Tuesday 3 November 2020

२८ ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२८ ऑक्टोबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब >> मुंबई
मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यपालांना भेटणार.

मनसे नागपूर >> पक्षप्रवेश 
मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्य सरचिटणीस श्री. हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या नेतृत्वात दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. 

मनसे वाहतूक सेना ठाणे >> पक्षप्रवेश
मुर्धा, राई, मोरवा, उत्तन येथील स्थानिक भूमिपुत्र रिक्षा चालक यांचा मनसे वाहतूक सेनेत जाहीर पक्ष प्रवेश.

मनसे चित्रपट सेना मुंबई >> दणका
मराठीची चीड येते असे बोलणाऱ्या बिग बॉस स्पर्धांच्या वक्तव्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे श्री अमेय खोपकर, मनसे नेत्या सौ. शालिनी ठाकरे ह्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, अखेर कलर्स समूह आणि स्पर्धकाने मराठी माणसाची जाहीर माफी मागितली.

मनसे पनवेल >> यश 
तळोजा रेल्वे फाटक लगत असलेल्या भुयारी मार्गात पाणी भरते मनसेच्या वतीने १६ ऑक्टोबर ला निवेदन व आंदोलन करण्यात आले होते. अखेर आज कामाला सुरुवात..!

मनसे नवी मुंबई >> कार्य
मनसेचे दिघा विभागाचे विभाग अध्यक्ष श्री भूषण आगीवले ह्यांच्या प्रयत्नानंतर मनपाने नागरी समस्या (उघडी गटारे)सोडवण्याचे काम हाती घेतले.

मनसे मिरारोड भाईंदर >> कार्य
गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी मनसेकडून पालिकेला 25 सीसीटीव्हींची मदत.

मनसे नवी मुंबई >> कार्य
१७०० सिडकोच्या घर सोडत धारकांना सिडकोने हप्ता न भरल्यामुळे घर न देण्याचा निर्णय घेतला होता मनसेचे श्री गजानन काळे ह्यांच्या प्रयत्नांनी अखेर हा निर्णय सिडकोने मागे घेतला आणि सोडको धारकांना दिलासा मिळाला.

मनसे मुलुंड मुंबई >> कार्य
मनसे प्रभाग क्र १०८ चे शाखा अध्यक्ष श्री संदीप वरे व उपशाखा अध्यक्ष निलेश कांबळे यांना विभागातील मैदान आणि उद्यान साफसफाई साठी तक्रार केली. अवघ्या काही वेळातच साप सपाई करून दिली. तरुण मुलांनी मानले मनसेचे आभार.

मनसे विद्यार्थी सेना गोरेगाव मुंबई >> कार्य
गोरेगाव (प ) भगत सिंग नगर १ हनुमान गल्ली इथे मनसे शाखाध्यक्ष (शाखा क्र ५७) सचिन सोनावणे यांनी स्वखर्चातून गटार दुरुस्तीचे काम काम पूर्ण केले. अनेक वेळा स्थानिक प्रशासनाला तथा स्थानिक नगर सेविकेला तक्रार करूनही उडवा उडवी ची उत्तरे मिळाली.

मनसे मिरारोड भाईंदर >> भेट
ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांनी आपल्या मिरारोड भाईंदर येथील सहकाऱ्यांसह मिरारोड भाईंदर मनपा आयुक्तांची भेट घेतली आसनी शहरातील प्रश्नांवर चर्चा केली,त्यानंतर पत्रकार परिषदेत भेटीबद्दल माहिती दिली.

मनसे अंधेरी >> उपोषण
कोळी बांधवांची हक्काची घरे हिसकवणाऱ्या विकासक नरेश जैन आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी मनसेचे श्री सुरेश धुरी (विभाग अध्यक्ष) श्री किशोर राणे (उप विभाग अध्यक्ष) ह्यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण.

मनसे वाडा पालघर >> उद्घाटन
मनसे वाडा जनसंपर्क कार्यालयाचे दिनांक ३० ऑक्टोबर २०२० रोजी उद्घाटन होणार आहे.

मनसे वाहतूक सेना पालघर >> उद्घाटन
मनसे वाहतूक सेनेच्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा- विरार लिंक रोडवरील सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन श्री किर्तीकुमार शिंदे (मनसे सरचिटणीस) ह्यांच्या हस्ते यावेळी मनवासेचे अध्यक्ष श्री संजय नाईक आणि सहकारी उपस्थित होते. 

मनसे शीळ-फाटा डोंबिवली >> उपक्रम
असह्य वाहतूक कोंडीबद्दल कल्याण-डोंबिवलीकरांनी असंख्य तक्रारी केल्या परंतु सत्ताधीशांनी कधीच दाद दिली नाही. एकीकडे रस्त्यांची दुरावस्था तर दुसरीकडे ढिसाळ वाहतूक नियोजन. अखेर महाराष्ट्र सैनिक 'फोडणार' वाहतूक कोंडी; मनसे नेते श्री राजू पाटील ह्यांच्या संकल्पनेतुन "इच्छा तिथे मार्ग" अभिनव उपक्रम.

मनसे भांडुप मुंबई >> उपक्रम
मनसे भांडुप शाखा क्रमांक ११४ च्या वतीने दिनांक १ नोव्हेंबर रोजी भांडुप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसे शीव मुंबई >> उपक्रम 
शीव कोळीवाडा विधानसभा मनसेचे श्री प्रभाकर सकपाळ(मनसे उपविभाग अध्यक्ष) श्री अरविंद ठमके(शाखा अध्यक्ष) यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर चे आयोजन  दिनांक २८ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आले आहे.

मनसे सहकार सेना गोवंडी मुंबई >> मेळावा
कोरोना काळातील आर्थिक चणचणीमुळे महिला बचत गटांना कर्जमाफी द्यावी', ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेतर्फे राज्यभरात मार्गदर्शन मेळावे.आज गोवंडी येथे सरचिटणीस श्री. दिलीप धोत्रे, सौ. रिटा गुप्ता,  व उपाध्यक्षा सौ. अनिषा माजगावकर ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

मनसे नेते मुंबई >> प्रश्न
नुकतेच कोरोना चाचणीचे दर कमी केले, परंतु हे दर सुरवातीपासूनच एवढे कमी करता आले नसते का? विशेष म्हणजे मागील 6-8 महिन्यात या मोठ्या कंपन्या चे शेयर च्या भावा मध्ये खुप मोठया प्रमाणात झालेली वाढ हा निव्वळ "योगायोग" समजावा का? असा प्रश्न मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी राज्य सरकारला केला आहे.

मनसे लातूर >> आंदोलन
ही मदत नाही तर भीक आहे..!
पशुधन वाहून गेले,पीक वाहून गेले,शेतकऱ्यांना अंदाजे हेक्टरी  ७५००० मदत अपेक्षित असताना साधारणपणे ४००० सरकारने हेक्टरी मदत जाहीर केलीय. ह्या निषेधार्ह मनसेने डॉ नरसिंह भिकाणे ह्यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी (लातूर) कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले. 

मनसे येरवडा पुणे >> निवेदन
विमाननगर,यमुना नगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने कोरोना रोगराईत आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे,मनसेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे विद्यार्थी सेना मालेगाव नाशिक >> निवेदन
मालेगाव (नाशिक) मनपा क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर दिशादर्शक रंगरंगोटी (गतिरोधक झेब्रा क्रॉसिंग) करण्यात यावी ह्यासाठी मनसेच्या वतीने श्री हर्षल गवळी(मनविसे कार्याध्यक्ष, मालेगाव) ह्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले.

मनसे देवगड सिंधुदुर्ग >> निवेदन
देवगड-मिठबाव-देवगड मार्गावरील बस सेवा चालू करावी ह्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष श्री चंदन मेस्त्री ह्यांच्या नेतृत्वाखाली देवगड आगर व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले.

मनसे विधी जनहित सेना नवी मुंबई >> नियुक्ती
मनसे विधी विभागाची नवी मुंबई शहर कार्यकारणी जाहीर..!
विधी व जनहित कक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. कीशाेर शिंदे व मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांची उपस्थितीत नवी मुंबई शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

मनसे चित्रपट सेना माहीम दादर >> उपक्रम
मनसे चित्रपट सेनेच्या वतीने सरचिटणीस श्री शशांक नागवेकर व उपाध्यक्ष श्री.  प्रविण नेरुरकर ह्यांच्या कडून प्रभागातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांना वाफ घेण्याचे यंत्र वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment