Tuesday 10 November 2020

३ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ०३/११/२०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब ◆ भेट ◆ दादर (मुंबई)
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टि.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'चे प्रतिनिधी ह्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. 

राजसाहेब ◆ भेट ◆ दादर (मुंबई)
केंद्र सरकारचं जीवनोन्नती अभियान राबवणाऱ्या उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी 'आम्हाला खासगी संस्थेकडे वर्ग करण्याचा घाट राज्यसरकारतर्फे घातला जातोय' म्हणत राजसाहेबांची भेट घेतली. ह्याप्रश्नी राजसाहेबांनी ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ ह्यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. 

राजसाहेब ◆ पक्षप्रवेश ◆ शिवडी (मुंबई)
राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत मनसे नेते श्री बाळा नांदगावकर, श्री नंदकुमार चिले ह्यांच्या नेतृत्वाखाली लालबाग, परळ, शिवडी येथील अनेक तरुण कार्येकर्त्यांनी मनसेत पक्षप्रवेश केला.

मनसे - प्रवाह ◆ पक्षप्रवेश ◆ नागपूर 
मनसे नागपूर शहराध्यक्ष श्री विशाल बडगे ह्यांच्या उपस्थितीत शहरातील तरुण कार्येकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे - प्रवाह ◆ उपक्रम ◆ मंडणगड (रत्नागिरी)
मनसे मंडणगड व भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत मवालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने 2 नोव्हेंबर 2020 कुणबी भवन मंडणगड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

मनसे - कामगार सेना ◆ भेट ◆ वांद्रे (मुंबई)
कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या असंख्य कामगारांनी आपल्या समस्या मनसेकडे मांडल्यानंतर कामगार सेनेचे सरचिटणीस श्री गजानन राणे ह्यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या समजावून सांगितल्या. दोन दिवसांत निर्णय घेऊ असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 

मनसे - विद्यार्थी सेना ◆ यश ◆ संभाजीनगर
मुजोर दि जैन इंटरनॅशनल शैक्षणिक संस्थेला अखेर मनसे दणका बसलाच, मान्यता रद्द चा प्रस्ताव अंतिम टप्यात. ह्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ यश ◆ शीव (मुंबई)
मनविसे राज्य उपाध्यक्ष श्री अविनाश किर्वे आणि सहकाऱ्यांनी "C.B.M Highschool" ला फी माफीसाठी निवेदन देताच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे साधारणपणे ₹ २३००/- माफ करण्याचा निर्णय संस्थेने घेतला त्यासंदर्भात लेखी पत्र सुद्धा दिले आहे. 

मनसे - प्रवाह ◆ यश ◆ भांडुप (मुंबई)
मनसे भांडुप विभाग अध्यक्ष श्री संदीप जळगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भांडुप वरून मरोळ बस सेवा चालू करण्यासाठी मागणी केली होती, अखेर मनसेच्या मागणीला यश आले आहे आणि विभागात आता बस फिरते आहे.

मनसे - प्रवाह ◆ आंदोलन ◆ मालेगाव (नाशिक)
छत्रपती शिवाजी नगर मोरया मॉल येथील जीवघेणा खड्डा संदर्भात मनसेचे मालेगाव उपजिल्हाध्यक्ष मुकेश भाऊ परदेशी सरचिटणीस प्रवीण भाऊ सोनवणे उपशहर अध्यक्ष भरत भाऊ सूर्यवंशी ह्यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांची पूजा करून आंदोलन करण्यात आले.

मनसे- विद्यार्थी सेना ◆ निवेदन ◆ वांद्रे (मुंबई)
चूकीच्या पद्धतीत होत असलेले रूग्णांवर उपचार, परिचारीका, कक्ष परिचार यांचे थकीत पगार, औषाधांचा अपुरा साठा आदी प्रश्नांबाबत मनविसेचे श्री अखिल चित्रे ह्यांनी बी.के.सी. जम्बो फॅसिलिटी सेंटरच्या अधिष्ठाता यांना निवेदन दिले.

मनसे - वाहतूक सेना ◆ निवेदन ◆ वांद्रे (मुंबई)
मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने चोलामंडलम फायनान्सच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्यालयात वाहतुकदारांच्या समस्यांच्या बाबतीत व्यवस्थापन शी चर्चा करून वाहतुकदारांच्या तक्रारींचे निवेदन व्यवस्थापनास दिले. त्यावेळी संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे, आरिफ शेख, सुनील हर्षे उपस्थित होते. 

मनसे - प्रवाह ◆ निवेदन ◆ बुलढाणा
जनता/ लोकप्रतिनिधी ह्यांचे निवेदन न स्वीकारणारे तहसीलदार हवेत तरी कशाला.? मनसेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री मदनराजे गायकवाड ह्यांनी उर्मट तहसीलदार ह्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन दिले. 

मनसे - प्रवाह ◆ निवेदन ◆ करवीर (कोल्हापूर)
बालिंगे (करवीर, कोल्हापूर) गावच्या झालेल्या सीटी सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने दुरुस्ती करण्यात यावी ह्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री अमित पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई ह्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ निवेदन ◆ पुणे
MPSC कडून २०१८ साली घेण्यात आलेली लिपिक पदासाठीच्या परीक्षेची द्वितीय निवड यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. याबाबत आज मनविसे पुणे शहर अध्यक्ष श्री कल्पेश यादव ह्यांनी निवेदन दिले असून, लवकरच ही यादी जाहीर होईल यासाठी पाठपुरावा करणार आहेत.

मनसे - प्रवाह ◆ भूमिका ◆ नागपूर
नागपूर येथे मनसे आणि अंगीकृत सर्व संघटना यांच्या पदाधिकारी वर्गाची "पदवीधर निवडणूक" संदर्भात बैठक संपन्न झाली असून "श्री महेश जोशी" ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सन्माननीय राजसाहेब ह्याबाबत अधिकृत निर्णय लवकरच घेतील.

No comments:

Post a Comment