदन >> यवतमाळ >> महागाव
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी मनसेच्या वतीने महागाव येथे तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले,आणि हेक्टरी ₹५०,००० मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मनसे निवेदन >> यवतमाळ >> आर्णी
आर्णी-सावळी (सदोबा) रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अश्या आशयाचे निवेदन मनसेच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन यलगंधेवार (आर्णी, यवतमाळ) यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग यांना देण्यात आले.

मनकासे भेट >> मुंबई
कामगार प्रश्नांसाठी झटणाऱ्या मनसेच्या वाघांनी (डॉ. मनोज चव्हाण, श्री संतोष धुरी, श्री गजानन राणे, श्री सचिन गोळे) मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली.

मनसे भेट >> रत्नागिरी >> खेड
खेड तालुक्यातील चिंचघर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांनी केली आणि शेकऱ्यांशी त्यावर सविस्तर चर्चा केली.

मनसे भेट >> मुंबई >> अंधेरी
हिंदूंच्या सणांबाबत अपमानजनक सोशल मीडिया पोस्टप्रकरणी 'ईरॉस नाऊ' व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी शालिनी ठाकरे कार्यालयात वैयक्तिक भेट घेतली आणि दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अशी कोणतीही चूक होणार नाही, असं निःसंदिग्ध आश्वासन त्यांनी या भेटीत दिलं.

मनसे भेट >> ठाणे >> खेड
श्री गजानन काळे (नवी मुंबई शहराध्यक्ष) श्री निलेश बाणखेळे (मनसे उपशहर अध्यक्ष) ह्यांनी मनपा उपायुक्त श्री कानडे (मालमत्ता विभाग) ह्यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांवर जाब विचारला.

मनसे आंदोलन >> सिंधुदुर्ग >> मालवण
मंदिरे उघडण्यासाठी मनसेच्या वतीने मालवण तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद, टाळ वाजवा आंदोलन करण्यात आले. उपजिल्हा अध्यक्ष दया साहेब मेस्त्री, कणकवली तालुका अध्यक्ष  दत्ताराम बिडवडकर ह्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

मनसे आंदोलन >> सिंधुदुर्ग >> कणकवली
मंदिरे उघडण्यासाठी मनसेच्या वतीने कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद, टाळ वाजवा आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अधिकाऱ्यांना निवेदनही दिले.

मनसे मोर्चा >> धाराशिव >> नळदुर्ग
मायक्रो फायनान्स कडून होत असलेल्या पिळवणूक बाबत मनसेच्या वतीने मोर्च्याचे नियोजन करण्यात येत आहे. तत्पूर्वी मनसेचे शहर अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या आणि मोर्च्यांच्या बाबत माहिती दिली.

मनसे पर्दाफाश >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
अवजड वाहनांना ठराविक वेळेत बंदी असताना स्थानिक पोलीस चिरीमिरी पैसे घेऊन अवजड वाहनांना सोडत आहेत. मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री राजेश कदम ह्यांनी पर्दाफाश केला आहे तर मनसे आमदार राजू पाटील ह्यांनी कडक कारवाईची मागणी केलीय.

मनसे उपक्रम >> पालघर >> ठाणे
मनसे नालासोपारा शहराच्या वतीने  नागरिकांसाठी "वृत्तपत्र वाचनालय" तर जेष्ठ नागरिकांसाठी "जेष्ठ नागरिक कट्टा" चे दिनांक २५/१०/२०२० सायंकाळी ६.०० वाजता लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.

मनसे उपक्रम >> मुंबई >> मानखुर्द
विधवा, गरीब, गरजू,कचरा वेचणारे अश्या ५० कुटुंबाना प्रांजल राणे (उपविभाग अध्यक्षा) नमिता पवार (महिला शाखा अध्यक्षा) यांच्या संकल्पनेतुन अणुशक्ती विधानसभा प्र क्र १४३  येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मनसे उपक्रम >> रत्नागिरी >> खेड
मनसे शासित खेड नगरपरिषद (रत्नागिरी) येथे नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर (सरचिटणीस) ह्यांच्या पुढाकाराने नगरपरिषद मार्फत अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी ५℅ अपंग निधि म्हणून  ₹ ११,००० धनादेश देण्यात आला.

मनसे दणका >> मुंबई >> मुलुंड
आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डर श्रद्धा अगरवाल यांना त्यांच्या राहत्या घरासमोरील गावगुंडांनी मारहाण केली. हे मनसेच्या लक्षात येताच मनसे नेत्या रिटा गुप्ता, सांतन फर्नांडिस, ऋषी शेरेकर (मनसे शारीरिक सेना अध्यक्ष) ह्यांनी त्या नराधमांच्या विरोधात ३५४ IPC Sec खाली गुन्हा दाखल केला. 

मनवासे उपक्रम >> ठाणे
मनसे वाहतूक सेना लक्ष्मी चिराग नगर ठाणे यांच्या वतीने चिराग नगर येथे "पंतप्रधान आत्मनिर्भर कर्ज योजना" शिबिराचे नियोजन करण्यात आले.

मनसे दणका >> नाशिक
परप्रांतातून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या महिलेने मराठी भाषा बोलणार नाही आणी शिकणारही नाही असा उर्मट पवित्रा घेतल्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने "nyasa enterprise" मनसे दणका दिला आणि मराठी भाषिकांची माफी मागायला लावली.

मनकासे उद्घाटन >> ठाणे
किलबर्न इंजीनियरिंग लिमिटेड - सरवली MIDC, R & B इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड (घनकचरा विभाग KDMC)  येथे मनसे कामगार सेनेच्या नामफलकाचा अनावरण सोहळा मनकासे अध्यक्ष श्री मनोज चव्हाण यांच्या उपस्थितीत  पार पडला.

मनसे धन्यवाद >> डोंबिवली >> ठाणे
महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मा. मुख्यमंत्र्यांना मनसे आमदार श्री राजु पाटील ह्यांनी पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या, त्याची दखल घेऊन सांस्कृतिक कार्य विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले.  सदर कार्यवाही साठी मनसे आमदार राजू पाटील ह्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. 

समाप्त !

धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

२२ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२२ ऑक्टोबर २०२० ● मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश >> ठाणे >> नवी मुंबई
मा. राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शारीरिक सेना अध्यक्ष ऋषी शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील तरुणांनी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे व शारीरिक सेना नवी मुंबई अध्यक्ष सागर नाइकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> मुंबई >> शीव
शीव येथील।मनसे विभाग अध्यक्ष श्री अनंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विभागातील तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> अहमदनगर >> पारनेर
पारनेर तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> पालघर >> मोखाडा
मोखाडा तालुक्यातील तरुणांनी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> पालघर >> जव्हार
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील तरुणांनी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> पालघर >> विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील तरुणांनी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे प्रवेश >> रत्नागिरी >> संगमेश्वर
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संगमेश्वर तालुक्यातील नावडी जि प गटातील संगमेश्वर बाजारपेठ येथील युवकांनी  मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

मनसे कार्य >> मुंबई >> भायखळा >> 
कोरोना काळात बंद असलेले बेस्ट वीज बिल भरणा केंद्र मनसेच्या मागणीनंतर अखेर चालू. मनसेचे शाखा अध्यक्ष श्री किरण टाकळे ह्यांनी "बेस्ट वीज बिल भरणा केंद्र" चालू करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.

मनसे कार्य >> मुंबई >> भायखळा
श्री ए जी पवार मार्गावरील खड्यांच्या बाबत मनसे प्रभाग क्रमांक २०८ च्या वतीने मनपा कडे पाठपुरावा करून खड्डे भरून घेतले.

मनसे कार्य >> सिंधुदुर्ग >> देवगड
दाभोळे(देवगड) गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मनसेचे सहसंपर्क अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांना १००० मास्कचे वाटप करण्यात आले.

मनसे इशारा >> वर्धा
 “सोयाबीनला हेक्टरी 40 हजारांची मदत द्या, अन्यथा राज्यातील मंत्र्यांना विदर्भात फिरु देणार नाही,” असा इशारा विदर्भातील मनसेचे नेते अतुल वांदीले यांनी दिला आहे. 

मनसे दणका >> ठाणे >> कल्याण डोंबिवली
अवजड वाहनांना बंदी असताना देखील सोडली जात होती अवजड वाहने,मनसे आमदार राजू पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी घेतले वाहतूक पोलिसांना फैलावर.

मनसे दणका >> मुंबई >> जुहू
मनसे विभाग अध्यक्ष श्री मनीष धुरी यांनी कोळी बांधवांची घरे उध्वस्त करणाऱ्या विकासक नरेश जैन याच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मनसे दणका >> मुंबई 
'ईरॉस नाऊ' या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ट्विटर हँडलवर नवरात्रीच्या शुभेच्छा देताना हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार घडला. याबाबत मनसेने इशारा देताच 'ईरॉस नाऊ' व्यवस्थापनाने शरणागती पत्करत आक्षेपार्ह ट्विट डिलिट केले आणि मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे लेखी माफी मागितली. 

मनसे आंदोलन >> चंद्रपूर >> अरोरा
मनसे अरोरा तालुका अध्यक्ष श्री वैभव दहाने यांनी मनसेच्या वतीने अवैध वाळू तस्करी विरोधात मोबाईल टॉवरवर चढून महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

मनसे निवेदन >> रायगड >> JNPT
JNPT परिसरामध्ये Karanja Infra Pvt Ltd कडून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डा सोबत २००९ साली केलेल्या करारानुसार काम पूर्ण न केल्यामुळे सरकारच्या आर्थिक नुकसान केल्याबद्दल कारवाई करावी या बाबतच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना मनसे कडून निवेदन सादर करण्यात आले. 

मनसे निवेदन >> नागपूर
टाळेबंद दिवसागणिक उघडला जात असला तरी छोटे मोठे व्यावसायिकांना अजून परवानगी दिली गेली नाहीय. त्यांना आता व्यवसाय करू द्या अशी मागणी मनसेचे नेते श्री हेमंत गडकरी ह्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

मनसे निवेदन >> मुंबई >> गोरेगाव
मराठी मध्ये माहिती देण्यास नकार देणाऱ्या उर्मट "जस्ट डाईल"
कंपनीच्या कार्यालयात मनसेचे गोरेगाव विभाग अध्यक्ष श्री विरेंद्र जाधव ह्यांनी भेट दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना झालेल्या प्रकार बाबत माफी मागायला लावली, पुन्हा असे प्रकार घडल्यास मनसे दणका बसेल असे समजावले. 

मनसे निवेदन >> यवतमाळ >> मोहदा
यवतमाळ पांढरकवडा राज्य क्र.६ वर मोठे खड्डे पडून रोज अपघात होत आहेत. मनसे तालुकाध्यक्ष पांढरकवडा तृषाल ग्रबाणी यांनी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाला निवेदन दिले.

मनसे निवेदन >> पालघर >> नालासोपारा
कोरोना काळात आर्थिक संकट सर्वांवर आले आहेत, वीज ग्राहकांना महावितरण विभागाने दिलासा द्यावा, मीटर कापू नयेत अश्या मागणीसाठी नालासोपारा शहर उपाध्यक्ष श्री कैलास पवार ह्यांनी महावितरणला निवेदन दिले.

मनसे निवेदन >> जालना
नाटकी पंचनामे बंद करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागमी मनसेच्या वतीने विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही आक्रमकपणे मांडा ह्यासाठी मनसेचे जालना जिल्हा अध्यक्ष श्री  गजानन गीते ह्यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवेदन दिले.

मनविसे निवेदन >> मुंबई >> भायखळा
जिओ सारख्या कंपन्या मनपाचा कर कशाप्रकारे बुडवते आणि त्यांच्यामूळे स्थानिक केबल व्यवसायिकांना कशाप्रकारे अर्थिक नुकसान होत आहे ह्याबाबत मनसेचे केबल सेना उपाध्यक्ष श्री सुनिल शिर्के, मनविसे उपाध्यक्ष मनीष पाथरे ह्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन >> अहमदनगर
कोरोना उपचारासाठी रुग्ण आणि नातेवाईक यांच्याकडून झालेली लूट सरकारी ऑडिट करून परत करण्यात यावी यासाठी मनसेचे सचिन दफळ, नितीन भुतारे ह्यांनी नगर मनपा आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली.

मनसे मागणी >> धाराशिव
शेतकऱ्यांचे अश्रू फुसायला येतात आणि फोटो काढून निघून जातात, प्रत्यक्षात मदत मिळणे हे दूरच. म्हणून मनसेने धाराशिव जिल्हा "VIP सेल्फी पॉइंट" म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

मनसे उपक्रम >> अमरावती
अमरावती शहर प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने मनसेचे शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर यांच्या तर्फे नवरात्रोत्सव मंडळात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

मनसे उपक्रम >> ठाणे >> आंबिवली (कल्याण)
मनसे आंबिवली टीम कडून पॅन कार्ड शिबिर सह "जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना" ह्याबाबत जनजागृती व योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी शिबीर नियोजन केले आहे.

मनसे उपक्रम >> मुंबई
मनसे वाहतूक सेना आपल्या सेवेत घेऊन येत आहोत "मोफत रक्तदान, प्लाझ्मा दान", ह्या रक्त साखळीसाठी सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य लाभत आहे असेच सहकार्य राहुद्या. (संपर्क: अजय-९८९२३६२९०७, विशाल-९११२३३४२५५, गाैरव-८१०८०१०२२२, अनुष -९९२०९०६०१०)
 
मनसे उपक्रम >> ठाणे >> डोंबिवली
घारीवली गावचे माजी सरपंच श्री योगेश रोहिदास पाटील ह्यांच्या पुढाकाराने अपंगांसाठी "मोफत स्वावलंबन कार्ड" हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मनसे उपक्रम >> ठाणे >> पाचपाखाडी
मनसे पाचपाखाडीचे श्री दिनेश मांडवकर यांनी नवरात्र उत्सवचे औचित्य साधून विभागातील डॉक्टर, परिचारिका, पत्रकार, बस चालक, वाहक ह्यांचा सत्कार केला.

मनसे आवाहन >> सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांचे व्यवहार सर्रास होत आहेत. मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर ह्यांनी तरुणांना अमली पदार्थांपासून वेळीच सावध होण्याचे आवाहन केले आहे.

मनसे आवाहन >> पुणे
मनसे महिला पुणे शहर अध्यक्षा रुपालीताई पाटील यांनी कामचुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात जम्बो कोविड सेंटर मधील डॉक्टर आणि इतर स्टाफच्या मागण्यांसाठी आपल्यालाच आंदोलन करावे लागेल असे आवाहन केले आहे.

मनसे भेट >> मुंबई >> अंधेरी
अंधेरी, जोगेश्वरी येथील असंघटित रिक्षा चालक ह्यांनी अंधेरी पूर्व येथील मनसे कार्यालयात आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. श्री सुरेंद्र पाल ह्यांनी श्री संजय नाईक आणि श्री आरिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या समस्यांचे निवारण लवकरच केले जाईल असे आश्वासित केले.

मनसे भेट >> मुंबई >> अंधेरी
मुंबई मनपा मध्ये कोरोना योद्धे म्हणून काम करणारे ४० कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन दिले जात न्हवते. कामगारांनी मनसे विभाग अध्यक्ष श्री संदेश देसाई यांची भेट घेतली. श्री देसाई ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सात दिवसात वेतन तुमच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासित केले.

मनसे भेट >> मुंबई
बॉम्बे मरकंटाईल बँक मधील कर्मचाऱ्यांनी मनसे नेते श्री नितिन सरदेसाई यांची भेट घेतली. बँक व्यवस्थापनाकडून वर्षानुवर्षे होणारे गैरप्रकार व कर्मचारी वर्गाला होणारा त्रास याबद्दल त्यांनी माहिती दिली. 

मनसे सूचना >> मुंबई >> Tweet
मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी राज्यातील सर्व सिग्नल वर टायमर यावेत अशी सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांना केलीय जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि इंधनाची बचत होईल.

२१ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२१ ऑक्टोबर २०२० • मनसे बातमीपत्र

राजसाहेब • मुंबई
आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नुतन कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले.

मनसे भूमिका • शेतकरी
मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी "ABP माझाने" आयोजीत केलेल्या चर्चासत्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची नाटक बंद करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्या अशी भूमिका मांडली.

मनसे प्रवेश • ठाणे
वसंत विहार,धर्मवीर नगर येथील तरुणांनी आज मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसे कार्य • भायखळा
प्रभाग क्रमांक २०८ च्या वतीने प्रभागात (विग्नहर, हेरंब सोसायटी समोर) पडलेल्या खड्यांच्या बाबत पाठपुरावा करून खड्डे भरून घेतले.

मनसे कार्य • पुणे
पुणे येथील मनपा नगरसेवक/ मनसे सरचिटणीस श्री वसंत मोरे यांच्या पुढाकाराने कै कृष्णाजी बळवंत मोरे शाळेला रंगरंगोटी करण्यात आली.

मनसे कार्य • भांडुप
रस्ते आस्थापना विभागाचे संघटक श्री संतोष मयेकर ह्यांच्या पुढाकाराने रेल्वे पोलिसांना मास्क चे वाटप करण्यात आले.

मनसे कार्य • मुंबई
प्रभाग क्रमांक १०८ चे शाखा अध्यक्ष श्री संदीप वरे ह्यांनी गिडवाणी स्कूल ते हनुमान पाडा रस्ता "समाजसेवक बबन दगडू शिंदे (बी.डी.शिंदे मार्ग)" नामफलक साठी पाठपुरावा केला होता. आता तो फलक तब्बल 10 वर्षानंतर मनसेच्या पाठपुराव्याने पूर्ववत.

मनसे कार्य • चाकण (पुणे)
ठेकेदार कडून थकवलेले स्थानिक मराठी व्यवसायिकाचे बिल  ‘मनसे’च्या दणक्याने ठेकेदाराकडून मिळवून दिले, संतोष काळे (चाकण शहर उपाध्यक्ष) शुभम स्वामी (खेड तालुका उपाध्यक्ष) ह्यांनी ठेकेदाराला समज दिली.

मनसे कार्य • कांदिवली
प्रभाग क्रमांक २३ चे शाखा अध्यक्ष श्री किरण जाधव ह्यांनी मुंबई मनपाच्या "मास्क नाही,प्रवेश नाही" ह्या मोहिमेत सहभागी होत. समाजात जागरूकता व्हावी म्हणून प्रभागातील दुकानात सूचना फलक लावत दुकानदारांना सूचना केल्या.

मनसे कार्य • सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून झालेल्या मनसेनच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

मनसे कार्य • विरार
मोरेगाव येथील साई काळकाई अपार्टमेंट च्या बाजूची इलेक्ट्रॉनिक DP मृत अवस्थेत होती. मनसेच्या वतीने पाठपुरावा करून नवीन बसवून घेण्यात आली.

मनसे निवेदन • अमरावती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या होत असलेल्या परीक्षा संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हे लक्षात घेऊन मनविसेचे श्री भूषण फरतोडे आणि हर्षल ठाकरे ह्यांनी  विद्यापीठाच्या व्यवस्थापनास निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

मनसे निवेदन • लांजा
लांजा तालुक्यात,अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन मनसेच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष श्री सचिन साळवी ह्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केलीय.

मनसे निवेदन • भांडुप
भांडुप रेल्वे स्थानकातील ईश्वर नगर येथून स्थानकात येणारे प्रवेशद्वार प्रवाशांसाठी खुले करावे ह्या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने, श्री संतोष पार्टे आणि सहकाऱ्यांनी रेल्वेला निवेदन दिले.

मनसे निवेदन • पारनेर
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून सरकारने पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत करावी ह्या मागणीचे निवेदन मनसे शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले.

मनसे निवेदन • भांबेड (लांजा, रत्नागिरी)
भांबेड गावातील अपघात क्षेत्राच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी किरण रेवाळे ह्यांनी भांबेड ग्रामपंचायत येथे निवेदन दिले.

मनसे निवेदन • विरार (पालघर)
विरार स्थित DNA Infotel ही इंटरनेट सेवा देणारी कंपनी मराठी भाषेला जाणूनबुजून दुय्यम दर्जा देत असल्याचे आढळून आल्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने श्री महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठीला प्राधान्य देण्यासाठी सदर कंपनीला निवेदन दिले.

मनसे निवेदन • भायखळा
प्रभाग क्रमांक २०८ चे शाखा अध्यक्ष श्री किरण टाकळे ह्यांनी नागरिकांच्या मागणीनुसार कोरोना काळात बंद असलेली बस क्र १६८ चालू करण्याची मागणी बेस्ट प्रशासनाकडे निवेदन देऊन केली.

मनसे इशारा • कुडाळ (सिंधुदुर्ग)
कुडाळ बसस्थानक इमारत अडीच कोटी खर्च करून उभारण्यात आली पण अजूनही प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली नाही, मनसे परिवहन सेनेचे उपाध्यक्ष श्री बनी नाडकर्णी ह्यांनी बसस्थानक खुले करा अन्यथा क्रिकेटचे सामने भरवू असा इशारा दिला.

मनसे मोर्चा • उस्मानाबाद
उमरगा - उस्मानाबाद येथे महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित महिलांचा मोर्चा काढण्यात आला. 

मनसे उद्घाटन • भंडारा
लाला लचपतराय वार्ड येथील मनसेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री नितीनभाऊ वानखेडे यांच्या हस्ते झाले.

मनसे आंदोलन • खोपोली (रायगड)
पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सुधागड मनसेने एमएसआरडीसी व बेग कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकार्‍यांना मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे व पदाधिकार्‍यांनी चक्क खड्डे मोजायला लावले.

मनसे नियुक्ती • नागपूर
जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री महेश जोशी, जनहित कक्ष नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीइक्बाल रिजवी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर मधील जनहित कक्षाच्या नियुक्त्या झाल्या.

मनसे नियुक्ती • मीरा भाईंदर(ठाणे)
मनविसे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष पदी श्री शान पवार ह्यांची नियुक्ती करण्यात आली.

Wednesday 21 October 2020

२० ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२० ऑक्टोबर २०२० ◆  मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश ● वांगणी (ठाणे)
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत वांगणी येथील महिला/ तरुण कार्येकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश ● मुरबाड (ठाणे)
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत  मुरबाड येथील महिला/ तरुण कार्येकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे कार्य ● देवरूख (रत्नागिरी)
देवरूख येथील निराधार अपंग व्यक्तीचे दैनंदिन दिवसाची परिस्थिती पाहून मनसे शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष श्री अनुराग कोचीरकर यांच्या पुढाकाराने सर्वोतोपरी मदत (कपडे/जीवनावश्यक वस्तू) करण्यात आली.

मनसे कार्य ● घाटकोपर (मुंबई )
प्रभाग क्रमांक १३२ शाखा अध्यक्ष श्री अभिजित शेजवळ ह्यांनी राजावाडी हॉस्पिटल ते MG Road रोडवरील होत असलेले अपघात लक्षात घेऊन रस्त्यावर "मार्गदर्शक पट्ट्यांची" गरज लक्षात घेऊन मनपाकडून करून घेतल्या.

मनसे कार्य ● मुंबई
‘माहीम सार्वजनिक वाचनालय’ वाचकांसाठी खुले झाले. वाचनाचा आनंद घेण्यासाठी येथे येणाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी म्हणून संपूर्ण वाचनालय मनसेकडून श्री नितिन सरदेसाई (मनसे नेते) ह्यांनी निर्जंतुक करून घेतले. तसेच फेस शिल्ड, सॅनिटायझरच्या बाटल्या व सॅनिटायझर स्टॅन्ड वाचनालयास दिले. 

मनसे यश ● मुंबई
मनसेचे श्री अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली ऍमेझॉन विरोधात मराठीसाठी उभारलेल्या लढ्याला यश आले, २० दिवसांत मराठी भाषा ऍमेझॉन App मध्ये दिसणार.

मनसे भेट ● मिरारोड भाईंदर
पारेख कुटुंबातील एकुलता एक मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्याचे हाऊसिंग लोन होते पण DHFL कंपनी ने तो क्लेम नाकारला म्हणून मनसे शिष्टमंडळाने मनसे मिरा भाईंदर उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांच्या नेतृत्वाखाली DHFL दहिसर शाखेत जाऊन जाब विचारला.

मनसे भेट ● मुंबई
मनसे नेते श्री नितिन सरदेसाई यांनी वाळकेश्वर येथील ऐतिहासिक "बाणगंगा तलाव" ह्या ठिकाणी कार्येकर्त्यांसह भेट दिली. तलावाच्या दुरावस्थे बाबत मनसे सरकारच्या सर्व संबंधित खात्यांशी पाठपुरावा करून हा ऐतिहासिक व पौराणिक वारसा जतन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल.

मनसे भेट ● दहिसर
मराठी फेरीवाल्यांना शिवसेना शासित मुंबई मनपा त्रास देते & परप्रांतीय फेरीवाल्यांना गोंजारते असे कसे चालेल..? प्रभाग क्रं ४ मधील मराठी फेरीवाल्यांनी मनसे शाखाअध्यक्ष श्री संतोष शिंदे यांची भेट घेतली & मनसे ह्या लढ्यात मराठी माणसासोबत आहे असे आश्वासित केले.

मनसे भेट ● नाशिक
खाजगी स्कुल बसचे चालक मालक ह्यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घडवून आणण्यासाठी मनसे नाशिक शहर अध्यक्ष अंकुश पवार ह्यांना विनंती केली.

मनसे भेट ● अंबड (जालना)
कापूस उत्पादकांच्या हमीभाव विषयी तक्रारी मनसेकडे आल्या होत्या, मनसे जालना जिल्हाध्यक्ष श्री बळीराम खटके ह्यांनी खरेदी विक्री येथे भेट देऊन मार्केट कमिटी सदस्य & संबंधित अधिकाऱ्यांना मनसे समज देऊन हमीभाव पेक्षा कमी रुपयांनी खरेदी केल्यास मनसे दणका निश्चितच.

मनसे दणका ● सुधागड (रायगड)
पाली/ बेणसे सुधागड तालुक्यातील परप्रांतीय ठेकेदाराला मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी सोमवारी मनसे स्टाईलने तंबी दिल्यावर त्याने स्थानिक कामगार ठेवण्याचे आश्वासन दिले. याबरोबरच कामावरून काढलेल्या स्थानिक तरुणाला पुन्हा कामावर घेण्यात आले आहेे.

मनसे आंदोलन ● नाशिक
नाशिक मनपा हद्दीतील बेकायदेशीर (१४८ कोटी रूपये) भूसंपादनाचा महाघोटाळा संदर्भात योग्य ते उत्तर महासभेत मिळाले नाही म्हणून मनसे नगरसेवक योगेश शेवरे व मनसे शहर अध्यक्ष अंकुश पवार यांनी महापौरांच्या रामायण निवास्थानी "ठिय्या आंदोलन" केले.

मनसे आंदोलन ● भिवंडी
मानकोली-अंजुरफाटा कामण-चिंचोटी रस्ता म्हणजेच मृत्यूला आमंत्रण ह्या रस्त्याच्या दुरुस्ती साठी मनसेच्या वतीने आज निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन ● ठाणे
ठाण्यातील सम्राट अशोक नगर,माजीवाडा नाका,घोडबंदर रोड येथील राहिवाश्यांच्या हक्काच्या घरासाठी मनसे जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव, श्री सचिन कुरेल यांच्या पुढाकाराने नागरिकांसह शुक्रवारी "धरणे आंदोलन" करण्यात येणार आहे.

मनसे आंदोलन ● पुणे
जम्बो कोविड सेंटर येथे काम करणाऱ्या नर्सेसचे ठेकेदार कडून वेतन थकवले होते मनसेच्या वतीने रुपालीताई पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली आज कोविड सेंटर बाहेर आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन ● लातूर
लातूर जिल्ह्यातील केळगाव येथे लातूर जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गावर मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ श्री नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली "चक्का जाम"आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन ● बुलढाणा
मनसे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री मदनराजे गायकवाड ह्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यात यावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले.

मनसे निवेदन ● कर्जत
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाही कारभारास रोक लावण्यात यावा आणि महिला बचत गटांना आर्थिक दिलासा द्यावा ह्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे निवेदन ● जळगाव
उजाड कसुम्बा गावातील शेतकऱ्यांना मिळालेली सरकारी मदत शेतकऱ्यांना न मिळता ती शेतकऱ्याच्या नावे वटवून मध्येच गिळंकृत केली गेली. याची चौकशी व्हावी ह्या मागणीसाठी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे निवेदन ● मुंबई 
IPL क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठीत सुद्धा व्हावे या मागणीसाठी मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री केतन नाईक ह्यांनी Star TV ला निवेदन दिले.

मनसे निवेदन ● चाळीसगाव
दहिवद -करमुड -  कुंझर मार्गाची दुरुस्ती करण्याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने चाळीसगाव बांधकाम विभागाला निवेदन दिले.

मनसे मागणी ● सोलापूर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर ह्यांनी मनसे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे ह्यांच्या निवासस्थानी भेट दिली, श्री धोत्रे ह्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळावी यासाठी विरोधी पक्षनेत्यांना निवेदन दिले.

मनसे मागणी ● मुंबई
मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २५००० आर्थिक मदत करणारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांचा जुना व्हिडिओ जाहीर करून त्याची आठवण तसेच मागणी केली. (tweet)

मनसे मागणी ● बुलढाणा
मनसे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री मदनराजे गायकवाड ह्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांना पत्र पाठवून ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी सरसकट ३० हजार आर्थिक मदत करावी अशी मागणी केलीय.

मनसे उद्घाटन ● माहीम
मनसे कामगार सेनेच्या नव्या कार्यालयाचे बुधवारी सकाळी ११ वाजता माहिम येथे मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

मनसे नियुक्ती ● नवी मुंबई (ठाणे)
रोजगार स्वयंरोजगार विभागाचे राज्य अध्यक्ष मा. महेंद्र बैसाणे व मनसे शहराध्यक्ष श्री गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली रोजगार स्वयंरोजगार विभाग नवी मुंबईच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मनसे मेळावा ● मुंबई
मनसे विधी विभागा अंतर्गत मुंबईतील मान्यवर वकिलांचा आज राजगड कार्यालय येथे परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता तसेच काही मान्यवर आणि नवोदित वकिलांचा पक्ष प्रवेश करून नियुक्ती साठी मुलाखती देखील घेण्यात आल्या .

मनसे नियुक्ती ● नाशिक
अरुण दातीर व कौशल पाटील यांची नाशिक मनविसे जिल्हा अध्यक्ष म्हणून मनविसे अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर यांनी नियुक्ती केली.

१९ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१९ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश ● चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम जिवती, गडचांदूर, नागभीड तालुक्यातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठांचे मनसेत पक्ष प्रवेश.

मनसे प्रवेश ● नालासोपारा (पालघर)
ठाणे मध्यवर्ती कार्यालय येथे नालासोपारा, वसई, विरार मधील शिवसेना व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा श्री संजय नाईक, श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश झाला.

मनसे प्रवेश ● नवी मुंबई (ठाणे)
सातारा, वाई तालुक्यातील नवी मुंबई येथील स्थानिक तरुणांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, श्री गजानन काळे ह्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.

मनसे यश ● नाशिक
छत्रपती शिवाजी महाराज,श्री संत नामदेव यांचा एकेरी उल्लेख बाबत मनसेच्या शिष्टमंडळाने श्री शाम गोहाड (जिल्हाध्यक्ष मनविसे) यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ येथे धडक दिली. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून कुलगुरूंनी दिलगिरी व्यक्त करत प्रश्नपत्रिका काढणाऱ्या आस्थापनेस पाच वर्षे काळ्या यादीत टाकले.

मनसे यश ● कल्याण-डोंबिवली (ठाणे)
मनसे नेते, आमदार श्री राजू पाटील यांच्या मागणीला यश! चुकीची मालमत्ता कर आकारणी दुरुस्त करण्यात येणार. KDMC तील ९ गावांना चुकीच्या पध्दतीने कर आकारणी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ही बाब आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिली होती, आता लोकांना कर आकारणी करून दिलासा मिळणार.

मनसे यश ● नवी मुंबई
२० हजार सिडको सोडतधारकांचा प्रश्न मनसेमुळे सुटला. लाखोंचे मुद्रांक शुल्क नाही तर फक्त प्रत्येकी हजार रुपये असतील असे सिडकोक्सही व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांचे मनसे शिष्टमंडळाला (गजानन काळे ह्यांच्या नेतृत्वाखाली) आश्वासन दिले.

मनसे यश ● संभाजीनगर
मनसेच्या आंदोलनाचं हे सर्वांत मोठं यश, मनसेच्या आंदोलन नंतर जैन इंटरनॅशनल शाळेच्या मनमानी विरोधात कारवाईचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे सादर, मनसेच्या राजीव जावळीकर आणि मंगेश साळवे यांनी आक्रमक आंदोलन केलं होतं.

मनसे यश ● मुंबई
मनसे निवेदन नंतर फ्लिपकार्ट आता मराठीत सेवा देणार आहे. श्री अखिल चित्रे आणि सहकाऱ्यांचे आभार. (बातमी सोर्स-पुढारी)

मनसे यश ● अंधेरी
मनकासे शिष्टमंडळाने रेल्वेतील कंत्राटी कामगारांच्या वेतन समस्यांच्याबाबत मे. कल्पतरू हॅास्पिटॅलिटी अँड फॕसिलिटी मॕनेजमेंट (KHFM ) या आस्थपनेच्या कार्यलयात  कामगारांसोबत घेराव घातला. ७ दिवसात वेतन मिळून जाईल असे लेखी आश्वासन आस्थापनेने मनसेला दिले.

मनसे कार्य ● भांडुप
ग्रेट ईस्टन गार्डन आणि आजुबाजुचा परिसर येथे मनसे भांडुप विधानसभा राजगड ११२ शाखाअध्यक्ष सुनिल नारकर यांच्या माध्यमातून धुरफवारणी करण्यात आली.

मनसे कार्य ● कांदिवली, मुंबई 
मनसे प्रभाग क्रमांक २३ चे शाखा अध्यक्ष श्री किरण जाधव यांच्या मागणीनंतर प्रभागात महानगरपालिकेकडून धूर फवारणी करण्यात आली.

मनसे कार्य ● बार्शी (सोलापूर)
सोलापूरच्या बार्शीत अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात पाणी घरात घुसले होते ह्यावेळी मनसेचे बार्शी तालुका अध्यक्ष श्री विक्रम सिंह पवार व सहकारी स्वतःहा मदतकार्य करत होते. 

मनसे कार्य ● पुणे
मनसे सरचिटणीस/ पुणे मनपा नगरसेवक श्री वसंत मोरे ह्यांच्या पुढाकाराने सौ जयश्री संदीप माने (शिक्षिका) ह्यांना ५०००० हॉस्पिटल बिल माफ करून मिळाले.

मनसे कार्य ● यवतमाळ
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा मनसे वतीने रोजगार करणाऱ्या व्यवसायिकांना, मूर्तिकार बांधव, न्यायालय परिसरातील टायपिंग व्यवसायिक, रिक्षा चालक यांना फेस शिल्डचे मोफत वाटप करण्यात आले.

मनसे निवेदन ● मुंबई
पदव्युत्तर कला शाखा आणि Law प्रवेशासाठी दिली जाणारी CET परीक्षा एकाच दिवशी असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एक परीक्षेला मुकावे लागणार असल्याने मनसेचे ADV संतोष धोत्रे ह्यांनी कुलसचिव मुंबई विद्यापीठ ह्यांना निवेदन दिले.

मनसे मागणी ● कोल्हापूर
चंदगड आणि उपविभागात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून शासकिय मदत द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला आहे.

मनसे मागणी ● सिंधुदुर्ग
कणकवली येथील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मनसे ची मागणी.

मनसे मागणी ● वसई विरार
महिला सक्षमीकरणच्या नावाखाली बचत गटाची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत मनसेचे वसई विरार शहर सचिव श्री महेश कदम ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मनसे आंदोलन ● ठाणे
ठाणे मानपाडा येथील ACME रेंटल मध्ये राहणारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे ठाणे प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर सह स्थानिक नागरिकांचे आंदोलन. 

मनसे मोर्चा ● कोल्हापूर
आजरा (कोल्हापूर) वनविभागावर मनसेच्यावतीने शंकध्वनी मोर्चा काढण्यात आला ज्यात नुकसानभरपाई सोबतच वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी मनसेकडून करण्यात आली.

मनसे सन्मान ● सिंधुदुर्ग
नीट परीक्षेत देशात 1488 आलेल्या मालवणची कन्या कुमारी जान्हवी विष्णू लाड हिचा सत्कार मनसे शिष्टमंडळाने केला.

मनसे सन्मान ● ठाणे
नवरात्रोत्सव मध्ये दुसऱ्या दिवशी ठाणे पाचपाखाडी मनविसेचे श्री दिनेश मांडवकर यांच्या संकल्पनेतुन सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.

मनसे सन्मान ● ठाणे
नवरात्रोत्सव मध्ये तिसऱ्या दिवशी ठाणे पाचपाखाडी मनविसेचे श्री दिनेश मांडवकर यांच्या संकल्पनेतुन डॉक्टर/ परिचारिका ह्यांचा सन्मान करण्यात आला.

मनसे उद्घाटन ● माहीम
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मनसे पक्षप्रमुख श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते बुधवारी मुंबई माहीम येथे होणार आहे.

मनसे नियुक्ती ● रायगड
श्री संजय नाईक ह्यांनी श्री राजकुमार पाटील यांची मनसे वाहतूक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.

१७ ऑक्टोबर,१८ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१७ ऑक्टोबर,१८ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश ● भिवंडी (ठाणे)
भिवंडी काल्हेर  येथील तरूणांनी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेत प्रवेश केला.

मनसे प्रवेश ● मुंबई
प्रभाग क्रमांक ९४ मधील विविध पक्षातील तरूण कार्येकर्ते/महिला कार्येकर्त्यांनी विभाग अध्यक्ष श्री सुनिल हर्षे, श्री संजय नाईक (मनसे वाहतूक सेना अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे प्रवेश ● रत्नागिरी
जयगड, खंडाळा,येथील तरुणांनी राजसाहेबांच्या विचाराने प्रेरीत होऊन मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर आणि मनसे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे प्रवेश ● पुणे
श्री अभयराजे वाडेकर (पुणे जिल्हा संघटक) यांच्या उपस्थितीत चाकण शहरातील महिला/ पुरुष कार्येकर्त्यांनी मनसे पक्षात पक्षप्रवेश केला.

मनसे प्रवेश ● अंधेरी (मुंबई)
प्रभाग क्रमांक ७६ मधील विविध पक्षातील तरुण कार्येकर्त्यांनी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे सरचिटणीस श्री संदीप दळवी ह्यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.


मनसे प्रवेश ● नवी मुंबई (ठाणे)
आगरी-काेळी तरुणांचा ओढाही मनसेकडे, नवी मुंबई, बेलापूर फणसपाडा, शहाबाज गावातील आगरी काेळी तरुणांनी मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माेठ्या संख्येने मनसे शहराध्यक्ष श्री गजानन काळे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

मनसे प्रवेश ● नागपूर
नागपूर जिल्ह्यातील रामटेक पवनी येथील फुलझरी येथे नवयुवकांनी तालुका शेखर भाऊ दुन्डे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश उईके व गावातील नवयुवकांनी प्रवेश केला यावेळी त्यांनी गावातील अनेक समस्या श्री. शेखरभाऊ दुन्डे यांच्यासमोर मांडल्या.

मनसे प्रवेश ● नाशिक
नाशिकरोड येथील विविध पक्षातील तरुण कार्येकर्ते, सामाजिक कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष श्री दिलीप दातीर, शहराध्यक्ष श्री अंकुश पवार ह्यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश ● नाशिक
भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. निर्मला पवार यांच्यासह अनेक महिलांनी मनसे सरचिटणीस श्री अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष श्री दिलीप दातीर, शहराध्यक्ष श्री अंकुश पवार ह्यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे प्रवेश ● उरण (रायगड)
वहाळगाव, मोरावे गावात अनेक तरुण कार्येकर्त्यांनी/ महिलांनी मनसे पक्षात श्री अतुल भगत, Adv श्री अक्षय काशीद (मनविसे जिल्हा अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला आणि मनसे शाखेचे उद्घाटन सुद्धा दोन्ही गावात झाले.

मनसे यश ● गुहागर (रत्नागिरी)
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पाटपन्हाळे कोंडवाडी ते पिंपळवट एसटी सुरू करण्यासाठी मनसे गुहागर तालुका अध्यक्ष श्री विनोद जानवळकर ह्यांनी निवेदन दिले होते, त्यांच्या मागणीला यश आले आहे. ST महामंडळाने सदर मार्गावर बससेवा चालू केली आहे.

मनसे यश ● नवी मुंबई
सीवुडस विभाग अध्यक्ष श्री अमोल आयवळे यांनी काही दिवसांपूर्वी प्रभागातील रस्त्यांवरील विजेचे दिवे बंद असल्याने चालू करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. पालिका प्रशासनाने मनसेच्या मागणीनंतर विजेचे दिवे अखेर चालू केले.

मनसे यश ● डोंबिवली (ठाणे)
मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष/ राज्य उपाध्यक्ष श्री राजेश कदम ह्यांनी डोंबिवली वाशी मार्गावर बस सेवा चालू करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांच्या मागणीला यश आले असून सोमवार पासून सदर मार्गावर बससेवा चालू होईल.

मनसे कार्य ● माहीम (मुंबई)
INFIGO आणि मनसे माहीम विधानसभा क्षेत्रातर्फे दिनांक - १७/१०/२०२० ते २५/१०/२०२० ह्या कालावधीत लिलीयन हाउस येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ ह्या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केला आहे.

मनसे कार्य ● बदलापूर (ठाणे)
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मनसे बदलापूर महिला सेनाच्या संगीता चेंदवणकर यांच्या पुढाकाराने निर्भया सामाजिक संस्था आणि माऊली कृपा कला अकादमी प्रस्तुत महिलांना आणि मुलींना स्वसंरक्षणासाठी शिवकालीन कलांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मनसे कार्य ● अमरावती
शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरक्षादृष्टिकोनातून मनसे अमरावती शहर टीम कडून अंबादेवी व एकवीरा देवी मंदिराचा परिसर तेथील घरे व दुकानांच्या संपूर्ण परिसरात औषधी फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात आले.

मनसे कार्य ● कुडाळ (सिंधुदुर्ग)
कोरोना आपत्तीमुळे नवरात्रौत्सव मनोरंजनाचे कार्यक्रम टाळून सामाजिक उपक्रमातून मनसे पिंगुळी विभागाच्या वतीने १९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसे कार्य ● पुणे
मा. मनसे नगरसेविका पुष्पा कनोजीया व मनविसे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजीया यांच्या माध्यमातुन आज आपल्या कोथरुड करांसाठी रुग्णवाहीका (ॲम्बुलन्स) लोकार्पण सोहळा मनविसे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते पार पडला.

मनसे कार्य ● भांडुप (मुंबई)
मनसे रस्ते आस्थापना विभागाचे श्री संतोष मयेकर, संतोष पार्टे आणि सहकाऱ्यांच्या वतीने मनपाच्या आरोग्य विभागात, पाणीपुरवठा विभाग, घनकचरा विभाग, परीक्षण विभाग, पर्यावरण विभाग, उद्यान विभाग मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले.

मनसे कार्य ● श्रीवर्धन
आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्रीवर्धन तालुक्यातील मौजे आदगाव येथे मनसे आदगावच्या वतीने मोफत सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मनसे कार्य ● कल्याण
मनसे प्रभाग क्र. 16 च्या वतीने जनधन व पॅनकार्ड शिबिराचे आयोजन करम्यात आले होते. ह्या मनसे आयोजित जनधन व पॅनकार्ड शिबीरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

मनसे कार्य ● अंधेरी (मुंबई)
गेले दिड महिना सुरू असलेल्या 'मनसे'च्या आंदोलनाला यश आल्याची विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांची माहिती. राजाराणी मल्होत्रा विद्यालयातील आरटीई व इतर विद्यार्थ्यांचे बंद असलेले ऑनलाईन शिक्षण सुरू.

मनसे निवेदन ● भोसरी (पुणे)
"साई तिरुपती ग्रीन्स" चर्होलीगाव भोसरी विधानसभेतील बिल्डर व मालकाकडून ६०० सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी तातडीने कडक कारवाई करण्याबाबत मनसेचे श्री सचिन चिखले आणि श्री अंकुश तपकीर ह्यांनी आयुक्तांना निवेदन दिले.

मनसे निवेदन ● उल्हासनगर (ठाणे)
चार ते पाच महिन्यांपूर्वी घोषणा करून, लाखो रुपये खर्च करून उल्हासनगर शहरासाठी उभारलेले स्वतंत्र चाचणी निदान केंद्र (आर टी पी सी आर लॅब) तात्काळ कार्यान्वित करणे बाबत मनसेने पालिका आयुक्तांना निवेदन दिले.

मनसे निवेदन ● पंढरपूर
अतिवृष्टीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले ह्याबाबत मनसेचे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे ह्यांनी मनपा अधिकाऱ्यांना उपाययोजना साठी निवेदन देऊन चर्चा केली.

मनसे निवेदन ● मिरारोड भाईंदर (ठाणे)
मनविसे मिराभाईंदर शहरअध्यक्ष हेमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना मिराभाईंदर शहरातील पालकांना शाळेच्या शुल्कामध्ये ५०% सवलत व शाळेचे शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेवरती कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन ● आंबिवली (कल्याण,ठाणे)
मनसे मा. आमदार श्री प्रकाशजी भोईर यांच्या नेतृत्वात आंबिवली स्टेशन प्लॅटफार्म क्रमांक १ वर नवीन तिकीट घर उभारण्यात यावे अशा मागणीसाठी मनसेकडून स्थानिक रेल्वे प्रशासन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन ● पुणे
हॉस्पिटल मध्ये मेडिकल बिलांमध्ये सामान्य नागरिकांना छळतात त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून FDA  च्या अधिकाऱ्यांना मनसे सरचिटणीस/ पुणे मनपा नगरसेवक श्री वसंत मोरे ह्यांनी निवेदन दिले.

मनसे इशारा ● सिंधुदुर्ग
अवैध वाळू उपसा विरोधात देवली, आंबेरी, चिपी येथील शेतकरी ग्रामस्थांसोबत मनसे आहे. वेळ प्रसंगी ग्रामस्थांना सोबत घेवून जन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. असा इशारा मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिला आहे.

मनसे इशारा ● माळशिरस
तिन महिन्यात मिळणारा कॅशबॅक दहा महिने झाले तरी मिळाला नाही. जर पंधरा दिवसांत काहिच प्रोसेस झाली नाही तर आॕफिसची एक काच ठेवणार नाही. असा इशारा बजाज फायनान्स आॕफीसला मनसेचे माळशिरस तालुकाध्यक्ष श्री रोहित खाडे ह्यांनी दिला आहे.

मनसे इशारा ● पुणे
विद्यापीठाच्या परीक्षेतील वाढते गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर परिक्षे बाबत आता मनविसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनविसे पुणे शहर अध्यक्ष श्री कल्पेश यादव ह्यांनी दिला आहे.

मनसे आंदोलन ● नांदुरा (जळगाव)
जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्याचे काम होऊन काही दिवसच उलटले असता भेगा पडलेल्या दिसत आहे जर करोड़ों खर्च करून सुद्धा काम निष्कृष्ट दर्जाचे असेल तर अधिकारी व कंत्राटदार हे जनतेला चुना लावल्याचा आरोप करत मनसेने रस्त्यावर भेगांमध्ये चुना व बेशरम झाड लावून निषेध व्यक्त केला. 

मनसे आंदोलन ● संभाजी नगर
जैन इंटरनॅशनल स्कुल मध्ये फिसाठी तगादा लावला होता. निवेदन देऊन व्यवस्थापन सुधारण्याचे नाव घेत नसल्याने अखेर मनसेने तोडफोड करून दणका दिलाच. आंदोलन कर्त्या महाराष्ट्र सैनिकांना जामीन मंजूर झाला.

मनसे नियुक्ती ● दोडामार्ग (सिंधुदुर्ग)
मनविसे दोडामार्ग शहराध्यक्षपदी श्री सौरव नाईक यांची नियुक्ती मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर ह्यांनी केली.

मनसे नियुक्ती ● पालघर
श्री संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली श्री. विनोद मोरे ह्यांची मनसे वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

मनसे सत्कार ● पुणे
पुणे वडगावशेरी विधानसभा मतदार संघातर्फे पत्रकार कै. पांडुरंग रायकर यांच्या स्मरणार्थ पत्रकारांचा कोरोना योद्धा कृतज्ञता सन्मान मनसे नेते बाबू वागसकर, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे, शहर अध्यक्ष अजय शिंदे, शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते यांच्या हस्ते करण्यात आला. आयोजन मनसे वि.अध्यक्ष सुनिल कदम ह्यांनी केले होते.

मनसे सत्कार ● सिंधुदुर्ग
नीट परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या  आशिष अविनाश झांटये याचा मनसेच्या वतीने श्री परशुराम उपरकर आणि सहकाऱ्यांनी सत्कार केला.

मनसे उद्घाटन ● मुंबई
मुंबई प्रभाग क्रमांक ९४ चे शाखा अध्यक्ष श्री रुपेश मालुसरे ह्यांच्या पक्ष कार्येलयाचे उद्घाटन मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष/सरचिटणीस श्री संजय नाईक ह्यांच्या हस्ते झाले.

मनसे उपक्रम ● नेरुळ (नवी मुंबई, ठाणे)
नवरात्रोत्सवच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ८३ च्या वतीने मनसे महिला उपशहर अध्यक्षा सौ अनिथा नायडू ह्यांच्या पुढाकाराने विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसे भेट ● संभाजीनगर
संभाजीनगर येथील कलाकार श्री अमर वानखेडे कोविड मुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे आंदोलन करत होते. मनसे जिल्हा अध्यक्ष श्री सुहास दशरथे ह्यांनी भेट घेऊन मनसेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

मनसे भेट ● संभाजी नगर
संभाजीनगर मनपा आयुक्त श्री पांडे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने श्री सुहास दशरथे (मनसे जिल्हा अध्यक्ष) यांनी भेट घेऊन शहरातील अनेक प्रश्नांवर चर्चा केली.

मनसे मोर्चा ● कर्जत (रायगड)
मनसे महिला सेनेने महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्यासाठी आज मोर्चा काढला, मायक्रो फायनान्स ह्यांच्या दंडेलशाही विरोधात सरकारने लवकर कारवाई करावी बचत गटातील महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी प्रमुख मागणी होती.

मनसे मेळावा ● सांगली
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असल्याने जिल्ह्याध्यक्ष श्री तानाजी सावंत ह्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवून कार्येकर्त्याना सरकारी कामावर देखरेख ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ कसा होईल यासाठी मार्गदर्शन केले.

मनसे मेळावा ● नवी मुंबई
विद्यार्थी, पालकांना भेडसावणा-या शैक्षणिक प्रश्नांवर आक्रमक हाेण्याचा मनविसेचा मानस. मनसे नवी मुंबई विद्यार्थी सेनेची बैठक श्री गजानन काळे (मनसे शहराध्यक्ष) यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

मनसे दणका ● मुंबई
मराठीच्या मुद्द्यावर मनसेने इशारा दिल्यानंतर फ्लिपकार्टवर सध्या उपलब्ध असलेल्या भाषांसह इतर भाषांमध्येही अॅप उपलब्ध असेल. भारतात विविध भागात पोहोचण्यासाठी विविध भाषा आणि व्हॉइस सॉल्यूशनचा वापर येईल, अशी माहिती फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Monday 19 October 2020

१६ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१६ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब●मुंबई
पुणे लोकमान्य डिजिटल फेस्टिव्हल २०२० च्या ई-बुक चे प्रकाशन मा .श्री .राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजसाहेब ●मुंबई
गुहागर तालुकाध्यक्ष श्री विनोद जानवळकर ह्यांनी मनसेप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली व कामाचा आढावा दिला.

मनसे प्रवेश | नवी मुंबई 
मनपा नेरुळ, वंडर्स पार्क येथील कामगारांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत, श्री गजानन काळे व युनियनचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, अभिजित देसाई, अमाेल आयवळे यांच्या उपस्थितीत मनसे मनपा कामगार सेनेत प्रवेश केला. 

मनसे प्रवेश●मुंबई
मायक्रो-फायनान्स कंपन्या राज्यातील महिला बचत गटांचे आर्थिक शोषण करत असल्याचा मुद्दा मनसेने हाती घेतला आणि या संकटग्रस्त महिलांना आशेचा एक किरण दिसू लागला. लवकरच या सर्व महिला #मनसे प्रवेश घेणार आहेत. 

मनसे प्रवेश●मानखुर्द(मुंबई)
मनसे वाहतूक सेनेचे श्री जगदीश खांडेकर आणि श्री श्रीमंत टेंगळे यांच्या  पुढाकाराने मानखुर्द शिवाजीनगर विभागातील रिक्षा चालक मालक ह्यांनी मनसे वाहतुन सेनेचे सभासत्व स्वीकारले.

मनसे यश●KDMC
मनसेचे श्री उल्हास भोईर आणि श्री कौस्तुभ देसाई ह्यांच्या पुढाकाराने KDMC मनपातील कामगारांचे वेतन २४ तासात कामगारांच्या खात्यावर जमा,कामगारांनी मनसेचे आभार मानले.

मनसे यश●पुणे
पुणे विश्रांतवाडी येथील बंद शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्यात यावी यासाठी  मनसेचे श्री गणेश पाटील ह्यांनी मागणी केली होती.अखेर त्याबाबत अन्नपुरवठा विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मनसे कार्य●खालापूर(रायगड)
काही दिवसांपूर्वी श्री. संदेश करतडे & श्री. अनिरुद्ध पवार ह्या दोन होतकरू कामगारांना खालापूर येथील कोपरन लि. ह्या कंपनीनं कामावरून काढून टाकले होते,मनसे कामगार सरचिटणीस श्री राणे ह्यांच्या पुढाकाराने ते पुन्हा कामावर रुजू झाले.

मनसे कार्य●घाटकोपर(मुंबई)
घाटकोपर पूर्व विभागातील टिळकरोड वरील लायन्स क्लब गार्डनमध्ये अनेक दिवसांपासून विजेचे खांब बंद अवस्थेत होते,मनसे प्रभाग क्र १३२ च्या वतीने त्याचा पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला व विजेचे पोल चालू करून घेतले.

मनसे कार्य●मुंबई
मुंबई येथील नामांकित सेक्युरिटी कंपनीमधील महिला सेक्युरिटी गार्ड यांचा २०१८ मधील थकीत बोनस बाबत श्री गजानन राणे(सरचिटणीस, मनसे कामगार सेना) ह्यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून महिला सेक्युरिटी गार्डना बोनस देण्यात आला.महिलांनी मानले आभार..!

मनसे कार्य●पंढरपूर
अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीघाटाच्या बांधकामाची २० फुटी भिंत कोसळून अभंगराव कुटुंबातील 4 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. सरचिटणीस श्री. दिलीप धोत्रे ह्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं आणि त्यांना विमा योजना व उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत केली. 

मनसे कार्य●भांडुप
भांडुप टँक रोड, काशीनगर,खडीमशीन प्रसाद सोसायटी,देवीचा मंडप तसेच आजुबाजुचा परिसर येथे मनसे राजगड ११२ शाखा अध्यक्ष श्री सुनिल नारकर यांच्या माध्यमातून धुरफवारणी करण्यात आली.

मनसे कार्य●शीव(मुंबई)
इमारत क्रमांक टि ६६ व ६७ प्रतिक्षा नगर सायन 
येथे मनसेचे शाखाअध्यक्ष श्री  शंकर कविलकर, श्री.इंगळे(बी.जी.शिर्के कंपनी) व श्री.शरद नवले यांच्या प्रयत्नाने रस्ता दुरुस्ती करण्यात आला.

मनसे निवेदन●संगमनेर
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्या विरोधात मनसेने दंड थोपटले, रस्त्याची अवस्था बिकट असल्याने रोज अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने मनसेच्या वतीने टोलनाका व्यवस्थापन ला निवेदन देण्यात आले,रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन.

मनसे निवेदन●नाशिक
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट/ महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बॉटनीकल गार्डनची दुरावस्था होत असल्याने तात्काळ सुरक्षा रक्षक नेमणे बाबत नाशिक मनसेने मा. आयुक्तांना निवेदन दिले आहे.

मनसे निवेदन●नालासोपारा
रस्त्यावर पडलेले खड्डे, उघड़ी पडलेली गटारे आणि नागरिकांना होणाऱ्या इतर अनेक अडचणी ह्याबाबत मनविसे मोरेगाव विभागाच्या वतीने व.वि.श.म.न.पा बांधकाम मुख्य अभियंता आर. के. पाटिल ह्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन●सावंतवाडी(सिंधुदुर्ग)
बचत गटांचे कर्ज माफ करण्यासाठी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन●मालवण(सिंधुदुर्ग)
मनसे मालवणचे बँकेसह मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे बचत गट अडचणीत असल्याने त्यांचे कर्जमाफी साठी निवेदन देण्यात आले.

मनसे निवेदन●देवगड(सिंधुदुर्ग)
मनसे देवगड च्या वतीने भातशेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करावा या मागणीसाठी  तहसील कार्यालय , देवगड , या ठिकाणी निवेदन देण्यात आले.त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री , उप तालुका अध्यक्ष अक्षय धुरी व इतर सहकारी उपस्थित होते.

मनसे निवेदन●पुणे
मनसे रोजगार स्वयंरोजगार चे श्री महेंद्र बैसणे यांचे आदेशाने पुणे हडसर विभागात ८०% स्थानिक तरुणांना संधी मिळाली पाहिजे ह्या मागणीसाठी मनसेच्या वतीने श्री श्रेयस देशमुख(पुणे शहर सचिव) यांनी विभागातील सर्व आस्थापना,मॉल &  कंपन्यांना निवेदन दिले.

मनसे निवेदन●मुंबई
कोर्ट आदेश असूनही हिरानंदानी बिल्डरने अत्यल्प घटकांसाठी घरे बांधण्याचे आश्वासन पुर्ण केले नाही.सदर बिल्डर्स  विकत असलेल्या सदनिकांचे रजिस्ट्रेशनला स्थगती द्यावी अशी मागणी नोंदणी उपमहानिरीक्षक श्री.पाटील ह्यांच्याकडे मनसे शिष्टमंडळाने केली.

मनसे निवेदन●पुणे
पुणे मनपा सर्वे क्रमांक १६ ,गोकुळ नगर भागातील नागरिकांना कमी दाबाचे पाणी,अनियमित वेळ ह्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने,मनसेच्या वतीने श्री समीर शिंदे(वार्ड अध्यक्ष ४९) ह्यांनी पाणी विभागाला निवेदन दिले.

मनसे मागणी●मुंबई
रेल्वे कामगारांना वर्ष २०२० साठी मिळणारा बोनस तातडीने जाहीर करण्यात यावा.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष मा श्री जितेंद्र पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली.

मनसे मागणी●मुंबई
मुख्यमंत्रीजी घरातून बाहेर पडा,शेतकऱ्यांना मदत करा “…नाहीतर लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल”; मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांची मागणी.

मनसे मागणी●मुंबई
सरकारने शेतकरी बांधवांसाठी कायमस्वरूपी 24 तास उपलब्ध असणारी "बळिराजा" हेल्पलाईन चालू करावी. आहि मागणी मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी सरकारकडे केली आहे.

मनसे मागणी●उल्हासनगर
उल्हासनगरातील बाजारपेठा नियमित सुरू करा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख ह्यांनी केली आहे. 

मनसे उपोषण●रत्नागिरी
टाळेबंद काळातील विज बिल माफी अन्यथा विजखांब कामाचे भाडे मिळण्यासाठी महावितरण अधीक्षक कार्यालयासमोर तब्बल तीन दिवस आमरण उपोषण करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांना महावितरणने पंधरा दिवसात आश्वासनाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. 

मनसे आंदोलन●लातूर
बचत गट चालवणाऱ्या महिलांना मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ व्हाव्हे यासाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता,त्या मोर्चात सहभागी झालेल्या मनसेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले.

मनसे आंदोलन●मानवत(परभणी)
मानवत तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० हजार रुपये मदत जाहीर करा या प्रमुख मागण्यांसाठी आज मानवत येथे मनसेकडून "रास्ता रोकून" आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन●हिंगोली
शहरात दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, शहरात स्वच्छता ठेवावी या मागणीसाठी मनसेतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून १६ आॅक्‍टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान आंदोलन केले.

मनसे आंदोलन●नागपूर
स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेला शहरांचा विकास नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने मनसे नागपूरच्या वतीने अर्धवट कामांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे दणका●शीव(मुंबई)
स्थानिक कोळी बांधवांच्या तक्रारीनंतर मनसे आक्रमक,परप्रांतीय कोळी बांधवाना मनसेने दिला दणका.

मनसे इशारा●पिंपरी चिंचवड
बायो मेडिकल वेस्टचे कंत्राट पास्को कंपनीला चुकिच्या पद्धतीनेच देण्यात आले? चुकीचे कंत्राट रद्द न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन असा इशारा मनसे नगरसेवक श्री सचिन चिखले ह्यांनी दिला आहे.

मनसे इशारा●मुंबई
बॉलिवूडला बाहेर नेण्याचा विचारही करु नका  असा इशारा मनसेचे सरचिटणीस/मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री अमेय खोपकर ह्यांनी दिला आहे.

मनसे इशारा●ठाणे
कोरोनाकाळात ठाणे शहरात खाजगी हॉस्पिटलकडून 1कोटी 64 लाख 68 हजारांची लूट झालीय असा आरोप मनविसेचे संदीप पाचंगे ह्यांनी केला आहे.आयुक्तांच्या आदेशाला खिसेकापू रुग्णालयांकडून केराची टोपली दाखवण्यात आले आहे आणि मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मनसे मुलाखत●ठाणे
कोरोनाच्या नावाखाली ठाण्यात खाजगी रुग्णालयाकडून लुटमार ?मनसेच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महापालिकेने नेमलेले लेखा परीक्षक यांनी निदर्शनास आणून दिलेली अवाजवी बिले रुग्णांना परत मिळत आहेत का?ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मनविसे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे ह्यांनी #ThaneLive  दिली आहे.

मनसे भेट●दहिसर
दहिसर चेक नाका येथील कोविड सेंटर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या(कामावरून कमी करणे,वेतन न देणे,आरोग्य विषयक सुविधा न मिळणे) मनसेकडे आल्या असता मनसेचे सरचिटणीस श्री नयन कदम ह्यांनी जातीने लक्ष घालत कामगारांना न्याय मिळवून दिला.

मनसे भेट●नागपूर
नागपूर शिक्षण विभागात सुरू असलेला प्रचंड भ्रष्टाचार, रात्रशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न अश्या अनेक समस्यांसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने श्री महेश जोशी,श्री शरद भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री श्री बच्चू कडू यांची भेट घेतली. 

मनसे सहभाग●पुणे
आंतराष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त, राज्यभरातील तरुणांच्या बेरोजगरीवर काम करणाऱ्या काही प्रतिनिधींसोबत मनविसेचे शहर अध्यक्ष श्री कल्पेश यादव यांनी चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी सहभाग घेतला.

मनसे संवाद●धाराशिव
नळदुर्ग (धाराशिव)- मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेल्या बचत गटांच्या कर्ज माफी साठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी शहरातील विविध भागात मनसे शहरध्यक्ष अलिम शेख, मनसे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वात बैठका घेऊन बचत गटातील महिलांशी संवाद साधला.

मनसे आनंदोत्सव●धुळे
महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील मनसे विध्यार्थी सेनेने सार्वजनिक वाचनालये व अभ्यासिका सुरू अभ्यासिका सुरू करण्यासाठी आंदोलन केलेलं.आज पासून ग्रंथालय ,अभ्यासिका सुरू झालेत राजसाहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मनवीसे टीमने आनंदोस्तव साजरा केला.

मनसे भेट●मिरारोड भाईंदर(ठाणे)
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अविनाश जाधव यांनी आज मीरा भाईंदर उद्योगिक वसाहतीतील पांचाळ आणि जय अंबे इंडस्ट्रीज मधील कामगारांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मनसे भेट●खेड(रत्नागिरी)
शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी खेड नगर परिषदेला सदिच्छा भेट दिली .त्यांचे स्वागत मनसेचे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर आणि इतर मनसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मनसे नियुक्ती●पालघर
पालघर उपशहराध्यक्ष पदी श्री कृणाल कुंटे यांची ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांनी नियुक्ती केली.

Friday 16 October 2020

१५ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

१५ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे प्रवेश●शहापूर
शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधवांच्या उपस्थितीत असंख्य शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश.

मनसे प्रवेश●वर्धा
बँड,वाजंत्री,वादक मातंग समाजाचा बांधवांनी मा.राजसाहेब ठाकरे यांचा विचारांनी प्रेरित होऊन व मनसे जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वंदिले यांच्या नेतृत्वात मनसेमध्ये प्रवेश केला.

मनसे प्रवेश●धुळे
मनसे अध्यक्ष राज साहेब ह्यांच्या विचाराने प्रेरित होऊन धुळे मनविसे जिल्हा अध्यक्ष यांच्या कामगिरी वर विश्वास ठेवत कुसुंबा ता.साक्री येथील विद्यार्थीनीं केला मनविसेत प्रवेश केला.

मनसेप्रवेश●खेड(रत्नागिरी)
खेड तालुक्यातील खोपी ,शिरगांव, गुणदे,कुभांड,मिर्ले,कुळवंडी, मधील  शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला.


मनसे कार्य●मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात साप दिसून आल्याची माहिती काही नागरिकांनी मनसेला दिली. पावसाळ्यात मैदानात वाढलेल्या गवतामुळे सापांना राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याची शक्यता आहे.कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी म्हणून आज मैदानातील वाढलेले गवत श्री नितिन सरदेसाई ह्यांच्या नेतृत्वाखाली कापण्यात आले.

मनसे कार्य●अमरावती
ग्लोबल फार्मासिस्ट कंपनीने प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे तरुणांकडून पैसे उकळले होते,ही तक्रार मनसेकडे येताच श्री संतोष बद्रे ह्यांनी मनसे दणका देत ४० ते ५० तरुणांना न्याय मिळवून दिला.

मनसे कार्य●मुंबई
दादर माटुंगा परिसरातील भ्रष्ट ठेकेदारांच्या बदलीसाठी मनसेकडून श्री मनीष मारू ह्यांनी पालिकेला निवेदन दिले होते,आज पालिकेने कारवाई करत त्या भ्रष्ट मुकादमची बदली केली.

मनसे कार्य●पुणे
कात्रज तलावातील पाणी ज्या ज्या कारणांमुळे लोकवस्तीत शिरते त्या त्या सर्व अडचणी मनसे नगरसेवक श्री वसंत मोरे ह्यांनी बुलडोझर च्या सहाय्याने मोकळा करून घेतला.

मनसे कार्ये●पुणे
पुण्याचे मनसेचे नगरसेवक श्री वसंत मोरे ह्यांनी विधानसभा निवडणुकीत सचाई माता मंदिर जवळील अचल फार्म भागाला पाणी देतो असे आश्वासन दिले होते,निकाल श्री वसंत मोरे ह्यांच्या बाजूने लागला नसला तरी त्यांनी दिलेला शब्द पाळला.अचल फार्म भागातील नागरिकांना पाणी पुरवठा केला.

मनसे कार्ये●पुणे
पुणे कोंढवा येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणांहून ड्रेनेज व राडारोडा वाहुन आला होता,मनसेचे नगरसेवक श्री साईनाथ बाबर ह्यांनी स्वतः प्रभागात उतरून प्रशासकीय आणि कार्येकर्त्यांच्या जोडीने परिसरात साफसफाई करून घेतली.

मनसे कार्ये●विरार(पालघर)
विरार पुर्व येथील कारगिल नगर मधील रस्त्याच्या लगत  असलेली मुख्य पाईप
लाईन कित्येक दिवस गळत/नादुरूस्त होती प्रभाग क्र. २५ चे शाखाध्यक्ष श्री. विश्वनाथ कुळे यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून आणि सतत पाठपुरावा करून  दुरूस्ती करून घेतली. 



मनसे निवेदन●कर्जत
कर्जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याबाबत. तालुका अध्यक्ष रवींद्रदादा सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.


मनसे निवेदन●मुंबई
महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करावं, बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री श्री अजित पवार ह्यांची भेट घेतली. 

मनसे निवेदन●मुंबई
अमेझॉन व फ्लिकार्ट ह्या बॅंगलुरु स्थित मुजोर कंपन्यांची दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलले आहे.तरी,आज फ्लिपकार्ट, अमेझॉन ह्या मुजोर कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन श्री अखिल चित्रे ह्यांनी निवेदन दिले. 

मनसे निवेदन●मुंबई 
भांडुप ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या मार्गावर ट्रेन बंद मुळे बस वर मोठा ताण येत आहे,बस फेऱ्या वाढवण्यासाठी मनसेच्या वतीने श्री संतोष पार्टे आणि सहकाऱ्यांनी विक्रोळी डेपोत निवेदन दिले.


मनसे निवेदन●लांजा(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील  भांबेड गावात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे,मनसेच्या वतीने लांजा तालुका मनविसे सहसंपर्क अध्यक्ष श्री किरण रेवाळे आणि सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतला पाणीपुरवठा पूर्वरत करण्यासाठी निवेदन दिले.

मनसे आंदोलन●भिवंडी
मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मेट्रोमुळे रस्त्यात पाणी साठल्याने मनसेच्या वतीने "मासे पकडा" आंदोलन करण्यात आले.

मनसे इशारा●आळंदी(पुणे)
आळंदी शहरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.पाणीपुरवठा नियमित न झाल्यास मनसेकडून आंदोलन पुकारले जाईल असा इशारा मनसे जिल्हा अध्यक्ष श्री समिरभाऊ थिगळे ह्यांनी दिला आहे.

मनसे मोर्चा●कर्जत
महिला बचत गटातील महिलांचं कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने महिलांचा तहसील कार्यालयावर उद्या कर्जत रॉयल गार्डन येथून सकाळी १० वाजता मोर्चा निघणार आहे.


मनसे दणका●बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील एक विधवा महिलेस मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने शिवी घातली,ही बाब मनसेच्या लक्षात येताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फायनान्स कंपनीला मनसे दणका दिला.

मनसे दणका●नगर
मनसेचे श्री राजू दादा जावळीकर,मंगेश साळवे यांनी पालकांची लुटमार करणाऱ्या जैन इंटरनॅशनल शाळेला  मनसे दणका दिला.

मनसे उद्घाटन●मालाड(मुंबई)
मनसे कामगार सेना सरचिटणीस श्री.गजानन नारायण राणे यांच्या नेतृत्वात आज दि १५/१०/२० रोजी मेडीट्रीन इन्स्टूमेट कंपनी (Meditrin Instrument Pvt Ltd ) मलाड पश्चिम येथे व्दारसभा तसेच नामफलकाचे अनावरण श्री निशांत गायकवाड आणि श्री गजानन राणे ह्यांच्या उपस्थितीत झाले.

मनसे अभिनंदन●नाशिक
मनसेच्या कार्यसम्राट नगरसेविका सौ वैशालीताई भोसले यांची नाशिक महानगरपालिका पश्चिम विभाग प्रभाग "सभापती पदी" बिनविरोध निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.

मनसे मागणी●जालना
जालना मनसे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश बापू सोळंके ह्यांनी पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे.


मनसे मागणी●दादर 
दादर येथील भाजव विक्रेत्यांकडून हप्ता वसुली करण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,मनसेचे सरचिटणीस श्री संदीप देशपांडे ह्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

मनसे मागणी●सिंधुदुर्ग
नुकसान झालेल्या भातशेतीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.


मनसे मागणी●पुणे
पुण्यातील आंबील ओढ्याची साफसफाई पुणे मनपा कडून होत नसल्याने नागरिकांना थोड्या थोड्या पावसाने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मनसे पर्वती विभागाचे वृषभ संघवी यांनी साफसफाई ओढा करण्याची मागणी केली


पदाधिकारी बैठक●राजगड(दादर)
'महिला बचतगटांना कर्जमाफी मिळावी' ह्यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेने'ची राज्यव्यापी मोहीम. सहकार सेनेचे अध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे ह्यांनी पक्षाच्या मुख्यालयात सरचिटणीस सौ. रिटा गुप्ता ह्यांच्या उपस्थितीत मध्य व दक्षिण मुंबईतील पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

पदाधिकारी बैठक●गोरेगाव
मुंबईत गोरेगाव येथे पक्षाच्या सरचिटणीस सौ शालिनी ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सहकार सेनेचे अध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर-पश्चिम मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

Thursday 15 October 2020

८ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

८ ऑक्टोंबर २०२० ★ मनसे बातमीपत्र

१) राजसाहेब ● मुंबई
ग्रंथालय विश्वस्त, संचालक यांनी आज मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. श्री राज ठाकरेंचा शिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन दोन दिवसांत निर्णय घेतो असे आश्वासन दिले.

२) राजसाहेब ● मुंबई
"राज ठाकरे म्हणजे काम फत्ते" हा TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट. 

३) राजसाहेब ● मुंबई
"महाराष्टाचे नवे मातोश्री..कृष्णकुंज" हा ABP माझाचा स्पेशल रिपोर्ट.

४) मनसे प्रवेश ● वाळवा(सांगली)
आज कासेगाव ता, वाळवा येथील तरुणांनी मनसे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

५) मनसे प्रवेश ● दहिसर (मुंबई)
प्रभाग क्रमांक ४ चे शाखा अध्यक्ष श्री संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे विभाग अध्यक्ष श्री विलास मोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

६) मनसे प्रवेश ● उरण (रायगड)
रायगड-उरण येथील एकता एंटरप्रायजेस (EKTA ENTERPRISES) कंपनी मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व श्री सचिन गोळे यांच्या उपस्थितीत स्वीकारले.

७) मनसे प्रवेश ● खेड (रत्नागिरी)
खेड तालुक्यातील काडवली हुमणे वाडीतील कार्यकर्त्यांनी खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खेड तालुका उपाध्यक्ष श्री. संदिप फडकले यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

८) मनसे प्रवेश ● कर्जत (रायगड)
कर्जत मधील तरुणांनी आज मनसे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

९) मनसे भेट ● मुंबई
शुल्कवाढ, अनाठायी शुल्क आकारणी, डिजिटल शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी ह्या मुद्द्यांसह सरचिटणीस सौ शालिनी ठाकरे ह्यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांची भेट घेतली. पालकांचे आर्थिक शोषण करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करणार; मंत्री बच्चू कडू ह्यांचं आश्वासन. 

१०) मनसे भेट ● मीरारोड भाईंदर (ठाणे)
राई, मुर्धा, मोरवा भाईदर पश्चिम येतील स्थानिक रिक्षा चालक यांच्या रिक्षा स्टॅन्डच्या अनेक  समस्या होत्या आज  मनसे शिस्टमंडळाने श्री. संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली जागेची पाहणी केली व लवकरात लवकर मिराभाईदर महानगर पालिका अधिकारी, रेल्वे अधिकारी  यांच्या सोबत मिटिंग घेऊन त्वरित  समस्या निवारण करण्याचे आश्वासन दिले.

११) मनसे भेट ● बोरिवली (मुंबई)
बोरिवली विधानसभा क्षेत्रातील मेनन शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन सोबत मनसेचे श्री प्रसाद कुलापकर (विभाग अध्यक्ष) यांनी पालकांसह बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढत सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे.

१२) मनसे भेट ● दादर (मुंबई)
दादर येथील आगार बाजारातील मासळी विक्रेत्या कोळी माता-भगिनी आपल्या समस्या घेवून कृष्णकुंज येथे मा.राजसाहेबांची भेट घेण्या करिता आल्या होत्या. मनसे नेते श्री नितिन सरदेसाई यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

१३) मनसे यश ● मुंबई
प्रभाग क्रमांक १९९ येथील इराणी चाळ येथी घनकचरा प्रश्न संदर्भात मनपाकडे निवेदन दिले होते मनसेच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर प्रकारात जबाबदार असणाऱ्या सर्व व्यावसायिकांना मनपाने नोटीस धाडली आहे.

१४) मनसे यश ● अमरावती
शाळेय शुल्क वरून मनसेचे श्रीहर्षल ठाकरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. शिक्षण अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत सर्व खाजगी शिक्षण संस्थांना फी वाढ करू नये यासाठी पत्रक काढले.

१५) मनसे यश ● उल्हासनगर (ठाणे)
उल्हासनगर मनसे टीम च्या सतर्कतेमुळे कोविड रुग्णालय उल्हासनगर येथे DURA-CYL 200 HP, 2 Liquid Oxygen Cylinders बसवण्यात आले.

१६) मनसे यश ● अहमदनगर
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने लोखंडी पुलशेजारील काम तातडीने पुर्ण करावे असे निवेदन वारंवार देऊन सुध्दा महानगरपालिका सदर पुलाचे काम पुर्ण करत नव्हते. मनसेचे श्री नितीन भुतारे यांनी अधिकाऱ्यांना पुलावर बांधून ठेवणार असा इशारा देताच कामकाज चालू.

१७) मनसे यश ● नाशिक
मनविसेचे शाम गोहाड यांच्या मागणीला यश, अनेक वर्षांच्या वनवासानंतर नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयालाला मिळाला पूर्णवेळ उपसंचालक.

१८) मनसे निवेदन ● वरळी(मुंबई)
नित्कृष्ट दर्जाचे कामकाज करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन श्री मारुती दळवी (शाखा अध्यक्ष १९९) यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले.

१९) मनसे निवेदन ● मंडणगड (रत्नागिरी)
मंडणगड तालुक्यातील राज्यमार्गाला अंतर्गत रस्त्याना खड्डे पडलेले असल्याने जर हे खड्डे सात दिवसात भरले नाही तर खड्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असे निवेदन मनसेकडून प्रशासनाला देण्यात आले. 

२०) मनसे निवेदन ● नेरुळ (नवी मुंबई, ठाणे)
श्री विनोद पाखरे (विभाग अध्यक्ष) यांनी नेरुळ येथी VIVO सर्व्हिस सेंटरला निवेदन देऊन मराठी कर्मचारी भरती करण्याची मागणी केली आहे.

२१) मनसे निवेदन ● मुरबाड (रायगड)
मुरबाड शहर मनसेचे तर्फे उत्तरप्रदेश राज्यातील हथरस येथे मनिषा वाल्मीकी या पिडीतेचा गँगरेप करुन हत्या करण्यात आली होती, याच्या निषेधार्थ व आरोपीना फाशी व्हावी यासाठी मनसे मुरबाड शहर संघटक किर्ती गोहिल यांनी मा. तहसिलदार, मुरबाड यांना निवेदन दिले.

२२) मनसे निवेदन ● अकोट (अकोला)
वाचनालय/ अभ्यासिका चालू करण्यासाठी मनसे अकोट तालुका वतीने विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

२३) मनसे निवेदन ● खर्डी (मुरबाड, रायगड)
स्टेशन परिसरात असलेल्या स्मशानभूमीची बिकट अवस्था लक्षात घेत मनसेच्या वतीने आज ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले.

२४) मनसे निवेदन ● मुंबई
विज पुरवठा खंडीत झाल्या मुळे परिक्षा देण्यासाठी खुप अडचणी येत, त्या अनुषंगाने मनविसे  विभाग अध्यक्ष हर्ष  गांगुर्डे त्वरित महावितरण कार्यलयात भेट देऊन निवेदन दिले. अभियंता श्री राठोड साहेब यांनी विषय समजुन, पुर्णपणे यंत्रणा सज्ज ठेवली आहे व कुठेही विज पुरवठा खंडीत होणार नाही असे सांगितले. 

२५) मनसे उपक्रम ● चिपळूण रत्नागिरी
मनसे कार्यकर्ते रविकांत काणेकर यांच्याकडून मोफत शिवभोजन थाळी व मास्कचे वाटप

२६) मनसे उपक्रम ● पुणे
दूध,केळी,पोहे व इतर फळे मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर यांच्या तर्फे रोज सकाळी शिवनेरी नगर भागातील गरजू लहान मुलांना वाटप होत आहे.

२७) मनसे उपक्रम ● अहमदनगर
मनसे तर्फे महाराष्ट्रात प्रथमच अहमदनगरच्या शिवाजी नगर मध्ये गरजूंना ५ रुपयात भोजन मिळणार.

२८) मनसे उपक्रम ● मुंबई
मनसे तर्फे "मोफत रक्त/ प्लाझ्मा दान" उपक्रम घेऊन येत आहोत ह्या साखळीत सहभागी होऊन तुम्ही सामाजिक बांधिलकी जपू शकता. अजय-९८९२३६२९०७, विशाल-९११२३३४२५५, गौरव-८१०८०१०२२२,
अनुश-९९२०९०६०१० ह्या क्रमांकावर संपर्क करा.

२९) मनसे इशारा ● मुंबई
कॅजूअल लेबरना कायम स्वरुपी सेवेत सामावून घ्या तसेच बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांचा वेतन करार करा आणि मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयातील लाईट बंद करण्याचा मनसे सरचिटणीस श्री संदीप देशपांडे यांनी धमकी वजा इशारा दिला आहे.

३०) मनसे दणका ● दहिसर (मुंबई)
दहिसर चेक नाका येथील कोविड सेंटर येथे काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या समस्या मनसे कडे मांडल्या.मनसे सरचिटणीस श्री नयन कदम यांनी विभाग अध्यक्ष श्री विलास मोरे यांच्यासह भेट देऊन व्यवस्थापन कडून सर्व मागण्या मंजूर करून घेतल्या.

३१) मनसे दणका ● नवी मुंबई (ठाणे)
प्रीजय हीट एक्सचेंजर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांच्या समस्या श्री राजेश भास्कर उज्जैनकर (उपाध्यक्ष, मनकासे) यांच्या कडे आल्या होत्या श्री राजेश यांनी कंपनी व्यवस्थापन ला दणका देत १५ दिवसात सर समस्या सोडवतो असे आश्वासन कंपनी व्यवस्थापनने दिले.

३२) मनसे दणका ● मीरारोड भाईंदर (ठाणे)
मीरा-भाईंदरमध्ये स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्रांवर बांग्लादेशी मच्छीमारांमुळे होत असणाऱ्या अन्याया विरोधात काल मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले. त्याची दखल घेत महापालिका अतिक्रमण विभागाकडून बांगलादेशी मच्छीमारांना हटवून स्थानिक भूमिपुत्रांना जागा उपलब्ध करून देण्यात आली. 

३३) मनसे दणका ● मीरारोड भाईंदर (ठाणे)
फॅमिली केअर मधील २७ स्टाफला नोटीस न देता काढून टाकण्यात आले होते. त्यांना मागील २ महिन्याचा पगार देखील दिला नाही स्टाफने मनसे कार्यालयात संपर्क साधताच महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन ५०% पगार काढून दिला तसेच उर्वरित ५०% येत्या दहा दिवसात मिळेल असे आश्वासन देखील दिले. 

३४) मनसे दणका ● ठाणे
शिवसेना शासित ठाणे मनपाने सावरकर नगर येथे सावरकरांचे शिल्प शौचालय शेजारच्या भिंतीवर लावले होते मनसेच्या दणक्यांनातर पालिकेने पर्यायी जागा शोधत शिल्प तिथून हलवले.सर्व ठाण्यातील कार्येकर्त्यांचे आभार.

३५) मनसे दणका ● नाशिक
ताळेबंदी कालावधीमध्ये अनेक कामगारांना अनेक कंपन्यांनी कामावरून काढून टाकले होते.आज गजानन राणे ह्यांनी जिल्ह्यातील सर्व कामगारांना नाशिक शहरातील पक्षाच्या 'राजगड' कार्यालय बोलवून घेऊन अर्ध्याहून अधिक समस्यांचे निवारण मनसेच्या दणक्याने पुर्ण केल्या उर्वरित समस्या लवकरच निकालात निघतील असे आश्वासित केले.

३६) मनसे दणका ● उस्मानाबाद
मागील सहा महिन्यापासून ग्राहकांना वाढीव वीजबील येत असल्याने मनसेच्या कार्यकत्र्यांनी गुरुवारी (दि.८) राडा केला. उस्मानाबाद येथील महावितरण अधीक्षक अभियंता याच्या कार्यालयात तोडफोड करून मनसे दणका देण्यात आला.

३७) मनसे दणका ● पुणे
हफ्ते न भरल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची गाड्या उचलून नेणाऱ्या MAGMA FINANCE, बालाजीनगर येथील शाखेत आज जाऊन मनसेने श्री वृषभ शिंगवी(पुणे,उपाध्यक्ष जनाधिकार विभाग) यांच्यासह कार्येकर्त्यांनी राडा घातला व मुजोर अधिकाऱ्यास गाडी सोडवण्यास भाग पाडले.

३८) मनसे नियुक्ती ● पनवेल
आज मा. श्री. राजसाहेबांच्या आदेशाने श्री. संदिप देशपांडे यांच्या अनुमतीने मश्री.संतोष धुरी यांच्या हस्ते श्री.उत्तम सांडव यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेची पनवेल महापालिका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

३९) मनसे उद्घाटन ● नवी मुंबई (रायगड)
नेरुळ ज़ुईनगर विभाग जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा..!!
सन्मा.आमदार राजू दादा पाटिल आणी  सन्मा.संदीप देशपांडे साहेब यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० स्थळ: दत्तात्रय कॉम्प्लेक्स शॉप क्रमांक ७ नेरुळ सेक्टर २ येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

४०) मनसे सभा ● सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकानिहाय बैठका मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर ह्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहेत.कार्येकर्त्यांचे प्रश्न जाणुन घेऊन मार्गदर्शन करून कार्येकर्त्यांना बळ देण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे.