Tuesday 10 November 2020

७-८ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ७-८ नोव्हेंबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे-वाहतूक सेना ◆ उद्घाटन ◆ अंधेरी (मुंबई)
मनसे वाहतूक सेनेच्या वतीने अंधेरी पूर्व येथे जे बी नगर विभागात रिक्षा स्टॅन्ड आणि टेम्पो स्टॅन्ड चे उद्घाटन पक्षाचे सरचिटणीस श्री संदीप दळवी ह्यांच्या हस्ते करण्यात आले, विभागातील तरूण कार्येकर्त्यांनी व वाहन चालकांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे - कामगार सेना ◆ मनसे प्रवेश ◆ जळगाव
जळगाव - चाळीसगाव येथील भारत वायर रोप्स लिमिटेड
(BHARAT WIRE ROPES LTD) कंपनी मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व श्री सचिन गोळे ह्यांच्या उपस्थितीत स्वीकारले.

मनसे प्रवाह ◆ मनसे प्रवेश ◆ पारनेर (अहमदनगर)
पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी या गावातील तरूणांनी श्री. बाळासाहेब माळी (पारनेर तालुका अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी श्री. सतिष म्हस्के, श्री. पप्पूशेठ लामखडे, श्री.मारूती रोहोकले उपस्थित होते.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ मनसे प्रवेश ◆ आळंदी (पुणे)
पुणे: आळंदी शहरात मनविसेच्या कार्येकर्त्यांची आढावा बैठक श्री अजय तपकिर ह्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. त्यावेळी अनेक तरुण कार्येकर्त्यांनी पक्षप्रवेश केला व शहरातील मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मनसे - कामगार सेना ◆ यश ◆ मुंबई 
मनसे कामगार सेनेचे चिटणीस श्री केतन नाईक ह्यांनी काही दिवसांपूर्वी हॉटस्टार व्यवस्थापन ला मराठीत समालोचन करण्यात यावे ह्यासाठी निवेदन दिले होते. हॉटस्टार व्यवस्थापनाने पत्रव्यवहार करून लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांची भेट घेऊ असे कळवले.

मनसे प्रवाह ◆ यश ◆ मालेगाव (नाशिक)
मनसे मालेगाव शहराच्या वतीने रस्त्यातील खड्ड्याच्या विरोधात आंदोलन उभारले होते. आता त्या विभागातील खड्डे आता प्रशासनाने भरले आहेत.

मनसे प्रवाह ◆ यश ◆ विरार (पालघर)
विरार जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी वनखात्याच्या जमिनीवर होत असलेले अतिक्रमण मनसेच्या लक्षात येताच मनसेचे विरार शहर सहसचिव श्री महेश कदम ह्यांनी वन विभागाला निवेदन लिहून कारवाईची मागणी केली. अखेर मनसेच्या मागणीनंतर वनविभागाने कारवाई केली.

मनसे - कामगार सेना ◆ उद्घाटन ◆ कल्याण डोंबिवली
कल्याण डोंबिवली महानगरपालिका घंटा गाडी युनियन च्या " नाम फलक नूतनीकरण सोहळा " हा सोहळा श्री. राजेश उज्जैनकर (उपाध्यक्ष मनसे कामगार सेना) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
 
मनसे प्रवाह ◆ उद्घाटन ◆ ठाणे शहर
मनसे ठाणे शहर कार्यालय गोकुळ नगर शाखेचे उदघाटन मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या हस्ते झाले.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ उद्घाटन ◆ नालासोपारा ठाणे
मोरेगाव, नालासोपारा (पालघर) मनविसेच्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या हस्ते झाले.

मनसे प्रवाह ◆ उद्घाटन ◆ बारामती (पुणे)
मनसे राज्य उपाध्यक्ष श्री सुधीर पाटस्कर यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यातील वडगाव येथे दोन शाखांचे कार्यालय उद्घाटन संपन्न झाले.

मनसे नेते ◆ भूमिका ◆ कल्याण डोंबिवली (ठाणे)
कल्याण डोंबिवली मधील ४५ मीटर रिंग रोडमध्ये बाधित झालेल्या रहिवाशांची मनसे आमदार श्री राजू पाटील ह्यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा दरम्यान आटाळी, आंबिवली येथील ८५० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत त्यांना त्यांचा मोबदला मिळावा अशी मागणी केलीय.

मनसे प्रवाह ◆ भूमिका ◆ सिंधुदुर्ग 
मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामविरोधात मनसेची उच्च न्यायालयात याचिका, मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती.

मनसे - चित्रपट सेना ◆ भूमिका ◆ मुंबई
मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजी मध्ये तब्बल १६ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष/ मनसे सरचिटणीस श्री अमेय खोपकर ह्यांनी केला आहे.

मनसे नेते ◆ इशारा ◆ कल्याण डोंबिवली (ठाणे)
लाज घेणारे पोलीस वाहतूक अधिकारी स्टिंग ऑपरेशन मध्ये आढळल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी वाहतूक पोलिसांविरोधात आंदोलन कारण्याचा इशारा दिला आहे.

मनसे प्रवाह ◆ इशारा ◆ शीव (मुंबई)
शीव कोळीवाडा (मुंबई) येथे विभाग अध्यक्ष श्री अनंत कांबळे ह्यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने विभागातील मराठी भाषा डावळणाऱ्या सर्व दुकानांना मराठीत फलक लागले पाहिजेत अश्या मागणीसाठी सर्व दुकानदारांना समाज देण्यात आली .

मनसे प्रवाह ◆ दणका ◆ वणी (यवतमाळ)
यवतमाळ  जिल्ह्यातील ब्लॅक डायमंड सिटीत मराठी कामगारांवर अन्याय झाल्या प्रकरणी मनसेचा आक्रमक पावित्रा, मनसे उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी दिला परप्रांतीयांना चोप.

मनसे - रोजगार विभाग ◆ निवेदन ◆ नवी मुंबई
नवी मुंबईतील सर्व डी मार्ट, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स  डिलिव्हरी पॉईंट या आस्थापनांनी ८०% मराठी तरुणांना नोकरी द्यावी. अशी मागणी मनसेच्या रोजगार विभागाने आस्थापना कडे केली आहे.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ परांडा (उस्मानाबाद)
संजयगांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजने मधील लाभार्थींना थकीत असलेले अनुदान दिवाळी पूर्वी मिळावे अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष श्री शाबीर शेख ह्यांनी तहसीलदार ह्यांना निवेदन देऊन केली.

मनसे - महिला सेना ◆ निवेदन ◆ नागपूर
नागपूर शहरातील छोटा ताजबाग ते तुकडोजी महाराज चौक मार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी मनसेच्या महिला शहर अध्यक्षा मनीषा पापडकर ह्यांनी निवेदन द्वारे मनपा आयुक्तांकडे केली.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ बुलढाणा
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना शेताच्या बांधावर पाठवा अशी मागणी मनसे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री मदनराजे गायकवाड ह्यांनी केली आहे.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ बोरिवली (मुंबई)
टाटा आणि अदानी इलेक्ट्रिसिटी कडून ग्राहकांना वीज बिल न भरल्यामुळे वीज खंडित करण्याबाबत नोटीस येऊ लागल्या आहेत. त्याबद्दल टाटा आणि अदानी दोन्ही वीज वितरण कंपन्यांनी अशा कारवाई केली तर मनसे अधिक आक्रमक होईल अशा आशयाचे निवेदन शी नयन कदम (मनसे सरचिटणीस) ह्यांनी दिले.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ मीरा भाईंदर (ठाणे)
दहिसर चेक नाका ते फाउंटन पर्यंत रस्ता कायमस्वरूपी ट्राफिक मध्ये असतो ह्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, नागरिकांना होणारा नाहक त्रास कमी झाला पाहिजे ह्या मागणीसाठी मनसे तर्फे श्री संदीप राणे (१४५ मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष) ह्यांनी वाहतूक विभागाला निवेदन दिले.

मनसे - विधी जनहित ◆ निवेदन ◆ नवी मुंबई (ठाणे)
मनसे विधी जनहित कक्ष नवी मुंबईच्या वतीने "नवी मुंबई कोर्ट अॅडव्होकेट बार असोसीएशन" ला निवेदन दिले त्यात,३ वर्षेपेक्षा कमी अनुभव आहे त्या वकिलांना दिवाळीसाठी २०००-३००० आर्थिक मदत करण्याची मागणी केली.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ डोंबिवली (ठाणे)
डोंबिवली पूर्व बाजारपेठेत अनेक दुकानांचे फलकांवर मराठी भाषा डावलल्यामुळे मनसेचे डोंबिवली शहर संघटक श्री हरीश पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली मधील कार्येकर्त्यांनी सर्व दुकान मालकांना निवेदने देऊन मराठी भाषेत फलक लावण्याची मागणी केली.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ बोरिवली (मुंबई)
गुटखा विक्री बंद असताना बोरिवली येथे खुलेआम होत आहे गुटख्याची विक्री....? प्रभाग क्रमांक १५ चे  मनसे शाखा अध्यक्ष श्री महेश भोईर ह्यांनी सदर घटनेबाबत बोरिवली पोलीस स्थानकात पत्र लिहून कळवले.

मनसे प्रवाह ◆ निवेदन ◆ आर्णी (यवतमाळ)
फेरीवाले व पथ विक्रेत्यांना नगरपरिषद ने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनसेचे श्री सचिन यलगंधेवार (मनसे आर्णी तालुकाध्यक्ष, यवतमाळ) ह्यांनी केली आहे.

मनसे प्रवाह ◆ सामाजिक ◆ अहमदनगर
मनसे अहमदनगर च्या वतीने १० रुपयांत पोटभर जेवण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, हराळ हॉस्पिटल, कल्याण नगर रोड येथे हा उपक्रम चालू होतं आहे.

मनसे - महिला सेना ◆ सामाजिक ◆ माहीम
मुंबई: मनसे नेत्या रिटाताई गुप्ता यांच्या पुढाकाराने कोविड मध्ये आर्थिक होरपळून निघालेल्या माहीम विधानसभा क्षेत्रातील काही गरजू कुटुंबांना फराळाचे साहित्य वाटप केले.

मनसे प्रवाह ◆ सामाजिक ◆ मुंबई
प्रभाग क्रमांक १२९ चे मनसे शाखा अध्यक्ष श्री अरविंद गिते ह्यांच्या पुढाकाराने  नागरिकांना दिवाळी फराळ सामग्री वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

मनसे - रोजगार विभाग ◆ नियुक्ती ◆ धुळे
मनसेचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री दुष्यंतराजे देशमुख ह्यांची मनसे रोजगार विभागाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

मनसे प्रवाह ◆ मेळावा/ बैठक ◆ नवी मुंबई (ठाणे)
नवी मुंबई शहरातील घणसोली, कोपरखैरणे विभागातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक श्री गजानन काळे (शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.

मनसे ◆ मेळावा/ बैठक ◆ नवी मुंबई (ठाणे)
नवी मुंबई शहरातील जुईनगर,नेरुळ विभागातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक श्री गजानन काळे (शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली

मनसे ◆ मेळावा/ बैठक ◆ नाशिक
मनसे नाशिक शहरातील प्रभाग नुसार पक्षांतर्गत बैठका संपन्न झाल्या.

मनसे -विधी जनहित ◆ मेळावा : बैठक ◆ लातूर
मनसे- विधी जनहित कक्ष विभागाची सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याची आढावा बैठक जनहित कक्षाचे अध्यक्ष श्री किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील इच्छुक वकिलांनी पक्षप्रवेश केला, मुलाखती घेऊन तिन्ही जिल्ह्यातील, नियुक्त्या करण्यात आल्या.

मनसे- महिला सेना ◆ नियुक्ती ◆ सांगली
मनसे - महिला सेना पलूस तालुकाध्यक्ष पदी सौ.कविता माने ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment