Wednesday 8 January 2020

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्याकडून सामान्य नागरिक काय अपेक्षा ठेवतो...?

आदरणीय मुख्यमंत्री,सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे,
सस्नेह जय महाराष्ट्र..!

विषय:-सामान्य नागरिक म्हणून काही मागण्या.

१.राज्यात धार्मिक स्थळांना दिली जाणारी मदत तात्काळ थांबवून तीच मदत सरकारी शाळांना देण्यात यावी.

२.राज्यातील खाजगी सुरक्षा यंत्रणा पुर्णपणे बंद करून त्याजागी "महाराष्ट्र सुरक्षा यंत्रणा" सरकारने चालू करावी.त्या यंत्रणेत फक्त आणि फक्त मराठी तरुणांना रोजगार मिळवून द्यावा.

३.प्रत्येक खाजगी कंपनीत ९५ % मराठी तरुण /तरुणी आहेत की नाही ह्याचे सरकारी ऑडिट करून घेऊन तसे नाही आढळल्यास कायदा करून अंमलबजावणी करावी.

४.पर्यटन केंद्र आपल्या महाराष्ट्रात खूपच आहेत,मंत्रिमंडळात नसणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील एक आमदाराला घेऊन एक कमिटी निर्माण करून पर्यटन च्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार आणि पर्यटन उत्पन्न सरकारच्या तिजोरीत कसे येईल ह्याचा विचार करावा.

५."महाराष्ट्र नागरिक कार्ड" चालू करावे,ह्याच्या अंतर्गत प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला एक कार्ड द्यावे,बाहेरून येणाऱ्याला परवानगी कार्ड देण्यात यावे,घुसखोरी थांबेल,स्थानिकांचे रोजगार स्थानिकांना मिळतील.

६.सर्व खरेदी विक्रीच्या ठिकाणी POS सिस्टम चालू करावी,कॅश मध्ये व्यवहार होणार नाहीत,पारदर्शकता येईल,लोकांची लूटमार होणार नाही,सरकारला सरकारचा GST मिळून जाईल,पाकिटमार कॅश नसल्याने कमी होतील,नागरिकांचे खर्चावर नियंत्रण राहील,(अधिकृत फेरीवल्यापासून सर्वांकडेच)

७.प्रत्येक गावात सरकारी खरेदी विक्री केंद्र असावे,त्यात दलाली करणाऱ्यांची दुकाने बंद होऊन शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी होईल आणि राज्यात जशी मागणी तशी त्या जिल्ह्यात रवानगी होईल.शिल्लक राहील तो माल सरकारने EXport करावा.(दलाली शुन्य होऊन,शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील)

८.महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात विक्रीस येणाऱ्या मालाची माहिती घेऊन इम्पोर्ट थांबवून महाराष्ट्रातील उद्योजकांना बाजारात स्थान मिळवून द्यावे.(उदा.अमूल गुजराती ब्रँड ऐवजी गोकुळ आणि इतर संस्थांना ह्या बाजारपेठ उपलब्ध करून द्याव्यात.

९.महिला अर्थिक दृष्टीने सक्षम कश्या होतील ह्यासाठी गृह उद्योग,शासकीय अतिरिक्त कारभारात थेट सहभाग करून घ्यावा ,असे अनेक मुद्दे लक्षात ठेवून त्यावर काम करावे.

१०.मराठी उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.

११.शेतकऱ्याला कर्ज घ्यावेच लागणार नाही ह्यासाठी प्रयत्न करावेत,उदा.योग्य हमीभाव

१२.रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यात आंबा,फणस,काजू इत्यादि कच्चा मालावर काम करणारे प्रोजेक्ट आणावेत.

सामान्य नागरिक म्हणून ह्या मागण्या उद्धवजी ठाकरे ह्यांच्यापर्यंत पोहचवा,share करा,comments करा.

धन्यवाद
✍️अनोळखी लेखणीतून
सामान्य नागरिक

No comments:

Post a Comment