Thursday 23 January 2020

राजमुद्राला विरोध करणाऱ्या बांडगुळ बुद्धीच्या लोकांनी एक प्रसिद्ध पत्रकार अमेय तिरोडकर यांचा लेख वाचवा.

शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती सर्रास वापरतात. अभिमानाने. ही मुद्रा वापरणं चुकीचं असूच शकत नाही. ज्यांनी आपल्याला ओळख दिली त्यांची ओळख अभिमानाने आपल्या सतत सोबत ठेवणं यात काहीच चूक नाही. मनसेने त्यांच्या झेंड्यात शिवमुद्रा आणण्यात म्हणून काहीच गैर नाही. फक्त शिवमुद्रेसोबत एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावर येते आहे याचं भान मनसेने असू द्यावं.

हि जबाबदारी प्रामुख्याने विचारांची आहे. मनसे झेंड्यासोबत विचार पण बदलणार असं म्हटलं जातंय. तसं होतं की नाही हे संध्याकाळी राज ठाकरेंच्या भाषणानंतर समजेल. पण त्यांची जी क्लिप फिरतेय त्यात हिंदुत्व वगैरे उल्लेख आहे.

शिवाजी महाराजांचं राज्य हिंदवी स्वराज्य होतं. हिंदवी ही भौगोलिक संकल्पना आहे. हिंदुत्ववादी स्वराज्य नव्हतं. हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे.

हिंदुत्व ही प्रतिक्रिया आहे. युरोपातल्या फॅसिस्ट विचार प्रणालीनुसार आपल्याकडेही हिंदू धर्माची मांडणी झाली पाहिजे असं वाटणा-यांनी ती केली आहे. यात सावरकर प्रमुख. आज मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांचा फोटो दिसला. आणि प्रबोधनकारांचा पण! प्रबोधनकारांनी ब्राम्हणी हिंदुत्वाबद्दल शेलक्या शब्दांत काय लिहून ठेवलं आहे ते प्रत्येकाने स्वतःच शोधून वाचावं. मग हे दोन्ही फोटो एकाच रांगेत ठेवण्याचा भोंगळपणा लक्षात येईल.

राज ठाकरे शिवमुद्रेसोबत 'हिंदवी' राज्याच्या दिशेने जाणार असतील तर ते स्वागतार्ह आहे. 'हिंदुत्वा'च्या दिशेने जाणार असतील तर शिवरायांच्या विचारांचा पुन्हा एकदा चुकीचा अर्थ काढला गेला असं म्हणावं लागेल.

शिवरायांचं राज्य हे सगळ्यांचं होतं. त्यात जश्या सगळ्या जातींच्या लोकांना स्पेस होती तशीच धर्माच्याही होती. मुळात शिवकालीन संघर्ष हा धार्मिक नव्हताच. तो राजकीय होता. त्यामुळे शिवरायांच्या विरोधात अनेक हिंदू सरदार लढले आणि शिवरायांच्या बाजूने अनेक मुस्लिम सरदार लढले. आजच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित हिंदू विरुद्ध मुस्लिम चष्म्यातून शिवकालीन संघर्ष बघणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणं. राज ठाकरेंनी ते करू नये.

यात दुसरा मुद्दा आहे. भाजपला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेनेची मदत हवी होती. यातून तब्बल पंचवीस वर्षं मान अपमान गिळून भाजप 'धाकटी' होऊन राहिली. २०१४ ला संधी मिळाली तशी 'थोरली' झाली. आणि आता या जुन्या नातेसंबंधातली नवी पोझिशन म्हणजे आपलं थोरलेपण टिकावं म्हणून राज्याच्या सत्तेवर पाणी सोडती झाली!

बाळासाहेबांना भाजपच्या ह्या धूर्तपणाचा पुरता अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी भाजप सेना संबंधात कधी आपला 'अप्पर हॅन्ड' सोडला नाही. उद्धव यांची २०१४ ला मजबुरी झाली पण संधी मिळताच भाजपची खोड त्यांनी २०१९ ला मोडली.

भाजपला हाच वेग कायम राहिला तरी एकहाती महाराष्ट्र जिंकायला अजून काही काळ जावा लागेल. तोवर त्यांना राज्यात एका सशक्त 'धाकल्या'ची गरज आहे. राज यांना ही स्पेस खुणावत आहे का हा माझ्या सारख्यासमोर प्रश्न आहे. जर असं झालं तर राज जे काही 'महाराष्ट्र धर्म' वगैरे बोलत आहेत त्यांच्याशीही प्रतारणा ठरेल आणि त्या 'शिवमुद्रे'सोबतही!

त्यामुळे मराठी मतांसाठीचा हा राज यांचा नवा प्रयोग, प्रयत्न बारकाईने बघितला पाहिजे. जर तो 'हिंदवी' दिशेने गेला तर आनंद, जर तो 'हिंदुत्व' दिशेने गेला तर मात्र क्लेशदायक.

प्रयोग करून बघत राहणं हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं. त्यातच वाढीच्या शक्यता असतात. आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रांना हे लागू आहे. राजकारणालाही. चांगला नेता प्रयोग करण्याची हिंमत दाखवतोच. राज यांनी ती दाखवली आहे म्हणून कौतुक. पण हा प्रयोग करताना धार्मिक राजकारणाची धोकादायक रेषा ते ओलांडणार तर नाहीत ना, ही काळजी!

by Amey Tirodkar

Sunday 19 January 2020

राज ठाकरेंचा "महाराष्ट्र धर्म" म्हणजे काय?

राज ठाकरेंचा "महाराष्ट्र धर्म" म्हणजे काय?

मनसे संस्थापक व प्रमुख श्री. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्माचा पुन्हा एकदा जाहिर उल्लेख केला, तो ऐकून खुप बर वाटल. मग मनात विचार आला काय आहे नेमका "महाराष्ट्र धर्म" हा हिंदुधर्माहून वेगळा आहे का..? 


मुळात आपल्याकडे धर्म हा Religion या अर्थाने साधारणतः घेतात. पण मी जेव्हा हिंदू धर्म किंवा महाराष्ट्र धर्म म्हणतो तेव्हा धर्म हा शब्द कर्तव्य (Duty) किंवा जिवनपद्धती या अर्थाने असतो.

उदा. रोग्याला उत्तम औषधोपचार करणे हा कुठल्याही डॉक्टरचा धर्म आहे,विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण देणे हा शिक्षकाचा धर्म आहे,
तसेच जनतेचे सर्वांगीन कल्याण करणे व योग्य पद्धतीने राज्यकारभार करणे हा राज्यकर्त्याचा धर्म आहे. 

इथे धर्म या शब्दामद्धे अधिकार, हक्क इत्यादींबरोबर जबाबदाऱ्या आपली निहीत कर्तव्ये हि देखिल तेव्हढीच महत्वाची आहेत. 

थोड भुतकाळात (खरतर हल्ली इतिहासात डोकावायला भितीच वाटते) डोकावुन पाहील तर "महाराष्ट्र धर्म" हे हिंदुधर्माचचं सामाजिक किंवा व्यक्तीगत पातळीवरील अभिव्यक्त रूप आहे हे लक्षात येते. 

काय सांगतो आमचा इतिहास..? कसा आहे आमचा महाराष्ट्र धर्म..? तर तो असा आहे.

१. शेकडो वर्षे उन-पावसात ग्यानबा-तुकाराम म्हणत, राम-कृष्ण म्हणत पंढरीची वारी करणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म."

२. आता विश्वात्मके देवे किंवा चिंता करतो विश्वाची म्हणणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

३. भले तर देऊ कासेची लंगोटी, पण नाथाळाचे माथी हाणू काठी असे ठणकावणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

४. वयाच्या अवघ्या १० व्या-१२ व्या वर्षी स्त्रीचा अपमान किंवा तिच्यावर अत्याचार केला म्हणुन हाथपाय तोडण्याची शिक्षा देऊन ती अंमलात आणणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

५. शत्रूच्या स्त्रीला आपल्या मातेसमान सन्मानाची वागणुक देऊन सुरक्षित पणे तिच्या आपल्या माणसांकडे पाठवणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

६. प्रसंगी शत्रू ला आपल्या कक्षेत बोलावुन त्याचा कोथळा बाहेर काढणं किंवा थेट शत्रूच्या घरात घुसुन त्याची बोटे छाटणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

७. आपल्याच माणसांचा रक्तपात थांबवण्यासाठी प्रसंगी एक पाऊल मागे घेऊन केलेला तह म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

८. आणी... आणी अवघी ३००/३५० माणस सोबत असताना दिल्ली दरबारात अपमान झाल्यावर चढ्या आवाजात भर दरबारात मान वर करून औरंग्याला जाब विचारणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म" 

९. बुरडी घाटावर मरणासन्न अवस्थेत असतानाही बचेंगे तो और भी लढेंगे हि जिद्द दाखवुण तलवार चालवणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

१०. आणि... दिलेला शब्द पाळण्यासाठी उपाशीपोटी लाखभर मराठा योद्ध्यांसमवेत लढता लढता स्वतःला मातीत मिसळुन पानिपतावर मृत्युला कवटाळणे म्हणजे "महाराष्ट्र धर्म"

एक राज ठाकरे प्रेमी

Thursday 16 January 2020

महाराष्ट्रात राजकीय सलोख्याचे विसर्जन होतेय का?नवनिर्माण करण्याची गरज आहे का?ऍड. पूजा जगन्नाथ घोरपडे(मुंबई उच्च न्यायालय) यांचा उत्तम लेख.

महाराष्ट्रात राजकीय सलोख्याचे विसर्जन होतेय का?नवनिर्माण करण्याची गरज आहे का?ऍड. पूजा जगन्नाथ घोरपडे(मुंबई उच्च न्यायालय) यांचा उत्तम लेख.
●भिडे गुरुजी vs शिवसेना
●उदयन राजे, शिवेंद्र राजे vs जितेंद्र आव्हाड,संजय राऊत
●कप्तान मलिक vs एकटा पडलेला, फक्त सोशल मिडीवर सपोर्ट असलेला सामन्य मराठी तरुण
●छत्रपती शिवाजी महाराज vs महाविकास आघाडी vs भाजप
●दलाल मीडिया vs भोळी जनता
●भारत vs आर्थिक मंदी
●केंद्र सरकार vs राज्य सरकार
●कार्यकर्ते vs लाचार पक्ष vs लोभी पक्ष
●चांगले मतदार vs मूर्ख मतदार

असे असेल तर या समस्त महाराष्ट्र चे व हिंदुस्थानाचे हाल तर होणारच!

जिथे एक मुद्दा काढून त्या वर राजकारण करत बसायचे, दुसर्याने लगेच त्याला गिरवायचे, अगदी महाराष्ट्र चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या भिक्कार राजकारण्यांनी सोडले नाही! 
लोकांना आता पोट भरायला अन्न नाही! इकडे मंत्री पदा वरून मारामाऱ्या चालू झाल्या। पक्षातील वरीष्ठ कनिष्ठ वर वाद सुरू झाले। नोकऱ्या मध्ये 10 हजार च्या वर पगार नाही! सर्व कंपन्या गुजरातला गेल्या.

लोक संख्या हाता बाहेर गेली,मंडळांना वर्षातून 5000 ची पावती अन 1 दिवसाची पार्टी भेटली की त्यातून दलाल तैयार होतात.भविष्य अडचणीत आहे हे दिसून त्याकडे काना डोळा करतात. सत्ता भोगून या महाराष्ट्राचे लचके अनेकांनी तोडले आहेत.असे एक ना अनेक गंभीर प्रश्न आहेत या महाराष्ट्र समोर.कोणी तरी देव दूत आलाच पाहिजे.

एक सामन्य तरुणी म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहेत.कारण तुम्ही दिलेला उमेदवार हा तुमच्या पक्षाचा एकमेव आमदार झाल्या नंतर शप्पथ घेण्या आधीच कामाला लागतो, असे अजून काही असते तर चित्र वेगळं असतं.तुमच्या बद्दल जास्त अभ्यास नक्कीच नाही मला, पण आज काल कुठे तरी वाटतंय की हा ठाकरे काही तरी करू शकतात.

सत्यवादी राजा हरिश्चंद्र सारखे सत्य पालन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे बोटावर मोजण्या इतके सरदार अन मावळे घेऊन प्रत्येक निवडणूक तुम्ही एकटेच का लढता,(नाही या वाक्यात महाराज व तुमची तुलना कधीच नाही होणार, कारण तुम्ही महाराजांच्या तत्वांवर चालणारे  त्यांचे या विसाव्या युगातील एक मावळेच आहेत असे मी समजते) पक्ष स्थापने पासून हार पहात आलेला एकमेव पक्ष प्रमुख असाल आपण, तरी तत्वांसाठी ना युती ना आघाडी। लाखो मुघलांकडून हिंदवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गनिमी कावा केलाच होता.

असो, 23 तारखेला तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात हे माहीत नाही पण काही तरी वेगळं घडेल अशी अपेक्षा करते!
मा. बाळासाहेबांनी त्या वेळेस महाराष्ट्र ला तारले, त्यावेळेस ची परिस्थिती ही फक्त धार्मिक होती, पण सध्याची परिस्थिती ही आर्थिक व धार्मिक अशी आहे.म्हणून या महाराष्ट्राला आता दुसरे बाळासाहेब नाही तर बाळासाहेब यांची शक्ती घेऊन आलेले पहिले राज साहेब पाहायचे आहे! अन तशी काळाची गरज ही आहे.

आपल्या राजकिय निर्णयाला आमच्या शुभेच्छा!
जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपली
ऍड. पूजा जगन्नाथ घोरपडे,नवी मुंबई (मुंबई उच्च न्यायालय)
९५०३०९५७१०
८६९२९२११४४

Monday 13 January 2020

गजानन काळे आंदोलनाचे बादशहा..!

गजानन काळे आंदोलनाचे बादशहा..!

गजानन काळे ह्यांना व्यक्तिशः कधी भेटलो नाही,पण त्यांच्या आंदोलनानांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.ह्या माणसाची स्वतःला लोकांसमोर प्रेसेंट करण्याची एक वेगळी पद्धत आहे हे त्यांच्या आंदोलनांतून दिसून येते.

गजानन काळे ह्यांच्या बाबत थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यापर्यंत काही पोचलो नाही,स्वतः त्यांच्याकडून ऐकण्यापेक्षा समाज माध्यमातून थोडी माहिती घेतली.काळे ह्यांचा पिंडच मुळी विद्यार्थी आणि आंदोलनातून तयार झालेला आहे.मनसे पक्षात त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे.

वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने हे त्यांचे वैशिष्ट्य आहे,त्यांनी आजपर्यंत महानगरपालिका कार्यालयावर अनेक समस्याबाबत आंदोलने केली पण त्यांनी सर्व आंदोलने वेगवेगळ्या प्रकारे हाताळली.

त्यांना पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा..💐

✍️ अनोळखी लेखणीतून

Saturday 11 January 2020

महाराष्ट्र सैनिकांनी फडकवला भगवा नवा झेंडा

पुणे : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या दरम्यान मनसेचा नवीन #भगवा झेंडा महाराष्ट्र सैनिकांनी स्टेडियम मध्ये फडकावला !

मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार आहे. भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत. दरम्यान मनसे प्रमुख अधिकृत रित्या 23 जानेवारी मनसेच्या महाअधिवेशनात या नवीन झेंड्याची घोषणा करतीलच या आधी काल भारत श्रीलंका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान महाराष्ट्र सैनिकांनी चक्क हा नवीन झेंडा स्टेडियममध्ये फडकावला आहे या झेंड्याची महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे पहावयास मिळत आहे.

मनसेच्या राजकारणाची दिशा बदलणार, पक्षाचा झेंडा भगव्या रंगात दिसणार आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची माहिती मिळत आहे . कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलणार आहेत .मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल.

Friday 10 January 2020

खरं तर फडणविस, तावडे, शेलार ही मंडळी म्हणजे राज ठाकरे यांच्यासाठी "कालची पोरं" ..?

आपल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात नुसते जोक करुन आणि लोकांच्या करमणूकिचा विषय ठरलेले  मामू फडणविस काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले आणि सोशल आणि इलेक्ट्रॉनिक मेडीयावर चर्चेचे एकच काहूर माजले की आता मनसे भाजप युती होणार, वैगरे-वैगरे.. लागलीच त्यावर स्वत: फडणविस यांनी स्पष्टीकरणही दिले की मनसे-भाजप युती आता सध्या शक्य नाही, त्यासाठी मनसेला विचारसरणीत बदल करायला हवा..

पण आम्हाला एक कळत नाही, मनसेचे नेते, पदाधिकारी तर नव्हते गेलेत ना भाजपच्या दारात कटोरा घेऊन..? हे स्वत: येतात आणि नंतर अशा वल्गना करतात.

खरं तर फडणविस, तावडे, शेलार ही मंडळी म्हणजे राज ठाकरे यांच्यासाठी "कालची पोरं"  १९९५ चे युती सरकार जेव्हा राज ठाकरे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चालवत होते तेव्हा ते अटलजी, आडवानीजी, मुंडे, महाजन, गडकरी आदी नेत्यांशी ते चर्चा करत असे.. म्हणून या "कालच्या पोरांनी" याचा विसर पडू देऊ नये.

फडणविस यांनी काल एक जोक केला ते म्हणाले की मनसेने आपल्या विचारसरणीत बदल केला तर भविष्यात युती शक्य आहे, अहो पण मामू.. कोणत्या विचारसरणीची गोष्ट तुम्ही करत आहात ? कुठे शायनिंग इंडियाचा नारा देणारी भाजप आणि कुठे शिकलेल्या तरुणांना चौकिदार बनवणारी आताची तुमची भाजप..
 कुठे संघर्ष यात्रा काढणारी मुंडे साहेबांची भाजप आणि कुठे तुमची आताची पदोपदी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणारी भाजप..

 मनसेची विचारसरणी देशाच्या कायद्याला धरुन आहे, किंवा कायद्याचे उल्लंघन करणारयांना धडा शिकवण्यासाठी कायदा हातात घेत असेल आणि सबंधीत जनांना न्याय मिळत असेल तर त्यात वावगं काहीही नाही, मनसेची सुधारनावादी  विचारसरणी आहे, जी सामान्य जनतेला चांगले रस्ते, रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा याची सरकार कडून योग्यरित्या पुर्तता झाली पाहिजे यासाठी कटीबद्ध असते किंवा त्यासाठी सरकारशी झगडत असते.. म्हणून युती होईल की नाही तो नंतरचा प्रश्न, किंवा आमचे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हास शिरसावंद्य, परंतू.. फडणवीस यांच्या सारख्या नेत्यांनी मनसे पक्षाच्या विचारसरणी बद्दल बोलणे म्हणजे निव्वळ जोकच.. 

✍  वाल्मिक पानसरे

Thursday 9 January 2020

अंतर्गत बदल का नको?मनसेला भाजप सोबत जाणे कितपत परवडणारे आहे...?

चर्चा मनसेच्या बदलाची...!

मनसे झेंड्याचे रंग बदलणार,मनसे भाजप सोबत युती करणार,मनसे अमित ठाकरे ह्यांना सक्रिय राजकारणात आणणार अश्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.सोबत मनसेचे नेते सुद्धा बदलाचे संकेत देत आहेत.

राज ठाकरे आणि मनसेचा समर्थक हा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा ह्या भूमिकेचा चाहता आहे हे नाकारून चालणार नाही.अनेक मराठी तरुण राज ह्यांच्याकडे खुप आशेने पाहत आहेत.

राज ठाकरे हे उत्तम राजकारणी,उत्तम वक्ते,करिष्मा असणारे नेतृत्व आहे हे पूर्ण भारताला माहीत आहे,राज्याबाहेर त्यांचे अनेक चाहते आहेत.पण राजकीय सातत्य नसल्याने अनेक कार्येकर्ते मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत.

राज ठाकरे ह्यांनी चोवीस तास राजकारण करावे,पक्षांतर्गत वेगवेगळ्या संघटनांना कार्यक्रम द्यावेत,संघटन वाढवावे,बदलत्या राजकारण नुसार Y S Jagan Mohan Reddy ह्यांच्यासारखे जनतेत मिसळावे,कार्येकर्त्यांना वेळ द्यावा,संघटनात्मक बदल करावे असे मी सामान्य नागरिक म्हणून मला वाटते.

बदल कोणाला नको असतात अमित ठाकरे राजकारणात येण्याचे कार्येकर्ते मोठ्या उत्साहात स्वागत करतीलच,बदलत्या रंगाचे स्वागत सुद्धा करतील काहीश्या नाराजीसह पण ज्या भाजपच्या विरोधात रान उठवले त्यांच्यासोबत जाणे कार्येकर्त्यांना पटणारे नसेल हे नक्की.

तरीही राज ठाकरे आहेत ते बघू २३ तारखेला कोणती भूमिका घेतात ते.

धन्यवाद
अनोळखी लेखणीतुन✍️

Wednesday 8 January 2020

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्याकडून सामान्य नागरिक काय अपेक्षा ठेवतो...?

आदरणीय मुख्यमंत्री,सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे,
सस्नेह जय महाराष्ट्र..!

विषय:-सामान्य नागरिक म्हणून काही मागण्या.

१.राज्यात धार्मिक स्थळांना दिली जाणारी मदत तात्काळ थांबवून तीच मदत सरकारी शाळांना देण्यात यावी.

२.राज्यातील खाजगी सुरक्षा यंत्रणा पुर्णपणे बंद करून त्याजागी "महाराष्ट्र सुरक्षा यंत्रणा" सरकारने चालू करावी.त्या यंत्रणेत फक्त आणि फक्त मराठी तरुणांना रोजगार मिळवून द्यावा.

३.प्रत्येक खाजगी कंपनीत ९५ % मराठी तरुण /तरुणी आहेत की नाही ह्याचे सरकारी ऑडिट करून घेऊन तसे नाही आढळल्यास कायदा करून अंमलबजावणी करावी.

४.पर्यटन केंद्र आपल्या महाराष्ट्रात खूपच आहेत,मंत्रिमंडळात नसणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील एक आमदाराला घेऊन एक कमिटी निर्माण करून पर्यटन च्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार आणि पर्यटन उत्पन्न सरकारच्या तिजोरीत कसे येईल ह्याचा विचार करावा.

५."महाराष्ट्र नागरिक कार्ड" चालू करावे,ह्याच्या अंतर्गत प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला एक कार्ड द्यावे,बाहेरून येणाऱ्याला परवानगी कार्ड देण्यात यावे,घुसखोरी थांबेल,स्थानिकांचे रोजगार स्थानिकांना मिळतील.

६.सर्व खरेदी विक्रीच्या ठिकाणी POS सिस्टम चालू करावी,कॅश मध्ये व्यवहार होणार नाहीत,पारदर्शकता येईल,लोकांची लूटमार होणार नाही,सरकारला सरकारचा GST मिळून जाईल,पाकिटमार कॅश नसल्याने कमी होतील,नागरिकांचे खर्चावर नियंत्रण राहील,(अधिकृत फेरीवल्यापासून सर्वांकडेच)

७.प्रत्येक गावात सरकारी खरेदी विक्री केंद्र असावे,त्यात दलाली करणाऱ्यांची दुकाने बंद होऊन शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी होईल आणि राज्यात जशी मागणी तशी त्या जिल्ह्यात रवानगी होईल.शिल्लक राहील तो माल सरकारने EXport करावा.(दलाली शुन्य होऊन,शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील)

८.महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात विक्रीस येणाऱ्या मालाची माहिती घेऊन इम्पोर्ट थांबवून महाराष्ट्रातील उद्योजकांना बाजारात स्थान मिळवून द्यावे.(उदा.अमूल गुजराती ब्रँड ऐवजी गोकुळ आणि इतर संस्थांना ह्या बाजारपेठ उपलब्ध करून द्याव्यात.

९.महिला अर्थिक दृष्टीने सक्षम कश्या होतील ह्यासाठी गृह उद्योग,शासकीय अतिरिक्त कारभारात थेट सहभाग करून घ्यावा ,असे अनेक मुद्दे लक्षात ठेवून त्यावर काम करावे.

१०.मराठी उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.

११.शेतकऱ्याला कर्ज घ्यावेच लागणार नाही ह्यासाठी प्रयत्न करावेत,उदा.योग्य हमीभाव

१२.रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यात आंबा,फणस,काजू इत्यादि कच्चा मालावर काम करणारे प्रोजेक्ट आणावेत.

सामान्य नागरिक म्हणून ह्या मागण्या उद्धवजी ठाकरे ह्यांच्यापर्यंत पोहचवा,share करा,comments करा.

धन्यवाद
✍️अनोळखी लेखणीतून
सामान्य नागरिक

मराठी व्यावसायिक मराठीचा वापर कधी करणार?

मराठी व्यवसायिकांचे स्वागत करायला हवेच...!
सर्व मराठी व्यवसायिकांना शुभेच्छा ...💐

मी Technical support Executive (L1) म्हणून कामाला सुरवात केली काम तसं फिरतीचे असल्याने जिथे कॉल असतील तिकडे जावे लागत असे.प्रवासातील थकवा,मरगळ घालवण्यासाठी टपरीवर चहा पिण्याची सवय लागली.आता त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे आणि उन्हा पावसातून केलेली मेहनत म्हणून काय माहीत नाही आता एक खाजगी कंपनीत नोकरी सुद्धा छान लागली आहे ह्याचे समाधान आहे.

परिस्थिती नुसार आजूबाजूचा मित्रपरिवार सुद्धा बदलत गेला,कधी मराठी तर कधी अमराठी मित्र भेटत गेले सर्वांशीच स्नेहसंबंध जोडण्याचे प्रयत्न केले.पण काही कडवट मराठी मित्र भेटले त्यांचे नाव नमूद करत नाही कारण त्यांना अजिबात कुठेही प्रसिद्धी केलेली आवडत नाही.त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या मनात खोलवर शिरकाव करत गेल्या.

रोजच्या व्यवहारात कोणतीही वस्तू घेण्याची गरज भासली तर ती मराठी व्यवसायिक कडूनच घे एक दोन रुपये जास्त गेले तरी चालतील आणि फावल्या वेळेत मराठी व्यवसायिक आपल्या घराच्या बाजूला शोधून ठेव त्यांची Mouth Publicity कर म्हणजेच आपल्या मराठी समाजाला त्या दुकान बाबत माहिती दे.बदल लगेच घडेल असे नाही काही वेळ वेळेनुसार चालवावे लागते पण प्रयत्न असतात की मराठीला प्राधान्य देण्याचे.

पुन्हा आपण चहाकडे जाऊया,चहाची सवय आहे पण प्रमाण कमी झालेय मग कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त जेंव्हा काही कामानिमित्त बाहेर पडतो तेंव्हा चहा म्हणून येवले ह्यासारखे अनेक मराठी व्यावसायिक उतरलेत चहा उद्योगात त्यांच्या दुकानात भेट होते.

मागील दोन वेळी अंधेरी आणि फोर्ट येथील येवले व्यवसायिक ह्यांच्या दुकानात भेट दिली तर तेथील मराठी कर्मचारी हिंदीला प्राथमिकता देऊन ग्राहकांशी हिंदीत बोलायला लागत असे निदर्शनास आले,मी दोन्ही ठिकाणी त्याना समज दिली तरीही मुंबईत हे प्रकार चालू आहेत हे थांबायला पाहिजेत माझ्यासारखे अनेक मराठी ग्राहक जर मराठी व्यावसायिक म्हणून आपण त्यांच्याकडे जात असू आणि त्यांच्याकडून हिंदी कानावर पडणार असेल तर मग मराठी व्यवसायिकांकडे आपण का जायचे?

धन्यवाद