Thursday 18 May 2017

जातीचं राजकारण

जातीचं राजकारण जोर धरताना दिसतंय आणि येणारी १० ते १५ वर्ष हे जर का असाच चालू राहील तर सामान्य माणसांना ज्यांना स्वतःच्या मूलभूत गरजा अन्न वस्र निवारा या साठी हि जातीचा आधार घ्यावा लागेल कि काय असा प्रश्न निर्माण होतो ?

मित्रानो माणूस म्हणून जागा लोकांसमोर एक चांगला माणूस म्हणून तुमची प्रतिमा तयार करा.पूर्वीचा काळ वेगळा होता आता काळ बदलत चाललाय स्वतःला बदलायला शिका. जातीचं राजकारण करणारे पुढारी तुमच्या डोक्यात विष काळतायत त्यांच्यापासून सावध रहा.

समाजाचं  भल्याची चर्चा करायची सोडून तुम्हाला हे पुढारी पुन्हा ६० वर्षे पाठीमागे घेऊन जातील . तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा कश्या पूर्ण करता येतील , आपल्या मुलांना कसे चांगले शिक्षण देता येईल याचा विचार करा . या पुढाऱ्यांच्या पाठीमागे धावण्यात आणि एकमेकांची डोकी फोडण्यात वेळ घालवू नका . हे पुढारी जशी तुम्हा  पाठीमागून जाणाऱ्यांची संख्या वाढेल तसे त्यांना राजकीय पक्ष विकत घेतील मग ते त्या राजकीय पक्ष्यांची भाषा बोलायला लागतील . मग तुम्ही त्यांच्या पाठीमागे फिरून काय साध्य करणार .

विचार करा वेळ अजून गेलेली नाही .

✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद

Wednesday 10 May 2017

आरक्षण

प्रत्येक समाज आरक्षण साठी रस्त्यावर आंदोलन करतोय आणि सामान्य, कष्टकरी, प्रामाणिक, जनतेला त्याचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम भोगावे लागतात , काहीजण तर आरक्षणामुळे देश सोडून चाललेत , मला कळत नाहीय आरक्षण घेऊन  फायदा होतोय तरी कुणाचा नक्की ???

स्वतःच्या हातात दम नाही का स्वतःचा विकास करायचा स्वतःचा विकास प्रथम करा मग आपोआप समाज सुधारला जाईल ...

मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत ... पण सत्यस्थिती अशी आहे की पुढारकी सामान्य जनतेला हाताशी धरून स्वतःचा फायदा करून घेतायत आणि आपण समाज समाज करत बसलोय.....

✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद