Tuesday 10 November 2020

६ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ०६/११/२०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे प्रवाह ◆ उपक्रम ◆ भांडुप (मुंबई)
मुंबई प्रभाग क्र ११२ मनसे शाखा अध्यक्ष श्री सुनील नारकर ह्यांच्या पुढाकाराने "गड किल्ले बांधणी स्पर्धा" चे आयोजन करण्यात आले आहे.

मनसे प्रवाह ◆ उपक्रम ◆ भांडुप (मुंबई)
कोरोना रोगराईमुळे आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ११० मनसे शाखा अध्यक्ष श्री. मोहन चिराथ ह्यांच्या तर्फे दिवाळी निमित्त स्वस्त दरात साखर वाटप करण्यात येणार आहे.

मनसे प्रवाह ◆ उपक्रम ◆ ठाणे
मनसे व ठाणे महापालिका यांच्या वतीने ठाण्यातील पाचपाखाडी टेकडी बंगला येथील व्यायामशाळेत "पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी" शिबिराचे आयोजन मनसेचे दिनेश मांडवकर, प्रितेश मोरे यांनी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केले होते.

मनसे प्रवाह ◆ भेट ◆ नागपूर
मनसे जनहित कक्षाचे श्री महेश जोशी ह्यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त वाहतूक उपायुक्त श्री सारंग आव्हाड यांचे तुळस देऊन स्वागत करण्यात आले.शहरातील वाहतूक समस्या, पार्किंग समस्या ह्याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आणि समस्या सोडवण्यासाठी मागणी केली.

मनसे - रस्ते आस्थापना ◆ यश ◆ भांडूप
मनसे रस्ते आस्थापना विभागाचे संतोष पार्टे ह्यांनी पाठपुरावा करून भांडुप रमाबाई नगर १ येथील पथदिवे चालू करून घेतले.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ बोरिवली (मुंबई)
गोराई, चारकोप मधील म्हाडा वसाहती मध्ये विकत घेतलेल्या घरांचे हस्तांतरण (transfar) प्रक्रिया म्हाडा प्रशासनाने  गेले  कित्येक दिवस बंद केल्याने स्थानिक रहिवाशांना खूपच मोठया समस्येला सामोरे जावे लागत होते. मनसेच्या शिष्टमंडळाने ह्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ लांजा (रत्नागिरी)
लांजा तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्पदंशावर वेळीच उपचार न मिळाल्याने एक व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले, त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MBBS डॉक्टरची मागणी किरण रेवाळे (मनविसे सहसंपर्क) व जितेंद्र चव्हाण (जिल्हाध्यक्ष) ह्यांनी केली. 

मनसे - महिला सेना ◆ सामाजिक ◆ विक्रोळी (मुंबई)
मनसे सरचिटणीस रिटाताई गुप्ता यांनी विक्रोळी विधानसभा मधील महापौर मैदान अंकुर हॉस्पिटल शेजारी कांजूरमार्ग येते  कब्बडी खेळणाऱ्या  मुले/ मुली तसेच त्यांचे प्रशिक्षक यांना दिवाळी फराळासाठी लागणारे  धान्य वाटप केले. यावेळी मनसेचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे प्रवाह ◆ मेळावा ◆ पुणे
आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पुणे पदाधिकारी यांची आढावा बैठक श्री संजय नाईक ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .

मनसे प्रवाह ◆ दणका ◆ चांदीवली (मुंबई)
नोकरीला लावतो सांगून पैसे उकळणाऱ्या युनिव्हर्सल ग्रुपला मनसेचे विभाग अध्यक्ष श्री महेंद्र भानुशाली ह्यांच्या नेतृत्वाखाली दणका दिला.

मनसे प्रवाह ◆ इशारा ◆ अंबड (जालना)
अंबड येथीलल कापुस खरेदी केंद्रावर कापूस हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी करण्यात येतो असे कळताच मनसे जिल्हा अध्यक्ष श्री खटके ह्यांनी कापूस खरेदी तात्काळ बंद केली, वजन काटे तपासून पाहिले व मार्केट कमिटीच्या अधिकारी व कर्मचारी यांना पुन्हा असे केल्यास मनसे दणका बसेल असा इशारा दिला.

मनसे प्रवाह ◆ आंदोलन ◆ कोल्हापूर
कोरोना काळातील आर्थिक चणचणीमुळे महिला बचत गटांना कर्जमाफी द्यावी', ह्यासाठी मनसे सहकार सेनेतर्फे आज गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) शहरात सरचिटणीस श्री. दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे कार्यकारिणी सदस्य वैभव माळवे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

मनसे प्रवाह ◆ आंदोलन ◆ कोल्हापूर 
खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर मनसेच्या कार्येकर्त्यांनी प्रतिकात्मक अपघात दाखवून अनोखं आंदोलन केले.

मनसे - रस्ते आस्थापना ◆ उपोषण ◆ जळगाव
मनसे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हा संघटक श्री राजेंद्र निकम ह्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला मिळालेल्या निधींची अफरातफर केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.

मनसे नेते ◆ प्रश्न ◆ मुंबई
मंदिर बंद वरून मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी सरकारला सर्वच खुले असताना मंदिरे बंद का? मंदिरातूनच फक्त कोरोना वाढतो का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मनसे नेते ◆ अभिनंदन ◆ मुंबई
मनसेआमदार श्री राजू दादा पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेच्या धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे या समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन .


धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

No comments:

Post a Comment