Saturday 11 January 2020

महाराष्ट्र सैनिकांनी फडकवला भगवा नवा झेंडा

पुणे : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या दरम्यान मनसेचा नवीन #भगवा झेंडा महाराष्ट्र सैनिकांनी स्टेडियम मध्ये फडकावला !

मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार आहे. भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत. दरम्यान मनसे प्रमुख अधिकृत रित्या 23 जानेवारी मनसेच्या महाअधिवेशनात या नवीन झेंड्याची घोषणा करतीलच या आधी काल भारत श्रीलंका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान महाराष्ट्र सैनिकांनी चक्क हा नवीन झेंडा स्टेडियममध्ये फडकावला आहे या झेंड्याची महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे पहावयास मिळत आहे.

मनसेच्या राजकारणाची दिशा बदलणार, पक्षाचा झेंडा भगव्या रंगात दिसणार आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची माहिती मिळत आहे . कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलणार आहेत .मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल.

1 comment:

  1. तसे पाहता हा झेंडा नवीन नाहीये. याच लौंचिंग २०१६ मध्येच झाले आहे. आणि हा शिवजयंती साठी मनसेने बनवला होता.

    ReplyDelete