Tuesday 3 November 2020

२९-३० ऑक्टोबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२९-३० ऑक्टोबर | मनसे बातमीपत्र (३४) 

मनसे कामगार सेना >> दणका
कामगार सरचिटणीस श्री. गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार शिष्टमंडळ आज व्यवस्थापने सोबत चर्चेसाठी गेले असता 'अ‍ॅम्बेसिडर फ्लाईट किचन' व्यवस्थापन ठरवून चर्चेसाठी उपस्थित नव्हते, "जर व्यवस्थापनाने असाच आडमुठेपणा केला आणि कामगारांना पुन्हा कामावर घेतले नाही तर, आम्ही हॉटेलला मनसे दणका दिल्या शिवाय राहणार नाही!" असं गजानन राणेसाहेब ह्यांनी कंपनी व्यवस्थापनाला  ठणकावून सांगितले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या समोर मनकासेच्या पदाधिकार्यांनी हॉटेलच्या गेटवर झेंडा लावण्यात आला. 🔗 https://bit.ly/3mDCSGo 

मनसे कामगार सेना, मुंबई >> कामगार प्रश्न ❓
सिक्यूरिटी क्षेत्रामधे कार्यरत असलेल्या नावजलेली व्हीनस सिक्यूरिटी कंपनी मधील  कॉन्ट्रॅक्ट वर कार्यरत असलेले कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मागील काही महिन्यांपासून कामावरून अचानकपणे काढून टाकले होते तसेच त्यांची मागील काही महिन्यांची थकबाकी व इतर देणी सदर कंपनीने दिले नव्हते. सदर कामगारांनी सरचिटणीस गजानन नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन सर्व कामगारांना योग्य न्याय देण्याचे मनसे आश्वासन देण्यात आले. 🔗 https://bit.ly/35M14zz 

मनसे नाशिक >> निवडणूक तयारी
महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकींच्या तयारीसाठी पश्चिम नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल शिवार येथे संपन्न झाली. बैठकीत प्रदेश सरचिटणीस मा. अशोकभाऊ मुर्तडक, जिल्हाध्यक्ष मा. अनंत सूर्यवंशी व मा. दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष मा. अंकुश पवार यांनी पश्चिम नाशिक विभागातील प्रभागांच्या दौऱ्यांच्या नियोजन, संघटना बांधणी, आगामी निवडणुकीच्या तयारींविषयी मार्गदर्शन केले. 

मनसे सांगली >> मेळावा
जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत (फायटर) ह्यांच्या नेतृत्वाखाली Pancard बधितांचा महामेळावा, दिनांक १/११/२०२० दुपारी १२:००. प्रमुख उपस्थिती मनसे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आयोजित केला आहे.

मनसे पालिका कर्मचारी सेना >> नियुक्ती
मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री संदिप देशपांडे (मनसे सरचिटणीस) यांच्या वतीने श्री किशोर दळपट यांची एस/ टी विभाग साफसफाई कर्मचारी सेना प्रमुख संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.

मनसे उस्मानाबाद >> यश
"सक्तीने कर्ज वसूल करू नका अन्यथा कारवाई करण्यात येईल." जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी काढले आदेश. 
मनसे मागणी मान्य - दिलीप बापू धोत्रे (मनसे प्रदेश अध्यक्ष) 🔗 https://bit.ly/35LDWRC

मनसे वर्धा >> यश
वर्धा जिल्ह्यात मनसे चा प्रयत्नांना यश!
सततच्या प्रयत्नाने बँड, वाजंत्री व्यावसायिकांना पूर्णपणे वाजवण्याची दिली परवानगी -- अतुल वंदिले मनसे जिल्हाध्यक्ष वर्धा. 🔗 https://bit.ly/3oCXlNr

मनसे पालिका कर्मचारी सेना नाशिक >> कार्यकारणी जाहीर 
मनसे महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, कामगार सेनेच्या संघटक म्हणून संकेत शिवलकर तसेच सहचिटणीस म्हणून राजू मांडवे, विशाल नवले तसेच संघटक म्हणून तोसिफ पठाण यांची नेमणूक करण्यात आली. 🔗 https://bit.ly/2TC5SSa 

मनसे रायगड >> इशारा
पाली - भुतीवली धरणाच्या पाण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरेल असा सज्जड दम जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील ह्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 🔗 https://bit.ly/34GlpGV

मनसे ठाणे >> पक्ष कार्य
काही दिवसांपूर्वी सम्राट अशोक नगर, माजिवडा येथील रहिवासी मनसे पक्ष कार्यालयात आले होते. गेले काही वर्ष त्यांना मासिक भाडे मिळत नव्हते. त्यानंतर बिल्डरला जागेवर बोलवून समज देण्यात आली व दोन दिवसाची मुदत दिली. आज त्या सर्व रहिवाश्यांचे थकीत भाडे बिल्डरकडून मिळाले त्या बद्दल मा. राजसाहेब व ठाणे मनसेचे त्यांनी कार्यालयात येऊन आभार मानले. 🔗 https://bit.ly/3oPctYb 

मनसे नवी मुंबई >> यश
चिंचोली तलावाचे दुरूस्तीचे काम लवकरच होणार सुरू , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश 
- अजय दिलीप मोरे, शाखा अध्यक्ष जुईनगर 🔗 https://bit.ly/3mGW1at

मनसे पुणे >> पक्ष कार्य
फुकटच श्रेय कुणी घेऊ नका भूमिपूजन पण मनसेनी केलं आहे आणि उद्घाटन पण मनसेच करणार शिवनेरी नगर मधील पाण्याच्या टाकीचे पेंटींग आज सुरू केलं -- मनसे नगरसेवक साईनाथ बाबर. 🔗 https://bit.ly/3oHQsdC 

मनसे पुणे >> निदर्शनं
ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भस्मासुर सरकारी आशीर्वादाने अक्राळविक्राळ रूप धारण करू लागला आहे सरकारने खर तर या अगोदरच उपाय योजना करणे अपेक्षित होते यांच्या नाकर्ते पणा मुळे महागाई प्रचंड वाढली आहे. व्यापाऱ्यांचा साठे बाजार सरकारच्या एकंदर धोरणामुळे नफेखोरीसाठी प्रोत्साहनच आहे. सातत्याने केंद्रा कडे बोट दाखवत रहाणे याने राजकारण नक्की होईल पण जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का ❓असा थेट सवाल मनसे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून उपस्थित. 🔗 https://bit.ly/37Wy4HO 

मनसे मिरा भाईंदर >> पक्ष कार्य
Mira Bhayandar | गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी मनसेकडून पालिकेला 25 सीसीटीव्हींची मदत -- अविनाश जाधव मनसे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष. 🔗 https://bit.ly/2GcFsDA

मनसे सातारा >> दणका 
वाहतुक सेना अध्यक्ष मा. संजयजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुजोर बजाज फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना समज देण्यात आली. यापुढे सातारा जिल्ह्यातील बेकायदेशीर हप्ते वसुल केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा सज्जड दम वजा इशारा देण्यात आला. यावेळी युवराज पवार जिल्हाअध्यक्ष सातारा, मा. राहुल शेडगे  
जिल्हाअध्यक्ष वाहतूक सेना तसेच सागर भोगावकर, प्रशांत साळुंखे, प्रशांत बारटक्के, अश्विन गोळे उपजिल्हाअध्यक्ष वाहतूक सेना हजर होते. 🔗 https://bit.ly/2HSBdxG 

मनसे चंद्रपूर >> पक्ष प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे मनसे च्या मेळाव्यात अनेक नवीन कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला. राज्य सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वंदिले, जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, जेष्ठ नेते रमेश राजूरकर, मनविसेचे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष वैभव डहाने, उपजिल्हाअध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, माजी नगरसेवक शरद मढावी यांनी केले. 🔗 https://bit.ly/3easxP7 

मनसे वाहतूक सेना मुंबई >> दणका
वाहतूक सेना शिष्टमंडळाने आज अंधेरी पूर्व येथील मणप्पूरम फायनान्स मुख्यालयात व्यवस्थापन अधिकारी श्री. नितीन कोहली यांच्याशी अत्यंत सविस्तर चर्चा केली. श्री. संजय नाईक, श्री. कीर्तिकुमार शिंदे, श्री. रोहन सावंत, श्री. प्रदीप वाघमारे, श्री. सुरेंद्र पाल आणि दोन भूमिपुत्र वाहतूक व्यावसायिक यांनी मांडलेल्या मुद्द्यानंतर आणि केलेल्या चर्चेनंतर "यापुढे कोणत्याही वाहन मालकाला दमदाटी केली जाणार नाही, तसंच जबरदस्तीने वाहन ताब्यात घेतलं जाणार नाही" असं निःसंदिग्ध आश्वासन दिलं. 🔗 https://bit.ly/3oJSVEa

मनसे वाहतूक सेना >> इशारा 
#NBFC कायदेशीर 'समज' | मणप्पूरम फायनान्स आणि इंडसइंड बँक यांच्यानंतर आता लवकरच चोलामंडलम, एचडीबी, इक्विटास आणि श्रीराम फायनान्स! येथे मनसे हजेरी लावणार आहे असे सूचक इशारा मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे ह्यांनी दिला. 🔗 https://bit.ly/34HKDVx  

मनसे वाहतूक सेना नवीमुंबई >> दणका
मुंबईत मणप्पूरम फायनान्सला दणका दिल्यानंतर काल दुपारी आम्ही नवी मुंबईत इंडसइंड बँकेत आलो. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात बँकेच्या व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा केली. वाहन कर्जधारकांकडून हप्त्याची वसुली करताना बेकायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला जात असल्याबद्दल मनसेच्या शिष्टमंडळाने कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. मनसेच्या शिष्टमंडळात सर्वश्री संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे, गजानन काळे, आरिफ शेख, नितीन खानविलकर, अक्षय काशिद आणि वाहतूक व्यावसायिक मुराद नाईक यांचा समावेश होता. बैठकीनंतर इंडसइंड बँक व्यवस्थापनाने आपलं आश्वासन-पत्र मनसेला दिलं. 🔗 https://bit.ly/3oK6sM3 

मनसे वाहतूक सेना >> शाखा उद्घाटन
काल्हेर, भिवंडी येथे मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ह्यांनी नवीन वाहतूक सेना कार्यालयचे उद्धघाटन केले. 🔗 https://bit.ly/3mBlAtf

मनसे विरार >> समाज कार्य
विरार पश्चिमेकडील, डोंगरपाडा विभागातील स्थानीक स्मशानभुमितील दिवे (लाईट्स) गेल्या ३ महिन्यांन पासुन बंद पडले होते. नागरीकांनी मनसेचे विभाग अध्यक्ष श्री. नारायण घाडींनसमोर हे गाऱ्हाणे मांडले. नारायणजींनी ही श्री. अभिजीत चौधरींच्या मार्गदर्शना खाली त्वरित हालचाल करुन प्रशासनाचे कान उपटले व हा विषय नेटाने रेटुन फक्त ३ दिवसात नविन दिवे बसवुन घेतले. 🔗 https://bit.ly/3kIFIJB 

मनसे डोंबिवली >> यश
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात पूर्वीप्रमाणे इतर आजारांसाठी सेवा उपलब्ध होणार, पोस्ट कोविड सेंटर कल्याण पश्चिम येथे कार्यान्वित. ➡️ शास्त्रीनगर रुग्णालय सध्या कोविड सेन्टर म्हणून काम करत आहे त्या ठिकाणी गोरगरीब सामान्य जनतेसाठी पूर्वीसारखेच इतर आजारांसाठी व गरोदर महिलांसाठीचे उपचार सुरू करण्यात यावे आणि दुसरी मागणी म्हणजे कोरोना आजारातून बरे झाल्यावर अनेक रुग्णांच्या तक्रारी येत होत्या त्यासाठी पोस्ट कोविड उपचार केंद्र सुरू व्हावेत या दोन्ही मागण्यांना यश आले आहे अशी माहिती मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम ह्यांनी दिली. 🔗 https://bit.ly/2TAXzGo 

मनसे महिला सेना गोवंडी >> मेळावा
सरचिटणीस श्री दिलीपबाप्पू धोत्रे व सरचिटणीस सौ रिटाताई गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवंडी येथे महिलांचे बचत गटांचे कर्ज माफ व्हावे म्हणून भव्य मेळाव्याचे आयोजन विभाग अध्यक्ष संदीप चव्हाण व विभागाध्यक्षा सौ रंजना गायकवाड यांनी केले होते. सदर मेळाव्याला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. या वेळी मनसे सहकार सेना सरचिटणीस व महिला सेना उपाध्यक्ष सौ अनिशा माजगावकर, ऋतुजा परब, अमिता गोरेगावकर, व पदाधिकारी उपस्थित होते. 🔗 https://bit.ly/2GbwGpk 

मनसे चाकुर - लातूर >> यश
मनसे लातूर जिल्हा अध्यक्ष मा. नरसिंग भिकाने सतत पाठपुरा करत होते अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले व राष्ट्रीय  महामार्गावरील खड्डे बुजवण्या सुरर्वात झाली आष्टा मोड ते घरणीचे खड्डे बुजवणे चालु झाले आहे सतत दोन महीन्याच्या प्रयत्नाला यश आले. 🔗 https://bit.ly/31YzVYT 

मनसे ठाणे >> शाखा उद्घाटन
किसन नगर, ठाणे येथे मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ह्यांनी नवीन मनसे कार्यालयचे उद्धघाटन केले. 🔗 https://bit.ly/31XUwfW 

मनसे वाडा, पालघर >> शाखा उद्घाटन
वाडा येथे मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ह्यांनी नवीन मनसे कार्यालयचे उद्धघाटन केले सोबत नवीन पक्ष प्रवेश देखील झाला. 🔗 https://bit.ly/3oEP9vX 

मनसे वाहतूक सेना, वसई विरार >> इशारा
यार्ड एजन्सी कंपनी कायदेशीर कार्यपद्धतीने व्यवसाय करत आहे का? असा थेट सवाल मनसे उपस्थित केला आहे.
कोहिनूर आणि ट्रीनीती इंटरप्राजेस अशा दोन वसईमधील यार्ड एजन्सी व्यवस्थापकांना मनसे वाहतूक सेनेने निवेदन देऊन विचारणा केली. सदर वेळी पालघर जिल्हयाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष विनोद मोरे, वसई:नालासोपारा विधानसभा उपाध्यक्ष महेश कदम, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक, यशवंत पोकळे, खांडेकर, मासाळ आणि राकेश खोपकर आदी हजर होते. 🔗 https://bit.ly/37XOHDg 

मनसे नांदेड >> मनसे प्रश्न ❓
पशुवैद्यकीय दवाखान्यातील विविध समस्येवर वेळोवेळी प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनकडून दखल घेतली जात नाही. परिसरातील शेतकऱ्याची पशुवैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याची खंत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनी व्यक्त केली आहे. 🔗 
https://t.co/wkmyidgOIF

मनसे अंधेरी, मुंबई >> समाज कार्य
अंधेरी आरटीओ रस्ता रहिवासी भागातील स्पीड ब्रेकर्स गेल्या काही काळापासून तुटले होते. रहिवाशांनी लक्षात आणून दिले आणि या रस्त्यावर चालणारे यांची रहदारी खूपच जास्त असल्याने संरक्षणासाठी युद्धपातळीवर ते पुन्हा तयार करून घेतले. -- मनसे अंधेरी शाखा अध्यक्ष प्रशांत राणे. 🔗 https://t.co/QH5StLrCNq 

मनसे लातूर >> दणका
सन्माननीय राजसाहेब ठाकरे व सन्मा. बाळा नांदगावकर साहेबांनी विजबिलाचा मुद्दा उचलला तेव्हापासून चापोली येथे विजबिलाची होळी, अहमदपूर येथे अधिकाऱ्याला घेराव, निलंगा येथे निदर्शने, कीनगाव येथे रस्ता रोको व शेवटी अहमदपूर येथे खळ खट्याक! -- मनसे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने 🔗 https://t.co/0GTiu7tl0Y

मनसे मिरा भाईंदर >> समाज कार्य 
उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांच्या नेतृत्वाखाली मिरा रोड (पूर्व) येथे भव्य रक्तदान शिबिर,प्लाझ्मा दान,आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला मिरा भाईंदर शहरातील नागरिक, मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला तसेच उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला. 🔗 https://t.co/ESVNC4hRcj

मनसे अ. नगर >> मोर्चा
मनसे महिला मोर्चा | २ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी - ११ वा.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, अ. नगर.
विषय: महिला बचत गट कर्ज माफी
मोर्चा अध्यक्ष: मा. नितीन म्हस्के
जिल्हाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना, अ. नगर 🔗 https://t.co/UYlJ34TwPG 

मनसे नेते >> सांत्वन
राकेश पाटील हत्या प्रकरण; मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील ह्यांनी घेतली राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट. मा. राजसाहेब ठाकरेंकडूनही कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन. 🔗 https://bit.ly/3kHHkmM 

मनसे नेते >> इशारा
कोणीही उठावे आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखवावे हे नित्याचेच झाले. "लक्ष्मी बॉम्ब" चित्रपटाचे नाव बदलले परंतु सेन्सॉर बोर्ड ने इथून पुढे अशा कोणत्याही धार्मिक भावना दुखविणाऱ्या ना अजिबात परवानगीच देऊ नये व हा खेळ कायमचा थांबवावा. -- मनसे नेते बाळा नांदगावकर
🔗 https://bit.ly/3ejzEoA

No comments:

Post a Comment