Friday 18 September 2020

१८ सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी.

१८ सप्टेंबर २०२० • मनसे बातमीपत्र

१.मुंबई /पक्षप्रवेश
पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी श्री संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

२.नवी मुंबई
शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थांवर कारवाई करावी अशी मागणी मनसे नवी मुंबई चे शहराध्यक्ष श्री गजानन काळे यांनी केली आहे.

३.मनविसे /मनसे मागणी
मनविसे अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर यांनी वेगवेगळ्या कक्षेतील विद्यार्थ्यांच्या  समस्या घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले

४.लातूर /मनसे मागणी
लातूर जिल्ह्यातील जळकोट येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.50 हा सर्व्हिस रोड आणि दुभाजकासह व्हावा जेणेकरून बाहेर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना अडचण होणार नाही यासाठी मनसे जळकोटच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली.

५.अहमदनगर /मनसे मागणी
अहमदनगर येथे खाजगी इस्पितळ रुग्णांना भरती करण्यापूर्वीच ४० हजार ते  १ लाख पर्यन्त डिपॉझिट भरायला लावतात,मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा काय?मनसेचे नितीन बुतारे यांनी आरोग्य विभागाकडे लक्ष घालण्यास मागणी केली आहे.प्रशासनाने लक्ष न घातल्यास खाजगी इस्पितळाना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

६.रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील डासांचे वाढते प्रमाण लक्षात घेता साफसफाई करण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे,मनसेच्या कार्येकर्त्यांनी स्वतःला ह्या कार्यात झोकून देऊन सांडपाणी स्वच्छता करून घेतली.

७.महाराष्ट्र रेल्वे कामगार सेना
मध्य रेल्वेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल तसेच मुंबई विभागातील कल्याण रेल्वे हॉस्पिटल आणि डिस्पेंसरी मध्ये कार्यरत कामगारांच्या समस्यांबाबत मुख्य आरोग्य अधिकारी, सेंट्रल रेल्वे यांची केंद्रीय उपाध्यक्ष श्री भास्कर खुडे यांनी भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले.

८.अहमदनगर
सहा महिने बंद नंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता कर्फ्यु बाबत नागरिकांनी निर्णय घ्यावा असे सांगितले. जनता कर्फ्युला ‘मनसे’ विरोध, नगरकरांनाही केले सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

९.राजगुरू नगर पुणे / खळखट्याक
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने महावितरणाला दणका दिला आहे. राजगुरूनगर येथील चांदोली येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांवरून महावितरण कार्यकारी उपअभियंता यांचे कार्यालय फोडले.

१०.ठाणे /मनसे सामाजिक
ठाण्यात पालिका प्रशासनाच्या गरजेनुसार मनसेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

११.दहिसर /मनसे निवेदन
दहिसर टोल नाका येथे चालकांच्या अनेक तक्रारी मनसेच्या कार्यालयात येत होत्या मनसे शाखा क्रमांक ४ चे शाखा अध्यक्ष श्री संतोष शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह टोल नाका व्यवस्थापनाला भेट देऊन समस्यांचे निवेदन दिले.

१२.नवी मुंबई /मनसे आंदोलन
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला. नागरिकानी नाहक त्रास सहन का करावा? अपघातात जखमी तरुणांच्या उपचाराचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा अशी मागणी करत मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेने पी डब्लू डी ला ‘डांबर’ट सन्मान दिला.

१३.उरण 
JNPT पोर्ट वरून सर्व ट्राफिक गुजरात च्या दिशेने वळवली जात आहे,मनसेचे नाविक सेनेचे कार्याध्यक्ष श्री निशांत गायकवाड यांनी आवाज उठवला होता. शिवसेना खासदार श्री संजय राऊत यांनी असज राज्यसभेत तोच प्रश्न उपस्थित केला.

१४.पनवेल /मनसे यश
ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका,फी वसुलीचा तगादा लावू नका.मनविसेचे श्री अक्षय काशीद यांच्या प्रयत्नांना यश.

१५.मिरारोड
आज मनसे शहर सचिव अनिल रानावडे यांच्या कार्यालयात उपशहर अध्यक्षा सौ रेश्मा तपासे यांनी महिलांना शासकीय योजनांसंबंधी माहिती दिली. नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

१६.भंडारा /पक्षप्रवेश
भंडारा शहरातील अनेक तरुणांनी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मनसेत जाहीर प्रवेश केला.

१७.नागपूर /पक्षप्रवेश
मध्य नागपूर विभागातील अनेक वरिष्ठ नागरिक तसेच युवकांनी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे ,मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे यांच्या उपस्थितीत शहर कार्यालयालात मनसेत जाहीर प्रवेश केला.

१८.अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णांची संख्या,रुग्णवाहिकेचा तुटवडा अश्या अनेक समस्यांचे निवेदन मनविसे अहमदनगर यांनी  पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना दिले.

१९.मिरारोड /मनसे प्रवेश 
मनसेकडून शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,उपस्थित महिलांनी कामाची पद्धत पाहून त्याच कार्यक्रमात मनसे पक्षात प्रवेश केला.

२०.नवी मुंबई
नवी मुंबईतील ७२ ठाेक मानधन शिक्षकांच्या थकीत वेतनातील १३ महिन्यांचा वेतन फरक ६० लाख रुपये येत्या ७ दिवसात देणार.मनसेच्या मागणीनंतर मनपा अतिरिक्त आयुक्तांचे मनसे ला आश्वासन.

२१.नाशिक
कॅन्टोमेंट झोन मध्ये फवारणीला होणाऱ्या दिरंगाई बद्दल मनसेचा नवीन नाशिक विभागीय कार्यालयात घेराव. अनेक समस्यांचे विभागीय अधिकारी श्री मयूर पाटील यांना मनसेचे निवेदन.

२२.पनवेल
सेंट विल्फ्रेडस कॉलेज मध्ये काही विध्यार्थ्यांच्या ऐनओसी (NOC)  देण्यासाठी भरपूर दिवस टाळाटाळ करत होते तरी त्या विध्यार्थ्यानी पनवेल मनसे ला संपर्क साधला आणि काही तासात त्यांना पनवेल मनसे ने न्याय मिळवून दिला. पालकांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि पनवेल मनसेचे आभार मानले.

२३.नवीमुंबई /मनसे आंदोलन
खड्डे युक्त रस्त्यांच्या विरोधात नवी मुंबईत मनसे घातले राज्य सरकारचे श्राद्ध, सरकारचा पिंडदान करून केला निषेध

२४.लातूर /मनसे मागणी
सहा महिन्यांची वीजबिल माफी व अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची  जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांची "मनसे"रास्ता रोको आंदोलनात मागणी.

२५.भांबेड लांजा/मनसे मागणी
महावितरण विभागाने अखंडित वीजपुरवठा  भांभेड मधील रहिवाश्यांनी द्यावा अशी मागणी मनविसे सहसंपर्क अध्यक्ष श्री किरण रेवाळे यांनी केली.

२६.विरार
मनसेकडून विरार महावितरण कार्यालयावर लाटणी मोर्चा काढण्यात येणार होता,महावितरण अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मोर्चा अगोदरच चर्चेस बोलावले.मनसेच्या शिष्टमंडळाने नागरिकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

२७.मुरुड /आंदोलन
मुरुड येथे खड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक,खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासन ,राज्यसरकार यांचा निषेध केला.

२८.ठाणे/ मनसे यश
घोडबंदर गावात ७०२ BEST च्या बस फेऱ्या वाढवण्यात मनसेला यश.  दोन दिवसात प्रवाश्यांचे सर्वे करून फेऱ्या वाढविण्यात येणार.

२९.नालासोपारा /रोजगार मेळावा
मोरेगाव नालासोपारा येथे मनसेच्या वतीने २० सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

३०.सांगोला (सांगली) /खळखट्याक
करगणी-शेटफळे या रस्त्यावर ओहरलोड वाहतूक करून खराब केला आहे, तो रस्ता दुरुस्त करावा, तसेच पत्रेवाडीतील कुटुंबांची घरे पाडली जात आहेत कोरोना परिस्थितीमुळे अनंत अडचणी असताना अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे तरी त्यांना शासनाने नुकसान भरपाई दिली पाहिजे. म्हणून मनसेने 3 सप्टेंबर रोजी निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्यामुळे मनसेनं आज खळखट्याक आंदोलन केले.

३१.खेड (रत्नागिरी) /मनसे उपक्रम
खेड तालुक्यातील तले आरोग्य केंद्रात मनसेकडून स्टीम वेपोरायसरचे वाटप मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर (खेड नगराध्यक्ष)यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

३२.नवी मुंबई
६६ निवासी डाॅक्टर मनपा रुग्णालयात काेविडमध्येही निरंतर सेवा देत आहेत. इतर मनपाने यांचे वेतन ५० हजार केल्यानंतरही नवी मुंबई मनपा प्रतिसाद देत नसतांना मनसे ने हा प्रश्न हाती घेतला व डाॅक्टरांचे वेतन ५० हजार करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले.डॉक्टरांनी मनसेच्या श्री गजानन काळे (शहर अध्यक्ष) यांचे आभार मानले.

धन्यवाद
*MNS Report Team*

No comments:

Post a Comment