Wednesday 8 January 2020

मराठी व्यावसायिक मराठीचा वापर कधी करणार?

मराठी व्यवसायिकांचे स्वागत करायला हवेच...!
सर्व मराठी व्यवसायिकांना शुभेच्छा ...💐

मी Technical support Executive (L1) म्हणून कामाला सुरवात केली काम तसं फिरतीचे असल्याने जिथे कॉल असतील तिकडे जावे लागत असे.प्रवासातील थकवा,मरगळ घालवण्यासाठी टपरीवर चहा पिण्याची सवय लागली.आता त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे आणि उन्हा पावसातून केलेली मेहनत म्हणून काय माहीत नाही आता एक खाजगी कंपनीत नोकरी सुद्धा छान लागली आहे ह्याचे समाधान आहे.

परिस्थिती नुसार आजूबाजूचा मित्रपरिवार सुद्धा बदलत गेला,कधी मराठी तर कधी अमराठी मित्र भेटत गेले सर्वांशीच स्नेहसंबंध जोडण्याचे प्रयत्न केले.पण काही कडवट मराठी मित्र भेटले त्यांचे नाव नमूद करत नाही कारण त्यांना अजिबात कुठेही प्रसिद्धी केलेली आवडत नाही.त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या मनात खोलवर शिरकाव करत गेल्या.

रोजच्या व्यवहारात कोणतीही वस्तू घेण्याची गरज भासली तर ती मराठी व्यवसायिक कडूनच घे एक दोन रुपये जास्त गेले तरी चालतील आणि फावल्या वेळेत मराठी व्यवसायिक आपल्या घराच्या बाजूला शोधून ठेव त्यांची Mouth Publicity कर म्हणजेच आपल्या मराठी समाजाला त्या दुकान बाबत माहिती दे.बदल लगेच घडेल असे नाही काही वेळ वेळेनुसार चालवावे लागते पण प्रयत्न असतात की मराठीला प्राधान्य देण्याचे.

पुन्हा आपण चहाकडे जाऊया,चहाची सवय आहे पण प्रमाण कमी झालेय मग कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त जेंव्हा काही कामानिमित्त बाहेर पडतो तेंव्हा चहा म्हणून येवले ह्यासारखे अनेक मराठी व्यावसायिक उतरलेत चहा उद्योगात त्यांच्या दुकानात भेट होते.

मागील दोन वेळी अंधेरी आणि फोर्ट येथील येवले व्यवसायिक ह्यांच्या दुकानात भेट दिली तर तेथील मराठी कर्मचारी हिंदीला प्राथमिकता देऊन ग्राहकांशी हिंदीत बोलायला लागत असे निदर्शनास आले,मी दोन्ही ठिकाणी त्याना समज दिली तरीही मुंबईत हे प्रकार चालू आहेत हे थांबायला पाहिजेत माझ्यासारखे अनेक मराठी ग्राहक जर मराठी व्यावसायिक म्हणून आपण त्यांच्याकडे जात असू आणि त्यांच्याकडून हिंदी कानावर पडणार असेल तर मग मराठी व्यवसायिकांकडे आपण का जायचे?

धन्यवाद

No comments:

Post a Comment