Sunday 29 November 2020

२३-२४ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक २३-२४ नोव्हेंबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र


मनसे◆पदवीधर निवडणूक ◆पुणे
"भारतीय मराठा महासंघ" चा मनसेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. रुपाली पाटील ह्यांना जाहीर पाठिंबा.

मनसे ◆पदवीधर निवडणूक ◆सातारा
रविवार दि २२/११/२०२० रोजी श्री क्षेत्र औदुंबर,पलूस येथे सौ रुपाली ताई ठोंबरे पाटील व श्री विद्यानंद मानकर यांच्या  पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या प्रचारार्थ मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री गणेश सातपुते,श्री रणजित शिरोळे,श्री महेश महाले उपस्थित होते.


मनसे ◆पक्षप्रवेश ◆मुरुड(रायगड)
मुरुड(रायगड जिल्हा)तालुक्यातील मजगाव गावातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक तरुणांनी मनविसेचे  तालुका अध्यक्ष युवराज भगत ह्यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे ◆पक्षप्रवेश ◆वाशिम
वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री मनीष डांगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळूरपीर भागातील २०० तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे ◆पक्षप्रवेश ◆दौंड
मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांनी  प्रदेश उपाध्यक्ष  adv.सुधीर  पाटसकर,तालुका अध्यक्ष सचिन कुलथे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


मनसे ◆पक्षप्रवेश ◆हिंगोली
मनसे हिंगोली जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांच्या उपस्थितीत तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला. 


मनसे ◆ भेट◆खेड(रत्नागिरी)
राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे रत्नागिरी जिल्ह्याच्या  आले असता,दापोली येथे खेड नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर(मनसे सरचिटणीस) ह्यांनी त्यांची भेट घेऊन खेड नगरपरिषद च्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली,प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले.

मनसे ◆ आंदोलन ◆ महाराष्ट्र
मनसेच्या वतीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव वीजबिल विरोधात २६ नोव्हेंबर रोजी बेधडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा.

मनसे ◆ आंदोलन ◆ महाराष्ट्र
मनसेचे वाढीव वीजबिल विरोधात होत असलेल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने नोटिसा धाडल्या आहेत.

मनसे ◆आंदोलन ◆मालेगाव(नाशिक)
मालेगावच्या वतीने शहराध्यक्ष राकेश भामरे व मुकेश परदेशी यांच्या नेतृत्वात लॉक डाऊन काळातील वीजबिल माफीसाठी विजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

मनसे ◆आंदोलन ◆राळेगाव
सोयाबीन,कापूस ह्या पिकांच्या नुकसान मुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सरकारने नुकसानभरपाई देण्यात यावे ह्या  मागण्यांसाठी मनसे राळेगाव  तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या नेतृत्वात राळेगाव येथे तहशील कार्यालयासमोर मनसेचा रस्ता रोखून आंदोलन.

मनसे ◆आंदोलन ◆उल्हासनगर(ठाणे)
मनसे उल्हासनगर येथील पदाधिकारी श्री बंडू देशमुख यांच्या पुढाकाराने मनसे मुख्य प्रवाह सह इतर अंगीकृत संघटना यांच्या उपस्थितीत आज कोरोना काळातील वाढीव वीजबिल विरोधात निदर्शने करण्यात आली. 

मनसे ◆आंदोलन ◆संभाजीनगर
संभाजीनगरमध्ये जिल्हाअध्यक्ष सुहास दाशरथे यांनी अभियंताना वाढीव वीजबिल संदर्भात जाब विचारत धारेवर धरले व अधिकारी कोणतेही उत्तर देऊ न शकल्याने राग अनावर होत त्यांच्या दिशेने लाईटबिले भिरकावली.यावेळी सतनाम सिंग गुलाटी,राजू भाऊ खरे,नामदेव बेंद्रे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

मनसे ◆आंदोलन ◆दादर
माहीमचे विभाग अध्यक्ष श्री यशवंत किल्लेदार ह्यांच्या नेतृत्वाखाली "एक पत्र मुख्यमंत्र्यांना" ही मोहीम राबवली जात आहेत,या मोहिमेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सन्माननीय राजसाहेबांनी ह्या उपक्रम ठिकाणी भेट देऊन चौकशी केली.

मनसे ◆भूमिका◆पुणे
पदवीधर मतदारांनो, कुणाच्याही फतव्यांना बळी पडू नका. तुमच्या अमूल्य मताचा विवेकाने वापर करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर) अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट रुपाली पाटील-ठोंबरे ह्यांचं आवाहन. 

मनसे◆भूमिका◆मुंबई
मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेचा हिंदुत्वाचा नारा; परप्रांतियांचा मुद्दाही कायम; मनसे नेते बाळा नांदगावकर ह्यांनी केली भूमिका स्पष्ट.

मनसे ◆यश ◆ नवी मुंबई(ठाणे)
मनसेच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई मनपाची ग्रंथालये, अभ्यासिका आजपासून सुरु, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मानले मनसेचे श्री गजानन काळे यांचे आभार.

मनसे ◆ यश ◆ चांदीवली(मुंबई)
चांदीवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका येथे असलेल्या ब्लु स्टार अस्थापणाला मराठी भाषेचा विसर पडला होता,मनसेचे विभाग अध्यक्ष श्री महेंद्र भानुशाली ह्यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून अस्थापणाला मराठी पाट्या लावण्यास सक्ती केलो.

मनसे-कामगार सेना◆युनिट स्थापना◆मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील वेस्ट केअर  जेव्ही मधील कंत्राटी वाहन चालक आणि स्वच्छक कामगार यांच्या न्याय हक्कासाठी द्वारसभा आणि नामफलक उद्घाटन समारंभ अध्यक्ष मनोज चव्हाण कार्याध्यक्ष संतोष धुरी  चिटणीस केतन नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

मनसे ◆निवेदन ◆रामटेक
रामटेक मनसे तालुका अध्यक्ष श्री शेखर डुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तहसीलदार कार्यालय येथे कोरोना काळातील वीजबिल माफ करावे व ग्रामीण भागातील जनतेला ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी ह्या मागणीसाठी निवेदन दिले.

मनसे ◆निवेदन◆मुंबई
भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची राजधानी "कराची" नावाने मुंबईत वांद्रे येथे व्यावसायिक व्यवसाय करत आहेत,त्या नावावर मनसेचे हाजी सैफ शेख(महाराष्ट्र उपाध्यक्ष) ह्यांनी आक्षेप नोंदवला आले.या संदर्भात राज्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख ह्यांची भेट घेऊन निवेदन दिले. 


मनसे ◆ निवेदन ◆ निफाड(नाशिक)
मनसे तालुका अध्यक्ष श्री शैलेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज निफाड येथील तहसीलदार कार्यालयावर मनसेने धडक देत तहसीलदारांना वाढीव वीजबिल विषयी निवेदन दिले.तहसीलदार कार्यालयासमोर वीजबिल फाडून निदर्शने केली.

मनसे-रस्ते आस्थापना◆निवेदन◆आळंदी (पुणे)
पुणे : आळंदी मरकळ रस्त्याचे काम लवकर पूर्ण नाही झाले तर मनसे आंदोलन करणार ,रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश लोखंडे  ह्यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ मुंबई
#वाहतूकदारांचीमनसे BS-IV वाहनांची विक्री आणि त्यासंदर्भातील नियमांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त श्री. अविनाश ढाकणे यांची आज मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि केसस्टडीजच्या आधारे सर्व वाहनांशी संबंधित वाहतूकदारांच्या अडचणी मांडल्या. 

मनसे - विद्यार्थी सेना◆ इशारा◆ पुणे
सरळ सेवा पद भरती साठी MITC करत असलेली कंपनी निवड ही डिसेंबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत पूर्ण झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या समवेत महा आयटीच्या कार्यालयावर थेट धडक मारू. कंपनी निवडीस प्राधान्य द्यायला आता भाग पाडू. असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष श्री कल्पेश यादव ह्यांनी दिला

मनसे ◆ मागणी ◆ ठाणे 
ठाण्यात जर माझे पदाधिकारी सुरक्षित नसतील, तर मला ही पोलीस संरक्षण नको.अशी मागणी मनसेचे श्री अविनाश जाधव(मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष) यांनी पोलीस विभागाला पत्र लिहून केली आहे.

मनसे ◆ मागणी ◆ बुलढाणा
शाळा चालू करण्याच्या हालचाली सरकारी दरबारात चालू असताना मनसेचे प्रतिमंत्रीमंडळ सदस्य श्री विठ्ठल लोखंडकर ह्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये अशी मागणी केली आहे.

मनसे ◆ मेळावा◆ पेण(रायगड)
मनसेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव वीजबिलाविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. 

मनसे ◆ मेळावा ◆ पुणे
पक्षाचे पुणे (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर) पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट रुपाली पाटील व शिक्षक मतदारसंघाचे विद्यानंद मानकर ह्यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते श्री बाळा नांदगावकर, श्री अविनाश अभ्यंकर ह्यांनी सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. 

मनसे ◆ उपक्रम ◆ कल्याण डोंबिवली (ठाणे)
आयुष्यमान भारत योजना,महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या सरकारी योजनांचा गोर गरीब जनतेला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून मनसेचे कल्याण डोंबिवली मधील श्री योगेश पाटील ह्यांनी उत्तरशिव गाव,नारीवली गाव येथे सदर योजनेचे कार्ड वाटप केले.

मनसे ◆ भेट ◆ पेण(रायगड)
पेण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्यविषयक सेवांचा अभाव असल्याने रात्री अपरात्री गरोदर महिलांना अलिबाग कडे हलवले जाते ह्या बाबत मनसेचे नितीन पाटील ह्यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रशासनाला जाब विचारला.

मनसे ◆सन्मान◆ मालवण
मालवण नगर पंचायत मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर ह्यांच्या काटेकोर नियम अंमलबजावणी मुळे शिस्तप्रिय वातावरण निर्मिती होऊन कोविड संख्या नियंत्रणात आणणे शक्य झाल्याने मनसेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मनसे◆सन्मान ◆गुहागर(रत्नागिरी)
मनसे गुहागर तालुका अध्यक्ष श्री विनोद जानवळकर ह्यांच्या पुढाकाराने मनसे गुहागरच्या वतीने कोविड काळात आपले योगदान देणाऱ्या तालुक्यातील कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment