Tuesday 10 November 2020

४-५ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ०४-०५ /११/२०२० ◆ मनसे बातमीपत्र


मनसे◆पक्षप्रवेश ◆चंद्रपूर
महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवरील अतिदुर्गम पहाडी क्षेत्र  ता. जिवती जि.चंद्रपूर येथील टाटाकोहडा येथील ग्राप सदस्य अनुसया गेडाम तसेच टाटाकोहडा, टिटवी, हिरापूर, गोविंदपूर, खडकी, कोलांडी, चौपणकुडा येथील महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी मनसेत प्रवेश केला.

मनसे ◆पक्षप्रवेश ◆नागपूर
नागपूर येथे मनसे सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, जिल्हा अध्यक्ष श्री सतीश कोल्हे ह्यांच्या उपस्थित शहरातील विविध पक्षातील अनेक तरुण कार्येकर्त्यांनी आज मनसे पक्षात प्रवेश केला.


मनसे◆पक्षप्रवेश◆मुंबई
मनसे अध्यक्ष श्री राज ठाजरे ह्यांच्या विचाराने प्रेरित होऊन वडाळा प्रभाग क्रमांक २०० येथे विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी मनसे पक्षात पक्षप्रवेश केला.

मनसे ◆ यश ◆ मुंबई
पक्षाचे नेते श्री. अमित राज ठाकरे ह्यांनी आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ व्हावी ह्यासाठी अर्थमंत्री, आरोग्यमंत्री ह्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यावर मानधनवाढीचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. त्याच निर्णयाचा अद्यादेश आज आरोग्यमंत्री ह्यांनी आशा स्वयंसेविकांना सुपूर्द केला. 

मनसे ◆यश◆नवी मुंबई(ठाणे)
मनसेची सिडकाेविजेत्यांना दिवाळी भेट..!मनसे शहराध्यक्ष श्री गजानन काळे ह्यांच्या प्रयत्नांनी १४५०० साेडतधारकांना  मिळाला दिलासा,१ हजार रुपयेच मुद्रांक शुल्क,सिडकाेचा निर्णय. सिडको व्यवस्थापनने मनसेला दिले लेखी पत्र.

मनसे -रस्ते आस्थापना◆यश◆मुंबई
भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकावरील ईश्वर नगर येथील प्रवेशद्वार खुले करण्यासाठी मनसे रस्ते आस्थापना विभागाचे संघटक श्री पार्टे आणि सहकाऱ्यांनी रेल्वे कडे पाठपुरावा केला होता,अखेर मनसेच्या प्रयत्नांना यश आले असून प्रवेशद्वार खुले झाले आहे.


मनसे ◆ यश ◆ नागपूर
जे.पी.कॉन्व्हेंट स्कुलमधील विद्यार्थ्यांना फी अभावी ऑनलाइन शिक्षणपासून वंचित ठेवले होते,मनसेच्या शिष्टमंडळाने श्री विशाल बडगे(नागपूर शहराध्यक्ष) ह्यांच्या नेतृत्वाखाली धडक देत व्यवस्थापनाला शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास भाग पाडले.


मनसे ◆ यश ◆मुलुंड(मुंबई)
प्रभाग क्रमांक १०८ चे मनसेचे शाखा अध्यक्ष श्री संदीप वरे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख असलेल्या बसस्टॉपचे नाव बदलण्यासाठी पाठपुरावा केला होता आता "श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक" अशी त्या थांब्याची नवीन ओळख झाली.

मनसे ◆ यश ◆ उस्मानाबाद
कोरोना काळात सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना बँक,फायनान्स यांच्याकडून होत असलेली लूट थांबायला पाहिजे अशी मागणी मनसेने जिल्हास्तरावर केली होती,उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातुन ह्याबाबत सविस्तर पत्रक काढले आहे.अखेर मनसेच्या मागणीला यश आले.

मनसे- सहकार सेना◆ सामाजिक ◆ सोलापूर
मनसे प्रदेश सरचिटणीस/मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष श्री दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने पंढरपूर शहरातील 10 मुलींची MSIT संगणक कोर्स ची पूर्ण फी भरण्यात आली.यावेळी शशिकांत पाटील(तालुकाध्यक्ष) NIT कॉम्पुटर सेंटर चे मालक शाम गोगाव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे ◆ कार्य ◆ मुंबई
मुंबईतील मनसे नगरसेवक श्री संजय तुर्डे ह्यांच्या प्रयत्नांनी कलिना विधानसभा क्षेत्रातील कांतीनगर येथे राहणाऱ्या राहिवाश्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे,९ इंच व्यासाची नवीन जलवाहिनीचे काम सुरू.

मनसे◆निवेदन◆मुंबई
प्रभाग क्रमांक १३२ च्या हद्दीतील लायन्स गार्डन(सैनिक गार्डन) मधील व्यायामाची उपकरणे निष्क्रिय झाल्याने मनसेचे शाखा अध्यक्ष श्री अभिजित शेजवळ ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह  एन वॉर्ड सहआयुक्त अधिकारी ह्यांना निवेदन दिले.

मनसे- विद्यार्थी सेना◆ निवेदन ◆ मीरा भाईंदर(ठाणे)
कोरोना काळात खाजगी शिक्षण संस्थांकडून होत असलेली लुट थांबवण्यासाठी नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून एक समिती स्थापन करून शैक्षणिक लूट वर नियंत्रण आणावे या मागणीसाठी मनसेकडून श्री शान पवार(मनविसे शहराध्यक्ष) ह्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे ◆निवेदन ◆चंद्रपूर
चंद्रपूर येथे ,अपंग आहे असे सांगून ५८ शिक्षक सरकारी योजनांचा फायदा उचलत होते मनसेने ह्या सर्वांची पोलखोल केली होती.आता पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.मनविसे जिल्हाध्यक्ष श्री अनिल हमदापुरे यांनी सहकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.



मनसे ◆ निवेदन ◆ सांगली 
खानापूर-विटा(सांगली) रस्त्याचे काम काँक्रीटीकरण चे ठरले असताना डांबरीकरण होत असल्याने मनसेच्या वतीने धूळ फेकण्याचे काम थांबवण्यासाठी श्री साजिद आगा(खानापूर तालुकाध्यक्ष) ह्यांनी खानापूर तालुका तहसीलदार ह्यांना त्याबाबत निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ नागपूर 
नागपूर शहरातील रेंगाळत पडलेले प्रकल्प,फुटपाथवर हिट असलेले अतिक्रमण,फुटाळा तलाव संरक्षण भिंत अश्या अनेक नागरी समस्या सोडवण्यात याव्यात ह्यासाठी मनसेकडून जनहित प्रदेश सरचिटणीस श्री महेश जोशी ह्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.


मनसे ◆ उपोषण ◆ शिरूर(पुणे)
मनसेचे शिरूर शहराध्यक्ष श्री घोगरे ह्यांनी नागरी समस्याबाबत आमरण उपोषण चालू केले होते,मनपा ने श्री घोगरे ह्यांच्या मागण्यांवर नक्की विचार करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

मनसे ◆उपक्रम ◆डोंबिवली(ठाणे)
श्री योगेश रोहिदास पाटील (माजी सरपंच, घारीवली) यांच्या वतीने शासनकृत आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्ड वाटपाचा कार्येक्रम आज मंगळवार दि.०३/११/२०२० रोजी घारीवली गाव, गणपती मंदिर येथे पार पडला.

मनसे ◆ निवेदन ◆ डोंबिवली
मनसे आमदार श्री राजू पाटील ह्यांनी कोविड-१९ साठी सेवा देताना बाधित झालेल्या शिक्षकांना विशेष सवलत देण्याबाबत मा.ना.श्री.राजेश  टोपे यांना पत्र दिले आहे.

मनसे ◆निवेदन ◆मालाड,मुंबई
प्रभाग क्र ४९ मधील मढ जेट्टी स्मशानभूमी ते मढ चर्च येथे गतिरोधक नसल्याने अपघात वाढले आहेत,म्हणून मनसेचे शाखा अध्यक्ष श्री सुनील घोंघे ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे ◆निवेदन ◆ पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नागरीकांना व्यायामासाठी  खुले करणे बाबत मा. कुलगुरू डॉ करमळकर यांना मनसे राज्य उपाध्यक्ष श्री रणजित शिरोळे ह्यांनी निवेदन दिले.


मनसे ◆ निवेदन ◆ गुहागर(रत्नागिरी)
L & T कंपनीने आपल्या दाभोळ येथील प्रोजेक्ट मध्ये अनेक कंत्राटदार मनुष्यबळसह बाहेरून आणले आहेत त्या संदर्भात मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री गणेश कदम,श्री जानवळकर(तालुका अध्यक्ष) ह्यांनी संबंधित व्यवस्थापनीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे - महिला सेना ◆ निवेदन ◆ नवी मुंबई(ठाणे)
नवी मुंबई मनपाच्या २० शाळेतील साधारणपणे ५६०० विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण पासून वंचित आहे अश्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण बाबत मनपा काय निर्णय घेणार?ह्याबाबत मनसेच्या नवी मुंबई शहर अध्यक्षा सौ आरती धुमाळ ह्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले.

मनसे -जनाधिकार सेना◆ निवेदन◆ पुणे
कै.शकुंतला किसनराव शिंदे  बहुउददेशीय क्रीडा संकुल हे अनाधिकृतपणे चालवले जात असल्याने मनसे जनाधिकार सेनेचे श्री वृषभ सिंघवी ह्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मनसे ◆ निवेदन ◆ उल्हासनगर(ठाणे)
उल्हासनगर मनपा क्षेत्रात सर्वसाधारण १२०० दिव्यांग व्यक्ती वास्तव करत आहेत अश्या सर्व दिव्यांग व्यक्तीना त्यांच्या हक्काचा निधी दिवाळीपूर्वी मिळावे ह्यासाठी मनसेचे उप-जिल्हा सचिव संजय घुगे,कामगार सेनेचे दिलीप थोरात, शहर संघटक मैनुद्दीन शेख ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

मनसे -कामगार सेना◆उद्घाटन◆मुंबई
गेली ३६ वर्षे वेगवेगळ्या युनियनचे सभासत्व स्वीकारून न्याय मिळत नसल्याने इंडीयन न्युमॅटीक अँड हायड्राॅलीक कंपनी प्रा.लि कंपनीतील कामगारांनी मनकासे चिटणीस श्री राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कामगार संघटनेची स्थापना केली,अनेक कामगारांनी मनसेचे सभासत्व स्वीकारले. 

मनसे - कामगार सेना ◆उद्घाटन ◆ मुंबई
मनसे-कामगार सेना सरचिटणीस श्री केतन नाईक ह्यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खाते, कचरा स्थलांतरण केंद्र (कुर्ला) येथे मनसे कामगार सेनेची स्थापना करण्यात आली.


मनसे - विद्यार्थी सेना ◆उद्घाटन ◆ नालासोपारा(पालघर)
नालासोपारा मोरेगाव येथे मनविसेच्या भव्यदिव्य कार्यालयाचे उद्घाटन श्री सचिन मोरे(सचिव) व श्री अविनाश जाधव(मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष) ह्यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ५.३० मिनिटांनी संपन्न होणार आहे.

मनसे -वाहतूक सेना◆भेट ◆मुंबई
आज "इंडोस्टार कॅपिटल फायनान्स" या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मनसे - वाहतूक सेनेच्या कार्यालयात भेट दिली. वाहतूकदारांच्या समस्या & फायनान्स व्यवस्थेच्या वसुलीच्या प्रक्रियेबाबत मांडलेले सर्व मुद्दे 'इंडोस्टार'ने मान्य केले,दिलासा देण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात येईल,अशी ग्वाही दिली. 


मनसे - कामगार सेना◆ भेट ◆ मुंबई
सैफी इस्पितळात अनेक कंत्राटदार कार्यरत आहेत,कोरोना काळात कामावर रुजू न झालेल्या कामगारांना व्यवस्थापन आणि कंत्राटदार कामावर घेण्यास टाळाटाळ करत होते,मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री गजानन राणे ह्यांनी धडक देत व्यवस्थापनला फैलावर धरले.लवकरच सकारात्मक निकाल घेऊ असे आश्वासन दिले. 

मनसे - कामगार सेना ◆ भेट ◆ मुंबई 
कामावरून कमी करणे,वेतन थकवणे,PF न जमा करणे,अश्या अनेक समस्या घेऊन सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी "व्ही सॉफ्ट" कंपनीतील कामगारांनी आपल्या समस्या मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री गजानन राणे ह्यांच्यासमोर मांडल्या,लवकरच कंपनी व्यवस्थापनला मनसे दणका.


मनसे ◆ पर्दाफाश ◆ वसई(पालघर)
महामार्गला लागून वसई विरार शहरात होत असलेल्या अनधिकृत बांधकाम विषयी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांनी फेसबुक लाइव्ह करून परिस्थिती जनतेसमोर ठेवली आणि बांधकाम थांबली नाहीत तर आयुक्तांवर गुन्हा नोंदवण्याची तयारी दाखवली आहे.

मनसे- रस्ते आस्थापना◆ पर्दाफाश ◆ पनवेल(रायगड)
सिडको प्रशासन,आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संगनमताने आणि पनवेल मनपाच्या निष्क्रीयतेमुळे पनवेलच्या नागरीकांना काय भोगाव लागणार आहे.?या विषयावर मनसे रस्ते आस्थापना विभागाचे सरचिटणीस योगेश चिले सविस्तर बोलणार आहेत.वेळ - ७/११/२०२०  सायंकाळी ५.००


मनसे ◆पर्दाफाश ◆ मालवण(सिंधुदुर्ग)
तारकर्ली येथे महावितरण कडून दोन ट्रान्सफॉर्मरमरचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष श्री प्रतीक कुबल ह्यांनी दाखवून दिले,महावितरण ने मान्य करत येत्या आठ दिवसात नव्याने करून देतो अशी ग्वाही दिली,मनसेचे स्थानिक जनतेकडून कौतुक होत आहे.

मनसे ◆ आंदोलन ◆ मीरा भाईंदर( ठाणे)
पाणी टंचाई प्रश्नावर मनसे मीरा भाईंदर शहर सचिव श्री अनिल राणावडे ह्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार  सकाळी ९.०० वाजता नवघर येथे मनपा प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

मनसे ◆आंदोलन ◆नाशिक
पुणे महामार्गावर सेंट झोविअर्स & गुरुद्वारा परिसरात असलेले गतिरोधकमुळे अपघात प्रमाण वाढले आहे,त्या ठिकाणी सूचना फलक  लावण्यात यावे ह्यासाठी  मनसेकडून  श्री विक्रम कदम(विभाग अध्यक्ष) ह्यांच्या नेतृत्वाखाली "सूचना फलक लावा" बॅनर खाली आंदोलन केले.

मनसे - रस्ते आस्थापना◆ उपोषण ◆ जळगाव
मनसे रस्ते आस्थापना विभागाचे श्री राजेंद्र निकम ह्यांच्या नेतृत्वाखाली निधी कागदोपत्री ठेवून खिशात घालणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ह्या मागणीसाठी एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.

मनसे ◆ उपक्रम ◆ गोरेगाव (मुंबई)
मनसे प्रभाग क्रं ५१(गोरेगाव) चे शाखाध्यक्ष श्री अरुण गवळी आयोजित 'मनसे ग्राहक पेठ' अंध बांधवांनी बनविलेल्या वस्तूची ग्राहक पेठ आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. 
स्थळ- व्हाईट हाऊस समोर , जय प्रकाश नगर , गोरेगाव पूर्व मुंबई -६३

मनसे ◆उपक्रम ◆पुणे
पुणे मनपा कोंढवा खुर्द चे मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर ह्यांच्याकडून २५० विधवा, गरीब गरजू,निराधार महिलांना भाऊबीज म्हणून मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहेत.


मनसे - विद्यार्थी सेना ◆ उपक्रम ◆ ठाणे
श्री अरुण घोसाळकर(मनविसे ठाणे शहर अध्यक्ष)
व मनसे ठाणे शहर आयोजित "ऑनलाइन नृत्य स्पर्धा" चे बक्षीस वितरण ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या हस्ते झाले.


मनसे ◆ आंदोलन ◆ कल्याण डोंबिवली 
मनसे डोंबिवली च्या वतीने स्थानक परिसरातील स्कायवॉक वर असलेले कचऱ्याचे साम्राज्यच्या विरोधात खळखट्याक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीला जाग, स्कायवॉकवर साफसफाईला सुरवात झाली.

मनसे - विद्यार्थी सेना◆ दणका ◆ वसई
महेंद्र फायनान्स कडून कर्जदाराला दिला जाणारा मानसिक त्रासच्या विरोधात मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्र फायनान्सच्या अधिकाऱ्यांना दणका दिला.

No comments:

Post a Comment