Friday 10 January 2020

खरं तर फडणविस, तावडे, शेलार ही मंडळी म्हणजे राज ठाकरे यांच्यासाठी "कालची पोरं" ..?

आपल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात नुसते जोक करुन आणि लोकांच्या करमणूकिचा विषय ठरलेले  मामू फडणविस काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले आणि सोशल आणि इलेक्ट्रॉनिक मेडीयावर चर्चेचे एकच काहूर माजले की आता मनसे भाजप युती होणार, वैगरे-वैगरे.. लागलीच त्यावर स्वत: फडणविस यांनी स्पष्टीकरणही दिले की मनसे-भाजप युती आता सध्या शक्य नाही, त्यासाठी मनसेला विचारसरणीत बदल करायला हवा..

पण आम्हाला एक कळत नाही, मनसेचे नेते, पदाधिकारी तर नव्हते गेलेत ना भाजपच्या दारात कटोरा घेऊन..? हे स्वत: येतात आणि नंतर अशा वल्गना करतात.

खरं तर फडणविस, तावडे, शेलार ही मंडळी म्हणजे राज ठाकरे यांच्यासाठी "कालची पोरं"  १९९५ चे युती सरकार जेव्हा राज ठाकरे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चालवत होते तेव्हा ते अटलजी, आडवानीजी, मुंडे, महाजन, गडकरी आदी नेत्यांशी ते चर्चा करत असे.. म्हणून या "कालच्या पोरांनी" याचा विसर पडू देऊ नये.

फडणविस यांनी काल एक जोक केला ते म्हणाले की मनसेने आपल्या विचारसरणीत बदल केला तर भविष्यात युती शक्य आहे, अहो पण मामू.. कोणत्या विचारसरणीची गोष्ट तुम्ही करत आहात ? कुठे शायनिंग इंडियाचा नारा देणारी भाजप आणि कुठे शिकलेल्या तरुणांना चौकिदार बनवणारी आताची तुमची भाजप..
 कुठे संघर्ष यात्रा काढणारी मुंडे साहेबांची भाजप आणि कुठे तुमची आताची पदोपदी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणारी भाजप..

 मनसेची विचारसरणी देशाच्या कायद्याला धरुन आहे, किंवा कायद्याचे उल्लंघन करणारयांना धडा शिकवण्यासाठी कायदा हातात घेत असेल आणि सबंधीत जनांना न्याय मिळत असेल तर त्यात वावगं काहीही नाही, मनसेची सुधारनावादी  विचारसरणी आहे, जी सामान्य जनतेला चांगले रस्ते, रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा याची सरकार कडून योग्यरित्या पुर्तता झाली पाहिजे यासाठी कटीबद्ध असते किंवा त्यासाठी सरकारशी झगडत असते.. म्हणून युती होईल की नाही तो नंतरचा प्रश्न, किंवा आमचे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हास शिरसावंद्य, परंतू.. फडणवीस यांच्या सारख्या नेत्यांनी मनसे पक्षाच्या विचारसरणी बद्दल बोलणे म्हणजे निव्वळ जोकच.. 

✍  वाल्मिक पानसरे

No comments:

Post a Comment