Tuesday 10 November 2020

२ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ०२/११/२०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब ◆ कृष्णकुंज
शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, कोचिंग क्लासचे संचालक ह्यांनी सन्माननीय राजसाहेब ह्यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे राजसाहेबांसमोर मांडले.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ भिवंडी
श्री डी के म्हात्रे (प्रदेश उपाध्यक्ष) श्री वैभव किणी (संपर्क अध्यक्ष) ह्यांच्या उपस्थितीत भिवंडी येथे तरुणांचा पक्षप्रवेश..!

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ नवी मुंबई
नवी मुंबई उपशहर अध्यक्ष श्री निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली दिघा येथील प्रभाग क्रमांक १ व ३ मधील विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ खेड (रत्नागिरी)
खेड शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला..!

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ पुणे
पुणे येथील युवा सेनचे उपनेते श्री संग्राम माळी यांनी  कार्येकर्त्यांसह मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ नवी मुंबई (ठाणे)
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबई नेरुळ पूर्व मधील विद्यार्थी, तरुण, महीलांनी शहर अध्यक्ष श्री गजानन काळे, सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

मनसे ◆ उद्घाटन ◆ पारनेर
मनसे पारनेर तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब माळी ह्यांच्या हस्ते तालुक्यातील दोन मनसे कार्यालयांचे उद्घाटन समारंभ संपन्न झाले.

मनसे ◆ भेट ◆ कांदिवली(मुंबई)
रेयान ईँटरनॅशनल स्कुल कांदीवली पूर्व शाळेकडुन कोरोनाकाळात विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुलीच्या तक्रारी आल्यानंतर श्री.नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली शाळा प्रशासनाला जाब विचारण्यात आला,येत्या ४-५ दिवसात फि कपातीबाबतीत प्रशासनाकडुन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. 

मनसे ◆ भेट ◆ मीरा भाईंदर (ठाणे)
टेंभा रुग्णालयातील (मीरा भाईंदर) सफाई कामगारांना कामावरून कमी करणे, वेतन न देणे, महिलांवर अत्याचार करणे अश्या समस्यांबाबत मनसेचे मिरारोड भाईंदर येथील श्री संदीप राणे यांनी सहकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, दोन दिवसात प्रश्न मार्गी निघेल असे मनसेला आश्वासन दिले. 

मनसे - रस्ते आस्थापना ◆ यश ◆ कल्याण (ठाणे)
कल्याण शहरातील खड्यांच्या दुरावस्थेबाबत मनसे रस्ते आस्थापना विभागाचे श्री रोहन अक्केवार ह्यांनी पाठपुरावा केला होता,वारंवार दुर्लक्ष करून अखेर प्रशासनाला दखल घेणे भाग पडले,मनसेच्या पाठपुराव्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम चालू.

मनसे - महिला सेना ◆ यश ◆ ठाणे
मनसेच्या ठाणे मनपाच्या माजी नगरसेविका सौ राजश्री नाईक ह्यांच्या प्रयत्नांनी पीपल्स शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी वर २५℅ सवलत देण्याचा निर्णय घेण्याक्त आला आहे.

मनसे ◆ मेळावा ◆ नाशिक
संघटना बांधणी,आगामी ग्राम पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांचा कामाचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते श्री प्रदीप पवार,श्री अशोक मुर्तडक व इतर पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्येकर्ता मेळावा संपन्न झाला.

मनसे ◆ मोर्चा ◆ अहमदनगर
मनसे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे आणि अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली "महिला बचत गट" कर्जमाफी साठी मनसे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मनसे - वाहतूक सेना ◆ भूमिका ◆ पालघर
पालघर जिल्ह्यातील मनसे वाहतूक सेनेची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.

मनसे - पालिका कर्मचारी सेना ◆ भूमिका ◆ वसई विरार
वसई विरार महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

मनसे ◆ भूमिका ◆ संभाजी नगर
मनसेचे संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष श्री सुहास दशरथे ह्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलन कर्त्यांची (मंडप, केटरिंग, फुल व्यवसायिक, ब्राह्मण महासंघ, ऑर्केस्ट्रा इत्यादी) भेट घेऊन मनसेचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला.

मनसे - कामगार सेना ◆ भूमिका ◆ अंधेरी
कामगारांचे थकलेले वेतन आणि कायदेशीर देणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या टॉप्स सिक्युरिटीच्या अंधेरी येथील कार्यालयाला श्री रोहन सावंत (विभाग अध्यक्ष) श्री केतन नाईक (चिटणीस, मनसे कामगार सेना) ह्यांच्या नेतृत्वाखाली टाळे लावण्यात आले आहे. 

मनसे - विधी, जनहित कक्ष ◆ भूमिका ◆ पुणे
लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे विभागात समाविष्ट करण्यासाठी स्थानिक आमदार सकारात्मक नसले तरीही मनसे जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष Adv श्री गणेश म्हस्के ह्यांनी पक्ष सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

मनसे - वाहतूक सेना ◆ उपक्रम ◆ विरार (पालघर)
मनसे वाहतूक सेनेचे नवनिर्वाचित पालघर जिल्हा अध्यक्ष श्री विनोद मोरे ह्यांच्या नेतृत्वाखाली वसई विरार शहरातील रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे.

मनसे ◆ उपक्रम ◆ पुणे
येरवडा रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा, रिक्षा चालकांना धान्याचे किट वाटप मनसेचे नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरअध्यक्ष मा. श्री. अजयभाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मनसे ◆ उपक्रम ◆ पालघर
मनसे पालघरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मनसे - चित्रपट सेना ◆ उपक्रम ◆ घाटकोपर (मुंबई)
सर्वसामान्य माणसाला मनपाचा "मास्क न घातल्यामुळे"दंड लागू नये, कोविड पासून सुरक्षा व्हावी म्हणून मनसे चित्रपट सेनेकडून घाटकोपर येथे "मोफत मास्क वाटप" उपक्रम हाती घेण्यात आला होता.

मनसे ◆ उपक्रम ◆ कल्याण-डोंबिवली (ठाणे)
मनसे आमदार श्री राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनकृत आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्ड चे वाटप सोबत मोफत मास्क चे वाटप करण्यात येणार आहे. 

मनसे ◆ उपोषण ◆ उल्हासनगर(ठाणे)
मनसेचे श्री सचिन कदम (जिल्हा अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर येथे मागील १५ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने "पाण्यासाठी-आमरण उपोषण" दिनांक २ नोव्हेंबर पासून चालू झाले आहे.

मनसे ◆ उपोषण ◆ अंधेरी (मुंबई उपनगर)
अंधेरी पश्चिम येथील जुहू मंगेला वाडी येथील स्थानिक कोळी बांधवाची घरे उध्वस्त करणाऱ्या नरेश जैन ह्या विकासकावर गुन्हा नोंदवण्यासाठी मनसेच्या वतीने विभाग अध्यक्ष श्री मनीष धुरी ह्यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय उपोषण करण्यात आले.

मनसे - महिला सेना ◆ पर्दाफाश ◆ कळवा (ठाणे)
मनसेच्या कळवा मुंब्रा विभाग अध्यक्षा काजल डावखर ह्यांनी ठाणे मनपा चा भोंगळ कारभार उघडकीस आणला आहे, खारेगाव येथील कोविड सेंटरच्या बाहेर PPE किट आढळल्याने मनसेने पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ निवेदन ◆ नाशिक
अंतिम सत्र वगळता प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या बॅकलॉग/ वायडी/ ए.टी.के.टी. विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याबाबत मनविसेच्या वतीने श्री संदेश जगताप ह्यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मा.कुलगुरूंना निवेदन. 

मनसे - सहकार सेना ◆ निवेदन ◆ अहमदनगर
महिला बचत गटांचे कर्जमाफ झाले पाहिजे ह्या मागणीसाठी मनसेचे सरचिटणीस/ सहकार सेनेचे अध्यक्ष श्री दिलिप धोत्रे ह्यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ वरळी (मुंबई)
पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे ह्यांच्या मतदारसंघात जे बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे उभे राहिले आहेत त्यावर कारवाई करण्यासाठी मनसेचे शाखा अध्यक्ष श्री मारुती दळवी(प्रभाग १९९) यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांना निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ पाथरी (परभणी)
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात "बाभळगाव मंडळ" ला समाविष्ट करून घेण्यासाठी मनसेचे पाथरी तालुका अध्यक्ष श्री पांडुरंग सोनवणे ह्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.

मनसे - महिला सेना ◆ निवेदन ◆ पनवेल (रायगड)
पनवेलमधील रस्त्यांच्यासंदर्भत शितल सिलकर (पनवेल शहर अध्यक्ष) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.१५ दिवसात रस्ते दुरुस्ती झाली नाही तर खड्यांत वृक्षारोपण करू असा इशारा देखील दिला.

मनसे ◆ निवेदन ◆ कुडाळ (सिंधुदुर्ग)
मनसे कुडाळच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांत कोविड रुग्ण/ नातेवाईक ह्यांची होत असलेली लूट संदर्भात लक्ष घालण्यासाठी निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ मालवण (सिंधुदुर्ग)
मालवण तालुक्यात कर्ली, खालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा चालू आहे पण प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. अनधिकृत वाळू उपसा करून पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.

मनसे ◆ निवेदन ◆ घाटकोपर (मुंबई उपनगर)
महानगर गॅस कडून झालेल्या बिल वाढी विरोधात मनसेचे प्रभाग क्रमांक १३२ चे शाखा अध्यक्ष श्री अभिजित शेजवळ ह्यांनी महानगर गॅस व्यवस्थापनला निवेदन लिहून कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली.

मनसे ◆ निवेदन ◆ गुहागर (रत्नागिरी)
हेदवी (गुहागर, रत्नागिरी) येथे बँक ऑफ महाराष्ट्र कडून होत असलेल्या हिंदीत व्यवहार बद्दल मनसेच्या वतीने श्री विनोद जानवळकर (मनसे तालुका अध्यक्ष) ह्यांनी सहकाऱ्यांसह  स्थानिक मातृभाषेतून व्यवहार करावा ह्या मागणीसाठी निवेदन दिले, सोबत राज्य शासनाचा GR सुद्धा दिला.

मनसे ◆ निवेदन ◆ भांडुप (मुंबई)
मनसेचे श्री सुनिल नारकर (प्रभाग क्रमांक ११२, शाखा अध्यक्ष) ह्यांनी नागरी समस्यांच्या (उद्यान समस्या, गटारे साफसफाई, पादचारी मार्गावर होणारे अश्लिल चाळे) बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ निवेदन ◆ भांबेड (लांजा, रत्नागिरी)
भांबेड MSEB नवनिर्वाचित अधिकारी श्री तेरसे यांचे मनसे तर्फे कु किरण रेवाळे (मनविसे सहसंपर्क सचिव) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले व मृत अवस्थेत असलेले विद्युत खांब बदलण्यासाठी निवेदन दिले. 

मनसे - रोजगार, स्वयंरोजगार विभाग ◆ नियुक्ती ◆ रायगड
मनसे रोजगार व स्वयंरोजगार चे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. महेंद्र बैसाणे आणि जिल्हा संघटक श्री. रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री. यतिन देशमुख यांची मनसे "रोजगार व  स्वयंरोजगार" विभागाच्या उपजिल्हा संघटक (रायगड) पदी नियुक्ती करण्यात आली.

No comments:

Post a Comment