Thursday 9 January 2020

अंतर्गत बदल का नको?मनसेला भाजप सोबत जाणे कितपत परवडणारे आहे...?

चर्चा मनसेच्या बदलाची...!

मनसे झेंड्याचे रंग बदलणार,मनसे भाजप सोबत युती करणार,मनसे अमित ठाकरे ह्यांना सक्रिय राजकारणात आणणार अश्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.सोबत मनसेचे नेते सुद्धा बदलाचे संकेत देत आहेत.

राज ठाकरे आणि मनसेचा समर्थक हा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा ह्या भूमिकेचा चाहता आहे हे नाकारून चालणार नाही.अनेक मराठी तरुण राज ह्यांच्याकडे खुप आशेने पाहत आहेत.

राज ठाकरे हे उत्तम राजकारणी,उत्तम वक्ते,करिष्मा असणारे नेतृत्व आहे हे पूर्ण भारताला माहीत आहे,राज्याबाहेर त्यांचे अनेक चाहते आहेत.पण राजकीय सातत्य नसल्याने अनेक कार्येकर्ते मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत.

राज ठाकरे ह्यांनी चोवीस तास राजकारण करावे,पक्षांतर्गत वेगवेगळ्या संघटनांना कार्यक्रम द्यावेत,संघटन वाढवावे,बदलत्या राजकारण नुसार Y S Jagan Mohan Reddy ह्यांच्यासारखे जनतेत मिसळावे,कार्येकर्त्यांना वेळ द्यावा,संघटनात्मक बदल करावे असे मी सामान्य नागरिक म्हणून मला वाटते.

बदल कोणाला नको असतात अमित ठाकरे राजकारणात येण्याचे कार्येकर्ते मोठ्या उत्साहात स्वागत करतीलच,बदलत्या रंगाचे स्वागत सुद्धा करतील काहीश्या नाराजीसह पण ज्या भाजपच्या विरोधात रान उठवले त्यांच्यासोबत जाणे कार्येकर्त्यांना पटणारे नसेल हे नक्की.

तरीही राज ठाकरे आहेत ते बघू २३ तारखेला कोणती भूमिका घेतात ते.

धन्यवाद
अनोळखी लेखणीतुन✍️

1 comment:

  1. नक्कीच हिंदुत्व पेक्षा महाराष्ट्र धर्म वाट निवडावी. फायदेशीर ठरू शकते.

    ReplyDelete