Thursday, 14 September 2017

विरोध बुलेट ट्रेन चा

विरोध बुलेट ट्रेन चा
हो मी बुलेट ट्रेन चा विरोध करतो त्याचे कारण बघायला गेलो तर खूप आहेत,बुलेट ट्रेन ला खूप छान पर्याय आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लोहमार्गाने जोडणे आणि जिल्ह्याच्या मध्यभागी शेतमाल साठवणुकीची सोय करणे.प्रत्येक लोहमार्गावर मालगाडी फिरली पाहिजे,जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य ती दळणवळणाची सोय उपलब्ध होईल.

समजा हा लोहमार्गचा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर आणि सरकारने प्रत्येक जिल्याच्या मध्य भागी रेल्वे स्थानकावर सरकारी खरेदी विक्री केंद्र उभारले तर शेतकरी जिल्ह्यातील जेवढा संपेल तेवढा माल विकून राहिलेला माल दुसऱ्या जिल्ह्यात ,राज्यात आणि दुसऱ्या देशात पाठवायला सरकारी खरेदी-विक्री केंद्रावर स्वतः आणून घालेल न त्याला योग्य भाव मिळेल जो मध्यस्थींकडून आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडून मिळतो त्यापेक्षा जास्त. समजा रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकतो,मग तो मध्यस्थी आणि मोठे व्यापारी असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मिळणाऱ्या किंमतीत भरमसाठ वाढ होते,मूळ शेतकऱ्याला मात्र कवडीमोल भावाने त्याचे पैसे मिळतात.जर सरकारने लोहमार्गच जाळ निर्माण केलं तर शेतकरी प्रत्तेक जिल्ह्यात सरकारी खरेदी केंद्र स्थानिक जिल्ह्यात विकून राहिलेला माल सरकारी खरेदी विक्री केंद्रावर घालू शकेल.पण हा शेतकरी जे काय विक्री करण्यासाठी पिकवेल ते सरकार ला विकत घेणे बंधन कारक असेल.
बुलेट ट्रेन मध्ये जेवढं केंद्र सरकार आणि राज्य सरकार पैसे घालेल त्याहून किती तरी पटीने कमी खर्च या लोहमार्गाला येईल.या सगळ्यात झाला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ शक्ती यात काहीच दुमत नाही.

या मध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते , शेतकऱ्यानांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते ,दळण वळण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उद्योगधंदे उभे राहू शकतात.
✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद
https://matchmindperfect.blogspot.com

Wednesday, 6 September 2017

पितृपक्ष

पितृपक्षात जो काही एक दिवसाचा खर्च होतो तो सगळा खर्च एखाद्या वृद्धाश्रमाला द्या वरती गेलेल्यांसाठी बनवण्यापेक्षा खाली जे वृद्धाश्रमात आहेत ते आजी आजोबा खातील.. ...

पचायला खुप कंठीण आहे

Thursday, 24 August 2017

चांगले वाईट काम आणि जातीचे लेबल

कोणत्याही चांगल्या किंव्हा वाईट कार्याला जातीचा , धर्माचा लेबल लावू नका प्रत्येक जण त्या ठिकाणे स्वतःच्या कर्माने पोहचलेला असतो .

चांगलं कार्य केलंत तर तोच धर्म, जात डोक्यावर घेतील पण चुकीचं एक जरी कार्य चुकून तुमच्या हातून घडलं तर हेच लोक तुम्हाला जाती धर्मातून बाजूला करायला मागे पुढे पाहणार नाहीत .

सगळ्यांचा आदर करा तुमचा आदर नक्कीच केला जाईल....!!!!!

मराठी सण आणि त्यांची गळचेपी

मला कुणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही आहेत , दुखावल्या गेल्या तर अगोदरच माफी मागून ठेवतो.

आता येणाऱ्या पारशी नववर्षाला बँकांना सुट्टी आहे, सरकारी सुट्टी म्हणून ती घोषित केली आहे , या पारशी धर्मातील लोक हे व्यावसायिक आहेत ते मूळचे इराण चे आहे आपली व्यावसायिक बुद्धीचा वापर करून त्यांनी भारत हि बाजारपेठ येणाऱ्या काळात आपल्या व्यावसायिकाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे . हे समजून त्यांनी आपली मुहूर्तमेढ भारतात रोवली .

हे लोक नोकरदार नाहीत, सगळे व्यावसायिक आहेत तर त्यांच्या नवीन वर्षाच्या दिवशी स्वतःचे व्यवसाय बंद ठेवतील त्यासाठी बँक , सरकारी कार्यालये बंद ठेवायची काय गरज आहे ?

स्थानिक लोकांना त्यांचे जेंव्हा सण असतात तेंव्हा मात्र सगळं चालू ठेवता ,हे असं का ?.कालच रक्षा बंधन होती किती स्थानिक बंधू भगिनींना आपल्या नोकरीतून धावपळ करून असे सण साजरे करावे लागतात.

त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे पारशी नूतन वर्षाची सुट्टी हि बँकांना (सरकारी कार्यालयच माहित नाही ) फक्त महाराष्ट्रात आहे , 

याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटत .

Wednesday, 23 August 2017

मराठी भाषेवरचा माझा पहिला लेख....

मराठी भाषेवरचा माझा पहिला लेख....

मराठी मध्ये का बोलावे????

१.मराठी तुमची संभाषणाची भाषा असल्यामुळे ती बोलताना विचार करावा लागत नाही.
२.समोरचा अमराठी असला तर त्याला हि कळते कि आपण आपल्या भाषेवर किती प्रेम करतो.
३.समोरच्याशी आपण शुद्ध ,संयमी मराठी भाषेत बोलणार तर त्यातून तुमच्यावर झालेले संस्कार दिसून येतात
४.आपण आपल्या राज्यात आहोत याचे तुम्हाला हि भान होईल.
५.तुम्ही मराठी बोलल्या मुळे मराठी तरुणांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल.
६.आपण जास्तीत जास्त मराठी बोलल्यामुळे देश पातळी वर आपल्या भाषेचा दर्जा वाढेल.