Wednesday 30 September 2020

२८ सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२८ सप्टेंबर २०२० • मनसे बातमीपत्र

1. धुळे • मनसे प्रवेश
धुळे जिल्हाध्यक्ष श्री दुष्यंतराजे देशमुख व श्री संजय सोनवणे यांच्या उपस्थितीत धुळे येथे तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला. 

2. भांडुप (मुंबई) • मनसे प्रवेश
भांडुप येथील शिवसेनेच्या कार्येकर्त्यांनी श्री विनोद शिंदे(विभाग अध्यक्ष) श्री अजय मिरेकर(उपविभाग अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

3. चोपडा(जळगाव) • मनसे प्रवेश
चोपडा येथील अनेक तरुणांनी श्री राजेंद्र निकम(रस्ते आस्थापना विभाग जिल्हाध्यक्ष)श्री अजय परदेशी(रस्ते आस्थापना तालुका अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

4. ठाणे • मनसे प्रवेश
ठाणे जिल्ह्यातील प्रभाग क्रमांक २२ येथील तरुणांनी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव ,श्री रविंद्र मोरे(ठाणे शहर अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला

5. ठाणे • मनसे प्रवेश 
विक्रमगड तालुक्यातील तरुणांनी श्री अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मनसे पक्षात प्रवेश केला.

6. मालवण (सिंधुदुर्ग) • मनसे प्रवेश
मालवण तालुक्यातील तारकर्ली,भराड नाका,मालवण शहर येथील तरुणांनी मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.

7. पुणे • मनसे प्रवेश
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोविड हेल्पलाईन सेंटर कात्रज येथे विनीत चव्हाण सह मांगडेवाडी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी मनसे पुणे शहरअध्यक्ष अजयभाऊ शिंदे यांचे उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला .

8. मुंबई • मनसे प्रवेश
प्रभाग क्रमांक ११ येथील काजूपाडा,सावरपाडा तरुणांनी श्री नयन कदम(मनसे उपाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

9. मानखुर्द (मुंबई) • मनसे प्रवेश
मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री संजय नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्येकर्त्यांनी मनसेत पक्षप्रवेश केला.

10. सांगली • मनसे निवेदन
प्रकाश स्टोन क्रेशर अमोनिया नायट्रेट चा वापर करून भूकंपजन्य परिस्थिती निर्माण करत आहे, नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे, श्री तानाजी सावंत (सांगली जिल्हाध्यक्ष) यांनी यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले

11. मुंबई • मनसे निवेदन
बस प्रवाश्यांच्या समस्यांची तक्रार मनसे प्रभाग क्रमांक १३२ शाखेत आल्या होत्या,मनसे शाखा अध्यक्ष श्री अभिजित शेजवळ यांनी कुर्ला बस डेपो स्थानकात अधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या समस्यांचे निवेदन दिले.

12. मानखुर्द मुंबई • मनसे निवेदन
मानखुर्द घाटकोपर लिंक रोड वरील खड्यांच्या समस्या बाबत श्री श्रीमंत बाळाप्पा टेंगळे (संघटक, शिवाजी नगर विधानसभा) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

13. नवी मुंबई • मनसे निवेदन
दिघा ईलठणपाडा येथील खांडी धरणाची झालेली प्रचंड दुरवस्था सुधारणे बाबत मनसेचे श्री रुपेश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले.

14. चिपळूण (रत्नागिरी) • मनसे निवेदन
विद्यापीठ परीक्षा घेण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे,चिपळूण मनविसे ने परीक्षा काळात विद्युत पुरवठा, इंटरनेट सेवा अखंडीच चालू ठेवण्यासाठी वीज कंपनीला, मोबाईल इंटरनेट कंपन्यांना आज निवेदन देण्यात आले.

15. पुणे • मनसे निवेदन
IIHM (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) ट्युशन फी व्यतिरिक्त इतरही फी विद्यार्थ्यांवर लादत आहे. अश्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या त्या विरोधात मनसेच्या श्री सारंग सराफ, श्री कृष्णा मोहिते यांनी  संस्थेला निवेदन समस्यांचे निवेदन दिले.

16. मुंबई • मनसे इशारा
लॉकडाऊन दरम्यान अविरत सेवा देणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विमानतळ व्यवस्थापनाला आंदोलन व संपाचा इशारा.

17. रत्नागिरी • मनसे उपोषण
कोरोना काळात आलेले वीजबिल माफ करा अन्यथा गेले चाळीस वर्षे विजेचे खांब ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत उभे आहेत त्यांना भाडे द्या. अश्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण मनसे जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सुरू झाले.

18. राजापूर (रत्नागिरी) • मनसे यश
राजापूर ओझर बस चालू करण्यासाठी मनसेच्या श्री संजय जड्यार (उपतालुकाध्यक्ष) आणि सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. मनसेच्या पाठपुराव्याला यश आले आहे, ST महामंडळाने सदर मार्गावरील बस सेवा चालू केली.


19. मुंबई • मनसे दणका
मुंबईतील सर्वात मोठे कोविड सेंटर BKC येथील परिचारिकांना ठेकेदाराने वेतन न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकले आणि ललित हॉटेल मधून सुद्धा बाहेर काढले. श्री अखिल चित्रे यांनी मागणी लावून धरत त्या परिचारिकांना न्याय मिळवून दिला.

20. मुंबई • मनसे दणका
बोरिवली पश्चिम येथील इन्फोसिस प्लेसमेंट च्या विरोधात काही तरुण तरुणींच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या. सौ. सुप्रिया ताई (विभाग अध्यक्षा) सौ. प्रियांका भोले (शाखा अध्यक्षा) त्या तरुणांना/ तरुणींना न्याय मिळवून दिला.

21. कळवा (ठाणे) • मनसे उपक्रम
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर  निधी शिबिराचे आयोजन श्री सुशांत सूर्यराव (शहर उपाध्यक्ष) शहरातील तरुणांसाठी केले होते.

22. विरार (पालघर) • मनसे यश
प्रभाग क्रमांक २५ शाखा अध्यक्ष श्री विश्वनाथ कुळे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रभाग क्रमांक २५ मधील नागरी समस्या (दुरावस्थेत असलेली गटारांची झाकणे) सोडवण्यात यश आले.

23. ठाणे • मनसे उपक्रम
मनसे, स्वराज्य सामाजिक सेवा, ठाणे मनपा, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २० मधील लोकांना "मोबाईल डिस्पेनसरी व्हॅन" सेवा आयोजित करण्यात आली होती. ३०० हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला. 


धन्यवाद ..

जय महाराष्ट्र !

२७ सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी

२७ सप्टेंबर २०२०•मनसे बातमीपत्र*

१.मुंबई /विनम्र अभिवादन
आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी जसवंत सिंग एक आहेत,मनसे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे यांनी जसवंत सिंग ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

२.मुंबई /कामगार प्रश्न
विमानतळ कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय विरोधात बोलण्यासाठी मनसेचे नेते श्री नितीन सरदेसाई उद्या समाज माध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट करतील.

३.मुंबई /कामगार प्रश्न
"जर कामावरून काढलेल्या माझ्या मराठी कामगारांना पुन्हा तुम्ही कामावर घेतले नाही तर, तुम्हाला मी धो-धो धुतल्याशिवाय राहणार नाही!" असा सज्जड दम श्री गजानन राणे(मनसे कामगार नेते) यांनी कंपनी व्यवस्थापनला भरला आहे.


४.मुंबई /मनसे इशारा
वाढवून आलेली बिले माफ झालीच पाहिजे, तारीख पे तारीख चालणार नाही मनसे नेते बाळा नांदगावकरांचा वीज कंपन्यांना इशारा मनसे इशारा.

५.मुंबई /मनसे यश
मनसेच्या संविनय कायदेभंग आंदोलन नंतर रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन वाढवण्यात आल्या.

६.मुंबई /मनसे यश
श्री कुणाल माईनकर(उप विभाग अध्यक्ष प्रभाग १३,१४) यांच्या निवेदन नंतर मेट्रो मॉल मध्ये सुरवातीला दर्शनी भागात मराठीत बदल झसले होते आता मोठ्या प्रमाणात संपूर्ण मॉल मध्ये मराठी फलक लावण्यात आले.

७.मुंबई /मनसे मदत
श्री.अनिष खंडागळे(उप शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक १८९) यांनी कोरोना ग्रस्त रुग्णाचे भरमसाठ बिल माफ करून घेतले,रुग्णांच्या नातेवाईकांनी मनसेचे आभार मानले.

८.मुंबई /मनसे भीती
मनसे सरचिटणीस सौ शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  राजाराणी मल्होत्रा विद्यालय व्यवस्थापनला मनसे शिष्टमंडळ भेट देणार कळताच व्यवस्थापन फरारी.अखेर शिक्षण अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून भेट घालून देण्याचे आश्वासन दिले.

९.मुंबई/मनसे लढा
शिवसेना नेते दिवाकर रावते यांचा मुलगा विकासक असलेल्या कंपनीने राहिवाश्यांचे भाडे थकवले आहेत,मनसेच्या माध्यमातून श्री राकेश गुरव(महाराष्ट्र सैनिक) यांच्याकडून नागरिकांच्या समस्यांसाठी लढा चालू.

१०.मुंबई/मनसे उपक्रम
मनसे वांद्रे विधानसभा च्या वतीने टाटा हॉस्पिटल येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

११.मुंबई /केबल चालकांच्या समस्या
केबल चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मनसे केबल सेनेची बैठक श्री परेश तेलंग(मनसे केबल सेना अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली माहीम येथे पार पडली

१२.शेवगाव(अहमदनगर)/ मनसे आंदोलन
श्री गणेश रांधवणे(तालुका अध्यक्ष),श्री गोकुळ भागवत( जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली गाडगेबाबा चौक येथे खड्यांच्या निषेधार्थ झाडे लावून केले आंदोलन.

१३.जालना/पक्षप्रवेश
श्री सिद्धेश्वर काकडे(मनविसे राज्य कार्यकारणी) यांच्या नेतृत्वाखाली आज जालना येथे तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.


१४.नांदेड/मनसे मागणी
अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई द्या अशी मागणी श्री राहुल शिंदे(जिल्हा उपाध्यक्ष)यांनी केली आहे.

१५.नवी मुंबई/पक्षप्रवेश
कोपरखैरणे, घणसोली, नेरुळ येथील टूर्स आणि ट्रॅव्हल च्या चालक ,मालकांनी नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री गजानन काळे,श्री नितिन खानविलकर(वाहतूक सेना उपाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश करत वाहतूक सेनेचे सभासत्व स्वीकारले.

१६.संभाजीनगर/पक्षप्रवेश
मनसेच्या चित्रपट सेनेत श्री अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रमेश परदेशी(अभिनेता) यांच्या उपस्थितीत ५० हुन कलाकार, लोक कलावंत ह्यांनी पक्षप्रवेश केला.

१७.पुणे/भूमिपूजन
मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर यांच्या नगरसेवक निधीतून कोंढवा प्रभागात शिवनेरी गल्ली क्रमांक ९ या सोसायटी साठी पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे भूमिपूजन झाले.


१८.आळंदी(पुणे)/पक्षप्रवेश
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन श्री बाबू वागस्कर(मनसे नेते) यांच्या उपस्थितीत तरुणांनी आज मनसे पक्षात प्रवेश केला.

१९.भोसरी(पुणे)/पक्षप्रवेश
श्री अंकुश तपकीर यांच्या पुढाकाराने आज भोसरी येथे तरुणांचा मनसे पक्षात पक्षप्रवेश झाला.

२०.शिरूर(पुणे)/राज आशिर्वाद
कोरोना काळात स्वतःला वाहून देणाऱ्या शिरूर येथील कार्येकर्त्यांनी राजसाहेबांची भेट घेऊन,राजसाहेबांचे आशीर्वाद घेतले.

२१.नालासोपारा(पालघर)/मनसे उपक्रम
मनविसे कांदिवली आणि नालासोपारा शहर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा येथे गरजूंना धान्य वाटप.

२२.नालासोपारा(पालघर) /वचनपूर्ती
श्री राज नागरे(नालासोपारा शहर सचिव)यांनी प्रभाग ३९ येथील साई वेल्फेअर सोसायटीच्या नागरिकांना पाण्याची समस्या मनसेकडून सोडवली जाईल असे आश्वासन दिले होते.आज त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते पूर्ण करत ५९ कुटुंबियांची समस्या सोडवली.

२३.रोहा(रायगड)/मनसे पक्षप्रवेश
कोलाड शहरातील तरुणांनी श्री दिलीप सांगले(जिल्हा संपर्क अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत आज तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

२४.पनवेल(रायगड) /मनसे नियुक्ती
मनसे रस्ते आस्थापना विभागाच्या पनवेल येथील नियुक्त्या श्री योगेश चिले (रस्ते आस्थापना विभाग सरचिटणीस)यांनी केल्या.


२५.रत्नागिरी/पक्ष भूमिका
राज्य सरकारच्या "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत बैठकीत श्री वैभव खेडेकर(खेड नगराध्यक्ष, मनसे सरचिटणीस) सहभागी होत कोविड परिस्थिती वर भूमिका स्पष्ट केली.

२६.रत्नागिरी/मनसे यश
आरवली येथील विजेचा खांब निकामी झाला होता मनसे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने महावितरण विभागाने खांब बदलण्याच्या कामाला सुरुवात केली.

२७.सांगली/पक्षप्रवेश
पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावातील आज युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

२८.कणकवली(सिंधुदुर्ग) /मनसे आंदोलन
रस्त्यावरील खड्यांच्या संदर्भात निवेदन देऊनही चर्चेस तयार नसलेले अधिकारी जोपर्यंत चर्चेस तयार होत नाहीत तोपर्यंत  उद्यपासून मनसेचे आंदोलन चालू होणार आहे.

२९.सिंधुदुर्ग /मनसे यश
श्री परशुराम उपरकर (राज्य सरचिटणीस),श्री प्रसाद गावडे(कुडाळ तालुका अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा वृक्ष लागवडीचे शेतकऱ्यांचा मोबदला अनुदान रक्कम मंजूर होत आहे.

३०.सोलापूर /पक्षप्रमुख
मनसे सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी मनसे पक्षात पक्षप्रवेश केला.

३१.डोंबिवली(ठाणे)/मनसे उपक्रम
श्री भुपेंद्र पाटील,श्री विवेक धुमाळ यांच्या पुढाकाराने डोंबिवली प्रभाग ९२(गणेश वाडी) येथे मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पॅनकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

३२.ठाणे/मनसे इशारा
नागरिकांना महावितरण कंपन्यांनी दिलासा नाही दिला तर मनसे ठाण्यात खळ खट्याक करेल असा इशारा ठाणे शहर अध्यक्ष श्री रविंद्र मोरे यांनी दिला आहे.

३३.कल्याण(ठाणे)/मनसे उपक्रम
कल्याण येथील म्हारळ गाव येथे श्री राजन चव्हाण(विभाग अध्यक्ष) यांच्याकडून  १० वी & १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप.

३४.डोंबिवली(ठाणे)/मनसे उपक्रम
मनसे आमदार श्री राजु पाटील ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक २९(KDMC) च्या वतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.

३५.डोंबिवली(ठाणे)/मनसे उपक्रम
मोफत PUC तपासणी,वाहनांचे निर्जंतुकीकरण,कोरोना सेंटर मध्ये फळांचे वाटप,N95 मास्क चे वाटप असे उपक्रम श्री राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली येथे घेण्यात आले.

३६.मिरारोड,भाईंदर(ठाणे)/मनसे मागणी
दुकानावरील वेळेचे बंधन काढून मीरा भाईंदर मधील दुकाने रात्री ११ वाजे पर्यंत चालू ठेवावीत.अशी मागणक संदीप राणे (महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना - उपाध्यक्ष )यांनी केली आहे.

३७.बदलापूर(ठाणे)/मनसे उपक्रम
वाढीव वीजबिल विरोधात जनतेची नाराजी आहे,मनसे बदलापूर महिला सेनेच्या सौ संगीता चेंदवणकर यांच्या पुढाकाराने शहरात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  १ ते ३ ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय "ग्राहक तक्रार निवारण शिबिर" चे आयोजन केले आहे.


३८.वर्धा /मनसे पक्षप्रवेश
श्री.अतुल वंदिले(वर्धा जिल्हा अध्यक्ष )यांच्या उपस्थितीत आज तरुणांचा पक्षप्रवेश झाला.

३९.नालासोपारा(ठाणे)/मनसे मागणी
मनसे अलकपुरी विभाग अध्यक्ष श्री महेश पालांडे यांनी जनतेच्या पैशाचा गैरवापर(शौचालय दुरुस्ती ) करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

४०.कोल्हापूर 
श्री गजानन जाधव(कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष),श्री रवी गोंदकर(जिल्हा उपाध्यक्ष)यांच्या उपस्थितीत आज इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

धन्यवाद 
MNS Report

२९ सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी.

२९ सप्टेंबर २०२०• मनसे बातमीपत्र


१.कोल्हापूर/मनसेप्रवेश
इचलकरंजी शहरातील तरुणांनी श्री रवी गोंदकर(मनसे जिल्हा उपाध्यक्ष),श्री प्रताप राव पाटील(तालुका अध्यक्ष ) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

२.नागपूर/मनसे प्रवेश 
श्री विशाल बडगे(शहर अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील तरुणांनी मनसे पक्षात पक्षप्रवेश केला.

३.मुंबई/मनसेप्रवेश
अंधेरी प्रभाग क्र ७६ मधील अनेक तरुणांनी श्री रोहन सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्री विजय पोमेंडकर(उपविभाग अध्यक्ष) श्री स्वप्निल मुंडये यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.

४.सांगली/मनसेप्रवेश
श्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत श्री सागर सुतार(पलूस तालुका अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली पलूस मधील तरुणांनी मनसे पक्षात पक्षप्रवेश केला.

५.उदगीर(लातूर)/मनसेप्रवेश
श्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली  श्री दयानंद डोंगरे(कामगार सेना तालुका अध्यक्ष) यांच्या सोमनाथपुर येथील नवीन शाखेचे उद्घाटन झाले तेथील स्थानिक तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

६.चिंचवड(पुणे)/मनसे प्रवेश
श्री सचिन चिखले(मनसे नगरसेवक) आणि सहकार्य यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवत विधानसभा क्षेत्रातील तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

७.मिरारोड भाईंदर(ठाणे)/मनसे प्रवेश
मनपा मध्ये कार्यरत असलेल्या सैनिक सुरक्षा रक्षक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मनसे पक्षाचे सदसत्व श्री विजय मांडवकर(महानगरपालिका कामगार सेना अध्यक्ष)यांच्या उपस्थितीत स्वीकारले, कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी साठी मनसे कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.



८.रत्नागिरी/मनसे यश
वाढीव वीजबिल विरोधात मनसेच्या श्री जितेंद्र चव्हाण(जिल्हाध्यक्ष) यांनी उपोषणाचे हत्यार बाहेर काढल्यानंतर महावितरणला जाग आली,आठ दिवसांत बैठक लावून वीज बिल कमी केले जातील असे आश्वासन दिले.

९.मुंबई/मनसे यश
मनसेच्या वतीने लोकल सेवा चालू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले होते,आज माननीय न्यायालयाने लोकल चालू करण्याबाबत निर्देश दिले आहे.हे मनसेच्या आंदोलनाचे फलित आहे.

१०.मुंबई /मनसे यश
प्रभाग क्र १०८ चे शाखा अध्यक्ष श्री संदीप वरे २०१९ पासून श्री यशवंतराव चव्हाण मैदानाच्या दुरुस्ती साठी आग्रही होते अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मैदान दुरुस्तीच्या कामाची अधिकृत सुरुवात झाली.

११.मुंबई/मनसे यश
भायखळा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र २०८ ई, एस,पाटणवाला मार्ग मधील मार्गदुभाजक चे काम पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून घेतले.

१२.पुणे/मनसे यश
कोंढवा प्रभागातील पाण्याच्या लाईनचे काम बंद होते,मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर यांच्या इशाऱ्यावर पालिका प्रशासनाला जाग आली आणि काम सुरू झाले.

१३.पुणे/मनसे यश
पुण्यात मनसे नगरसेवक श्री वसंत मोरे यांनी चालू केलेल्या "मनसे हेल्पलाईन केंद्र" चालू झाल्यानंतर कै.सुग्राबी हसन शेख यांच्या कुटुंबातील सदस्यांना मनसेच्या दणक्यांनातर २४००० रुपयांचा परतावा मिळाला.

१४.आसनगाव(ठाणे)/मनसे यश
आसनगाव येथील तासपाडा विभागांत विजेच्या लाईक झुलत असल्याने मनसेने संकटाचा विचार करत विजेचा खांब टाकण्याची मागणी केली होती,महावितरण विभागाने मागणी मान्य करत अखेर विजेचा खांब बसवला.



१५.बुलढाणा/मनसे निवेदन
शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करण्यात वेळ न घालवता तात्काळ आर्थिक मदत म्हणून सरसकट हेक्टरी ३०,००० रुपयांची मदत करावी अशी मागणी मनसेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

१६.मिरारोड भाईंदर(ठाणे)/मनसे निवेदन
ट्युशन फी व्यतिरिक्त कोणतीही फी शिक्षण संस्थांनी पालकांच्या माथी मारू नये,अनेक पालक या विरोधात तक्रार करत आहेत.श्री शान पवार (मनविसे शहर सचिव) यांनी पालकांच्या समस्यांचे निवेदन शिक्षण अधिकारी यांना दिले आहे.

१७.चांदीवली(मुंबई)/मनसे निवेदन
BOOMERANG खाजगी कंपनीकडून वारंवार मराठीला डावलले जात होते,मनसेच्या वतीने श्री संजय मुळे(विधानसभा सचिव) आणि टीमने सदर व्यवस्थापनला निवेदन दिले ,व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर बदल दिसतील असे आश्वासन दिले.


१८.नागपूर/मनसे निवेदन
मनसे महिला सेनेच्या सौ कल्पना चौहान(उपशहर अध्यक्षा)यांनी महिलांच्या आंतरवस्त्रांचा शहरातील कापड व्यावसायिकांकडून होत असलेल्या आक्षेपाह्य प्रदर्शनावर बंदी लावण्याची मागणी केली आहे,सौ चौहान यांनी पोलीस प्रशासन ला ह्याबाबत निवेदन दिले.

१९.नागपूर/मनसे निवेदन
नागपूर शहरात अवैध धंदे चालू आहेत त्याला कुठे तरी आळा बसला पाहिजे म्हणून श्री विशाल बडगे(शहर अध्यक्ष) यांनी पोलीस प्रशासनाला अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले.

२०.जळगाव/मनसे निवेदन
स्थानक परिसरतील बंद जिन्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे मनसेने जिना चालू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले,अन्यथा मनसेकडून आंदोलन छेडले जाईल.

२१.नवी मुंबई(ठाणे)/मनसे निवेदन
दिघा प्रभाग क्र.१ मधील नागरी समस्यांच्या(रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटारांवरील झडपे) बाबत मनसे दिघा विभागाचे श्री भूषण आगीवले यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले

२२.श्रीरामपूर(अहमदनगर)/मनसे निवेदन
श्रीरामपूर शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अन्यथा मनसेकडून आंदोलन छेडले जाईल, समस्यांचे निवेदन श्री बाबा शिंदे(जिल्हाध्यक्ष) यांनी नगरपरिषद मधील अधिकाऱ्यांना दिले.

२३.चंद्रपूर/मनसे निवेदन
MEL स्टील प्लांट अंतर्गत ब्राईट गार्ड सेक्युरिटी फोर्स च्या वतीने कामगारांवर होत असलेल्या अन्याय विरोधात श्री सचिन भोयर(चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष) यांनी केंद्रीय श्रमायुक्त श्री शेलार यांना समस्यांचे निवेदन करून कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

२४.नागपूर/मनसे निवेदन
मुंबई च्या धर्तीवर नागपुरात सुद्धा बस सेवा चालू करण्यात यावी अशी मागणी श्री विशाल बडगे आणि टीमने पालिका प्रशासनाकडे परिवहन आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.



२५.बदलापूर(ठाणे)/मनसे पाठिंबा
बदलापूर शहरात अनधिकृत फेरीवाले आणि दुकानदार यांच्यात वाद चालू आहे,मनसे बदलापूर टीमने ह्या लढ्यात दुकानदार यांना पाठिंबा दर्शविला आहे.

२६.मुंबई /मनसे पाठिंबा
मराठी फेरीवाले आहेत त्यांना स्थानिक मराठी आमदार श्री सुनील राणे(भाजप) हे त्रास देत आहेत पण त्याच प्रभागात परप्रांतीय फेरीवाले आमदार महाशय साहेबांना चालतात.मनसे विभाग अध्यक्ष श्री प्रसाद कुलापकर यांनी त्या मराठी फेरीवल्या8च्या पाठीशी उभे राहत व्यवसाय पुन्हा चालू केला.



२७.डोंबिवली(ठाणे)/मनसे इशारा
खड्डे बुजवण्याच्या कामावर मनसेने आक्षेप नोंदवला आहे,अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे श्री राजेश कदम (राज्य उपाध्यक्ष)यांनी म्हटले आहे,दोन दिवसांत चांगल्या प्रतीचे काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

२८.पोलादपूर(रायगड)/मनसे उपक्रम
मनसे पोलादपूर तालुका अध्यक्ष रुपेश सकपाळ  यांच्यातर्फे पोलीस स्थानक पोलादपूर येथे रोगप्रतिबंधक औषध फवारणी! 

२९.पालघर/मनसे मदत
गातेस येथील रहिवासी श्री कल्पेश काळूराम तोरसे ह्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने श्री अविनाश जाधव ह्यांनी २५००० रुपयांची मदत केली.

३०.मुंबई /मनसे मदत
मुंबईचा डबेवाला आर्थिक संकटात असल्याने मनसेच्या सौ शालिनी ठाकरे (मनसे सरचिटणीस) यांनी १००० कुटुंबाना "कल्की फाउंडेशन" च्या वतीने फूड किट घरपोच केले.

३१.नवी मुंबई(ठाणे)/मनसे आश्वासन
घणसोली व्यापारी असोसिएशनने मांडली व्यथा. लवकरच व्यापारी प्रश्नांवर मार्ग काढणार असल्याचे दिले #मनसे आश्वासन. सदर प्रसंगी विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण, उपविभाग अध्यक्ष श्याम वाघमारे, संदीप गलुगडे, गावडे, धरपाल, शिंदे, जाधव, पाटील उपस्थित होते. 

३२.सोलापूर/मनसे मोर्चा
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पंढरपूर बचत गटातील महिलांच्या समस्यांवर दिलीप बापू धोत्रे ह्यांच्या नेतृत्वाखाली तुफानी मोर्चा काढण्यात आला. 

३३.दिवा(ठाणे)/मनसे प्रश्न
ठाणे मनपा मध्ये दिवा आहे पण ठाणे मनपा कडे दिव्याच्या विकासासाठी मात्र वेळ नाहीय,मनसे आमदार श्री राजू पाटील यांनी ठाणे मनपा आणि राज्य सरकार चे दिव्याकडे लक्ष वेधण्यासाठी काही प्रश्न आणि सूचना उपस्थित केल्या आहेत.

३४.मुंबई /मनसे दणका
मुंबई पालिका येथे कंत्राटी कामगारांचे पगार थकवण्याची तक्रार मनसेकडे आली श्री निलेश पाटील(कामगार सेना चिटणीस) श्री प्रसाद कुलापकर(विभाग अध्यक्ष) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारताच, चौकशी करून दोन दिवसांत वेतन दिले जातील असे आश्वासन दिले.

Sunday 20 September 2020

२० सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी.

२० सप्टेंबर २०२० • मनसे बातमीपत्र

१.अंबरनाथ /मनसे निवेदन
ऑनलाइन शिक्षण त्याच विजेचा खेळखंडोबा ह्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे,मनसेच्या वतीने खंडित वीजपुरवठा नियमित करणेबाबत मनसेतर्फे महावितरण ला निवेदन दिले.

२.बीड/ मनसे निवेदन 
केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत भगवान बाबा चौक व छत्रपती संभाजी महाराज चौकाचे रुंदीकरण व नव्याने बांधकाम करण्यात यावे या मागणीचे निवेदन HPM कंपनीचे व्यवस्थापक श्री शिंदे यांना मनसेच्या वतीने सुमंत धस(जिल्हाध्यक्ष) यांनी निवेदन दिले.

३.भाईंदर /मनसे मागणी
भाईंदर येथील मधुसूदन ग्लोबल शाळेला मनसेची धडक..!पालकांच्या विविध मागण्या घेऊन मनसे शिष्टमंडळाने सौ रेश्मा तपासे यांच्या अध्यक्षतेखाली समस्यांचे निवेदन मधुसूदन ग्लोबल संस्थेच्या संचालक/मुख्याध्यापक यांना दिले.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन.

४.भुसावळ /कार्येकर्ता मेळावा
भुसावळ येथे मनसे नेते श्री जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली कार्येकर्ता मेळावा संपन्न झाला.जनतेचे प्रश्न हाताळणे,संघटन बांधणी,नियुक्ती अश्या अनेक विषयांवर त्यांनी कार्येकर्त्याना मार्गदर्शन केले.

५.कल्याण /मनसे पक्षप्रवेश
कल्याण मधील विविध भागांतील शिवसेना  भाजप कार्येकर्त्यांनी मनसे माजी आमदार श्री प्रकाश भोईर यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात पक्षप्रवेश केला.

६.कोल्हापूर/मनसे आंदोलन
मनसे इचलकरंजी शहराच्या वतीने के.एल. मलाबादे चौक येथे वाढीव वीजबिल रद्द करण्यासाठी रस्ता रोखून निदर्शने करण्यात आली.श्री.रवी गोंदकर(जिल्हा उपाध्यक्ष),प्रतापराव पाटील(शहराध्यक्ष) यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.इतरही मनसे पदाधिकारी उपस्थित होते.


७.मुंबई /मनसे आंदोलन
मनसे सरचिटणीस श्री संदीप देशपांडे यांनी पुकारलेल्या "मनसे सविनय कायदेभंग" आंदोलनात डोंबिवली वरून आमदार श्री राजू पाटील, राजेश पाटील(,राज्य उपाध्यक्ष) ठाण्यातून अविनाश जाधव(ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष) नवी मुंबईहुन श्री गजानन काळे (नवी मुंबई शहराध्यक्ष)सहभागी होणार आहेत.


८.मुंबई /कार्येकर्त्याना नोटीस
नागरिकांच्या हक्कासाठी "मनसे सविनय कायदेभंग आंदोलन" होऊ नये म्हणून प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस,तरीही आंदोलनं होणार यावर पदाधिकारी ठाम.

९.मुंबई /मनसे प्रश्न
कंगना राणावत विरोधात आंदोल करायला शिवसेना सत्तेत असल्याने शिवसेनेला परवानगी मिळते आणि मग मनसेला का नोटीस धाडता..?संदीप देशपांडे यांचा पलटवार.

१०.मुंबई /मनसे सामाजिक
मुंबई प्रभाग क्रमांक १९९ च्या वतीने शाखा अध्यक्ष श्री मारुती दळवी यांच्या पुढाकाराने आग्रीपाडा पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायसर, मास्कचे वाटप करण्यात आले.


११.मुंबई /मनसे निवेदन
प्रभाग क्रमांक ४ मध्ये दिवसाढवळ्या अनोळखी  इसमांकडून भांडण व टवाळखोरी मोठ्या प्रमाणात चालू आहे,नागरिकांमध्ये भीती दायक वातावरण तयार झाले.सदर घटनेसंदर्भात दहिसर पोलिसांना लक्ष घालण्यासाठी मनसे शाखा अध्यक्ष श्री संतोष शिंदे यांनी निवेदन दिले.

१२.मुंबई /मनसे मागणी
कोविड जन्य परिस्थिती मध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे आदेश न्यायालयाने  दिले आहेत त्या निर्णयाचे मनसे स्वागतच,पण ज्या दुर्गम भागातील विद्यार्थी अंतिम वर्षात & जिथे ऑनलाइन  परीक्षा देणे शक्य होणार नाही तरी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी श्री संतोष गांगुर्डे (मनविसे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष)यांनी केली आहे. 


१३.मुंबई/मनसे यश
मनसेच्या मागणीला यश..!मुंबई प्रभाग क्रमांक १३२ चे शाखा अध्यक्ष श्री अभिजित शेजवळ यांनी नागरी समस्यांच्या (गटार उघडी झाकणे, तुंबलेली गटारे)बाबत पालिका प्रशासनाकडे निवेदन दिले होते.पालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत कामाला सुरुवात केली.

१४.नांदेड /कार्येकर्त्यांची सुटका
वाढीव वीजबिल विरोधात मुदखेड येथील वीज कार्यालय फोडणारे मनसेच्या सर्व  कार्येकर्त्यांची सुटका झाली.

१५.नवी मुंबई /पक्षप्रवेश
नवी मुंबई येथील पालिका प्रशासन मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांनी मनसेच्या युनियनचे सभासत्व स्वीकारले.


१६.नवी मुंबई/मनसे पक्षप्रवेश
नवी मुंबईतील दिवाळे गाव,करावे गाव,महापे मधील शेकडाे तरुणांनी सन्मा.राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत श्री गजानन काळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


१७.पुणे/ पक्षप्रवेश
भोसरी(पिंपरी चिंचवड) विधानसभा क्षेत्रात अनेक राजकीय पक्षातील तरुणांनी भोसरी विधानसभा अध्यक्ष श्री अंकुश तापकीर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


१८.सातारा /पद नियुक्ती
सातारा जिल्हा मनसे चित्रपट सेना जिल्हाध्यक्षपदी राज पुजारी ,सातारा जिल्हा मनसे चित्रपट सेना कार्यकारिणी जाहीर.


१९.सोलापूर /पक्षप्रवेश
सोलापूर प्रभाग क्रमांक ८ चे शिवसेना शाखा प्रमुख सुनील चारगुंडी यांनी आपल्या कार्येकर्त्यांसह मनसे सरचिटणीस श्री बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


धन्यवाद
*MNSReport Team*

Saturday 19 September 2020

१९ सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी.

१९ सप्टेंबर २०२० • मनसे बातमीपत्र

१.अंबरनाथ /मनसे निवेदन
मुसळधार पावसाने अंबरनाथचे चिखलोली धरण ओव्हरफ्लो झाले तरीही त्या धरणातून नागरिकांना पिण्याचे पाणी सोडले जात नसल्याने शिवाजीनगर आणि परिसराची पाणी टंचाई दूर कधी होणार असा प्रश्न मनसेतर्फे पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.निवेदन द्वारे मागणीचे पत्रक दिले.

२.बीड /मनसे मागणी
अतिवृष्टीमुळे ऊस,कापूस,सोयाबीन,मूग,उडीद, बाजरी ह्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना अर्थिक दिलासा मिळावा ह्यासाठी सरकारने,प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी मनसे बीडच्या वतीने करण्यात आली आहे.

३.बुलढाणा /मनसे मागणी
बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गटांचे मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ करण्याची मागणी मनविसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


४.मुंबई /मनसे आंदोलन
मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील वाहतूक यंत्रणेवर आलेला ताण, नागरिकांची गर्दी पाहता ट्रेन चालू करण्याची आवश्यकता असल्याचे मनसेने म्हटले आहे.२१ सप्टेंबर ला मनसेच्या वतीने रेल्वेने प्रवास करून सविनय कायदेभंग करणार असे संदीप देशपांडे(मनसे सरचिटणीस)यांनी म्हटले आहे.


५.मुंबई /मनसे मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर साहेब ह्यांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांची भेट घेतली.मुंबई विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त महाविद्यालये भरमसाठ बेकायदेशीर शुल्क (fee) घेत होत असणाऱ्या लूट प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. 

६.मुंबई /आंदोलनास पाठिंबा
ट्रेन चालू करण्याच्या मनसेच्या मागणीला प्रवासी संघटना सुद्धा पाठिंबा देत असत असे श्री संदीप देशपांडे यांनी सांगितले.


७.मुंबई /मराठी उद्योजक
"मनसे निर्धार,स्थानिकांना रोजगार" अंतर्गत मराठी युवकाच्या पाणीपुरी केंद्रासाठी मनसेचा पुढाकार.श्री महेंद्र भैसने, श्री.अल्ताफ शेख, श्री विरेंद्र जाधव(मनसे विभाग अध्यक्ष) धनश्री नाईक यांचे आभार त्यांनी नवीन मराठी उद्योजकाला उभे करण्यास मदत केली.

८.मुंबई /पोलखोल
मनसे चे श्री अखिल चित्रे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भगवती रूग्णालय,बोरीवली येथील भ्रष्ट कारभार व भोंगळ कारभाराची पुराव्यानिशी फेसबुक लाईव्ह करून पोलखोल केली.


९.नवी मुंबई / मनसे मोर्चा
ट्युशन फी व्यतिरिक्त अन्य फी भरण्यास सक्ती करणाऱ्या व फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मुजोर खासगी शाळांना दणका देण्याच्या मागणीसाठी मनसेचा गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी पाटी पेन्सिल मोर्चा श्री गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

१०.नवी मुंबई /मनसे आंदोलन
ट्रेन चालू करण्यासाठी नवी मुंबईतून श्री गजानन काळे हे आंदोलनात सहभागी होणार आहेत तर त्यांनी जनतेनेही २१ सप्टेंबर रोजी ह्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

११.नवी मुंबई /मनसे निवेदन
शेतकऱ्यांना मारक कायदा केंद्र सरकारने पारित केला आहे,त्याविरोधात मनसेने APMC मार्केट येथे आंदोलन केले आणि श्री प्रसाद घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास निवेदन दिले.

१२.पनवेल /मनसे पक्षप्रवेश
पनवेल खारघर येथिल पक्ष कार्यालयाला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी भेट दिली,विविध पक्षातील कार्यर्त्यांनी त्यांच्या उपस्थित मनसे पक्षात प्रवेश केला.

१३.पुणे /मनसे उपक्रम
मनसे सरचिटणीस श्री वसंत मोरे यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका क्षेत्रात लवकरच "मनसे कोविड १९ हेल्पलाईन केंद्र" उभे राहणार आहे.मनसे आमदार श्री राजू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे बोलले जात आहे.

१४.पुणे /कामगार समस्या
पुणे महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अतिक्रमण आयुक्त माणुसकीची वागणूक न देता मनमानी करून वेतन कापले जाते.ह्या समस्या घेऊन कामगारांनी मनसेचे नगरसेवक श्री वसंत मोरे यांची भेट घेतली.

१५.पुणे/मनसे उपक्रम
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" राज्य सरकारच्या अभियानातंर्गत मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर यांनी स्वतः  उपस्थित राहून कोंढवा प्रभागातील नागरिकांची तपासणी करून घेतली.

१६.रायगड /मनसे इशारा
मुंबई-गोवा महामार्गावर पेण शहरालगत असणाऱ्या एचपी पेट्रोल पंप विरोधात मनसे आक्रमक,अपुऱ्या सुविधा आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.अपघात होण्याची शक्यता प्रवासी सुविधा पूर्ण न केल्यास मनसे स्टाईलने कारवाही करू असा मनसेच्या रुपेशदादा पाटील यांनी इशारा दिला आहे.

१७.रत्नागिरी /मनसे निवेदन
कोविड सेंटर मधील असुविधांबाबत मनसे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन दिले.कोविड सेंटरची सुधारणा नाही झाल्यास मनसे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१८.ठाणे /मनसे पर्दाफाश
शिवसेना शासित ठाणे महानगरपालिकेचे महापौर ज्या बंगल्यात राहतात त्याच शेजारी हुक्का पार्लर चालतो.मनसेने त्याचा पर्दाफाश केला आहे.महापौरांच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे का ?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


१९.उस्मानाबाद /मनसे स्वागत
वाढीव वीजबिल विरोधात मनसेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात आले होते,जनतेच्या मागण्यांसाठी १९ दिवस कारागृहाची शिक्षा भोगून आलेल्या महाराष्ट्र सैनिकांचे जंगी स्वागत करण्यात आले,ग्रामस्थानी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.


२०.यवतमाळ /मनसे प्रश्न
२०१३ साली ५० ते ८० खाटांच्या आरोग्य केंद्राच्या निर्णय भाजप आमदार श्री संजीव बोदकुरवार यांनी दडपून ठेवला म्हणून कोविड परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेची ही वाणवा दिसून येते असे श्री राजू उंबरकर(मनसे उपाध्यक्ष)यांनी म्हटले आहे.



धन्यवाद
*MNSReport Team*

Friday 18 September 2020

१८ सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी.

१८ सप्टेंबर २०२० • मनसे बातमीपत्र

१.मुंबई /पक्षप्रवेश
पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी श्री संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

२.नवी मुंबई
शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थांवर कारवाई करावी अशी मागणी मनसे नवी मुंबई चे शहराध्यक्ष श्री गजानन काळे यांनी केली आहे.

३.मनविसे /मनसे मागणी
मनविसे अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर यांनी वेगवेगळ्या कक्षेतील विद्यार्थ्यांच्या  समस्या घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले

४.लातूर /मनसे मागणी
लातूर जिल्ह्यातील जळकोट येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.50 हा सर्व्हिस रोड आणि दुभाजकासह व्हावा जेणेकरून बाहेर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना अडचण होणार नाही यासाठी मनसे जळकोटच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली.

५.अहमदनगर /मनसे मागणी
अहमदनगर येथे खाजगी इस्पितळ रुग्णांना भरती करण्यापूर्वीच ४० हजार ते  १ लाख पर्यन्त डिपॉझिट भरायला लावतात,मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा काय?मनसेचे नितीन बुतारे यांनी आरोग्य विभागाकडे लक्ष घालण्यास मागणी केली आहे.प्रशासनाने लक्ष न घातल्यास खाजगी इस्पितळाना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

६.रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील डासांचे वाढते प्रमाण लक्षात घेता साफसफाई करण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे,मनसेच्या कार्येकर्त्यांनी स्वतःला ह्या कार्यात झोकून देऊन सांडपाणी स्वच्छता करून घेतली.

७.महाराष्ट्र रेल्वे कामगार सेना
मध्य रेल्वेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल तसेच मुंबई विभागातील कल्याण रेल्वे हॉस्पिटल आणि डिस्पेंसरी मध्ये कार्यरत कामगारांच्या समस्यांबाबत मुख्य आरोग्य अधिकारी, सेंट्रल रेल्वे यांची केंद्रीय उपाध्यक्ष श्री भास्कर खुडे यांनी भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले.

८.अहमदनगर
सहा महिने बंद नंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता कर्फ्यु बाबत नागरिकांनी निर्णय घ्यावा असे सांगितले. जनता कर्फ्युला ‘मनसे’ विरोध, नगरकरांनाही केले सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

९.राजगुरू नगर पुणे / खळखट्याक
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने महावितरणाला दणका दिला आहे. राजगुरूनगर येथील चांदोली येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांवरून महावितरण कार्यकारी उपअभियंता यांचे कार्यालय फोडले.

१०.ठाणे /मनसे सामाजिक
ठाण्यात पालिका प्रशासनाच्या गरजेनुसार मनसेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

११.दहिसर /मनसे निवेदन
दहिसर टोल नाका येथे चालकांच्या अनेक तक्रारी मनसेच्या कार्यालयात येत होत्या मनसे शाखा क्रमांक ४ चे शाखा अध्यक्ष श्री संतोष शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह टोल नाका व्यवस्थापनाला भेट देऊन समस्यांचे निवेदन दिले.

१२.नवी मुंबई /मनसे आंदोलन
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला. नागरिकानी नाहक त्रास सहन का करावा? अपघातात जखमी तरुणांच्या उपचाराचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा अशी मागणी करत मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेने पी डब्लू डी ला ‘डांबर’ट सन्मान दिला.

१३.उरण 
JNPT पोर्ट वरून सर्व ट्राफिक गुजरात च्या दिशेने वळवली जात आहे,मनसेचे नाविक सेनेचे कार्याध्यक्ष श्री निशांत गायकवाड यांनी आवाज उठवला होता. शिवसेना खासदार श्री संजय राऊत यांनी असज राज्यसभेत तोच प्रश्न उपस्थित केला.

१४.पनवेल /मनसे यश
ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका,फी वसुलीचा तगादा लावू नका.मनविसेचे श्री अक्षय काशीद यांच्या प्रयत्नांना यश.

१५.मिरारोड
आज मनसे शहर सचिव अनिल रानावडे यांच्या कार्यालयात उपशहर अध्यक्षा सौ रेश्मा तपासे यांनी महिलांना शासकीय योजनांसंबंधी माहिती दिली. नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

१६.भंडारा /पक्षप्रवेश
भंडारा शहरातील अनेक तरुणांनी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मनसेत जाहीर प्रवेश केला.

१७.नागपूर /पक्षप्रवेश
मध्य नागपूर विभागातील अनेक वरिष्ठ नागरिक तसेच युवकांनी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे ,मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे यांच्या उपस्थितीत शहर कार्यालयालात मनसेत जाहीर प्रवेश केला.

१८.अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णांची संख्या,रुग्णवाहिकेचा तुटवडा अश्या अनेक समस्यांचे निवेदन मनविसे अहमदनगर यांनी  पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना दिले.

१९.मिरारोड /मनसे प्रवेश 
मनसेकडून शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,उपस्थित महिलांनी कामाची पद्धत पाहून त्याच कार्यक्रमात मनसे पक्षात प्रवेश केला.

२०.नवी मुंबई
नवी मुंबईतील ७२ ठाेक मानधन शिक्षकांच्या थकीत वेतनातील १३ महिन्यांचा वेतन फरक ६० लाख रुपये येत्या ७ दिवसात देणार.मनसेच्या मागणीनंतर मनपा अतिरिक्त आयुक्तांचे मनसे ला आश्वासन.

२१.नाशिक
कॅन्टोमेंट झोन मध्ये फवारणीला होणाऱ्या दिरंगाई बद्दल मनसेचा नवीन नाशिक विभागीय कार्यालयात घेराव. अनेक समस्यांचे विभागीय अधिकारी श्री मयूर पाटील यांना मनसेचे निवेदन.

२२.पनवेल
सेंट विल्फ्रेडस कॉलेज मध्ये काही विध्यार्थ्यांच्या ऐनओसी (NOC)  देण्यासाठी भरपूर दिवस टाळाटाळ करत होते तरी त्या विध्यार्थ्यानी पनवेल मनसे ला संपर्क साधला आणि काही तासात त्यांना पनवेल मनसे ने न्याय मिळवून दिला. पालकांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि पनवेल मनसेचे आभार मानले.

२३.नवीमुंबई /मनसे आंदोलन
खड्डे युक्त रस्त्यांच्या विरोधात नवी मुंबईत मनसे घातले राज्य सरकारचे श्राद्ध, सरकारचा पिंडदान करून केला निषेध

२४.लातूर /मनसे मागणी
सहा महिन्यांची वीजबिल माफी व अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची  जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांची "मनसे"रास्ता रोको आंदोलनात मागणी.

२५.भांबेड लांजा/मनसे मागणी
महावितरण विभागाने अखंडित वीजपुरवठा  भांभेड मधील रहिवाश्यांनी द्यावा अशी मागणी मनविसे सहसंपर्क अध्यक्ष श्री किरण रेवाळे यांनी केली.

२६.विरार
मनसेकडून विरार महावितरण कार्यालयावर लाटणी मोर्चा काढण्यात येणार होता,महावितरण अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मोर्चा अगोदरच चर्चेस बोलावले.मनसेच्या शिष्टमंडळाने नागरिकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

२७.मुरुड /आंदोलन
मुरुड येथे खड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक,खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासन ,राज्यसरकार यांचा निषेध केला.

२८.ठाणे/ मनसे यश
घोडबंदर गावात ७०२ BEST च्या बस फेऱ्या वाढवण्यात मनसेला यश.  दोन दिवसात प्रवाश्यांचे सर्वे करून फेऱ्या वाढविण्यात येणार.

२९.नालासोपारा /रोजगार मेळावा
मोरेगाव नालासोपारा येथे मनसेच्या वतीने २० सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

३०.सांगोला (सांगली) /खळखट्याक
करगणी-शेटफळे या रस्त्यावर ओहरलोड वाहतूक करून खराब केला आहे, तो रस्ता दुरुस्त करावा, तसेच पत्रेवाडीतील कुटुंबांची घरे पाडली जात आहेत कोरोना परिस्थितीमुळे अनंत अडचणी असताना अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे तरी त्यांना शासनाने नुकसान भरपाई दिली पाहिजे. म्हणून मनसेने 3 सप्टेंबर रोजी निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्यामुळे मनसेनं आज खळखट्याक आंदोलन केले.

३१.खेड (रत्नागिरी) /मनसे उपक्रम
खेड तालुक्यातील तले आरोग्य केंद्रात मनसेकडून स्टीम वेपोरायसरचे वाटप मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर (खेड नगराध्यक्ष)यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

३२.नवी मुंबई
६६ निवासी डाॅक्टर मनपा रुग्णालयात काेविडमध्येही निरंतर सेवा देत आहेत. इतर मनपाने यांचे वेतन ५० हजार केल्यानंतरही नवी मुंबई मनपा प्रतिसाद देत नसतांना मनसे ने हा प्रश्न हाती घेतला व डाॅक्टरांचे वेतन ५० हजार करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले.डॉक्टरांनी मनसेच्या श्री गजानन काळे (शहर अध्यक्ष) यांचे आभार मानले.

धन्यवाद
*MNS Report Team*

Monday 14 September 2020

१४ सप्टेंबर २०२०, मनसे कार्याची दैनंदिनी.

१४ सप्टेंबर २०२० • मनसे बातमीपत्र

@ मीरारोड भाईंदर/ मनसे इशारा
मीरा भाईंदर पालिका कोविड सेंटर येथे २० वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकाकडून बलात्कार झाला आहे. हा प्रकार झाल्याने नवघर पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंद झाला. मनसेकडून पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाने लक्ष घातले नाही असे मत सौ रेश्मा तपासे यांनी व्यक्त केलय. (१)

@ मालाड (मुंबई)/ मराठी भाषा
मालाड येथील अभ्युदय बँकेच्या बाहेर गुजराती भाषेत बोर्ड लावण्यात आले होते. महाराष्ट्र सैनिकांनी त्या बोर्डला काळे फासून मराठीची मागणी केली. (२)

@ कर्जत (नगर)/ मनसे निवेदन
मनसे कर्जत तालुक्यात सरकारी हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले, प्रशासनाने आठ दिवसात हमीभाव खरेदी केंद्र चालू होईल असे आश्वासन दिले. (३)

@ पुणे/ मनविसे इशारा
सरळ सेवा भरती कंपनी निवड तातडीने करा. वारंवार होत असणाऱ्या मुदत वाढीमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत, तरुणांचा राग उफाळून येण्यापूर्वी जागे व्हा. मनविसे पुणे शहर अध्यक्ष श्री कल्पेश यादव यांनी सरळ सेवा भरतीची टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर निकालात काढण्याची मागणी केली आहे.(४)

@ गुहागर (रत्नागिरी)/ मनसे इशारा
ठेवीदारांची दिशाभूल करणाऱ्या हेरंब साई ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. वर गुहागर मनसे ची धडक. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास टाळाटाळ करू नये. ठेवीदारांशी बोलताना सन्मानाने बोलावे अन्यथा मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा मनसे इशारा श्री जानवळकर यांनी दिला. (५)

@ गुहागर (रत्नागिरी)/ मनसे प्रवेश
मनसे गुहागर तालुका अध्यक्ष श्री विनोद जानवळकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील तरुणांनी पक्षप्रवेश केला. (६)

@ सांगली/ मनसे मागणी
राजपथ इंफ्रोकॉम कंपनीच्या अवजड वाहतुकीने शेटफळे करगणी हा रस्ता पुर्णपणे खचुन मोठ मोठे खड्डे पडलेत त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. रस्ता कंपनीने त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी मनसेने केली आहे.(७)

@ नालासोपारा (पालघर)/ मनसे रोजगार
मनसे विद्यार्थी सेना नालासोपारा शहर आयोजित "महारोजगार मेळावा" २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांनी ह्या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन ह्या योजनेचा लाभ घ्यावा.  आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.(८)

@ पेण (रायगड)/ मनसे इशारा
पेण येथील मुंबई महामार्ग साठी भूसंपादन झाले पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या प्रकल्पात सरकारने घेतल्या आहेत त्यांना अजून मोबदला मिळाला नाही, मनविसे सचिव श्री रुपेश पाटील ह्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.(९)

@ खेड (रत्नागिरी)/ मनसे प्रवेश
खेड(रत्नागिरी) दाभिळ गावातील तरुणांनी सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर (नगराध्यक्ष खेड) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.(१०)

@ शिर्डी (नगर)/ मनसे प्रवेश
मनसे नेते मा. बाळा नांदगावकर साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष (अहमदनगर) मा. बाळासाहेब माळी साहेब यांनी शिर्डी येथे मनसेत पक्षप्रवेश केला. त्यावेळी  मनसे अहमदनगर तसेच मनसे पारनेरचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.(११)

@ गोंदिया/ मनसे प्रवेश
गोंदिया जिल्हा आमगांव तालुका गीरोला येथील अनेक तरुणांनी आदरणीय श्री. राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जिल्हा उपाध्यक्ष मुनाभाऊ गवळी यांच्या उपस्थित मनसेत जाहीर प्रवेश केला.(१२)

@ नवी मुंबई/ मनसे प्रवेश 
नवी मुंबई वाशी मधील तरुणांनी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मनसेत श्री गजानन काळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.(१३)

@ अहमदनगर/ मनसे मदत
मनविसे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री सुमित वर्मा यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तीस स्टॉल देण्यात आला. याचे उद्घाटन श्री सुमित वर्मा यांनी केले.(१४)

@ जालना/ मनसे आंदोलन
जालन्यात शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी मनसे आक्रमक, शहरातील जुना मोंढा येथील अग्रणी बँकेसमोर मनसेचं अनोखं आंदोलन, विजय मल्यारुपी चेहरा परिधान करुन जिल्ह्यातील बँकांचा निषेध, शेतकऱ्यांना कर्ज मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा.(१५)

@ बारामती/ मनसे दणका
J M Mhatre कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मनसेचे श्री आप्पासाहेब कर्चे (माढा लोकसभा अध्यक्ष) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून लेखी तक्रार केली. आज म्हात्रे कंपनीला १ लाख ३८ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.(१६)

@ उरण/ मनसे इशारा
उरण येथील ट्राफिक गुजरातला अदानी समूहाच्या बंदरावर  फिरवून केंद्रसरकार राज्याचे पर्यायाने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे घाट घालत आहेत सत्ताधारी/ विरोधक मात्र ह्यावर चिडीचूप आहेत. मनसे नाविक सेना कार्याध्यक्ष श्री निशांत गायकवाड यांनी याविरोधात आवाज उठवला आहे.(१७)

@ पनवेल/ मनसे इशारा
मनसे रस्ते आस्थापना सरचिटणीस श्री योगेश चिले यांनी पनवेल पालिका प्रशासनाला धारेवर धरले. वाढलेले रुग्ण, कोविड मृत्यू ह्याबाबत मनसेचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ नका असा सज्जड दम भरला आहे.(१८)

@ संभाजीनगर/ मनसे प्रवेश
संभाजीनगर येथे युवक-महिला भगिनी,वकील मंडळी यांनी मनसे पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांचा रीतसर प्रवेश मनसे मा. प्रकाश महाजन साहेब, सुमीत खांबेकर यांच्या उपस्थितीत झाला.(१९)

@ बॉलिवूड/ मनसे आभार
बॉलिवूड अभिनेते राजकुमार कनोजिया यांनी मानले मनसेचे आभार. कोविडच्या पार्श्वभूमीवर मनसेचे सोहेल कार्य उत्तम काम १०० हुन अधिक लोकांची सेवा पाहून ते भारावले आणि राजसाहेबांचे आभार मानले.(२०)

@ पुणे/ मनविसे निवेदन
अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांवर उपकरणाचा नाहक खर्च लादला जाऊ नये यासाठी आज पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. करमलकर यांना श्री कल्पेश यादव यांनी दिले. याबाबत कार्यवाही करणार असून उपकरण उपलब्द करून देण्याचे त्यांनी अशवस्त केले आहे.(२१)

@ विरार /मनसे यश
मनसेचे प्रभाग क्रमांक ३० (विरार महानगरपालिका) चे शाखा अध्यक्ष श्री प्रथमेश साळवी यांनी सेंट पीटर शाळेजवळ बंद दिवाबत्ती प्रशासनाकडून चालू करून रस्ता प्रकाशमय केला.(२२)

@ नागपूर/ मनसे मागणी
मनसे महिला सेने कडून व्हाॕट्सअप, फेसबुक विडिओज, इंटरनेट वरिल आक्षेपाह्य विडियोज तथा नेटफ्लिक्स वरील वेबसिरिज, चित्रपटातिल अश्ल्लिल दृष्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सौ. कल्पना चौहान (नागपूर उपशहर अध्यक्षा) यांनी केंद्र कडे केली.(२३)

@ बोरीवली (मुंबई)/ मनसे विनंती
मनसे सरचिटणीस मा श्री नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्ष श्री विलास भाई मोरे, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक  यांनी अशोकवन युनिव्हर्सल गुरुकुल शाळेतील असंघटित बस वाहक कामगार यांच्या पगार न दिल्या संदर्भात व्यवस्थापनाशी चर्चा केली.(२४)

@ दापोली रत्नागिरी/ मनसे निवेदन
नवशी शाळा शिरशींगे फाटा येथील खराब रस्ते बाबत मनसेच्या मिलिंद गोरीवले, मयूर काते, अमोल काते यांनी बांधकाम विभागाच्या निवेदन देऊन खड्डे भरून घेतले.(२५)

@ रेल्वे कामगार संघटना/ मनसे प्रवेश
मध्य रेल्वेच्या भायखळा येथील एस अँड टी रेल्वे कारखाना येथे मनरेकासेना केंद्रीय उपाध्यक्ष श्री भास्कर खुडे यांच्या मार्गदर्शनाने रेल्वे कारखान्यातील ओ एस श्री अनिल चव्हाण आणि श्री संजय माधव यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेत जाहिर प्रवेश केला.(२६)

@ मालवण (सिधुदुर्ग)/ मनसे यश
मनसेच्या दणक्यानंतर कोव्हीड १९ रुग्णांना मिळाली सुविधा, रुग्णांच्या आहारात अंडी, केळी, गरम पाण्याची केली व्यवस्था  करण्यात आली. माजी आमदार श्री परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी पाठपुरावा केला होता. मनसेच्या आंदोलनाला आले यश.(२७)

Thursday 10 September 2020

१० सप्टेंबर २०२० मनसे दैनंदिन बातमीपत्र

*10 Sep 20 | मनसे बातमीपत्र

*१.मुंबई*
*मनसे नेते श्री बाळा नांदगावकर* यांनी ९८०० ST कामगारांचे थकलेले पगार याविषयी आवाज उठवला आहे,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष घालून लवकरात लवकर पगार देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.


*२.नागपुर*
*सौ कल्पना चौहान (नागपूर उप शहर अध्यक्षा)* यांनी गरजूंना किराणा ,धान्य वाटप केले तर पोलिस स्थानकात शीतपेय वाटप केले.


*३.सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग मधील आरोग्य यंत्रणेला मनसेने धारेवर धरलेय,जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या विरोधात *मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर* यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलनआरोग्य संचालक २४ सप्टेंबरला चर्चेसाठी येत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आहे.


*४.कल्याण ग्रामीण*
महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार *श्री राजू पाटील* यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.

*५.ऐरोली(ठाणे,नवी मुंबई)*
रस्त्यांवरील खड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक,पटणी येथील रस्त्यांवरील खड्यांच्या विरोधात *मनसेने श्री निलेश बाणखिले* यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.


*६.नाशिक*
पिंपळगाव(सिन्नर नाशिक) नाशिक पुणे महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा मनसेच्या अक्रोशाला सामोरे जा,प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर वृक्षारोपण करून मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल.

*७. कल्याण*
मनसे आणि मनविसे यांच्या पुढाकाराने वालधुनी कल्याण पूर्व येथे नागरिकांना केंद्र सरकारच्या जनधन योजनेचा लाभ मिळावा म्हणून बँकांचे खाते उघडून देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.


 *८.नागपुर*
 स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत शंभर टक्के संधी द्या, कायद्यात बदल करा, मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाची सरकारला मागणी.नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देऊन मागणी केली.

*९.जालना*
मनसे जालना जिल्हाध्यक्ष *श्री बळीराम खटके* यांच्या अंबड येथील कृष्णकुंज निवासस्थानी तरुणांचा मनसे पक्षात पक्षप्रवेश झाला.

*१०.सोलापूर*
नातेपुते(माळशिरस, सोलापूर)येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित रक्तदान शिबीर पार पडला,७१ रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले.आयोजक *श्री रवीभैया काळे(नातेपुते मनसे शहर अध्यक्ष)* यांचे आभार.


*११.कल्याण*
कल्याण डोंबिवली येथे रस्त्याच्या कडेला एक गणपती मूर्ती पाच दिवस बसवून ठेवण्यात आली होती,स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होते. *महाराष्ट्र सैनिक अमोल साळवी,अजिंक्य माळवे यांच्या साथीने रोहन अक्केवार* यांनी सदर गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित केली.


*१२.रत्नागिरी*
मनसे रोजगार विभाग,मनसे रत्नागिरी यांच्यावतीने स्थानिकांना नोकरीत १००% प्राधान्य देण्यास यावे तसा कायदा करावा,मागणी नसून स्थानिक भूमीपुत्रांचा हक्क आहे,विचार नाही झाल्यास मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल.यावेळी *मनसे रोजगार विभागाचे रुपेश जाधव,मनसे जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण ,संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री अनुराग कोचिरकर*,आदी पदाधिकारी उपस्थित होते.


*१३.ठाणे*
मानपाडा रेंटल सोसायटी येथे कचऱ्याचे साम्राज्य,वीज सुट्टीवर,पाणी तीन दिवसांनी ह्या प्रश्नांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करतेय, *मनसेचे स्वप्निल महिंद्रकर* यांनी महापालिकेने लक्ष न दिल्यास मनसे आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

*१४.राजगड(दादर)*
*मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे,वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री संजय नाईक* यांनी मनसे वाहतूक सेनेच्या कोरोनातील आक्रमक पवित्र्यामुळे किती वाहनचालक, मालकांना फायदा झाला याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.


*१५.शिर्डी(नगर)*
साईमंदिर न उघडल्यास मनसे। २५ सप्टेंबर रोजी करणार आंदोलन.

*१६.रायगड*
पेण(रायगड) शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे अशी मागणी *मनविसे रायगड जिल्हा सचिव श्री रुपेश पाटील* यांनी काही दिवसांपूर्वी केली होती आज त्यांच्या मागणीला यश आले आहे.खड्डे भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे.


*१७.यवतमाळ*
फवारणीतून विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू झाले ,याविरोधात मनसेने आंदोलन करत कृषी विभागाची तोडफोड केली होती प्रशासनाने त्यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंदवले आहेत.आंदोलकर्त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी झाली आहे.


*१८.पनवेल*
मनसे सरचिटणीस सौ रिटाताई गुप्ता यांनी काल पनवेल येथील मनसे कार्यालयास भेट दिली. *श्री योगेश चिले* यांच्या नेतृत्वाखाली तेथील महिलांनी *सौ रिटाताई गुप्ता* यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.


*१९.ठाणे*
मनसेचा सत्ताधारी शिवसनेला इशारा; अद्यापही ठाण्यात मालमत्ता करमाफी का नाही? *श्री अविनाश जाधव(मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष)* #शिवसेनेचा_वचननामा


*२०.नांदेड*
शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावेत व वाढीव घरगूती वीजबिलात कपात करण्यात यावी यासाठी उमरी *मनसे तालुका अध्यक्ष पांडुरंग कोलेवाड* यांच्या नेतृत्वात उमरीयेथील महावितरणचे उपकार्यकरी अभयंता यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 

*२१.उरण(रायगड)*
रायगड उरण येथील ऑल कार्गो कंपनी मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासत्व स्वीकारले. *श्री सचिन गोळे* यांचे आभार.


*२२.रत्नागिरी*
कोकणात दर आठवड्याला शिवसेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा धक्का..! *मनसे सरचिटणीस श्री वैभव खेडेकर(नगराध्यक्ष)* यांच्या नेतृत्वाखाली खेड चिरणी,आंबडस येथील शिवसैनिकांचा पक्षप्रवेश.


*२३.भांडुप(मुंबई)*
भांडुप मधील प्रभाग क्रमांक १११ चे *शाखा अध्यक्ष कु गणेश चव्हाण आणि टीमने* सामान्य घरातील महिलेस थकीत वेतन मिळवून दिले.


धन्यवाद
*MNS Report Team*

#RajThackeray #AmitThackeray #MNS #मनसे
#MNSReport #MNS_Bulletin

Wednesday 9 September 2020

09 Sep 20 | MNS Bulletin मनसे दिवसभरातील बातम्या.

09 Sep 20 | MNS Bulletin

१.
नांदेड येथे K T construction चे गौणखनिज अवैध उत्खनन चालू आहे मनसे  जिल्हा उपाध्यक्ष *श्री राहुल शिंदे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती,विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले.

२.
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा परिवार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.परळ रेल्वे कारखाना येथे काम करणाऱ्या अनेक कामगारांनी मनसेच्या रेल्वे कामगार संघटनेचे सभासत्व स्वीकारले.

३.
कोविड जन्य परिस्थिती मुळे नॉन कोविड रुग्णांकडे सरकारी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे,म्हणून नॉन कोविड रुग्णांना तात्काळ उपचार द्या अशी मागणी
मनसे जिल्हाध्यक्ष मा.श्री.तानाजीराव सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

४.
घणसोली- कोपरखैरणे राजगड जनसंपर्क कार्यालय मध्ये नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे यांच्या उपस्थितीत घणसोली- कोपरखैरणे मधील तरुणांचा पक्ष प्रवेश झाला.


५.
कोपरखैरणे(नवी मुंबई) राजगड जनसंपर्क कार्यालय मध्ये नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे साहेब व शहर सचिव श्री. सचिन आचरे साहेब यांच्या शुभहस्ते कापडी पिशव्यांचे अनावरण केले. उपविभाग अध्यक्ष श्री. चंद्रकांत डांगे व घनश्याम चौधरी यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी  हा उपक्रम राबविला गेला.

६.
 समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनांच्या अमलबजावणीसाठी मनसे आग्रही.परंडा-भूम-वाशी तालुक्यातील रमाई आवास योजनेतील घरकुलांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा  अशी मागणी शाबीर शेख(अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष) यांनी केलीयावेळी उस्मानाबाद चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी गपाट साहेब,उप-जिल्हा अध्यक्ष शाबीर भाई शेख,शेतकरी सेनेचे विश्वनाथ पाटील,स्वप्नील पाटील व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


७. 
बुलढाणा :मेहकर येथे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला /सरकारला जागे करण्यासाठी खड्ड्यात खुर्ची टाकून आंदोलन करण्यात आले . 


 ८.
अवाजवी वीजबीलाच्या विरोधात विदर्भातील वर्ध्याचे मनसे जिल्हाध्यक्ष श्री अतुल वंदिले नागरिकांसह रस्त्यावर उतरले. 

९.
उदगीर(लातूर) विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्षप्रवेश झाला.

१०.
अभ्यासिका चालू करण्यात याव्यात अशी मागणी श्री अखिल चित्रे यांनी केली होती,मंत्री श्री उदय सामंत यांनी मनसेच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

११
कोरोना संकटात अनेकांचे रोजगार गेले आहेत,राज्य सरकारने बाहेरून येणाऱ्यांपेक्षा स्थानिकांना प्राधान्य द्यायला हवे.अशी मागणी मनसे धुळे जिल्हाध्यक्ष श्री दुष्यंतराजे देशमुख आणि मनसे रोजगार सेलचे श्री माळी यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली.

१२.
कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ.सुनंदा कोट यांच्या नगरसेवक निधीतून तयार झालेल्या रस्त्याचे आज भूमिपूजन झाले.

१३.
मृत व्यक्तीला घेऊन जाण्यास भाजप शासित पुणे पालिका येथे रुग्णवाहिका मिळत नसल्याने संबंधित अधिकाऱ्याची गाडी मनसे नगरसेवक श्री वसंत मोरे यांनी फोडली त्या केस मध्ये आज वसंत मोरे यांना अटक झाली आणि जामीन सुद्धा मंजूर झाला.

१४.
कोरोना वर नियंत्रण मिळवण्या ऐवजी कल्याण डोंबिवली पालिका लाचखोर निलंबित भ्रष्ट अधिकार्‍यांना आमंत्रण देऊन परत कामावर बोलवत आहे असा आरोप श्री राजेश कदम (राज्य उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष)  यांनी केला आहे.

१५.
पावसामुळे शेतकऱ्याचे मुगाचे पीक हातचे गेले,त्याबदल्यात शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी मुखेड तहसीलदार कार्यालयात मनसेच्या वतीने करण्यात आली.

१६.
राजगुरूनगरला (पुणे)मनसेचे 'खळ्ळखट्याक'; वाढीव वीजबिलांवरून महावितरणचे कार्यालय फोडले.

१७.
ठाकरे व रेगे चित्रपटाचे दिग्दर्शक मनसे नेते मा. श्री. अभिजित पानसे यांचे प्रतापगड संवर्धनासाठी महाराष्ट्राला साद !(गडकिल्ले संवर्धन ,मनसे विकास आराखडा)

१८.
मिरा भाईंदर महानगर पालिका मधील परिवहन विभागाने कामगारांचे पगार दिले नाहीत.याबाबत न्याय मिळवून देण्याचे ठाम आश्वासन #मनसे महाराष्ट्र कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री संदीपजी राणे यांनी दिले. 

१९.
कोंढवा खुर्द भागातील रिक्षा मध्ये कोरोनो पासुन संरक्षण व्हावे म्हणून रिक्षा चालकांना  "चालक आणि प्रवाशांच्या मध्ये पार्टिशन" चे वाटप मनसे नगरसेवक श्री साईनाथ बाबर यांनी केले .

२०.
देश विकायचा आहे, म्हणून जनतेला सुशांत रिया आणि कंगनात गुंतवून ठेवलयं.रात्र वैराची आहे, जागे रहा .सतर्कतेचा इशारा मनसे सरचिटणीस/कामगार सेनेचे अध्यक्ष श्री मनोज चव्हाण यांनी केला आहे.

२१.
तुळजापूर येथील कुलस्वामिनी विद्यालयात विद्यार्थी आणि पालकांकडून वाढीव तुकडी,ईमारत निधीच्या नावाखाली होत असलेली लूट यासंदर्भात मनविसेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

२२.
पुणे-रांजणगांव एम आय डी सी येथील सुप्रिम कंपनी मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले.सचिन गोळे यांची काम करण्याची पद्धत अनेक कामगारांना भावत आहे.

२३.
मुंबई प्रभाग क्रमांक १६ मिलिंद नगर प्रभागात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे लवकरात लवकर दुरूस्त करावे अशी विनंती अर्ज आज ब प्रभाग अधिकारी गुप्ते यांना मनसेने केली.यावेळी श्री.रोहन आक्केवार (रस्ते आस्थापना), श्री.भुषण भिसे,श्री.दिलीप गायकवाड,श्री.सचिन सावंत,श्री.गणेश खंदारे उपस्थित होते. 

२४.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे उमरगा शहर अध्यक्ष श्री. राजेंद्र चुंगे ह्यांनी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण केलं आणि त्यामुळे मा. राजसाहेबांच्या आदेशानुसार श्री. चुंगे ह्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

२५.
महिला बचत गट यांच्या समस्या  सहकार सेना प्रदेश अध्यक्ष/प्रति मंत्रिमंडळ सहकार मंत्री श्री बापु धोत्रे व शेतकरी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री संतोष नागरजोगे यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे मांडल्या,राजसाहेबांनी निश्चितच मार्ग निघेल असे आश्वासक केले आहे.

२६.
ठाणे महानगरपालिकेकडून स्लम डेव्हलपमेंट मध्ये केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन
संबंधित दोषींवर कारवाई न केल्यास पुढच्या आठवड्या पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाण्यात करणार आंदोलन असा इशारा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी दिला आहे.

२७.
प्रलंबित तलाठी भरती पूर्ण करण्याबाबत श्री कल्पेश यादव यांनी अनेक दिवस पाठपुरावा केला,त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्री बाबासाहेब थोरात यांनी तसे निर्णय घेतले आहे,कल्पेश यादव यांचे आभार


धन्यवाद
*MNS Report Team*

#RajThackeray #AmitThackeray #MNS #मनसे
#MNSReport #MNS_Bulletin