Thursday 16 January 2020

महाराष्ट्रात राजकीय सलोख्याचे विसर्जन होतेय का?नवनिर्माण करण्याची गरज आहे का?ऍड. पूजा जगन्नाथ घोरपडे(मुंबई उच्च न्यायालय) यांचा उत्तम लेख.

महाराष्ट्रात राजकीय सलोख्याचे विसर्जन होतेय का?नवनिर्माण करण्याची गरज आहे का?ऍड. पूजा जगन्नाथ घोरपडे(मुंबई उच्च न्यायालय) यांचा उत्तम लेख.
●भिडे गुरुजी vs शिवसेना
●उदयन राजे, शिवेंद्र राजे vs जितेंद्र आव्हाड,संजय राऊत
●कप्तान मलिक vs एकटा पडलेला, फक्त सोशल मिडीवर सपोर्ट असलेला सामन्य मराठी तरुण
●छत्रपती शिवाजी महाराज vs महाविकास आघाडी vs भाजप
●दलाल मीडिया vs भोळी जनता
●भारत vs आर्थिक मंदी
●केंद्र सरकार vs राज्य सरकार
●कार्यकर्ते vs लाचार पक्ष vs लोभी पक्ष
●चांगले मतदार vs मूर्ख मतदार

असे असेल तर या समस्त महाराष्ट्र चे व हिंदुस्थानाचे हाल तर होणारच!

जिथे एक मुद्दा काढून त्या वर राजकारण करत बसायचे, दुसर्याने लगेच त्याला गिरवायचे, अगदी महाराष्ट्र चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या भिक्कार राजकारण्यांनी सोडले नाही! 
लोकांना आता पोट भरायला अन्न नाही! इकडे मंत्री पदा वरून मारामाऱ्या चालू झाल्या। पक्षातील वरीष्ठ कनिष्ठ वर वाद सुरू झाले। नोकऱ्या मध्ये 10 हजार च्या वर पगार नाही! सर्व कंपन्या गुजरातला गेल्या.

लोक संख्या हाता बाहेर गेली,मंडळांना वर्षातून 5000 ची पावती अन 1 दिवसाची पार्टी भेटली की त्यातून दलाल तैयार होतात.भविष्य अडचणीत आहे हे दिसून त्याकडे काना डोळा करतात. सत्ता भोगून या महाराष्ट्राचे लचके अनेकांनी तोडले आहेत.असे एक ना अनेक गंभीर प्रश्न आहेत या महाराष्ट्र समोर.कोणी तरी देव दूत आलाच पाहिजे.

एक सामन्य तरुणी म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहेत.कारण तुम्ही दिलेला उमेदवार हा तुमच्या पक्षाचा एकमेव आमदार झाल्या नंतर शप्पथ घेण्या आधीच कामाला लागतो, असे अजून काही असते तर चित्र वेगळं असतं.तुमच्या बद्दल जास्त अभ्यास नक्कीच नाही मला, पण आज काल कुठे तरी वाटतंय की हा ठाकरे काही तरी करू शकतात.

सत्यवादी राजा हरिश्चंद्र सारखे सत्य पालन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे बोटावर मोजण्या इतके सरदार अन मावळे घेऊन प्रत्येक निवडणूक तुम्ही एकटेच का लढता,(नाही या वाक्यात महाराज व तुमची तुलना कधीच नाही होणार, कारण तुम्ही महाराजांच्या तत्वांवर चालणारे  त्यांचे या विसाव्या युगातील एक मावळेच आहेत असे मी समजते) पक्ष स्थापने पासून हार पहात आलेला एकमेव पक्ष प्रमुख असाल आपण, तरी तत्वांसाठी ना युती ना आघाडी। लाखो मुघलांकडून हिंदवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गनिमी कावा केलाच होता.

असो, 23 तारखेला तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात हे माहीत नाही पण काही तरी वेगळं घडेल अशी अपेक्षा करते!
मा. बाळासाहेबांनी त्या वेळेस महाराष्ट्र ला तारले, त्यावेळेस ची परिस्थिती ही फक्त धार्मिक होती, पण सध्याची परिस्थिती ही आर्थिक व धार्मिक अशी आहे.म्हणून या महाराष्ट्राला आता दुसरे बाळासाहेब नाही तर बाळासाहेब यांची शक्ती घेऊन आलेले पहिले राज साहेब पाहायचे आहे! अन तशी काळाची गरज ही आहे.

आपल्या राजकिय निर्णयाला आमच्या शुभेच्छा!
जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपली
ऍड. पूजा जगन्नाथ घोरपडे,नवी मुंबई (मुंबई उच्च न्यायालय)
९५०३०९५७१०
८६९२९२११४४

5 comments:

  1. छान... अपेक्षा फक्त राज साहेबांकडून पण दलाल मेडिया आणि पत्रकारांकडून कायम साहेबांची बदनामी होत आहे त्याला सामान्य जनता जी जातीपातीच्या राजकारणात अडकली आहे ती बळी पडत आहे.

    ReplyDelete
  2. ताई एकदम छान पण महाराष्ट्रातील मराठी माणूस हा भक्म पणे राजसाहेब यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणे ही काळाची गरज आहे.
    अन्यथा गुजराती, व परप्रांतीय

    महाराष्ट्र राज्याचे लचके तोडून
    आपल्याच राज्यात आपल्याला गुलाम करून ठेवतील
    त्यामुळे महाराष्ट्र राज्य टिकविण्या करिता
    राजसाहेब यांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे

    ReplyDelete
  3. अतिशय वास्तववादी लेख ....
    तुमच्या सारखे शंभर लोक पुढे आले तर नक्की देशाचे आणि महाराष्ट्राचे चित्र बदलेल ...पुढील लेखासाठी शुभेछा !

    ReplyDelete