Thursday 24 August 2017

मराठी सण आणि त्यांची गळचेपी

मला कुणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही आहेत , दुखावल्या गेल्या तर अगोदरच माफी मागून ठेवतो.

आता येणाऱ्या पारशी नववर्षाला बँकांना सुट्टी आहे, सरकारी सुट्टी म्हणून ती घोषित केली आहे , या पारशी धर्मातील लोक हे व्यावसायिक आहेत ते मूळचे इराण चे आहे आपली व्यावसायिक बुद्धीचा वापर करून त्यांनी भारत हि बाजारपेठ येणाऱ्या काळात आपल्या व्यावसायिकाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे . हे समजून त्यांनी आपली मुहूर्तमेढ भारतात रोवली .

हे लोक नोकरदार नाहीत, सगळे व्यावसायिक आहेत तर त्यांच्या नवीन वर्षाच्या दिवशी स्वतःचे व्यवसाय बंद ठेवतील त्यासाठी बँक , सरकारी कार्यालये बंद ठेवायची काय गरज आहे ?

स्थानिक लोकांना त्यांचे जेंव्हा सण असतात तेंव्हा मात्र सगळं चालू ठेवता ,हे असं का ?.कालच रक्षा बंधन होती किती स्थानिक बंधू भगिनींना आपल्या नोकरीतून धावपळ करून असे सण साजरे करावे लागतात.

त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे पारशी नूतन वर्षाची सुट्टी हि बँकांना (सरकारी कार्यालयच माहित नाही ) फक्त महाराष्ट्रात आहे , 

याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटत .

No comments:

Post a Comment