Tuesday 25 April 2017

दुसऱ्याच लिखाण प्रसारित

किती दिवस लोकांनी लिहिलेलं चांगलं वाटतंय म्हणून प्रसारित करणार, तुम्ही तुमचे विचार लोकांसमोर कधी मांडणार ?

स्वतः असं काहीतरी लिहा कि लोकांच्या मनात तुम्ही घर करून रहाल,लोक तुम्हाला वाचताना त्यांना प्रसन्न वाटेल .


Thursday 20 April 2017

समाज प्रभोधन आणि प्रश्न

मित्रानो,
समाज म्हणजे नेमकं काय ?

समाज म्हणजे जातबांधव ?
समाज म्हणजे आजूबाजूची लोक ?
समाज म्हणजे गरीब श्रीमंतांचा वेगवेगळा समूह ?
समाज म्हणजे कामगारांची पिळवणूक थांबवण्यासाठी एकत्रित झालेला कामगार समूह?

असे खूप प्रश्न मनात आहेत,तुम्हाला विनंती करतो कि तुम्हा सगळ्यांची समाज प्रति असलेली व्याख्या मला जाणून घ्यायची आहे....

समाज प्रभोधन बद्दल तुमचं मत हवंय,जेणेकरून मला अभ्यास करण सोपं जाईल ... तुमच्यामुळे समाज प्रभोधनाबद्दल माझ्या ज्ञानात भर पडेल.

✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद

मला राज ठाकरे का आवडतात ???

काही चुकलं असेल तर सुधारण्याची संधी द्या .....

मला राज ठाकरे का आवडतात ???

पहायला गेलं तर राज ठाकरेंचं दैनंदिन / वैयक्तित जीवन कस आहे याचा फारसा सामान्य जनता खूप कमी विचार करते , परंतु माझ्या माहिती प्रमाणे राज साहेब एक व्यक्तिमत्त्व म्हणून खूप प्रसिद्ध आहेत .

राज साहेब मला का आवडतात याची काही कारणे खालील प्रमाणे ,
१.ते खूप छान व्यंगचित्रकार आहेत .
२.त्यांना कलेबद्दल खूप आत्मीयता आहे.
३.त्यांना महाराष्ट्रा विषयी खूप प्रेम आहे.
४.त्यांना मराठी भाषे बद्दल आदर आणि प्रेम आहे.
५.त्यांच्या बोलण्यातून असे कळते कि ,त्यांनी आजूबाजूच्या राज्यांचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात केला आहे.
६.त्यांनी इतर देशांचा पण अभ्यास मोठ्या प्रमाणात केला आहे.
७.इतिहास वर त्यांची पकड आहे .
८.भौगलिक ज्ञान हि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आत्मसात केले आहे.
९.पाकिस्तान सारख्या मुद्दा जेंव्हा हातात घेतात तेंव्हा त्यांचे देशप्रेम किती प्रमाणात आहे याची माहिती मिळते
१०.नाशिक सारख्या शहराचा झालेला उलथापालथ पाहता, शहर कसे असावे त्याचे व्यवस्थापन कसे असावे, याबाबतीत त्यांचा नीटनेटकापणा समोर येतो .
११.ते एक उत्तम राजकारणी आहेत.
१२.त्यांना राजकारणामध्ये निर्णय घेताना दिल्ली ची वाट पाहावी लागत नाही.याचा अर्थ ते कुणावर हि अवलंबून नाहीत.
१३.स्फष्टोक्ती पणा त्यांच्या बोलण्यातून दिसतो,.
१४. http://mnsblueprint.org/ या वेब ला भेट दिली कि काळात कि महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणात्मक अभ्यास किती आहे.
१५. हि व्यक्ती जातीच्या राजकारणातून बाहेर आलेली एकमेव व्यक्ती आहे.

बोलायला गेलं तर खूप आहे या व्यक्तीबद्दल बोलण्यासारखं ,पण काही ठराविक मुद्दे मांडताना हि अंगामध्ये शहारे उभे राहिले अभिमान पण वाटला कि मी महाराष्ट्रात जन्माला आलो ,मी कार्यकर्ता म्हणून सदैव राजसाहेबांच्या विचारांशी जोडला जाणारच आहे  यात काही शंका नाही.

भविष्यात या व्यक्तीला भेटण्याची खूप इच्छा आहे .





✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद