Sunday 19 January 2020

राज ठाकरेंचा "महाराष्ट्र धर्म" म्हणजे काय?

राज ठाकरेंचा "महाराष्ट्र धर्म" म्हणजे काय?

मनसे संस्थापक व प्रमुख श्री. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्माचा पुन्हा एकदा जाहिर उल्लेख केला, तो ऐकून खुप बर वाटल. मग मनात विचार आला काय आहे नेमका "महाराष्ट्र धर्म" हा हिंदुधर्माहून वेगळा आहे का..? 


मुळात आपल्याकडे धर्म हा Religion या अर्थाने साधारणतः घेतात. पण मी जेव्हा हिंदू धर्म किंवा महाराष्ट्र धर्म म्हणतो तेव्हा धर्म हा शब्द कर्तव्य (Duty) किंवा जिवनपद्धती या अर्थाने असतो.

उदा. रोग्याला उत्तम औषधोपचार करणे हा कुठल्याही डॉक्टरचा धर्म आहे,विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण देणे हा शिक्षकाचा धर्म आहे,
तसेच जनतेचे सर्वांगीन कल्याण करणे व योग्य पद्धतीने राज्यकारभार करणे हा राज्यकर्त्याचा धर्म आहे. 

इथे धर्म या शब्दामद्धे अधिकार, हक्क इत्यादींबरोबर जबाबदाऱ्या आपली निहीत कर्तव्ये हि देखिल तेव्हढीच महत्वाची आहेत. 

थोड भुतकाळात (खरतर हल्ली इतिहासात डोकावायला भितीच वाटते) डोकावुन पाहील तर "महाराष्ट्र धर्म" हे हिंदुधर्माचचं सामाजिक किंवा व्यक्तीगत पातळीवरील अभिव्यक्त रूप आहे हे लक्षात येते. 

काय सांगतो आमचा इतिहास..? कसा आहे आमचा महाराष्ट्र धर्म..? तर तो असा आहे.

१. शेकडो वर्षे उन-पावसात ग्यानबा-तुकाराम म्हणत, राम-कृष्ण म्हणत पंढरीची वारी करणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म."

२. आता विश्वात्मके देवे किंवा चिंता करतो विश्वाची म्हणणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

३. भले तर देऊ कासेची लंगोटी, पण नाथाळाचे माथी हाणू काठी असे ठणकावणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

४. वयाच्या अवघ्या १० व्या-१२ व्या वर्षी स्त्रीचा अपमान किंवा तिच्यावर अत्याचार केला म्हणुन हाथपाय तोडण्याची शिक्षा देऊन ती अंमलात आणणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

५. शत्रूच्या स्त्रीला आपल्या मातेसमान सन्मानाची वागणुक देऊन सुरक्षित पणे तिच्या आपल्या माणसांकडे पाठवणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

६. प्रसंगी शत्रू ला आपल्या कक्षेत बोलावुन त्याचा कोथळा बाहेर काढणं किंवा थेट शत्रूच्या घरात घुसुन त्याची बोटे छाटणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

७. आपल्याच माणसांचा रक्तपात थांबवण्यासाठी प्रसंगी एक पाऊल मागे घेऊन केलेला तह म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

८. आणी... आणी अवघी ३००/३५० माणस सोबत असताना दिल्ली दरबारात अपमान झाल्यावर चढ्या आवाजात भर दरबारात मान वर करून औरंग्याला जाब विचारणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म" 

९. बुरडी घाटावर मरणासन्न अवस्थेत असतानाही बचेंगे तो और भी लढेंगे हि जिद्द दाखवुण तलवार चालवणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

१०. आणि... दिलेला शब्द पाळण्यासाठी उपाशीपोटी लाखभर मराठा योद्ध्यांसमवेत लढता लढता स्वतःला मातीत मिसळुन पानिपतावर मृत्युला कवटाळणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

एक राज ठाकरे प्रेमी

No comments:

Post a Comment