Tuesday 1 December 2020

३० नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ३० नोव्हेंबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे - कामगार सेना ◆ कार्यालय उद्घाटन◆ माहीम(मुंबई)
मनसे कामगार सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज माहीम येथे सौ.शर्मिला राजसाहेब ठाकरे आणि श्री अमित राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते झाले.यावेळी मनसे कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

मनसे◆ पक्षप्रवेश ◆ कल्याण(ठाणे)
कल्याण तालुका अध्यक्ष श्री अश्विन भोईर ह्यांच्या नेतृत्वाखाली  "म्हारळ" गावातील तरुणांनी आज मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ बीड
बीड जिल्ह्यातील पेठ बीड,पुनर्वसन कॉलनी येथील अनेक तरुणांनी मनसे राज्य उपाध्यक्ष श्री अशोक तावरे, जिल्हा अध्यक्ष श्री वैभव काकडे ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ नागपूर
उत्तर नागपूर येथील नारी रोड मानस मंदिर चौक येथे विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी मनसे नेते श्री हेमंत गडकरी ,शहराध्यक्ष अजय डोके महिला सेना अध्यक्षा संगीता सोनटक्के यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ ठाणे
ठाणे मनपा प्रभाग क्रमांक  ४(नळपाडा,कापूरबावडी) येथील तरुणांनी आज मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव,ठाणे शहर अध्यक्ष श्री रविंद्र मोरे ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.



मनसे ◆ निवेदन ◆ नवी मुंबई (ठाणे)
नवी मुंबई येथे घरातील एक सदस्याची कोरोना टेस्ट करून इतर सदस्यांच्या टेस्ट केल्या असे दाखवून मोठा भ्रष्टाचार होत होता,संबंधित अधिकारी निलंबित झाला असला तरी सदर बाब गंभीर आहे,ह्याची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेचे शहर अध्यक्ष श्री गजानन काळे ह्यांनी आयुक्तांकडे केली.

मनसे ◆ निवेदन ◆गुहागर(रत्नागिरी )
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी ते ओंकार मंगल कार्यालय रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नागरिकांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,रस्ता दुरुस्ती करण्यात यावा यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष श्री विनोद जानवळकर ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदाराला निवेदन दिले. 

मनसे ◆ मागणी ◆ कल्याण डोंबिवली(ठाणे)
दिशा कायदा राज्यात लवकरात लवकर लागू करा अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.


मनसे ◆ पर्दाफाश◆ ठाणे
ठाणे मनपाने "बाईक रुग्णवाहिका" लाखो रुपये खर्च करून राबवली,आयुक्तांच्या आदेशाला मनपा अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने "बाईक रुग्णवाहिका"सध्या धूळ खात पडली आहे आणि  फाईल ने आण करण्यासाठी तिचा वापर होतोय ह्याचा पर्दाफाश मनसेचे श्री स्वप्निल महिंद्रकर केला आहे.

मनसे ◆ कार्य◆ खेड(रत्नागिरी)
खेड शहरात गांधी चौक येथे महिलांसाठी खेड नगरपरिषद कडून शौचालय बांधण्यात आले होते, याचा लोकार्पण सोहळा खेड नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

मनसे ◆ कार्य◆ मालाड(मुंबई)
मालाड मढ येथील ३० कोळी बांधवांचा DTS कंपनीने ७ महिने वेतन थकवले होते,प्रभाग क्र ४९ चे शाखा अध्यक्ष श्री सुनील घोंगे ह्यांच्याकडे तक्रार येताच श्री घोंगे ह्यांनी सहकाऱ्यांसह कंपनी व्यवस्थापनला मनसे दणका दिला & ३ महिन्याचे वेतन ३ दिवसांत मिळवून दिले.कामगारांनी भेट घेऊन आभार मानले. 

मनसे - महिला सेना◆ कार्य ◆ विलेपार्ले(मुंबई)
मुंबई विलेपार्ले प्रभाग क्रमांक ८५ महिला शाखा अध्यक्षा सौ बिजल शाह वाही ह्यांनी पथदिवे बंद असल्याने अदानी कडे पाठपुरावा करून पथदिवे चालू करून घेतले. 

मनसे ◆ कार्य ◆ टिटवाळा(कल्याण,ठाणे)
टिटवाळा पूर्व RK नगर येथे कचरा उचलण्यासाठी कल्याण डोंबिवली मनपाची घंटागाडी येत नसल्याने मनसेच्या वतीने श्री भूषण जाधव(शाखा अध्यक्ष) ह्यांनी मनपाकडे पाठपुरावा करून टिटवाळा पूर्व येथे घंटागाडी चालू करून घेतले,मनसेमुळे आता नियमित कचरा उचलला जातो.


मनसे ◆ कार्य◆ अंधेरी, मुंबई
मुंबई मनपा प्रभाग क्रं ५९ मधील सात बांगला,दादाभाई नौरोजी उद्यान येथे रस्त्यावर मोटारसायकल स्लिप होण्याचे प्रमाण वाढले असल्याने मनसेचे शाखा अध्यक्ष श्री राजेश कारके ह्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार करून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली.

मनसे ◆ आंदोलन ◆ कुडाळ(सिंधुदुर्ग)
मुंबई गोवा महामार्ग मध्ये जे प्रकल्प ग्रस्त आहेत त्यांना त्यांचे हक्क अद्याप मिळाले नाही आहेत,स्थानिकांच्या हक्कांसाठी मनसेने वेळोवेळी निवेदन दिले पण ढिम्म प्रशासनाला जाग नाही आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसेकडून ३ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती कुडाळ तालुकाध्यक्ष श्री प्रसाद गावडे ह्यांनी दिली आहे.

मनसे ◆ भेट ◆ लातूर
औसा(लातूर) पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती सौ. रेखाताई शिवकुमार नागराळे ह्यांनी शिवली परिसरात केलेल्या विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यासाठी उपस्थित रहावे म्हणून आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे तसेच मनसे नेते श्री. अमितसाहेब ठाकरे ह्यांना निमंत्रण दिले.


मनसे- रस्ते आस्थापना ◆ नियुक्ती◆ खेड(पुणे)
खेड तालुका मनसे रस्ते आस्थापना विभाग संघटक पदी श्री प्रसाद बोराटे ह्यांची नियुक्ती करण्यात आली.

मनसे ◆ उपक्रम ◆ खेड(रत्नागिरी)
मनसे खेड च्या वतीने "नगराध्यक्षांना पत्र,आकाश कंदील स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,किल्ला स्पर्धा(लहान गट/मोठा गट) अश्या स्पर्धांचे आयोजन दीपावली निमित्ताने करण्यात आले होते.खेड नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर ह्यांच्या वाढदिवसाच्या दिनी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. 

मनसे ◆ उपक्रम ◆ मंडणगड(रत्नागिरी)
मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे मंडणगडच्या वतीने "भाऊबीज कार्यक्रमाचे"आयोजन करण्यात आले होते.यावेळी कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कोविड योध्यांचा भाऊबीज करून सन्मान करण्यात आला. 

मनसे ◆ उपक्रम ◆ खेड(रत्नागिरी)
मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे खेड चे मनविसे उपशहर अध्यक्ष श्री गणेश बेलोसे ह्यांनी गुलमोहर पार्क येथे नागरिकांच्या सेवेसाठी आसन व्यवस्था केली.

मनसे ◆ उपक्रम ◆ खेड
मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मनसे खेडच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर खेडे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मनसे ◆ उपक्रम ◆ पुणे
NIBM कौसरबाग (कोंढवा, पुणे)परिसरात मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर ह्यांच्यातर्फे  ॲक्युप्रेशर थेरेपी शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,नागरिकांनी मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर ह्यांचे आभार मानले.


मनसे ◆ उपक्रम ◆ कल्याण डोंबिवली(ठाणे)
सरकारी पक्ष सध्या "हिंदी भवन"  उभारण्यात व्यस्त असल्याने त्यांना "आगरी कोळी वारकरी भवन" कडे निधी आणि लक्ष द्यायला वेळ नाही,म्हणून मनसे आमदार श्री राजु पाटील स्वखर्चाने "आगरी कोळी वारकरी भवन "उभारणार आहेत.

मनसे ◆ उपक्रम ◆ मीरा भाईंदर(ठाणे)
मनसे मीरा भाईंदर शहर आयोजित "मनसे रोजगार मेळावा" २९  नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.२५६१ जणांनी मनसे रोजगार मेळाव्यात नोंदणी केली,१३०० जणांना तात्काळ नोकरीवर ठेवून घेण्यात आले आहे.रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री शान पवार,श्री शशी मेंडन,श्री विक्रम कृपाळ ह्यांनी केले होते.

Sunday 29 November 2020

२९ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक २९ नोव्हेंबर २०२० ◆मनसे बातमीपत्र

मनसे-महिला सेना◆पक्षप्रवेश ◆मिरारोड भाईंदर(ठाणे)
महिला उद्योजक सौ नीता राणे आणि मीरा भाईंदर शहरातील बचत गटांच्या महिलांनी मीरा भाईंदर मनपा कर्मचारी अध्यक्षा सौ अनु पाटील ह्यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.यावेळी सौ पुतुळ अधिकारी,रेश्मा तपासे ,वैशाली येरूळकर ह्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

मनसे- कामगार सेना ◆ पक्षप्रवेश ◆ठाणे
इंडस मोबाईल टॉवर टेकनिकल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य येथील कर्मचार्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने मध्ये ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे◆पक्षप्रवेश◆ठाणे
धर्मवीर नगर ठाणे येथील तरुणांनी मनसे ठाणे/ पालघर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे - महिला सेना◆ पक्षप्रवेश ◆ उल्हासनगर(ठाणे)
उल्हासनगर शहर प्रभाग क्रमांक १३ मधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.मनसेचे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन कदम ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सर्व महिलांचे स्वागत केले.


मनसे - कामगार सेना ◆ उद्घाटन सोहळा◆ मुंबई
मनसे कामगार सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे व श्री अमित राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते  दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.

मनसे -वाहतूक सेना◆पक्षप्रवेश ◆उल्हासनगर(ठाणे )
उल्हासनगर शहरातील मालवाहतूक तीन चाकी/चार चाकी चालकांनी आज मनसे वाहतूक सेनेचे श्री उल्हासनगर शहर अध्यक्ष श्री काळू थोरात ,मनसे वाहतूक सेना संघटक श्री मैनुद्दीन शेख ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे ◆ यश ◆कल्याण डोंबिवली(ठाणे)
मनसे आमदार श्री राजू पाटील ह्यांनी वारंवार कल्याण शिळफाटा येथील वाहतूक समस्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे,अखेर मनसेच्या मागणीला यश आले आहे,जड अवजड वाहनांना आता जॅमर लागणार.

मनसे ◆ सामाजिक ◆ ठाणे
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ह्यांच्या पुढाकाराने दोन अपंग व्यक्तींना कृत्रिम पाय मिळणार आहेत.


मनसे ◆आढावा बैठक ◆बोरिवली(मुंबई उपनगर)
येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या धर्तीवर उत्तर मुंबईतील दहिसर, मागाठाणे,बोरीवली,कांदिवली,चारकोप & मालाड विभागाच्या विभागीय बैठका मनसे सरचिटणीस श्री नयन कदम आणि मनसे नेते /प्रवक्ते श्री अविनाश अभ्यंकर ह्यांच्या उपस्थितीत झाल्या,श्री अविनाश अभ्यंकर ह्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

मनसे - कामगार सेना ◆दौरा ◆पुणे
मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री सचिन गोळे उद्या पुणे रांजणगाव येथील कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

मनसे ◆भेट ◆ केज(बीड)
केज तालुका(बीड) चे पदाधिकारी श्री नारायण हांगे ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मनसेचे नेते श्री अमित ठाकरे ह्यांची भेट घेतली आणि बीड मधील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

मनसे ◆ आंदोलन ◆ कुडाळ(सिंधुदुर्ग)
कुडाळ डेपो परिवहन विभागाच्या भोंगळ कारभार विरोधात मनसेच्या कुडाळ येथील पदाधिकाऱ्यांनी क्रिकेटचे सामने भरवून आंदोलन केले.

मनसे -लॉटरी सेना ◆ उपक्रम◆ कणकवली(सिंधुदुर्ग)
मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम ह्यांच्या पुढाकाराने माईन(कणकवली, सिंधुदुर्ग) गावात सोलर लाईट देण्यात आले होते त्याचे आज लोकार्पण स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.


मनसे -वाहतूक सेना ◆उपक्रम ◆विरार(पालघर)
मनसे वाहतूक सेना पालघर जिल्हा च्या वतीने मनसे वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष श्री विनोद मोरे आणि  सहकाऱ्यांच्या उपस्थितीत "एक हात मदतीचा" उपक्रम खाली  रिक्षा चालक मालक ह्यांना दुसऱ्या टप्प्यातील धान्य वाटप उपक्रम विरार पूर्व येथे राबविण्यात आला.

मनसे ◆ उपक्रम ◆उलवे(पनवेल,रायगड)
मनसे उलवे(पनवेल) च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, नागरिकांनी मनसे उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला.

२३-२४ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक २३-२४ नोव्हेंबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र


मनसे◆पदवीधर निवडणूक ◆पुणे
"भारतीय मराठा महासंघ" चा मनसेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. रुपाली पाटील ह्यांना जाहीर पाठिंबा.

मनसे ◆पदवीधर निवडणूक ◆सातारा
रविवार दि २२/११/२०२० रोजी श्री क्षेत्र औदुंबर,पलूस येथे सौ रुपाली ताई ठोंबरे पाटील व श्री विद्यानंद मानकर यांच्या  पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या प्रचारार्थ मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री गणेश सातपुते,श्री रणजित शिरोळे,श्री महेश महाले उपस्थित होते.


मनसे ◆पक्षप्रवेश ◆मुरुड(रायगड)
मुरुड(रायगड जिल्हा)तालुक्यातील मजगाव गावातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक तरुणांनी मनविसेचे  तालुका अध्यक्ष युवराज भगत ह्यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे ◆पक्षप्रवेश ◆वाशिम
वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री मनीष डांगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळूरपीर भागातील २०० तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे ◆पक्षप्रवेश ◆दौंड
मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांनी  प्रदेश उपाध्यक्ष  adv.सुधीर  पाटसकर,तालुका अध्यक्ष सचिन कुलथे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


मनसे ◆पक्षप्रवेश ◆हिंगोली
मनसे हिंगोली जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांच्या उपस्थितीत तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला. 


मनसे ◆ भेट◆खेड(रत्नागिरी)
राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे रत्नागिरी जिल्ह्याच्या  आले असता,दापोली येथे खेड नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर(मनसे सरचिटणीस) ह्यांनी त्यांची भेट घेऊन खेड नगरपरिषद च्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली,प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले.

मनसे ◆ आंदोलन ◆ महाराष्ट्र
मनसेच्या वतीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव वीजबिल विरोधात २६ नोव्हेंबर रोजी बेधडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा.

मनसे ◆ आंदोलन ◆ महाराष्ट्र
मनसेचे वाढीव वीजबिल विरोधात होत असलेल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने नोटिसा धाडल्या आहेत.

मनसे ◆आंदोलन ◆मालेगाव(नाशिक)
मालेगावच्या वतीने शहराध्यक्ष राकेश भामरे व मुकेश परदेशी यांच्या नेतृत्वात लॉक डाऊन काळातील वीजबिल माफीसाठी विजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

मनसे ◆आंदोलन ◆राळेगाव
सोयाबीन,कापूस ह्या पिकांच्या नुकसान मुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सरकारने नुकसानभरपाई देण्यात यावे ह्या  मागण्यांसाठी मनसे राळेगाव  तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या नेतृत्वात राळेगाव येथे तहशील कार्यालयासमोर मनसेचा रस्ता रोखून आंदोलन.

मनसे ◆आंदोलन ◆उल्हासनगर(ठाणे)
मनसे उल्हासनगर येथील पदाधिकारी श्री बंडू देशमुख यांच्या पुढाकाराने मनसे मुख्य प्रवाह सह इतर अंगीकृत संघटना यांच्या उपस्थितीत आज कोरोना काळातील वाढीव वीजबिल विरोधात निदर्शने करण्यात आली. 

मनसे ◆आंदोलन ◆संभाजीनगर
संभाजीनगरमध्ये जिल्हाअध्यक्ष सुहास दाशरथे यांनी अभियंताना वाढीव वीजबिल संदर्भात जाब विचारत धारेवर धरले व अधिकारी कोणतेही उत्तर देऊ न शकल्याने राग अनावर होत त्यांच्या दिशेने लाईटबिले भिरकावली.यावेळी सतनाम सिंग गुलाटी,राजू भाऊ खरे,नामदेव बेंद्रे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

मनसे ◆आंदोलन ◆दादर
माहीमचे विभाग अध्यक्ष श्री यशवंत किल्लेदार ह्यांच्या नेतृत्वाखाली "एक पत्र मुख्यमंत्र्यांना" ही मोहीम राबवली जात आहेत,या मोहिमेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सन्माननीय राजसाहेबांनी ह्या उपक्रम ठिकाणी भेट देऊन चौकशी केली.

मनसे ◆भूमिका◆पुणे
पदवीधर मतदारांनो, कुणाच्याही फतव्यांना बळी पडू नका. तुमच्या अमूल्य मताचा विवेकाने वापर करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर) अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट रुपाली पाटील-ठोंबरे ह्यांचं आवाहन. 

मनसे◆भूमिका◆मुंबई
मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेचा हिंदुत्वाचा नारा; परप्रांतियांचा मुद्दाही कायम; मनसे नेते बाळा नांदगावकर ह्यांनी केली भूमिका स्पष्ट.

मनसे ◆यश ◆ नवी मुंबई(ठाणे)
मनसेच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई मनपाची ग्रंथालये, अभ्यासिका आजपासून सुरु, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मानले मनसेचे श्री गजानन काळे यांचे आभार.

मनसे ◆ यश ◆ चांदीवली(मुंबई)
चांदीवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका येथे असलेल्या ब्लु स्टार अस्थापणाला मराठी भाषेचा विसर पडला होता,मनसेचे विभाग अध्यक्ष श्री महेंद्र भानुशाली ह्यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून अस्थापणाला मराठी पाट्या लावण्यास सक्ती केलो.

मनसे-कामगार सेना◆युनिट स्थापना◆मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील वेस्ट केअर  जेव्ही मधील कंत्राटी वाहन चालक आणि स्वच्छक कामगार यांच्या न्याय हक्कासाठी द्वारसभा आणि नामफलक उद्घाटन समारंभ अध्यक्ष मनोज चव्हाण कार्याध्यक्ष संतोष धुरी  चिटणीस केतन नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

मनसे ◆निवेदन ◆रामटेक
रामटेक मनसे तालुका अध्यक्ष श्री शेखर डुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तहसीलदार कार्यालय येथे कोरोना काळातील वीजबिल माफ करावे व ग्रामीण भागातील जनतेला ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी ह्या मागणीसाठी निवेदन दिले.

मनसे ◆निवेदन◆मुंबई
भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची राजधानी "कराची" नावाने मुंबईत वांद्रे येथे व्यावसायिक व्यवसाय करत आहेत,त्या नावावर मनसेचे हाजी सैफ शेख(महाराष्ट्र उपाध्यक्ष) ह्यांनी आक्षेप नोंदवला आले.या संदर्भात राज्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख ह्यांची भेट घेऊन निवेदन दिले. 


मनसे ◆ निवेदन ◆ निफाड(नाशिक)
मनसे तालुका अध्यक्ष श्री शैलेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज निफाड येथील तहसीलदार कार्यालयावर मनसेने धडक देत तहसीलदारांना वाढीव वीजबिल विषयी निवेदन दिले.तहसीलदार कार्यालयासमोर वीजबिल फाडून निदर्शने केली.

मनसे-रस्ते आस्थापना◆निवेदन◆आळंदी (पुणे)
पुणे : आळंदी मरकळ रस्त्याचे काम लवकर पूर्ण नाही झाले तर मनसे आंदोलन करणार ,रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश लोखंडे  ह्यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ मुंबई
#वाहतूकदारांचीमनसे BS-IV वाहनांची विक्री आणि त्यासंदर्भातील नियमांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त श्री. अविनाश ढाकणे यांची आज मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि केसस्टडीजच्या आधारे सर्व वाहनांशी संबंधित वाहतूकदारांच्या अडचणी मांडल्या. 

मनसे - विद्यार्थी सेना◆ इशारा◆ पुणे
सरळ सेवा पद भरती साठी MITC करत असलेली कंपनी निवड ही डिसेंबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत पूर्ण झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या समवेत महा आयटीच्या कार्यालयावर थेट धडक मारू. कंपनी निवडीस प्राधान्य द्यायला आता भाग पाडू. असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष श्री कल्पेश यादव ह्यांनी दिला

मनसे ◆ मागणी ◆ ठाणे 
ठाण्यात जर माझे पदाधिकारी सुरक्षित नसतील, तर मला ही पोलीस संरक्षण नको.अशी मागणी मनसेचे श्री अविनाश जाधव(मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष) यांनी पोलीस विभागाला पत्र लिहून केली आहे.

मनसे ◆ मागणी ◆ बुलढाणा
शाळा चालू करण्याच्या हालचाली सरकारी दरबारात चालू असताना मनसेचे प्रतिमंत्रीमंडळ सदस्य श्री विठ्ठल लोखंडकर ह्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये अशी मागणी केली आहे.

मनसे ◆ मेळावा◆ पेण(रायगड)
मनसेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव वीजबिलाविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. 

मनसे ◆ मेळावा ◆ पुणे
पक्षाचे पुणे (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर) पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट रुपाली पाटील व शिक्षक मतदारसंघाचे विद्यानंद मानकर ह्यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते श्री बाळा नांदगावकर, श्री अविनाश अभ्यंकर ह्यांनी सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. 

मनसे ◆ उपक्रम ◆ कल्याण डोंबिवली (ठाणे)
आयुष्यमान भारत योजना,महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या सरकारी योजनांचा गोर गरीब जनतेला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून मनसेचे कल्याण डोंबिवली मधील श्री योगेश पाटील ह्यांनी उत्तरशिव गाव,नारीवली गाव येथे सदर योजनेचे कार्ड वाटप केले.

मनसे ◆ भेट ◆ पेण(रायगड)
पेण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्यविषयक सेवांचा अभाव असल्याने रात्री अपरात्री गरोदर महिलांना अलिबाग कडे हलवले जाते ह्या बाबत मनसेचे नितीन पाटील ह्यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रशासनाला जाब विचारला.

मनसे ◆सन्मान◆ मालवण
मालवण नगर पंचायत मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर ह्यांच्या काटेकोर नियम अंमलबजावणी मुळे शिस्तप्रिय वातावरण निर्मिती होऊन कोविड संख्या नियंत्रणात आणणे शक्य झाल्याने मनसेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मनसे◆सन्मान ◆गुहागर(रत्नागिरी)
मनसे गुहागर तालुका अध्यक्ष श्री विनोद जानवळकर ह्यांच्या पुढाकाराने मनसे गुहागरच्या वतीने कोविड काळात आपले योगदान देणाऱ्या तालुक्यातील कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.

२२ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक २२ नोव्हेंबर २०२० ◆ मनसे बातमीपत्र

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ विक्रमगड (पालघर)
मनसे विक्रमगड तालुका पक्ष प्रवेश उपजिल्हा अध्यक्ष संदेश दादा पडवळे यांच्या उपस्थितीत तरुणांनी मनसेत प्रवेश केला.यावेळी मनसे,मनविसे चे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 


मनसे ◆ भूमिका ◆ मुंबई
मनसे पुणे मतदार संघाच्या आक्रमक उमेदवार सौ रुपाली पाटील ह्यांना धमकीचा फोन आल्यानंतर मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांनी रुपाली ताई ह्यांची फोन करून चौकशी केली आणि तु प्रचारात लक्ष दे बाकीचे मी पाहतो असा संदेश दिला.

मनसे ◆ भूमिका ◆ महाराष्ट्र
मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी मनसे पक्ष्याकडून २६ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव वीजबिल विरोधात मोर्चा निघेल अशी माहिती देण्यात आली.

मनसे ◆ भूमिका ◆ कल्याण डोंबिवली (ठाणे)
कल्याण डोंबिवली मधील सहा वर्षे रखडलेल्या पत्रीपुल वरून शिवसेनेच्या वेळ काढू भूमिकेबद्दल मनसे नेते श्री राजू पाटील ह्यांनी पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर वेळेत पुलाचे काम झाले असते असे म्हटले आहे.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ यश ◆ मुंबई
परीक्षा काळात विद्यार्थ्यांना व पालकांना तात्काळ उपनगरीय रेल्वेसेवेत प्राधान्याने मोफत प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व रेल्वेमंत्री यांच्याकडे केली होती.मनसेच्या मागणीनंतर राज्य सरकार आणि रेल्वे विभागाने ही मागणी मान्य केली आहे.

मनसे ◆ आंदोलन◆ ठाणे
ठाणे शहर अध्यक्ष श्री रविंद्र मोरे ह्यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीजबिल विरोधात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली नागरिकांनी ह्या आंदोलनात उस्फुर्त सहभाग घेतला.


मनसे ◆आंदोलन ◆ महाराष्ट्र 
मनसेच्या आंदोलन पूर्वी महाराष्ट्र शासनाने मनसेच्या कार्येकर्त्याना नोटिस धाडल्या आहेत,पण जनतेच्या वाढीव वीजबिल विषयी चकार शब्द काढायला  तयार नाहीत.

मनसे ◆ मेळावा ◆ शिवडी(मुंबई)
शिवडी विधानसभा अध्यक्ष श्री नंदकुमार चिले ह्यांच्या नेतृत्वाखाली वीजबिल ह्या मुद्यावर आंदोलन पूर्वीची आढावा बैठक घेण्यात आली आणि श्री राजसाहेबांच्या आदेशाने पुढील रणनीती ठरवण्यात आली.

मनसे - वाहतूक सेना ◆ मेळावा ◆ (बोईसर)पालघर
पालघर येथे मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री संजय नाईक ह्यांच्या नेतृत्वाखाली आढावा मेळावा संपन्न झाला.

मनसे ◆ मेळावा ◆ नाशिक
वीजबिल विषयावर मनसे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली,सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशानुसार वीजबिल आंदोलन आक्रमकपणे उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनसे ◆ इशारा ◆ दादर(मुंबई)
सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलांचा धक्का. आता मनसे देणार त्यांच्या स्टाईलने शॉक. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने दादर परिसरात लावले सरकारला इशारा देणारे बॅनर्स झळखले.

मनसे - पर्यावरण सेना◆ उपक्रम ◆ माहीम(मुंबई)
मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष श्री जय शृंगारपूरे ह्यांनी समुद्र किनारी खेळणारी मुले,सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेणारे तरुण ह्यांना #recycling महत्त्व समजावून सांगून माहीम बीच वर स्वच्छता मोहीम राबवली.


मनसे- विद्यार्थी सेना ◆ उपक्रम ◆ मीरा भाईंदर
मनसे मिरा भाईंदर आयोजित दिनांक २९ नोव्हेंबर रोजी रोजगार मेळावा..!
५० पेक्षा जास्त नामांकित विवीध क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग.ह्या उपक्रमाचे आयोजन श्री शान पवार(मनविसे शहर अध्यक्ष),श्री विक्रम कृपाळ (विधानसभा अध्यक्ष १४६) श्री शशी मेंडन(शहर अध्यक्ष) ह्यांनी केले आहे.

११-१३ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ११-१३/११/२०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब ◆ उपक्रम ◆ दादर(मुंबई )
"शिवतीर्थ" दादर मनसे दिपोत्सवात राजसाहेब ठाकरे दरवर्षीप्रमाणे सहकुटुंब सहभागी.

राजसाहेब◆ भेट◆नागपूर
कृष्णकुंज येथे विदर्भातील विविध प्रश्नावर मनसे सरचिटणीस श्री हेमंत गडकरी आणि वर्धा जिल्हाध्यक्ष श्री अतुल वंदिले ह्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेऊन चर्चा केली.

राजसाहेब ◆भेट ◆मुंबई
ठाणे ब्रास बँन्ड असोसिएशन राज ठाकरेंना भेटले, व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर, 'कृष्णकुंज'मध्ये समस्या मांडली.

मनसे◆ भेट◆ दादर
'वारकरी संप्रदायाला कार्तिकी वारीसाठी परवानगी देण्यात यावी; आम्ही कोरोना काळातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करू, परंतु पंढरपुरातील संचारबंदी शिथिल करावी' ह्या मागणीसह वारकऱ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. राज्य सरकारशी बोलून कळवतो, असं राजसाहेबांनी आश्वस्त केलं. 

मनसे ◆भेट ◆मुंबई
 . 

राजसाहेब ◆ भेट ◆ दादर(मुंबई)
मुंबईतील कोळी बांधव ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांची भेट घेऊन मांडले समस्यांचे गाऱ्हाणे.

मनसे ◆ निवडणूक ◆ पुणे
पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या अधिकृत उमेदवार सौ रुपाली पाटील ह्यांनी बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत उमेदवारी अर्ज भरला.

मनसे ◆ प्रशासकीय ◆ शिर्डी
नागरिकांच्या समस्या सोडविण्यास “नगरसेवक आपल्या दारी” मोहिमेतून मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोतेंच्या प्रयत्नाला यश-श्री गणेशवाडीत पथदिवे लावणे शुभारंभ.

मनसे ◆ यश ◆ खानापूर(सांगली)
मनसेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते,प्रशासनाकडून सदर उपोषणाची दखल घेत भ्रष्ट तलाठी आणि अधिकारी ह्यांची चौकशीसाठी चौकशी अधिकारी म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे मनसेचे खूप मोठे यश आहे.

मनसे ◆ यश ◆ अकोला
मनविसेचे अकोट शहराध्यक्ष श्री शशांक कासवे ह्यांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने अकोट शहरातील सात ग्रंथालय चालू करण्यास परवानगी दिली.


मनसे - विद्यार्थी सेना◆ यश ◆ नांदेड
कॅरिओन अनंतर्ग प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा MCQ पद्धतीने घेण्याची मागणी मनविसेचे जिल्हा अध्यक्ष श्री रवी राठोड ह्यांनी केली होती,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठने तसे पत्रक काडून सर्व संलग्नित विद्यालयाना सूचना केल्या आहेत.

मनसे -रस्ते आस्थापना ◆ यश ◆ भांडुप(मुंबई)
एस विभाग प्रभाग क्र.११२(भांडुप) R.R.पेंट,टॅंक रोड  ड्रीम्स मॉल समोरील रहदारीच्या ह्या मुख्य मार्गावर असलेल्या सांडपाण्याचा(ड्रेनेज) झाकण कित्येक दिवस उघडे होते,मनसे-रस्ते आस्थापना विभागाचे श्री संतोष पार्टे & सहकारी यांच्या पुराव्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली. 

मनसे ◆ यश ◆ नवी मुंबई
नवी मुंबई पालिकेच्या ७२ प्राथमिक शिक्षकांचा १३ महीन्याच्या वेतनातील फरक रुपये म्हणजेच  ५५ लाख रुपयांच्या मागणीसाठी मनसेचे शहराध्यक्ष श्री गजानन काळे आणि सहकाऱ्यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन दोन तासात मुद्दा निकालात काढला.

मनसे ◆ यश ◆ उस्मानाबाद
मनसेच्या निवेदनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक ११-११-२० रोजी उस्मानाबाद शहरातील महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली,मनसे उस्मानाबाद जिल्हा सचिव श्री दादा कांबळे यांनी स्वतः थांबून चांगल्या प्रकारे खड्डे बुजवून घेतले.

मनसे - कामगार सेना ◆यश ◆ मुलुंड
गेली चार वर्षे निर्मल लाईफ मधील काही कामगारांची देणी शिल्लक होती,अनेक युनियन,राजकीय पक्ष ह्यांनी प्रयत्न करूनही निर्मलने त्यांना दुर्लक्षित केले.मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री गजानन राणे ह्यांनी भेट देऊन ८ दिवसांची मुदत दिली,दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज वेतन जमा झाले. 

मनसे ◆ यश ◆विरार
विरार मनवेल पाडा येथे "आबिना बेन" इमारत मोडकळीस आली होती,इमारत कोसळून जीवित हानी होऊ नये म्हणून मनसेचे श्री प्रफुल्ल जाधव(विरार शहर उपाध्यक्ष) ह्यांनी मनपाला निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली,मनपाने अखेरीस ती इमारत पाडली.

मनसे - कामगार सेना◆ मुंबई ◆ यश
आज मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री सचिन गोळे ह्यांच्या नेतृत्वाखाली पी व्हि आर (PVR CINEMA) सिनेमा व्यवस्थापन यांच्यासोबत दिवाळी बोनस करता मीटिंग झाली,मनसेच्या पुढाकाराने कंपनीकडून दिवाळी बोनस २०% मंजूर करुन घेण्यात आला.

मनसे ◆ कार्य ◆ डोंबिवली
मनसे आमदार श्री राजू पाटील ह्यांच्या पुढाकाराने स्वखर्चाने कल्याण डोंबिवली शीळ फाटा येथे CCTV कॅमेरे बसवण्यात आले,वाहतूक विभागाला आता ट्राफिक वर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ पक्षप्रवेश ◆ दापोली(रत्नागिरी)
मनविसे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री सचिन गायकवाड, तालुका अध्यक्ष श्री नितिन साठे ह्यांच्या नेतृत्वाखाली निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण पालकर,हाफिज महालदार यांच्यासह विविध पक्षातील तरुण कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ नवी मुंबई (ठाणे)
बेलापूर फणसपाडा,शहाबाज गावातून अनेक महिला,पुरुष,तरुणांनी शहर अध्यक्ष गजानन काळे,महीला सेना शहर अध्यक्ष आरती धुमाळ,अनिथा नायडू मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे,सचिन कदम,उपविभाग अध्यक्ष श्याम काेळी यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश.

मनसे- वाहतूक सेना ◆ वाहतूक स्टॅन्ड ◆ पुणे
ॲड. सुनिल कोरपडे(अध्यक्ष प्रभाग क्र. ३४) व मनसे वाहतूक सेना पुणे शहर यांच्या प्रयत्नातून गोयल गंगा,माणिकबाग येथे रिक्षा स्टँडचे उद्घाटन व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमाचे आयोजन.

मनसे - चित्रपट सेना ◆संपर्क कार्यालय ◆पुणे
मनसे चित्रपट सेनेच्या “प्रचंडगड”कार्यालयाचे उद्घाटन पुणे येथे नेते श्री अनिल शिदोरे, श्री अमेय खोपकर यांच्या हस्ते पार पडले.शान रमेश परदेशी(पिट्या भाई)व त्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.


मनसे ◆ संपर्क कार्यालय ◆ पारनेर(अहमदनगर )
"गाव तिथं शाखा" या उपक्रमाअंतर्गत पारनेर तालुक्यातील पोखरी गावात मनसे तालुकाध्यक्ष मा.बाळासाहेब माळी यांच्या हस्ते  मनसे शाखेचे उद्घाटन झाले. त्यावेळी अ.नगरचे जिल्हाध्यक्ष ,पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.


मनसे ◆ निवेदन ◆ बोरिवली(मुंबई)
वाढत्या प्रवाशांच्या संखेमुळे बोरिवली  रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १आणि २ वरून सोडण्यात येत आहेत परंतु फलाट क्रमांक १ चे प्रवेश द्वार बंद ठेवल्याने प्रवाश्यांना होणारा त्रास  ,बंद असलेल्या सरकत्या जिन्यामुळे दिव्यांग आणि आजारी प्रवाश्यांची गैरसोय लक्ष्यात घेऊन मनसे विभाग अध्यक्ष श्री प्रसाद कुलापकर यांनी निवेदन दिले.

मनसे ◆निवेदन ◆ नवी मुंबई(ठाणे)
उच्च न्यायालयाची बंदी असतानाही नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांच्या गरजेपोटी घरांवर हातोडा का? स्थानिक भूमिपुत्र,ग्रंथालय,अभ्यासिका उद्याने,शिक्षक,कामगार या विविध विषयांसाठी मनसेने घेतली मनपा आयुक्त यांची ,भेट घेऊन निवेदन सादर केले.कारवाई थांबवा अन्यथा अवमान याचिका दाखल करू मनसे इशारा देण्यात आला.

मनसे ◆ निवेदन ◆ वाशिम
वाशिम जिल्ह्यातील अनेक रेशनिंग दुकानात भ्रष्टाचार होत आहे,पुरवठा विभागातील अधिकारी/कर्मचारी स्वतःच्या स्वार्थासाठी धान्याचा काळाबाजार करत आहेत.त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री मनिष डांगे ह्यांनी जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन दिले. 

मनसे -वाहतूक सेना◆ निवेदन ◆पुणे
मनसे वाहतूक सेना व पुण्यातील विविध वाहतूक संघटनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वाहन कर माफील मुदतवाढ द्यावी व वाहनांनवर होणारी कारवाई यापुढे होऊ नये म्हणून संयुक्तपणे, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली  परिवहन उपअधिक्षक श्री. ससाणे यांना निवेदन देण्यात आले. 

मनसे ◆ निवेदन ◆ रत्नागिरी
रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ७ मधील नागरी समस्या (उघडी गटारे,सांडपाणी) इत्यादी समस्या साठी मनसे शहर अध्यक्ष श्री सतीश राणे ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगरपरिषद अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे ◆ मागणी ◆ डोंबिवली(ठाणे)
मनसे आमदार श्री राजु पाटील,मनसे रेल्वे कामगार सेनेचे श्री जितेंद्र पाटील ह्यांनी सेंट्रल रेल्वे मार्गावरील दिवा स्थानक रेल्वे पूल,कोपर पूल,लोकग्राम पूल,काटई पूल यांच्या रखडलेल्या कामांविषयी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली.रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. 

मनसे ◆उपक्रम ◆नळदुर्ग(उस्मानाबाद)
नळदुर्ग(उस्मानाबाद) शहरातील मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कष्टकरी समाजातील गरजू लोकांसाठी मनसेच्या वतीने कोरोना संकटाचा विचार करून "दिवाळी भेट"म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  जिल्हासचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी यांनी सहकाऱ्यांसह केले. 

मनसे- लॉटरी सेना◆ उपक्रम ◆ कणकवली(सिंधुदुर्ग)
मनसे- लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम यांच्या पुढाकाराने कणकवली तालुक्यात माईण, कोंडये, कोळोशी या गावांमध्ये सोलर लाईट देण्यात आल्या.

मनसे ◆ उपक्रम ◆ यवतमाळ
मनसे यवतमाळ च्या वतीने जिल्हा प्रशासनास १००० PPE किट देण्यात आले तर,कोरोना किंवा इतर कोणत्याही आजाराने मृत्यू झाल्यास मनसेच्या वतीने अंत्यसंस्कारचा सर्व खर्च केला जाईल अशी माहिती अनिल हमदापुरे(यवतमाळ जिल्हा अध्यक्ष) यांनी दिली.

मनसे ◆ उपक्रम ◆ पुणे
पुण्यात मनसेचे नगरसेवक श्री वसंत मोरे यांच्या पुढाकाराने कंत्राटी कामगार,सफाई कामगारांना दिवाळी भेट.

मनसे ◆ उपक्रम ◆ माढा(सोलापूर)
मोडनिंब गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व पत्रकार बंधूंचा दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भेटवस्तू देऊनसन्मान करण्यात आला.

मनसे ◆ उपक्रम ◆ वसई- विरार(पालघर)
मनसे- वसई विरार शहर तर्फे श्री विवेक केळुसकर(शहर सचिव) श्री महेश कदम(शहर सहसचिव) यांच्या पुढाकाराने रांगोळी स्पर्धा, कंदील स्पर्धा,  निबंध स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन.

मनसे ◆उपक्रम ◆पुणे
मनसेचे प्रविण माळी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप व नेत्र चिकित्सा शिबीर आयोजीत करण्यात आले होते. अभिनव रावेत सोशल फाऊंडेशनच्या मार्फत संत मोनी बाबा वृद्धाश्रम येथील सर्व वृद्धांची नेत्र चिकित्सा करण्यात आलेली आहे. तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले आहे.

मनसे ◆ उपक्रम ◆ राजापूर(रत्नागिरी)
मनसे राजापुर(रत्नागिरी) यांच्याकडून सरकारी इस्पितळात वाटप करण्यासाठी तहसीलदार ह्यांच्याकडे PPE कीट देण्यात आले.यावेळी श्री जितेंद्र चव्हाण(जिल्हाध्यक्ष), श्री अविनाश सौंदळकर(उपजिल्हाध्यक्ष),श्री राजेश पवार(तालुकाध्यक्ष),श्री अजिम जैतापकर(शहराध्यक्ष) व मनसे पदाधिकारी उपस्थित होते. 

मनसे ◆ उपक्रम ◆ मुंबई 
पोलीस कर्मचारी,बी एम सी कर्मचारी, स्थानिक नागरिक यांना मनसेकडून श्री अल्ताफ खान(सचिव, मुंबई उपनगर)यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय स्टिमरचे वाटप करण्यात येणार आहे,त्याचे उद्घाटन मनसे नेते श्री अमित राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मनसे ◆उपक्रम ◆ठाणे
ठाण्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून रस्त्यावर मोल मजुरी करून संसाराचा गाडा हकणारी काही कुटुंबे आहेत. एकीकडे दिवाळीत शहरातला झगमगाट आणि दुसरीकडे जगण्याची धडपड खुप जिवाला लागणारी विसंगती समोर आल्यावर मनसे पंचपाखाडीचे श्री दिनेश मांडवकर ह्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.


मनसे ◆उपक्रम ◆ नेरुळ(ठाणे)
मनसे जुईनगर प्रभाग क्रं ८३ च्या वतीने प्रभागातील महिलांना मनसे-महिला सेना उपशहर अध्यक्षा सौ.अनिथा नायडू यांच्याकडून मोफत दिवे,रांगोळी आणि उटने चे वाटत करण्यात येत आहे.


मनसे ◆ उपोषण ◆ खानापूर(सांगली)
भ्रष्ट तलाठी व मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी श्री साजीद आगा(खानापूर तालुकाध्यक्ष, सांगली) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू.या आंदोलनात वाहतूक सेनेचे श्री कृष्णा देशमुख ,कामगार सेनेचे श्री सूरज तांबोळी,श्री विनोद कांबळे व इतर कार्येकर्ते उपस्थित होते. 

मनसे ◆दणका ◆बुलढाणा
बुलढाणा चिखली येथे खरेदी-विक्री व्यवहारात अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देतो, कार्यालयात आलेल्या लोकांशी उद्धट वागणे अश्या आरोपानंतर मनसेच्या कार्येकर्त्यांचा संयम सुटला आणि कार्येकर्त्यांनी अधिकाऱ्याला दिला मनसे दणका.


मनसे ◆ आंदोलन ◆ मुंबई 
भ्रष्ट पालिका अधिकारी यांचा निषेध करण्या साठी मनपा कार्यालयावर मनसे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोळी बांधवांच्या तोडलेल्या घरांची माती व विटा दिपावली निमित्य भेट देऊन निषेध केला.

मनसे ◆ आंदोलन ◆पुणे
पुण्यात मनसे वाहतूक सेनेचे श्री संजय नाईक ह्यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालकांच्या अनेक समस्यांच्या मागणीसाठी RTO कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

मनसे ◆ आंदोलन ◆बोरिवली(मुंबई)
टाटा पावरने ८५० ग्राहकांची वीज खंडित केली होती मनसेच्या लक्षात येताच मनसे सरचिटणीस श्री नयन कदम व उपनगर विभागातील विभाग अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्तावर बसून आंदोलन केले,ह्यापुढे वीज खंडित केली जाणार नाही अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी मनसेला दिली. 

मनसे ◆ आंदोलन◆ ठाणे
माजीवडापासून ते अगदी फाऊंटनपर्यंत २ ते ३ तासाची वाहतूककोंडी, बऱ्याच वेळेला तर अँबुलन्सला सुद्धा मार्ग मिळत नाही म्हणून ठाणे - माजिवडा नाका येथे अवजड वाहनांना प्रतिबंधित वेळेत प्रवेश बंद करण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष श्री रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

मनसे- वाहतूक सेना◆मागणी◆महाराष्ट्र
वाहतूक वाहन कर्जदारांची वाहने उचलून घेऊन जाणे  हा बेकायदेशीर मार्ग वित्तीय संस्थांनी थांबवावा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस श्री किर्तीकुमार शिंदे ह्यांनी केली आहे.


मनसे ◆ भूमिका ◆ नाशिक
मनसे नाशिक मधील नगर पंचायत निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता, मतदारसंघात पक्षांतर्गत बैठकांची संख्या वाढली.
 
मनसे ◆ नियुक्ती ◆ दहिसर(मुंबई)
मनसे सरचिटणीस श्री नयन कदम,विभाग अध्यक्ष राजेश येरूनकर ह्यांच्या नेतृत्वाखाली दहिसर विधानसभा क्षेत्रात तीन प्रभारी शाखा (प्रभाग क्र.६, श्री. दिपक गव्हाणे,प्रभाग क्र.८, श्री. दिनेश गरासिया ,प्रभाग क्र १०, श्री. अरुण बोर्डेकर)अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली.

मनसे- कामगार सेना◆नियुक्ती◆नवी मुंबई(ठाणे)
मनसे कामगार सेनेचे श्री मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली श्री आप्पासाहेब कोठुळे ह्यांची मनसे कामगार सेनेच्या उपचिटणीस पदी (महाराष्ट्र राज्य) नियुक्ती करण्यात आली.

मनसे - मनपा कर्मचारी सेना◆ नियुक्ती ◆ मीरा भाईंदर(ठाणे)
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या शुभाशीर्वादाने तसेच मनसे महानगरपालिका कामगार सेना अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सौ. अनु पाटील यांची मीरा भाईंदर महानगरपालिका कामगार सेना अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

मनसे ◆ सन्मान ◆लातूर
कोरोनाकाळातील आदर्श समाजकार्याबद्दल MVLA(नाशिक) संस्थेकडून मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्री नरसिंह भिकाणे ह्यांना मिळाला ऑनलाइन समाजरत्न पुरस्कार.

Wednesday 11 November 2020

९-१० नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ०९-१०/११ /२०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब ◆ भेट ◆ दादर(मुंबई)
नाटक कलाकार,निर्माते आणि दिग्दर्शकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट, नाटक सुरु करण्यासंदर्भात येणा-या अडचणी राज ठाकरेंसमोर मांडल्या . 

राजसाहेब ◆भेट ◆ दादर
केबल व इंटरनेट व्यावसायिकांनी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंज निवस्थानी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.


राजसाहेब ◆ मनसेप्रवेश ◆ दादर
मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष श्री गजानन काळे ह्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरातील वेगवेगळ्या पक्षातील कार्येकर्त्यांनी आज कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे ◆पक्षप्रवेश ◆सिन्नर
सिन्नर तालुक्यात शहा गावात मनसेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले,सिन्नर तालुका मनसे अध्यक्ष श्री विलास सांगळे ह्यांच्या प्रयत्नांनी शहा गावातील तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.


मनसे ◆मनसे प्रवेश ◆ चिपळूण(रत्नागिरी)
चिपळूण तालुकाध्यक्ष श्री संतोष नलावडे ह्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध पक्षातील तरुण कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

मनसे ◆पक्षप्रवेश ◆नाशिक
नाशिक-अंबड येथील एम एस इंडस्ट्रीयल कॉम्पोनेटस् लि
(M S INDUSTRIAL COMPONENTS LTD)कंपनी मधील कामगारांनी मनसे- कामगार सेनेचे सभासत्व श्री सचिन गोळे(संयुक्त सरचिटणीस)यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारले.यावेळी मनसे नाशिकचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे◆पक्षप्रवेश ◆ उल्हासनगर(ठाणे)
उल्हासनगर शहरातील विविध पक्षातील तरुण कार्येकर्त्यांनी मनसेचे श्री सचिन कदम(जिल्हाध्यक्ष ) ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे ◆भेट ◆डोंबिवली(ठाणे)
डोंबिवलीतील मानपाडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी ह्या मागणीसाठी पक्षाचे आमदार श्री राजू पाटील ह्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. अशोक चव्हाण ह्यांची भेट घेतली. 

मनसे ◆यश ◆नाशिक
मनसेचे नाशिक मधील पदाधिकारी श्री विक्रम कदम ह्यांनी शहरातील अपघाती भागात गतिरोधक लावण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली होती,अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.गतिरोधक बसवण्याचे काम चालू.


मनसे-कामगार सेना ◆यश◆मुंबई
भारतीय पोस्ट च्या संकेतस्थळ वर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती मिळत होती मनसेचे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री मनोज चव्हाण यांनी पत्रव्यवहार करून मराठीची मागणी केली,पोस्टाकडून मराठी संकेतस्थळ बाबत हालचाली चालू.

मनसे ◆ यश ◆मीरा भाईंदर(ठाणे)
मीरा भाईंदर शहरातील शांतीनगर सेक्टर  १,२,४ मधील अतिक्रमण हटवण्यासाठी मनसेचे शहर सचिव श्री नितीन अंडागळे ह्यांनी निवेदन द्वारे मागणी केली होती ,मनपाने अखेर आज कारवाई केली,सदर विभाग नागरिकांना रहदारी साठी मोकळा झाला.


मनसे ◆ यश ◆ धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तलमोड येथील नियमबाह्य टोल वसुलीच्या विरोधात मनसेने निवेदन दिले होते पोलीस उपाधीक्षक यांच्याकडून मनसेच्या निवेदनाची दखल घेण्यात आली,चौकशी सुरू झाली.


मनसे -कामगार सेना◆यश ◆ रोहा(रायगड)
श्री राजेश भास्कर उज्जैनकर (उपाध्यक्ष,मनसे-कामगार सेना) यांच्या नेतृत्वाखाली "कोरस इंडिया लिमिटेड"(रोहा,रायगड) कंपनीत कामगारांच्या हक्काच्या मागण्यासाठी धडक देण्यात आली,मनसे शिष्टमंडळाच्या पुढाकाराने कंपनी व्यवस्थापनाने सर्व मागण्या मान्य केल्या. 

मनसे ◆ यश ◆मालवण(सिंधुदुर्ग)
मालवण तालुक्यात कर्ली खाडी किनाऱ्यावरील आंबेरी येथील  अनधिकृत वाळू उपसा होत होता त्याविरोधात मनसेने निवेदन दिले होते,वाळू वाहतूक करणारे रॅम्प महसूलच्या पथकाने उदध्वस्त करण्यात आले आहे.

मनसे-चित्रपट सेना◆उद्घाटन◆पुणे
मनसे चित्रपट सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी पुण्यात चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री अमेय खोपकर ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मनसे-कामगार सेना◆उद्घाटन◆नवी मुंबई(ठाणे)
इंडियन न्युमॅटीक अँड हायड्राॅलीक कंपनी प्रा.लि कंपनीचा "युनिट नामफलक अनावरण सोहळा" संपन्न झाला तसेच मनसेच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामागरांशी संवाद साधला.यावेळी श्री निलेश बाणखेले(नवी मुंबई शहर  उपाध्यक्ष) श्री.राज पार्टे(चिटणीस-कमागर सेना) व सहकारी उपस्थित होते. 

मनसे ◆ निवेदन ◆ मालवण (सिंधुदुर्ग)
मालवण तालुक्यात होत असलेला बेकायदेशीर वाळू उपसाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी ह्यासाठी मालवण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.


मनसे ◆ निवेदन ◆ रत्नागिरी
कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक करून परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव उद्ध्वस्त करण्यासाठी सदर जमीन गैरव्यवहारांच्या चौकशी करण्याची मागणी मनसेचे श्री सतीश र नारकर (उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य )
यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.

मनसे ◆ निवेदन ◆ नागपूर
कळमेश्वर(नागपूर) शहरातील सर्वसाधारण जनतेला मोठमोठे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या संत नरहरी लँड डेव्लपर कळमेश्वर च्या विरोधात मनसेकडे तक्रारी आल्या,मनसे कळमेश्वर तालुक्याच्या वतीने तात्काळ मा.पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

मनसे -महिला सेना◆ निवेदन ◆अणुशक्ती नगर(मुंबई)
मुंबई मनपाचे देवनार विभागात असलेले प्रसुतीगृह बंद असल्याने विभागातील गरोदर महिलांना शीव इस्पितळात यावे लागते,मनसेच्या अणुशक्ती नगर विधानसभा महिला अध्यक्षा सौ. अमिता गोरेगावकर ह्यांनी मनपा अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे -शेतकरी सेना◆निवेदन ◆वर्धा
कपाशीवर आलेल्या बोण्ड अळीमुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचा शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 40 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी यासाठी मनसे शेतकरी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री किशोर चांभारे यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मनसे - विद्यार्थी सेना◆निवेदन ◆संभाजीनगर
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता इतर कोणतेही शुल्क आकारू नयेत असे सरकारी आदेश असताना विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात आहे.
सहसंचालक ह्यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी मनविसे संभाजीनगरच्या वतीने श्री राजीव जावळीकर ह्यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन करण्यात आली.

 
मनसे ◆ निवेदन ◆ ठाणे
ठाणे मनपा अग्निशमन विभागाशी संबंधित संपर्क माहिती संकेतस्थळ वर  उपलब्ध नाहीय,दिवाळीत फटाके व तात्पुरती वीज जोडणीमुळे आग लागण्याची शक्यता असल्याने,आपत्कालीन संपर्क करण्यासाठी मनपाने संकेतस्थळ अपडेट करावे,यासाठी मनसे ठाणे शहर अध्यक्ष श्री रविंद्र मोरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. 

मनसे ◆निवेदन ◆ नाशिक
भगुर (नाशिक)शहरातील मुख्य रस्ता रेल्वे लाईनच्या खालचा नविन बोगदा नागरिकांना ये जा करण्यासाठी अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी नाशिक तहसीलदार यांना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश खांडबहाले,भगुर शहराध्यक्ष श्री कैलास भोर ह्यांनी सहकाऱ्यांसह निवेदन दिले.

मनसे - रोजगार विभाग ◆ निवेदन ◆नवी मुंबई (ठाणे)
नवी मुंबईतील सर्व डी मार्ट, रिलायन्स मार्ट , रिलायन्स  डिलिव्हरी या आस्थापनांनी ८०% मराठी तरुणांना नोकरी द्यावी,अशी मागणी मनसेच्या रोजगार विभागाने कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देऊन केली आहे.

मनसे -विद्यार्थी सेना◆निवेदन ◆ साक्री,धुळे
साक्री, जि.धुळे येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी डावलून हिंदीची सक्ती करण्यात येत असल्याची माहिती मिळताच मनविसेच्या धुळे उपजिल्हाध्यक्षा सायली सोनवणेयांच्या नेतृत्वाखाली  निवेदन देण्यात देण्यात आले.

मनसे ◆ निवेदन ◆राळेगाव(यवतमाळ)
अतिवृत्तीमुळे शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे,नुकसान भरपाई म्हणून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी ह्या मागणीसाठी मनसे राळेगावच्या वतीने श्री शंकर वरघट(तालुकाध्यक्ष ) ह्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆घाटगी(यवतमाळ)
यवतमाळ : घाटंजी तालुक्यात पुरवठा विभागात मोठी अफरातफर झाली असून पुरवठा विभागाकडून आलेले कडधान्य वाटपच झाले नाही, याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी मनसेचे घाटंजी नगरसेवक गजानन भालेकर यांनी सहकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे  निवेदन दिले.


मनसे ◆ निवेदन ◆ पुणे
पुणे आळंदी शहरातील खड्डे बुजवणे, स्पीड ब्रेकर लावणे व ड्रेनेज लाईन सारख्या गंभीर समस्यावर मनसेचे शहर अध्यक्ष श्री निलेश घुंदरे यांनी सहकाऱ्यांसह आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी ह्यांना निवेदन दिले.

मनसे ◆निवेदन ◆ खानापूर(सांगली)
वाढीव वीजबिल,अवकाळी पाऊस शेतकरी नुकसान,महिला बचत गट,दूध दर ह्या मुद्यावर मनसे खानापूर तालुका अध्यक्ष श्री साजिद आगा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले.


मनसे ◆उपक्रम ◆भांडुप(मुंबई)
कोरोना रोगराईमुळे आलेले आर्थिक संकट पाहता,मनसे शाखा  ११० चे शाखा अध्यक्ष श्री. मोहन चिराथ(भांडुप,मुंबई) यांच्यातर्फे दिवाळी निमित्त स्वस्त दरात साखर वाटप करण्यात आले. 

मनसे ◆उपक्रम ◆भांडुप(मुंबई)
दिवाळीनिमित्त सुगंधी उटणे वाटप करण्याचा उपक्रम मनसे राजगड ११२ शाखाअध्यक्ष सुनिल नारकर यांनी हाती घेतला आहे.

मनसे-विद्यार्थी सेना◆उपक्रम ◆दहिसर(मुंबई)
कोविड रोगराईमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य कुटुंबाना मनसेच्या वतीने मनविसे दहिसर विभाग सचिव श्री. किरण गायकवाड आणि उपविभाग सचिव श्री. प्रथमेश पाटेकर  यांच्या पुढाकाराने मोफत पणतीचे वाटप.

मनसे -विद्यार्थी सेना ◆उपक्रम ◆ठाणे
मनविसे प्रभाग क्र-३ आयोजित " सेल्फी विथ रांगोळी " स्पर्धा दि.१३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर पर्यंत आयोजित केली आहे. 


मनसे ◆सामाजिक ◆भांडुप
प्रभाग क्रमांक ११२ येथे ईश्वर नगर परिसरात मनसेचे उपशाखा अध्यक्ष श्री ओंकार नाईक,शाखा अध्यक्ष श्री सुनील नारकर ह्यांच्या प्रयत्नांनी  डासांच्या नायनाटसाठी जंतूनाशक धुर फवारणी करण्यात आली.

मनसे ◆सामाजिक ◆डोंबिवली
मा.सरपंच योगेश रोहिदास पाटील (घारीवली, डोंबिवली)
यांच्या पुढाकाराने मनसे तर्फे साडेतीनशे विद्यार्थ्यांना मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

मनसे ◆ उपोषण ◆विरार(पालघर)
कोरोना काळात वीज वितरण कंपन्यांकडून होत असलेली लूट लक्षात घेत सरकारने ह्यावर तोडगा काढणे अपेक्षित होते पण सरकार नऊ महिने होऊन गेले तर ह्यावर अजून निर्णय घेऊ शकले नाही,मनसेचे श्री महेश पालांडे ह्यांनी आजपासून आमरण उपोषण हे शस्त्र बाहेर काढले आहे.


मनसे -परिवहन सेना◆आंदोलन ◆ संभाजीनगर
एस टी कामगारांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश आहे,एस 
टी कामगारांवर होणारा अन्याय थांबावा ह्या मागणीसाठी मनसे परिवहन कामगार सेनेकडून उद्या सकाळी संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

मनसे ◆आंदोलन ◆ अंधेरी
जुहू येथील भूमीपुत्रांची गुजराती बिल्डरच्या साथीने घरे उध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने श्री सुरेश धुरी(विभाग अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली विटा माती देऊन आंदोलन.

मनसे -कामगार सेना◆इशारा◆मुंबई
माझ्या कामगारांच्या घरी दिवाळीचा दिवा नाही लागला तर, मी PF Office ला दिवाळी होऊ देणार नाही,सर्व पी एफ ॲाफीस ला काळे कंदिल लावेन असा इशारा श्री गजानन राणे (मनसे कामगार सेना सरचिटणीस) PF कार्यालयाला दिला आहे.

मनसे ◆दणका◆ दहिसर
दहिसर विधानसभा क्षेत्रातील सेंट मेरी शाळा व्यवस्थापन कडून विद्यार्थी/पालकांकडे फिसाठी तगादा लावण्यात येत होता,मनसे दहिसर विधानसभा अध्यक्ष श्री राजेश येरूनकर यांच्या नेतृत्वाखाली धडक देताच शाळा व्यवस्थापनने ह्यापुढे असा कोणताही प्रकार होणार नाही ह्याची ग्वाही दिली.


मनसे ◆भूमिका ◆ मुंबई
राज्य शासनाने वेतन थकवल्याने दोन ST कामगारांनी आत्महत्या केली,त्या परिवारातील सदस्यांना सरकारने शासकीय नोकरी द्यावी आणि पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी सरकारने तरतूद करावी अशी मागणी मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी केली आहे.

मनसे◆ भूमिका ◆ पनवेल(रायगड)
अपंग लोकांच्या स्टॉलवर अतिक्रमण विभाग कारवाई करत आहे त्या विरोधात मनसेच्या यतिन देशमुख यांनी पनवेल महापालिके समोर आक्रमक पवित्रा घेतला.या वेळी मनसेचे अमोल पाटील, सिद्धेश पावले, अतुल जाधव, संजय मुरकुटे, प्रतीक वैद्य आणि आकाश घाटे आदी उपस्थित होते.

मनसे-नेते ◆ भूमिका ◆ मुंबई
ST कर्मचाऱ्यांचा थकित पगारावरून मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी सरकारचे कान टोचत आत्महत्या होऊ नये म्हणून सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणीही केली आहे.

मनसे- विद्यार्थी सेना◆मेळावा◆संगमेश्वर(रत्नागिरी)
मनविसे संगमेश्वर तालुका संपर्क अध्यक्ष श्री दिनेश मांडवकर ह्यांनी दोन दिवसांचा संगमेश्वर तालुका दौरा केला,त्यांच्या सोबत तालुका अध्यक्ष श्री अनुराग कोचीरकर व इतर सहकारी उपस्थित होते.दौऱ्याची सांगता कार्येकर्ता मेळाव्याने झाली.

मनसे ◆ दणका ◆कल्याण
मोहने वडवली ब्रिजचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे,मनसेचे कल्याण चे माजी आमदार श्री प्रकाश भोईर आणि उप शहराध्यक्ष श्री दिनेश भोय यांनी सहकाऱ्यांसह कामाची पाहणी करून सदर ठेकेदारला संथ कामाचा जाब विचारला.


मनसे◆ बैठक/मेळावा ◆पुणे
पुणे पदवीधर निवडणुकीच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. रुपाली पाटील ठोंबरे ह्यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी आणि प्रचारासाठी पुण्यात बैठकांच सत्र सुरु. 

मनसे -मनपा कर्मचारी सेना◆नियुक्ती ◆वसई विरार
श्री. प्रफुल पाटील यांची महापालिका कामगार सेनेच्या वसई विरार अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

मनसे -वाहतूक सेना◆नियुक्ती◆बेलापूर(ठाणे)
नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा क्षेत्रातील मनसे वाहतूक सेनेच्या नियुक्या मनसे सरचिटणीस श्री संजय नाईक(अध्यक्ष, मनसे वाहतूक सेना) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

मनसे -विद्यार्थी सेना ◆नियुक्ती ◆नाशिक
मनविसे नाशिकची आढावा बैठक पळसे येथे संपन्न झाली,मनसे तालुकाध्यक्ष श्री सुनिल गायधनी ह्यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा संपन्न झाला. तालुक्यात मनविसेच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मनसे -विद्यार्थी सेना ◆नियुक्ती◆कामोठे(पनवेल, रायगड)
मनसे-विद्यार्थी सेना कामोठे शहरातील पदाधिकारी यांची नियुक्ती मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर साहेब यांच्या हस्ते पत्रक देऊन करण्यात आली. त्यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत , मनविसे जिल्हाध्यक्ष ऍड अक्षय काशिद उपस्थित होते. 

मनसे -महिला सेना ◆नियुक्ती ◆चिपळूण
मनसे महिला सेना चिपळूण तालुका अध्यक्षपदी अस्मिता पेंढामकर यांची नियुक्ती श्री संतोष नलावडे(मनसे चिपळूण तालुकाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Tuesday 10 November 2020

२ नोव्हेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

दिनांक ०२/११/२०२० ◆ मनसे बातमीपत्र

राजसाहेब ◆ कृष्णकुंज
शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, कोचिंग क्लासचे संचालक ह्यांनी सन्माननीय राजसाहेब ह्यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे राजसाहेबांसमोर मांडले.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ भिवंडी
श्री डी के म्हात्रे (प्रदेश उपाध्यक्ष) श्री वैभव किणी (संपर्क अध्यक्ष) ह्यांच्या उपस्थितीत भिवंडी येथे तरुणांचा पक्षप्रवेश..!

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ नवी मुंबई
नवी मुंबई उपशहर अध्यक्ष श्री निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली दिघा येथील प्रभाग क्रमांक १ व ३ मधील विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ खेड (रत्नागिरी)
खेड शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विविध पक्षातील कार्येकर्त्यांनी मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर ह्यांच्या उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला..!

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ पुणे
पुणे येथील युवा सेनचे उपनेते श्री संग्राम माळी यांनी  कार्येकर्त्यांसह मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मनसे ◆ पक्षप्रवेश ◆ नवी मुंबई (ठाणे)
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबई नेरुळ पूर्व मधील विद्यार्थी, तरुण, महीलांनी शहर अध्यक्ष श्री गजानन काळे, सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

मनसे ◆ उद्घाटन ◆ पारनेर
मनसे पारनेर तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब माळी ह्यांच्या हस्ते तालुक्यातील दोन मनसे कार्यालयांचे उद्घाटन समारंभ संपन्न झाले.

मनसे ◆ भेट ◆ कांदिवली(मुंबई)
रेयान ईँटरनॅशनल स्कुल कांदीवली पूर्व शाळेकडुन कोरोनाकाळात विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुलीच्या तक्रारी आल्यानंतर श्री.नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली शाळा प्रशासनाला जाब विचारण्यात आला,येत्या ४-५ दिवसात फि कपातीबाबतीत प्रशासनाकडुन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. 

मनसे ◆ भेट ◆ मीरा भाईंदर (ठाणे)
टेंभा रुग्णालयातील (मीरा भाईंदर) सफाई कामगारांना कामावरून कमी करणे, वेतन न देणे, महिलांवर अत्याचार करणे अश्या समस्यांबाबत मनसेचे मिरारोड भाईंदर येथील श्री संदीप राणे यांनी सहकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, दोन दिवसात प्रश्न मार्गी निघेल असे मनसेला आश्वासन दिले. 

मनसे - रस्ते आस्थापना ◆ यश ◆ कल्याण (ठाणे)
कल्याण शहरातील खड्यांच्या दुरावस्थेबाबत मनसे रस्ते आस्थापना विभागाचे श्री रोहन अक्केवार ह्यांनी पाठपुरावा केला होता,वारंवार दुर्लक्ष करून अखेर प्रशासनाला दखल घेणे भाग पडले,मनसेच्या पाठपुराव्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम चालू.

मनसे - महिला सेना ◆ यश ◆ ठाणे
मनसेच्या ठाणे मनपाच्या माजी नगरसेविका सौ राजश्री नाईक ह्यांच्या प्रयत्नांनी पीपल्स शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी वर २५℅ सवलत देण्याचा निर्णय घेण्याक्त आला आहे.

मनसे ◆ मेळावा ◆ नाशिक
संघटना बांधणी,आगामी ग्राम पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांचा कामाचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते श्री प्रदीप पवार,श्री अशोक मुर्तडक व इतर पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्येकर्ता मेळावा संपन्न झाला.

मनसे ◆ मोर्चा ◆ अहमदनगर
मनसे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे आणि अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली "महिला बचत गट" कर्जमाफी साठी मनसे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मनसे - वाहतूक सेना ◆ भूमिका ◆ पालघर
पालघर जिल्ह्यातील मनसे वाहतूक सेनेची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.

मनसे - पालिका कर्मचारी सेना ◆ भूमिका ◆ वसई विरार
वसई विरार महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

मनसे ◆ भूमिका ◆ संभाजी नगर
मनसेचे संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष श्री सुहास दशरथे ह्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलन कर्त्यांची (मंडप, केटरिंग, फुल व्यवसायिक, ब्राह्मण महासंघ, ऑर्केस्ट्रा इत्यादी) भेट घेऊन मनसेचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला.

मनसे - कामगार सेना ◆ भूमिका ◆ अंधेरी
कामगारांचे थकलेले वेतन आणि कायदेशीर देणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या टॉप्स सिक्युरिटीच्या अंधेरी येथील कार्यालयाला श्री रोहन सावंत (विभाग अध्यक्ष) श्री केतन नाईक (चिटणीस, मनसे कामगार सेना) ह्यांच्या नेतृत्वाखाली टाळे लावण्यात आले आहे. 

मनसे - विधी, जनहित कक्ष ◆ भूमिका ◆ पुणे
लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे विभागात समाविष्ट करण्यासाठी स्थानिक आमदार सकारात्मक नसले तरीही मनसे जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष Adv श्री गणेश म्हस्के ह्यांनी पक्ष सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

मनसे - वाहतूक सेना ◆ उपक्रम ◆ विरार (पालघर)
मनसे वाहतूक सेनेचे नवनिर्वाचित पालघर जिल्हा अध्यक्ष श्री विनोद मोरे ह्यांच्या नेतृत्वाखाली वसई विरार शहरातील रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे.

मनसे ◆ उपक्रम ◆ पुणे
येरवडा रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा, रिक्षा चालकांना धान्याचे किट वाटप मनसेचे नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरअध्यक्ष मा. श्री. अजयभाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मनसे ◆ उपक्रम ◆ पालघर
मनसे पालघरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मनसे - चित्रपट सेना ◆ उपक्रम ◆ घाटकोपर (मुंबई)
सर्वसामान्य माणसाला मनपाचा "मास्क न घातल्यामुळे"दंड लागू नये, कोविड पासून सुरक्षा व्हावी म्हणून मनसे चित्रपट सेनेकडून घाटकोपर येथे "मोफत मास्क वाटप" उपक्रम हाती घेण्यात आला होता.

मनसे ◆ उपक्रम ◆ कल्याण-डोंबिवली (ठाणे)
मनसे आमदार श्री राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनकृत आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्ड चे वाटप सोबत मोफत मास्क चे वाटप करण्यात येणार आहे. 

मनसे ◆ उपोषण ◆ उल्हासनगर(ठाणे)
मनसेचे श्री सचिन कदम (जिल्हा अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर येथे मागील १५ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने "पाण्यासाठी-आमरण उपोषण" दिनांक २ नोव्हेंबर पासून चालू झाले आहे.

मनसे ◆ उपोषण ◆ अंधेरी (मुंबई उपनगर)
अंधेरी पश्चिम येथील जुहू मंगेला वाडी येथील स्थानिक कोळी बांधवाची घरे उध्वस्त करणाऱ्या नरेश जैन ह्या विकासकावर गुन्हा नोंदवण्यासाठी मनसेच्या वतीने विभाग अध्यक्ष श्री मनीष धुरी ह्यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय उपोषण करण्यात आले.

मनसे - महिला सेना ◆ पर्दाफाश ◆ कळवा (ठाणे)
मनसेच्या कळवा मुंब्रा विभाग अध्यक्षा काजल डावखर ह्यांनी ठाणे मनपा चा भोंगळ कारभार उघडकीस आणला आहे, खारेगाव येथील कोविड सेंटरच्या बाहेर PPE किट आढळल्याने मनसेने पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ निवेदन ◆ नाशिक
अंतिम सत्र वगळता प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या बॅकलॉग/ वायडी/ ए.टी.के.टी. विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याबाबत मनविसेच्या वतीने श्री संदेश जगताप ह्यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मा.कुलगुरूंना निवेदन. 

मनसे - सहकार सेना ◆ निवेदन ◆ अहमदनगर
महिला बचत गटांचे कर्जमाफ झाले पाहिजे ह्या मागणीसाठी मनसेचे सरचिटणीस/ सहकार सेनेचे अध्यक्ष श्री दिलिप धोत्रे ह्यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ वरळी (मुंबई)
पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे ह्यांच्या मतदारसंघात जे बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे उभे राहिले आहेत त्यावर कारवाई करण्यासाठी मनसेचे शाखा अध्यक्ष श्री मारुती दळवी(प्रभाग १९९) यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांना निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ पाथरी (परभणी)
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात "बाभळगाव मंडळ" ला समाविष्ट करून घेण्यासाठी मनसेचे पाथरी तालुका अध्यक्ष श्री पांडुरंग सोनवणे ह्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.

मनसे - महिला सेना ◆ निवेदन ◆ पनवेल (रायगड)
पनवेलमधील रस्त्यांच्यासंदर्भत शितल सिलकर (पनवेल शहर अध्यक्ष) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.१५ दिवसात रस्ते दुरुस्ती झाली नाही तर खड्यांत वृक्षारोपण करू असा इशारा देखील दिला.

मनसे ◆ निवेदन ◆ कुडाळ (सिंधुदुर्ग)
मनसे कुडाळच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांत कोविड रुग्ण/ नातेवाईक ह्यांची होत असलेली लूट संदर्भात लक्ष घालण्यासाठी निवेदन दिले.

मनसे ◆ निवेदन ◆ मालवण (सिंधुदुर्ग)
मालवण तालुक्यात कर्ली, खालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा चालू आहे पण प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. अनधिकृत वाळू उपसा करून पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.

मनसे ◆ निवेदन ◆ घाटकोपर (मुंबई उपनगर)
महानगर गॅस कडून झालेल्या बिल वाढी विरोधात मनसेचे प्रभाग क्रमांक १३२ चे शाखा अध्यक्ष श्री अभिजित शेजवळ ह्यांनी महानगर गॅस व्यवस्थापनला निवेदन लिहून कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली.

मनसे ◆ निवेदन ◆ गुहागर (रत्नागिरी)
हेदवी (गुहागर, रत्नागिरी) येथे बँक ऑफ महाराष्ट्र कडून होत असलेल्या हिंदीत व्यवहार बद्दल मनसेच्या वतीने श्री विनोद जानवळकर (मनसे तालुका अध्यक्ष) ह्यांनी सहकाऱ्यांसह  स्थानिक मातृभाषेतून व्यवहार करावा ह्या मागणीसाठी निवेदन दिले, सोबत राज्य शासनाचा GR सुद्धा दिला.

मनसे ◆ निवेदन ◆ भांडुप (मुंबई)
मनसेचे श्री सुनिल नारकर (प्रभाग क्रमांक ११२, शाखा अध्यक्ष) ह्यांनी नागरी समस्यांच्या (उद्यान समस्या, गटारे साफसफाई, पादचारी मार्गावर होणारे अश्लिल चाळे) बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मनसे - विद्यार्थी सेना ◆ निवेदन ◆ भांबेड (लांजा, रत्नागिरी)
भांबेड MSEB नवनिर्वाचित अधिकारी श्री तेरसे यांचे मनसे तर्फे कु किरण रेवाळे (मनविसे सहसंपर्क सचिव) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले व मृत अवस्थेत असलेले विद्युत खांब बदलण्यासाठी निवेदन दिले. 

मनसे - रोजगार, स्वयंरोजगार विभाग ◆ नियुक्ती ◆ रायगड
मनसे रोजगार व स्वयंरोजगार चे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. महेंद्र बैसाणे आणि जिल्हा संघटक श्री. रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री. यतिन देशमुख यांची मनसे "रोजगार व  स्वयंरोजगार" विभागाच्या उपजिल्हा संघटक (रायगड) पदी नियुक्ती करण्यात आली.